आय.सी.यू.----एक आत्मचिंतन

वैशाली हसमनीस's picture
वैशाली हसमनीस in जे न देखे रवी...
26 Sep 2008 - 3:18 pm

आय.सी.यू .मध्ये कांही दिवस दाखल झालेले असताना मनात आलेले विचार मुक्तकाच्या रूपात मांडले आहेत.

आय. सी. यू. चा मॉनिटर

जणू सुतार पक्ष्याची टकटक

वाजवितो मृत्यू आपलेच गाणे.

व्हेंटीलेटरचा आवाज

वाजवितो त्यू आपल्याच घंटा!

आय‌. सी. यू. त चालते सारखीच गडबड,

नर्सेसची लगबग नि डॉक्टरांची धावपळ,

सगळ्यांचे प्रयत्न या तीरावर अडकविण्यासाठी

जीवाला घाई पैलतीर गाठण्यासाठी !

मधला तो काळाशार अंधार,

आणि समुद्राचा आवाज,

गुदमरून टाकणारा अन श्वास कोंडून ठेवणारा.

हे कोण कुजबुजले कानाशी,

''चल, येतेस का सफरीला?

जाऊन येऊ तिरुपतिला ! ''

'छट , मला नाही वेळ,

इथलीच कामे पडली आहेत,

साऱ्यांचीच देणी द्यायची आहेत,

कांही वचनेही पाळायची आहेत. '

''ठीक आहे. मर्जी तुझी''

'माझ्याच बागडणाऱ्या मुलांसाठी

मला जगायचे आहे. '

मॉनिट्र टकटकतो आहे,

'आ. सी. यू. '

मी पाहत आहे बरे,

एकवार संधी दिली आहे''

एक सत्य मात्र मला उमगले आहे

मॉनिटरवरच सर्व जग जगते आहे,

त्याच्या असण्यानसण्यावरच जीवन फुलते आहे !

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

जैनाचं कार्ट's picture

26 Sep 2008 - 3:21 pm | जैनाचं कार्ट (not verified)

वा वा !

छान ! मस्त कविता आहे !

कोण कुजबुजले कानाशी,

''चल, येतेस का सफरीला?

जाऊन येऊ तिरुपतिला ! ''

'छट , मला नाही वेळ,

इथलीच कामे पडली आहेत,

साऱ्यांचीच देणी द्यायची आहेत,

कांही वचनेही पाळायची आहेत. '

एकदम मनातील कडवं !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

मनीषा's picture

26 Sep 2008 - 11:53 pm | मनीषा

मला जगायचे आहे. '

मॉनिट्र टकटकतो आहे,

'आ. सी. यू. '

मी पाहत आहे बरे,

एकवार संधी दिली आहे''

एक सत्य मात्र मला उमगले आहे

मॉनिटरवरच सर्व जग जगते आहे,

त्याच्या असण्यानसण्यावरच जीवन फुलते आहे !

खूप छान लिहिले आहे ............

प्राजु's picture

26 Sep 2008 - 11:57 pm | प्राजु

आत्मचिंतन आवडले..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

धनंजय's picture

27 Sep 2008 - 6:19 am | धनंजय

हाताळणी आवडली.

विसोबा खेचर's picture

27 Sep 2008 - 8:48 am | विसोबा खेचर

लै भारी कविता....!

आपला,
(ओपीडीतला पेशंट) तात्या.