मोदींचे स्वातंत्र्यदिनाचे पूर्ण भाषण नाही ऐकले पण बलुचिस्तान चा उल्लेख ऐकला. अक्षरश: दोनच वाक्यं...
त्यानंतर गूगल ट्रेंड्स वर जाऊन पहातो तो काय! बलुचिस्तान ला हा स्पाईक आलेला! सर्व जग शोधू लागले कि नक्की हा काय प्रकार आहे? मलाही शोधता शोधता पन्नास-एक पुस्तके सापडली बलुचिस्तान च्या इतिहासावर! वाटलं हे सारे जगापुढे आले पाहिजे.अभ्यासकांना मिळालं पाहीजे. लगेच टाकून दिली ती जाल संग्रहात (जिज्ञासूंसाठी लिंक) (पृष्ठावर ctrl +F करून balochistan हा शब्द शोधावा ). असो, काश्मिरात वळवळणारे नापाक बोट आपण छाटू शकत नाही आता, तर निदान नाक तरी दाबावे म्हणजे तरी बोट शांत होईल!
काय वाटते? काय भूमिका असावी आपली एक दक्ष आणि जागरूक भारतीय नागरिक म्हणून?
आपण बलुचिस्तान मध्ये होणाऱ्या स्थानिक बलूच व बुगटी मराठा वा अन्य मराठा जमातींवर होणारा अन्याय हिरीरीने जगापुढे आणावा का? तुटुदेत का पाकचा आणखी एक तुकडा?
बलुचिस्तान : आपण नक्की काय करावे?
गाभा:
प्रतिक्रिया
13 Sep 2016 - 4:36 am | दासबोध.कॊम
क्षमा असावी. पूर्वीचे काथ्याकूट वाचले नाहीत हा धागा सुरु करण्यापूर्वी. तरी कृपया थेट काय करता येईल हा उपाय सांगावा.
उदा. 1) वेबसाईट चालविणे
2) व्हिडीओ बनविणे
3) वृत्तपत्रात लेख लिहिणे
म्हणजे धागा आखूड राहील.
मनापासून विचारतोय हे प्रश्न, त्यामुळे गांभीर्याने उत्तरे द्यावीत हि अपेक्षा.
13 Sep 2016 - 6:55 am | मंदार कात्रे
तुटुदेत का पाकचा आणखी एक तुकडा? +१००
13 Sep 2016 - 8:32 am | फेदरवेट साहेब
आपण काय करावे???
इंदरकुमार गुजराल/ मोरारजी देसाई छाप बावळटपणा बंद करावा, एकदा केलेली चूक असते, दुसऱ्यांदा झाली की तो मूर्खपणा होतो.
13 Sep 2016 - 8:56 pm | रमेश आठवले
सध्या भारत पाकिस्तान मध्ये एकतर्फी व्यापार करार आहे. म्हणजे आपण Most Favored Nation या तहा प्रमाणे पाकिस्तान ला तेथून येणाऱ्या मालावर जकात सवलती देतो .पण जगात बाकी देश एकमेकांना तीच सवलत देण्याचे बंधन पाळतात तसे पाकिस्तान करत नाही.पाकिस्तान ही सवलत भारतातून पाठवल्या जाणाऱ्या मालावर देत नाही. सबंध इतके बिघडल्या नन्तर तरी हे पाकिस्तान धार्जिणे एकतर्फी धोरण बंद करायला हवे,
आणखी एक विचित्र बाब म्हणजे अफगणिस्तानला त्याच्या भारताला निर्यात केलेल्या मालाला वाघा सरहद्दीवरून भारतात पाठविण्यास पाकिस्तान परवानगी देतो पण भारताला मात्र त्याच मार्गाने अफगाणिस्तान ला माल निर्यात करू देत नाही.
13 Sep 2016 - 9:09 pm | आदूबाळ
इंट्रेष्टींग माहिती! पाकिस्तान भारताला एमएफएन स्टेटस २०१२ साली देणार होता ते घडलं नाही का?
13 Sep 2016 - 11:12 pm | रमेश आठवले
http://www.thehindu.com/news/international/south-asia/pakistan-in-no-moo...
भारताने पाकिस्तानला MFN सवलत १९९६ साली दिली . पाकिस्तानने अजून तरी तसे केलेले नाही.
महात्मा गांधी यांच्या शत्रूने एका गालात थप्पड मारली तर दुसरा गाल पुढे करावा असे म्हटले होते. ते धोरण आजही पुढे चालवले जात आहे असे वाटते .
13 Sep 2016 - 8:43 am | साहना
बेडकाने बैल होऊ नये. खरोखर भारताकडे त्या प्रकारची ताकद आहे का ? मोदी सरकार गेल्या नंतर सुद्धा भारत त्या दृष्टीने पाऊले उचलेल का (लॉन्ग टर्म कमिटमेंट) ?
माझ्या मते आपल्या भक्तांना खुश करण्यासाठी बलुचिस्तानचा जुमला मोदी साहेब फेकत आहेत.
बलोचिस्तानचा इशू नक्की काय आहे हे समजल्या शिवाय आपण त्यात पडू नये.
13 Sep 2016 - 12:12 pm | alokhande
मला वाटते की भारताने बलुचिस्तान वेगळा करू नये कारण की ही जखम कायम तशीच ठेवावी कारण आपण ह्या जखमेवर उपचार केले तर ते उद्या आपल्या मुळावर उठणार नाहीत हे कशावरून ? पुर्व पाकिस्तान (बांगलादेश) वेगळा करून आपण त्याचे परिणाम भोगत आहोत पाकिस्तानला बलुचिस्तान मधे गुंतवून ठेवण्यात भारताला फायदा होईल त््ात्यात पाकिस्तान ची शक्ती पैसा आणि वेळ खर्च होइल
13 Sep 2016 - 1:23 pm | कपिलमुनी
महाराष्ट्र- कर्नाटक सीमा प्रश्नात तुम्ही काय केलात?
13 Sep 2016 - 2:09 pm | दासबोध.कॊम
काश्मीरहून आकाराने बराच मोठा असलेला, स्वतंत्र भारतात राहू इच्छिणारा, पाकड्यांनी १९४८ मध्ये बळकावलेला, बलुचिस्तान हा महाप्रांत...
बरीचशी लोकसंख्या मराठी पाळेमुळे असणारा! इथे मराठ्यांच्या अनेक उप जाती आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत.
बुगटी मराठा, काल्पर मराठा, नोथानी मराठा, शांबानी मराठा,मसोरी मराठा, पिरोजानी मराठा ,रहेजा मराठा, मर्री मराठा , मझारी मराठा, रायसानी मराठा , गुरचानी मराठा, साहु (शाहू) मराठा,गढवानी मराठा , रंगवानी मराठा, पेशवानी मराठा, किलवानी मराठा,दरुरग मराठा या त्यातल्याच काही पोटजाती...
इथे आजही अम्मीजान ला आई म्हणतात, याहून वेगळा बलुचींच्या मराठीपणाचा पुरावा काय हवाय!
तर आज कधी नव्हे तो हा बलुची मराठा समाज स्वातंत्र्येच्छेने भारलेला दिसतोय!
त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद घालत आपल्या पंतप्रधानांनीही स्वतंत्र बलुचिस्तानच्या आशा आकांक्षा जागतिक पटलावर प्रथमच मांडलेल्या आहेत!
अशा प्रसंगी आपल्या या पानिपतकालीन पूर्वजांना पुन्हा स्वतंत्रतेचा श्वास मिळवून देणे ही आपली आद्य नैतिक जबाबदारीच ठरते! हे काम फ़क्त महाराष्ट्रच करू शकतो! या बलुचिस्तानचा इतिहास खालील ५० हून अधीक दुर्मिळ पुस्तकांच्या माध्यमातून जाणून घेऊयात!
त्यांचा जगभर प्रचार व प्रसार करुयात व आपल्या बांधवांना मुक्त करण्याचे पुण्यकर्म करुयात!
पुस्तके खालील लिंकवर वाचा (Ctrl+F करून Baloch हा शब्द शोधा)
http://www.dasbodh.com/p/blog-page_707.html
13 Sep 2016 - 7:01 pm | शाम भागवत
बापरे.
दासबोध.कॉमच्या श्रेयनामावलीत संघ प्रमुखांचे नाव आहे शिवाय बाबासाहेब पुरंदर्यांचेही नाव आहे म्हणजे बर्याच जणांना ही साईट वर्ज असणार आहे.
दुसरे म्हणजे तुम्ही चक्क अभ्यास करून मीपावर या अस सांगतय. उथळ पाण्याला खळखळाट असतो हे तुम्हाला माहित नाही का?
:))
मात्र बोकाभाऊ, ट्रूमन , क्लिंटन, प्रचेतस वगैरेंनी ही साईट अगोदरच पाहिली असेल म्हणा.
एक सुंदर व प्रचंड परिश्रमानी बनवलेली व अभिमान वाटावा अशी साईट बद्दलची माहिती दिल्याबद्दल
_/\_ _/\_ _/\_
14 Sep 2016 - 7:27 am | फेदरवेट साहेब
किती ती चारआण्यांची मानसिकता अन आपला आपला कंपू स्थापन करायची घिसाडघाई.
13 Sep 2016 - 9:40 pm | चित्रगुप्त
दासबोध.कॉम वर जुनी दुर्मिळ ७७८ पुस्तके (मराठी, आंग्ल, गुजराती, बंगाली वगैरे -- आणि त्यांच्या विषयांची व्यापकता ) ऑनलाईन वाचनासाठी उपलब्ध असलेली बघून अक्षरशः स्तिमित झालेलो आहे. यासाठी धागाकर्त्याचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत.
प्रत्येक मिपावाचकाने एकदातरी या ग्रंथ-खजिन्यावर नजर टाकावी. (सर्वात शेवटी असलेल्या 'sitemap' वर या ग्रंथांची यादी सापडेल).
13 Sep 2016 - 9:51 pm | प्रचेतस
ती आधीच टाकलेली होती.
फ़्याण्टास्टीक संग्रह आहे.
16 Sep 2016 - 4:48 pm | प्रीत-मोहर
__/\__
अफाट आहे. धन्यवाद हे आम्हाला उपलब्ध करुन दिल्याबद्दल आता एकेक करुन पुस्तके वाचायला सुरवात करते
14 Sep 2016 - 3:06 pm | दासबोध.कॊम
ग्रंथसंग्रहप्रशस्तीबद्दल आभार...
सरसंघचालकांचे नाव टाकण्याचे कारण असे की सज्जनगडासंबंधित एका कार्यक्रमात त्यांची प्रत्यक्ष भेट झाली, काही चर्चा झाली व संकेतस्थळासंदर्भात मौलिक मार्गदर्शन मिळाले. बाबासाहेबांचे इतिहास क्षेत्रावर न फ़िटणारे ऋण आहेच हे इतिहास अभ्यासकच मान्य करतात.वैचारिक मतभिन्नता असणा-यांनी श्रेयनामावली वाचून कृपा करून इतका अनमोल ग्रंथसंग्रह पहाण्याची संधी वाया दवडू नये...या कार्यार्थ मदत झालेल्या "काही" लोकांची नावे तिथे टाकली नाहीत तर रोष पत्करण्याची भीती असते. अशीही काही नावे आहेत. असो हे विषयांतर होते आहे,
आजच अमेरिकेने आमचा स्वतंत्र बलुचिस्तानला पाठिंबा नसून अखंड पाकिस्तान हेच आमचे धोरण आहे हे बोलून आपले खायचे दात दाखविलेले आहेत!
15 Sep 2016 - 12:54 pm | मारवा
तुमचा ग्रंथसंग्रह भारी आहे.
मला विशेषतः
फारसी मराठी शब्द कोश
ब्रिटीश बिगीनिंग्ज इन वेस्टर्न इंडिया
पुना अखबार
हे उतरवुन घेतांना मोठा आनंद झाला.
आपले अनेक अनेक आभार
साइट दरोडा टाकण्यायोग्य आहे.
17 Sep 2016 - 3:16 pm | आदूबाळ
हे पूना अखबार मला डाऊनलोड करता येत नाहीयेत. कोणी मदत करू शकेल का?
17 Sep 2016 - 3:38 pm | दासबोध.कॊम
डाउनलोड करता येई नाही आहे म्हणजे नक्की काय होते आहे?
ड्राईव्ह वर गेलात की उजवीकडे डाउनलोडचा बाण येतो पहा..त्यावर च्लिक केले कि होइल डाउनलोड...
तरी जमले नाही तर सांगा, इमेल करतो.
18 Sep 2016 - 1:08 pm | आदूबाळ
Drive वरच जाता येत नाहीये! नुसतंच टेक्स्ट दिसतंय, लिंक गायब!
16 Sep 2016 - 4:04 pm | दासबोध.कॊम
धन्यवाद मारवा! या ग्रंथांचे रसग्रहण अथवा त्यातील काही वाचनातून केले गेलेले रंजक उद्बोधन वाचायला आवडेल सर्वांना़च!
चित्रगुप्तजी, एकून ग्रंथसंख्या ७७८ नसून केवळ शिवाजी महाराज या पृष्ठावरील ग्रंथांची ती संख्या आहे,
त्या खेरीज, समर्थ वाङ्मय, रामदासी वाङ्मय , समर्ह चरित्रे इ. पृष्ठांवरील ग्रंथसंख्या पकडली तर सुमरे हजार एक ग्रंथ सध्या आहेत येथे व दररोज नवनवीन ग्रंथांची भर पडतेच आहे...
17 Sep 2016 - 3:30 pm | अजया
_/\_
5 Oct 2016 - 9:20 am | सतोश ताइतवाले
आता खूप झाली सहन शिलता किती दिवस हे असा चालणार
कोणीही उठतो बिनधास्त कोणत्याही शहर मध्ये
घातपात हत्या करतो
आपण पाकिस्तान मधील फुटीर वाद्यांना
छुपा पाठिंबा देऊन पाकिस्तान मध्ये
अस्तिरता पसरवली पाहिजे
जास्तच तसे वागल्या शिवाय
शांतात मिळणार किंवा लाभणार नाही