गेल्या काही महिन्यांपासुन पुण्यात चिकुन्गुनिया सदृश एक नवीनच प्रकारचा विषाणुजन्य आजार पसरला आहे.
माझ्या माहितीतल्या घरटी एकातरी व्यक्तीस हा आजार झालेला मी ऐकला/पाहिला.
याची लक्शणे साधारण खालील प्रमाणे असतात :
- थंडी वाजुन अतिशय तीव्र स्वरुपाचा ताप येणे ( १०२ ते १०४ )
- सांधे,स्नायु दुखणे
- ताप उतरला की ३-४ दिवसांनी अंगावर रॅशेस येणे
- क्वचित जुलाब्/उलटी असा त्रास
ताप १-२ दिवसात कमी होतो. पण थकवा बराच राहातो.
डेंगु आणि चिकुन्गुनिया दोन्हीच्या टेस्ट निगेटीव्ह येतात.पण प्लेटलेटस काही प्रमाणात कमी होतात.
ताप उतरला आणि रुग्ण पूर्ण बरा झाला तरी पुढे कित्येक दिवस सांधे व स्नायु आखडणे व दुखणे असा त्रास होतो.
मला अशाप्रकारचा ताप येउन उद्या ७ आठवडे पूर्ण होतील.
परंतू अजुनही मला प्रचंड सांधेदुखी आणि स्नायुदुखी चा त्रास होत आहे.ऑफिसमद्धे एसी मधे बसुन अजुनच त्रास होतो.रोज एखादे नवीनच हाड जास्त दुखायला लागते.८ आठवडे सांधेदुखी राहिल असे डॉकटर म्हणाले होते त्यानुसार आत्तापर्यंत दुखणे कमी व्हायला हवे होते पण तसे काही लक्षण दिसत नाहिते.
त्यामुळे आता माझे पेशन्स पण संपत चाललेत. माझ्या ओळखिच्या बर्याच जणांना सेम त्रास चालु आहे.
यावर खात्रीशीर ईलाज किंवा औषध उपलब्ध आहे का ?
मिपा वर कोणाला अशाप्राकारचा त्रास झाला आहे का ? असल्यास काय उपाययोजना केली ?
होमिओपॅथी चा सांधेदुखी साठी फायदा होतो असे ऐकले आहे ? हे खरे आहे का ?
ईथल्या जाणकार डॉक्टरांचा सल्ला काय आहे ?
याविषयावर ईथे तुम्हा सगळ्यांची मतं जाणुन घेण्यासाठी हा धागा.
प्रतिक्रिया
10 Oct 2016 - 3:18 pm | शाम भागवत
याबाबत खालील ४ गोष्टी ऐकण्यात आल्या.
१) रोज व्यायाम करणार्यांना याचा फारसा त्रास होत नाही.
२) प्रतिकार शक्ती चांगली असेल तर दुखणे लवकर बरे होते.
३) पावसा ळी हवेत याचा जास्त प्रादुर्भाव होतो व उन पडायला लागून हवा कोरडी व्हायला लागली की हा रोग आटोक्यात येऊ लागतो.
४) साधारणतः दोन महिने पर्यंत सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो.
10 Oct 2016 - 3:19 pm | शाम भागवत
खखोदेजा
हे लिहायचे राहिलेच.
10 Oct 2016 - 3:32 pm | रेवती
उपाय माहित नाही गं.
माझ्या आईला असा ताप येऊन गेला पण अजूनही सांधेदुखी व अशक्तपणातून मुक्तता मिळालेली नाही. अगदी वेदनादायक अनुभव आहे असे ती नेहमी सांगते. अगदी झोपून म्हणजे झोपून रहावे लागतेय. अनेकांना असेच दुखणे आहे असे ऐकल्याने आता अस्वस्थपणा आलाय.
11 Oct 2016 - 10:50 pm | मोहन
समस्या बिकट आहे.
खरच कोणाला उपाय माहिती असल्यास कृपया या धाग्यावर सांगावेत.
11 Oct 2016 - 10:54 pm | खटपट्या
घरातील दोन व्यक्ती याच आजाराने त्रस्त आहेत. त्यातील एकीला "डेंग्यू होता पण आता रीकवर झालाय" असे सांगीतलेय. :( काळजी घ्या सर्वांनी.
-घरात साचलेले पाणी ठेउ नका कुठेही. मासे ठेवायचे टँक,
-कुंड्याच्या खाली ठेवतात त्या थाळ्या.
-फ्लॉवर पॉट्स
काळजी घ्या
11 Oct 2016 - 11:30 pm | बॅटमॅन
बाकी माहिती नाही, पण पाणी उकळलेले किंवा प्यूरिफायरवालेच घ्या. माझा ताप लगेच उतरला पण सर्दी व खोकला आहे अजून.
12 Oct 2016 - 12:40 am | भीमराव
आर मला पन सेम सेम झालेला आजार, पहिल़्या दिवशी ताप आला, डोक भयानक दुखत होतं, ताप १०३, दोन दिवसांनी ताप कमी झाला पन आगदी प्रत्येक पार्ट ना पार्ट दुखत होता, चालता सुद्धा येत नव्हत, एक एक पाऊल कष्टाने उचलुन टाकावे लागत होते, डोळे सुजुन लाल झालेले, व बुबुळांचा दाह व वेदना होत होत्या. प्लेटलेट्स काउंट १.५, पांढरे पेशी सुद्धा कमी झालेल्या. नंतर चाैथ्या रात्री सगळं त्वचेची आग व्हायला सुरुवात झाली, त्यात आणखी ताप आलेल्या दिवसापासनं जेवण जाईना झालतं, सगळी बोंबाबोंब, मला तर वाटलेलं बहुतेक अापलं आता काय खरं नाय. महीनाभर अशक्तपना राहीला अंगात, आता निट झालोय परंतु डाव्या पायाच्या गुडघ्याच स्नायु बेक्कार दुखतोय.
डेंगु-चिकुन गुनिया च्या टेस्ट माझा सुद्धा निगेटीव आलेल्या.
12 Oct 2016 - 12:55 am | रेवती
वाईट्ट.
12 Oct 2016 - 9:18 am | निखिल इनामदार
mala pn same ajar zala ahe.
महीनाभर अशक्तपना राहीला अंगात, आता निट झालोय परंतु डाव्या पायाच्या गुडघ्याच स्नायु बेक्कार दुखतोय.
12 Oct 2016 - 10:43 am | मृत्युन्जय
याबाबत वर्तमानपत्रात बातम्या येउन गेल्या आहेत. माझ्या आईला सुद्धा हाच त्रास झाला. हीच लक्षणे. सांधे अजुन दुखतात. अशी अजुन बरीच उदाहरणे माहिती आहेत. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ना डेंग्युचे निदान होते ना चिकन्गुनियाचे. लक्षणे दोन्हींची दिसतात.
बहुधा ही डासांची नविन संकरित जात असावी. डेंग्यु आणि चिकनगुनियाच्या डास यांच्य नैसर्हिक अथवा अनैसर्गिक संकरातुन ही जात निर्माण झाली असावी. ज्या मोठ्या प्रमाणावर याचा प्रादुर्भाव झ्झाला आहे ते बघता हे नैसर्गिक वाटत नाही.
12 Oct 2016 - 12:49 pm | संदीप डांगे
शंभर टक्के सहमत,
दोन्ही रोगांची लक्षणे एकाच रोगात हे शंकास्पद आहे.
कदाचित लस वा औषधे तयार असतील किंवा भारतीयांवर प्रयोग चालू असतील..
12 Oct 2016 - 1:53 pm | अनिरुद्ध.वैद्य
कदाचित लस वा औषधे तयार असतील किंवा भारतीयांवर प्रयोग चालू असतील..
अगदी असेच स्वाईन फ्लुच्या दुसर्या साथीच्या वेळेस झाले होते! आणि डेंग्युवर २ ३ नव्या लसी बाजारात येत आहेत असे ऐकिवात आहे.
12 Oct 2016 - 12:58 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर
मला तर वाटतयं अमेरीकेने जेनेटिकली इंजिनिअर्ड व्हायरस भारतात सोडला असावा.
12 Oct 2016 - 5:33 pm | सिरुसेरि
कदाचित हा चिमेरा व्हायरस असावा .
12 Oct 2016 - 9:16 pm | एस
तज्ञांच्या मतांच्या प्रतीक्षेत.
12 Oct 2016 - 9:30 pm | स्रुजा
:( बर्याच जणांकडुन ऐकलं हे एवढ्यात. चिकनगुणिया पण पुन्हा वाढलाय म्हणे. घरात दोघींना झालाय. धागा वाचत राहणार.