प्रस्तावना
"आर्म्ड फ़ोर्सेस स्पेशल पॉवर्स अॅक्ट" उर्फ़ AFSPA. हा भारतीय संसदेने मंजुर केलेला सशस्त्र लष्करी/निमलष्करी/ अर्ध्वलष्करी दलांना विशिष्ट परीस्थीतीत विशिष्ट भौगोलिक क्षेत्रांतर्गत कारवाई करतांना विशेषाधिकार देणारा एक जुना वादग्रस्त कायदा आहे. या कायद्याचा एकुण प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा व अनेक पैलु असणारा आहे. या लेखाची मांडणी माझ्या सोयीसाठी मी खालीलप्रमाणे तीन भागात करायची असे ठरविले आहे.
पहीला भाग- Basics- या भागात या कायद्याच्या ऐतिहासिक पार्श्वभुमी पासुन सुरुवात करुन ते , संबंधित राज्यातील याची अंमलबजावणी, यातील तरतुदी, संबंधित खटले, आयोग व इतर अनेक मुलभुत मुद्दे जो हा विषय मुळातुन समजण्यास माझ्या मते फ़ार आवश्यक आहेत ते माझ्या मर्यादीत कुवतीनुसार मांडतो.
दुसरा भाग- Arguments- पहील्या भागाची पार्श्वभुमी तयार झाल्यावर मग या कायद्यासंदर्भातील प्रत्यक्ष जे वादाचे विवीध मुलभुत मुद्दे आहेत त्यांचे किमान विवेचन एक एक मुद्दा घेऊन,त्यावर विवीध बाजुंची, पक्षांची, विरोधाची /समर्थनाची जी काय भुमिका/मांडणी आहे त्याचे विवेचन करतो.
तिसरा भाग- Solutions- तिसर्या भागात या कायद्याच्या समस्येसंदर्भात, या जटील प्रश्नावर जो मुळात सोशियो-इको-पॉलिटिकल आहे त्यावर विविध मान्यवरांनी आपल्या अनुभव व अभ्यासाने जे काही विविध उपाय सुचविलेले आहेत त्यांचे विवेचन करतो.
याशिवाय वरील तीन भागांच्या प्रमुख चौकटीच्या आत व क्रमात राहुन मग या कायद्यासंदर्भातील इतर अनेक लहान मोठ्या मुद्द्यांना माहीतीला अनुषंगाने घेत जातो. संस्थळ मर्यादेचे भान ठेऊन अगदी थोडक्यात मोजके मुद्दे मांडुन विस्तार नियंत्रणात ठेवायचा असे ठरविले आहे आता प्रत्यक्षात हे सर्व किती जमते ते बघु या. माझ्या लेखातील चुकांची दुरुस्ती, व आवश्यक मुद्यांची पुर्ति करणार्या प्रत्येक संभाव्य चिकित्सक जाणकार प्रतिसादकांचे व हा लेख वाचण्याचे कष्ट घेणार्या सर्वच वाचकांचे अगोदरच आभार मानतो.
ऐतिहासिक पार्श्वभुमी
थोडक्यात असे आहे की ब्रिटीशांनी सर्वप्रथम हा कायदा "छोडो भारत" चळवळ दडपण्यासाठी १५-०८-१९४२ ला पहील्यांदा आणला. यात सशस्त्र दलाच्या विशिष्ट केवळ वरिष्ठ स्तरांच्या अधिकार्यांना काही खास अधिकार देण्यात आले ज्यात आंदोलन दडपण्यासाठी प्रामुख्याने बळाचा वापर करण्याचा अधिकार (हा वापर शेवटी मृत्युस कारणीभुत झाला तरीही) , तसेच असा बळाचा वापर करणार्या अधिकार्यावर कायदेशीर कारवाईस केंद्र शासनाची (ब्रिटीश) परवानगी घेणे पिडीतांना बंधनकारक असेल इ. अशा स्वरुपाच्या तरतुदी करण्यात आल्या. यानंतर स्वतंत्र भारतात १९४८ मध्ये फ़ाळणीच्या वेळेसची आणिबाणीची परीस्थीती हाताळण्यासाठी सर्वप्रथम हा कायदा वापरण्यात आला. व त्यानंतर पुढे अधिक परीपुर्णतेने /तरतुदींनी या कायद्याला दोन्ही सभागृहात २२-०५-१९५८ ला पास करण्यात आले. व The Armed Forces (Assam & Manipur) special Powers Act-1958 ( थोडक्यात AFSPA म्हणुया) हा कायदा अस्तित्वात आला. नावाप्रमाणेच हा कायदा त्यावेळेच्या आसाम मणिपुर प्रांतातील अत्यंत अस्थिर अशा परीस्थीतीला नियंत्रणात आणण्याच्या हेतुने बनविलेला होता. त्या काळापासुन ईशान्य राज्यातील अनेक नागा व इतर आदिवासी जमातींचा स्वतंत्र भारतात सामील होण्यास तीव्र विरोध होता.पहील्या सार्वत्रिक निवडणुकीवर त्यांनी बहिष्कार टाकलेला होता व रेफ़रेंडम ची मागणीही केली होती. व त्या विरोधातील त्यांनी चालवलेल्या हिंसाचाराला आंदोलनाला नियंत्रणात आणण्यासाठी हा कायदा बनवला गेला. तेव्हा या प्रस्तावित कायद्यावरील चर्चेत तत्कालिन गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी हे बिल सशस्त्र दलांना या प्रांतात चाललेल्या लुटीला, जाळपोळीला, नियंत्रणात आणण्यास उपयुक्त ठरेल असे म्हणत या कायद्याचे समर्थन केलेले होते. यावर संसदेत सात तास चर्चा चालली याला प्रखर विरोधही झाला होता. उदा. तत्कालिन मणिपुरचे खासदार लाइशराम सिंग यांनी याला " लॉ लेस लॉ " असे म्हणत यास तीव्र विरोध केला होता. मात्र अखेरीस हा कायदा फ़क्त ६ महीन्यासाठीच ठेवण्यात येइल असे आश्वासन देत हा कायदा मंजुर करवुन घेण्यात आला. ब्रिटीश १९४२ च्या कायद्यात केवळ कॅप्टन व त्यावरील वरीष्ठ अधिकार्याला हे बलप्रयोगाचे (ठार मारण्याइतपत ) विशेष अधिकार होते भारतीय १९५८ च्या कायद्यात हेच अधिकार खालच्या पातळीपर्यंत हवालदार/जमादार पर्यंत व नॉन कमिशन्ड दर्जाच्या अधिकारी पर्यंत प्रदान करण्यात आले. तसेच मुळ ४२ च्या कायद्यात नसलेले एखाद्या संशयित ठिकाणावर/ इमारतीत सर्च विदाउट वॉरंट व प्रसंगी एखादी इमारत बॉम्ब टाकुन नष्ट करण्याचे/ उडव्ण्याचे अधिकार ५८ च्या कायद्यात देण्यात आले. पुढे १९७१ मध्ये मणिपुर ,मेघालय, त्रिपुरा यांची स्वतंत्र राज्य म्हणुन निर्मीती झाल्यावर पुन्हा एकदा मोठे बदल व तरतुदीत वाढ होत. The Armed Forces (Amendment) special Powers Act-1972 या कायद्याची निर्मीती झाली.
मुळ ६ महीन्यापुरताच अपेक्षित कायदा आज जवळ जवळ ६० वर्षे सातत्याने मणिपुर व ईशान्य राज्यांत काही भौगोलिक प्रदेश वगळता विशेषत: मणिपुरमध्ये ( इम्फ़ाळ म्युनिसीपल एरीया इ. अगदी अलीकडच्या काळापासुन वगळता ) आजही अस्तित्वात आहे व मुळपेक्षा अधिकच्या जाचक तरतुदींनी अस्तित्वात अंमलात आहे. एकुण भारतात आजवर तीन प्रदेशात हा कायदा प्रत्यक्षात अंमलात आणला गेला आहे. त्यात पंजाब राज्यात खलिस्तान वादी फ़ुटीरतावादी चळवळी विरोधात १९८३ ते १९९७ या १४ वर्षाच्या कालावधीसाठी हा कायदा वापरला गेला. १९९७ मध्ये १४ वर्षांच्या दीर्घ कालावधी नंतर एकंदरीत पंजाबची गाडी रुळावर आल्यानंतर हा कायदा उठवण्यात आला तेव्हापासुन आजवर पंजाबमध्ये हा कायदा पुन्हा वापरला नाही. तसेच १९९० पासुन ते आजपर्यंत जम्मु काश्मीर राज्यात हा कायदा साधारण २५ वर्षांहुन जास्त काळ अस्तित्वात आहे. आणि तिसरा प्रदेश सर्वसाधारणपणे सातही ईशान्य राज्यांत त्यातही प्रामुख्याने विशेषत: मणिपुर राज्यात सर्वाधिक काळ १९५८ ते आजपर्यंत सर्वसाधारणपणे हा कायदा अंमलात आहे. अर्थातच हे ढोबळ विधान आहे यात अपवादही आहेत. यात त्रिपुरातुन व मिझोराममधुन हा पुर्ण उठवण्यात आला. शिवाय मेघालय च्या केवळ २० किलोमिटर सीमावर्ती विशिष्ट भागात तसेच आसाम च्या ही मोठ्या भागातुन व मणिपुरच्या ही काही उदा. म्युनिसीपल एरीया इम्फ़ाल इ. तुन हा उठवण्यात आलेला आहे. मात्र याच बरोबर ईशान्य राज्यांतील अनेक ठीकाणी हा कायदा अजुनही अस्तित्वात आहे त्यातही सर्वात प्रामुख्याने मणिपुर राज्यात. आता अगदी अचुक विदा की सध्या नेमका कुठुन उठवण्यात आला व कुठे अंमलात आहे तो माझ्याकडे नाही. मात्र अजुनही एका मोठ्या भुप्रदेशात व मोठ्या लोकसंख्येवर याचा प्रत्यक्ष अंमल सुरु आहे व हा रद्द झाला नाही इतके सध्यासाठी आपल्याला पुरेसे आहे. याची राज्यागणिक वेगळी नावे आहेत व थोडाफ़ार मामुली फ़रक राज्यागणिक कायद्यात असला तरी सर्वसाधारण वादग्रस्त तरतुदी सर्वत्र समान आहेत. त्यातील फ़रक व नावे मी देत बसत नाही. व अॅफ़्स्पा म्हणतो तेव्हा सर्वसाधारण अर्थाने ते घ्यावे. त्याने मोठा फ़रक पडणार नाही याची खात्री मी देतो. म्हणजे अॅफ़्स्पा पंजाब व अॅफ़्स्पा मणिपुर च्या प्रमुख तरतुदीं मध्ये फ़ार मोठा फ़रक नाहीच. जे आहे ते किरकोळ व नावात व काही चिल्लर बाबतीत तरतुदीत आहे ज्याने मुळ विषयाला धक्का लागत नाही.
अॅफ़्स्पा कायद्याचा विरोध व आंदोलने.
या कायद्याला अनेक मानवी हक्क संघटना, नागरीक संघटना इ. चा प्रखर विरोध होत आलेला आहे. यात अग्रगण्य उदाहरण म्हणजे इरोम शर्मिला यांचे या कायद्याविरोधातील १६ वर्षे चाललेले दिर्घ उपोषण. "मालोम" ला १० जणांची चकमकीत आसाम रायफ़ल्स कडुन हत्या झाल्यावर त्यांनी हे उपोषण सुरु केले होते. १९७२ मध्ये जन्मलेल्या, १२ वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या, कविता लिहीण्याची आवड असलेल्या एका कवितेत " आय वुइल स्प्रेड द फ़्रॅगरन्स ऑफ़ पीस " असे म्हणणार्या इरोम शर्मिला यांनी हे उपोषण नुकतेच थांबवले्ले आहे. व राजकारणात येऊन या कायद्याला रद्द करायचे असे ठरवले आहे. शिवाय त्यांनी आता डेसमंड कॉथियो यांच्याशी विवाह करुन सामान्य जीवनात परतण्याचाही निर्णय घेतलेला आहे त्या म्हणतात त्यांना कोणी देवी संत वगैरे म्हणु नये मी एक सामान्य स्त्री आहे व शांती साठी संघर्ष करणारी इतकीच माझी ओळख असावी असे त्या म्हणतात. यावर मोठी टिका व वाद ही झाला. सुरुवातीच्या ३ ते ४ वर्षे फ़ारशी दखल न घेतली गेल्यावर मात्र नंतर हळुहळु त्यांच्या आंदोलनाचा मोठा प्रभाव जनमानसावर पडला. व अॅफ़्स्पा चा मुद्दा ऐरणीवर किमान चर्चेत आला. हे आंदोलन झाले नसते तर कदाचित हा मुद्दाच अजुन मुळात इतक्या लोकांपर्यंत पोचला नसता असे म्हणण्यास नक्कीच वाव आहे. इतकी टोकाची उदासीनता, उर्वरीत भारतीयांची या प्रश्नाबाबत व एकुण ईशान्य राज्यांबाबत आहे. काश्मीरमुळे थोडा अॅफ़्स्पा चर्चेत यायला मदत झाली. ( इथे प्रामुख्याने मी ईशान्य राज्यांतील अॅफ़्स्पावर केंद्रीत लिखाण केलेले आहे. काश्मीरपेक्षा अनेक बाबतीत ईशान्य राज्यांतील अॅफ़्स्पाचा प्रश्न फ़ार भिन्न स्वरुपाचा आहे.)
तसेच दुसरी एक मोठी घटना म्हणजे २००४ मध्ये थंगजम मनोरमा नावाच्या एका तरुण मुलीचा आसाम रायफ़ल्स च्या जवानांकडुन कथित अपहरण. बलात्कार व क्रुर हत्या झाल्यानंतर मणिपुरच्या १२ महीलांनी "इमां" नी आसाम रायफ़ल्स चे मुख्यालय असलेल्या कांगला फ़ोर्ट समोर अत्यंत आक्रमकतेने या विरोधात संपुर्ण नग्नावस्थेत उभे राहुन "इंडियन आर्मी रेप अस, किल अस " अशा घोषणा देत आक्रोश केला. यातील एक आंदोलक ग्यानेश्वरी यांनी मनोरमाचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये जाऊन बघितला होता मनोरमाच्या योनित १६ गोळ्या मारलेल्या आढळलेल्या होत्या. मृतदेह अत्यंत भयावह अवस्थेत होता. आउटलुकला दिलेल्या एका मुलाखतीत त्या म्हणतात 'I didn't know Manorama, but that such a terrible thing can happen, can be done to a girl, shocked me. There was so much cruelty...so gruesome that my heart bled. It was like vultures had preyed on her,' आसाम रायफ़ल्सचे म्हणणे की मनोरमा ही पीएलए ( पिपल्स लिबरेशन आर्मी एक दहशतवादी संघटना ) ची सदस्य होती व पळुन जाण्याचा प्रयत्न करतांना केवळ तिच्या पायावर गोळ्या झाडलेल्या होत्या. या घटनेने व यानंतरच्या उग्र आंदोलनांनी संपुर्ण मणिपुर ढवळुन निघाला होता व अॅफ़्स्पा विरोध प्रकर्षाने पुन्हा एकदा उफ़ाळुन समोर आला. व कधी नव्हे ते भारताच्या मुख्यप्रवाहातील माध्यमांनी याची दखल घेतली. यातली नमुद करण्यासारखी बाब म्हणजे इतका आक्रोश झाला तेव्हाच दखल घेतली गेली. याच १२ महीला एक वर्षानंतर दिल्लीत याच आंदोलनानिमित्त विरोधासाठी आल्या तेव्हा माध्यमांनी त्यांची कोणीही फ़ारशी दखल घेतली नाही. साधे म्हणणे ऐकुन घेण्यासाठी इतका किमान आक्रोश माध्यमांना आवश्यक होता. या संदर्भातील श्री अरीजीत सेन यांचा ईशान्य राज्यां संदर्भातील मुख्यप्रवाहातील माध्यमांच्या एकुण उदासीनते संदर्भात, ईशान्य राज्याच्या नागरीकांसंदर्भातील उर्वरीत भारतीयांच्या विचीत्र दृष्टीकोणाचा मानसिकतेचा, राजकीय धोरणांच्या संदर्भातील व त्यामुळे ईशान्यराज्यांतील नागरीकांना वाटणार्या "एलियनेशन" विषयी मार्मिक विवेचन करणारा पेपर Marginal on the map नावाने नेटवर उपलब्ध आहे.. आरएसएस च्या एका कार्यकर्त्याने मात्र तिथे राहुन या लोकांना मुख्य प्रवाहाशी जोडुन घेण्यासाठी चालवलेल्या एका अभियानाविषयी काहीतरी चांगले वाचलेले आठवते. (पुर्वी लोकप्रभात एक लेखमाला होती संदर्भ आठवत नाही ). मात्र राजकीय का हेतु असेना तो प्रयत्न फ़ार सकारात्मक वाटला होता आवडला होता. संदर्भ शोधुन देतो. तर या दोन आंदोलनां व्यतिरीत्क्त मग ग्राउंड लेव्हलवर अनेकोनेक नागरीक / विद्यार्थी संघटनांनी, मानवाधिकार संघटनांनी तसेच राजकीय संघटनांनी ही या कायद्याला मोठा विरोध केलेला आहे. व अत्यंत दिर्घकाळ असा एक न्यायालयीन संघर्ष या विरोधात केलेला आहे व अजुनही तो सुरु आहे. मात्र उर्वरीत भारतीयांना केवळ या दोन प्रमुख घटनांमुळे थोडाफ़ार हा विषय माहीत आहे अन्यथा एकंदरीत सर्वसाधारण काश्मीर सारखा हा विषय कधीच इतक्या मोठ्या प्रमाणात चर्चेत येत नाही त्याचीही अनेक कारणे आहेत हा वेगळा भाग.
अॅफ़्स्पा कायद्यातील काही महत्वाच्या / वादग्रस्त तरतुदी
तर नेमक अस काय आहे या कायद्यात ज्याला इतका प्रखर विरोध होतो व का होतो ? कुठल्या तरतुदींच्या अंमलबजावणीने/ वापराने गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत ? या कायद्यातील प्रमुख वादाचे केंद्र असलेल्या व इतर काही तरतुदी थोडक्यात पाहु या.
तर सेक्शन ४ अनुसार अॅफ़्स्पा कायदा लष्करी अधिकार्यांना सरकारने जो प्रदेश Disturbed Area म्हणुन घोषित केलेला आहे व ज्यात परीस्थीती नियंत्रणात आणण्यासाठी सैन्याची मदत घेण्यात आलेली आहे तेथील तैनात अधिकारीला जो ( Any commissioned officer, warrant officer, non-commissioned officer or any other person of equivalent rank in the armed forces may, in a disturbed area )—ला बलप्रयोग करण्याचा त्याला केवळ संशय आला व त्याचे तसे मत बनले इतक्याच कारणाने फ़ायरींग करण्याची ( मृत्युस कारणीभुत झाली तरीही ) परवानगी देतो.
(a) if he is of opinion that it is necessary so to do for the maintenance of public order, after giving such due warning as he may consider necessary, fire upon or otherwise use
force, even to the causing of death, against any person who is acting in contravention of any law or order for the time being in force in the disturbed area prohibiting the assembly of five or more persons or the carrying of weapons or of things capable of being used as weapons or of firearms, ammunition or explosive substances;
कुठलेही निवासी घर बिल्डींग शेल्टर जर त्याच्या मते समाजकंटकानी लपण्यासाठी वा हल्ल्यासाठी वापरले आहे असे मत बनले वा संशय आला तर ते बॉम्ब इ. ने उध्वस्त करण्याची उडवण्याची परवानगी देतो.
(b) if he is of opinion that it is necessary so to do, destroy any arms dump, prepared or fortified position or shelter from which armed attacks are made or are likely to be made or
are attempted to be made, or any structure used as training camp for armed volunteers or utilized as a hide-out by armed gangs or absconders wanted for any offence; या तरतुदीचा गैरवापर निवासी घरे उडवण्यासाठीही केलेला असल्याच्या तक्रारी आहेत.
यानुसार एखादी व्यक्ती गुन्हा करेल असा केवळ संशय असेल मत असेल तरी केवळ तितक्याच आधारावर वरील दर्जाचे अधिकारी त्याला "विदाउट वॉरंट" अटक करु शकतात. इथे विदाउट वॉरंट हा कळीचा मुद्दा आहे व त्यानंतर अशा व्यक्तीला २४ तासाच्या आत मॅजिस्ट्रेट समोर सादर करणे हा एक भाग आहे. याच्याही अनेक गैरवापराच्या तक्रारी आहेत
(c) arrest, without warrant, any persons who has committed a cognizable offence or against whom a reasonable suspicion exists that he has committed or is about to commit a cognizable offence and may use such force as may be necessary to effect the arrest;
कुट्ल्याही घरात केवळ संशयाच्या आधारावर घुसुन विना वॉरंट शोध घेण्याचे त्याचप्रणाणे प्रसंग पडल्यास बळाचा वापर करुन जप्ती करण्याचा इ. अधिकार देण्यात आलेले आहेत.
(d) enter and search, without warrant, any premises to make any such arrest as aforesaid or to recover any person believed to be wrongful restrained or confined or any
property reasonably suspected to be stolen property or any arms, ammunition or explosive substances believed to be unlawful kept in such premises, and may for that purpose
use such force as may be necessary, and seize any such property, arms, ammunition or explosive substances;
कुठलेही वाहन संशयावरुन थांबवुन झडतीच नव्हेतर थांबवण्यासाठी बळाचा पुर्ण वापर करण्याचे अधिकार दिलेले आहेत.
(e) stop, search and seize any vehicle or vessel reasonably suspected to be carrying any person who is a proclaimed offender, or any persons who has committed a noncognizable
offence, or against whom a reasonable suspicion exists that he has committed or is about to commit a noncognizable offence, or any person who is carrying any arms,
ammunition or explosive substance believed to be unlawfully held by him, and may, for that purpose, use such force as may be necessary to effect such stoppage,
search or seizure, as the case may be.
या संदर्भात काश्मीरच्या बडगाम येथील दोन मुलांनी चेकपोस्टवर गाडी न थांबवल्याने सैनिकांच्या गोळीबारात एका १४ व १९ वर्षीय मुलाचा मृत्यु झाल्याचे प्रकरण मोठे चर्चेत आलेले होते. इथे अर्थात अनेक मुद्दे आहेत उदा. आर्मीला दोन गुप्तचर संस्थांकडुन सुचना मिळालेली होती की काही आतंकवादी एक कार घेऊन जात आहेत दुसर या मुलांनी एकुण दोन चेकपोस्ट वर न थांबता ते तोडुन ते पुढे गेलेले होते हे सैन्याकडुन मांडण्यात आले होते व विरोधी बाजुने किमान टायरवर गोळी झाडायला हवी होती, किमान पायावर मारुन पाय तोडले असते इ. तसेच प्रतिकार नसतांनाही एकूण तब्बल्ल ११८ राउंड फ़ायर या मुलांवर का करण्यात आले इ. बाजु मांडलेल्या तर केसेस अशा अत्यंत गुंतागुंतीच्या व दोन्ही बाजुंनी आक्रमक आर्ग्युमेंट्स असलेल्या आहेत हे एक उदाहरण केवळ यासाठी दिले की एकेक तरतुद ही साधारण नाही व एक एक तरतुदीच्या वापरा/ गैरवापरावर अनेक प्रश्न व समस्या निर्माण झालेल्या आहेत हे लक्षात असु द्यावे..या सर्व "Sweeping Powers" आहेत व या कायद्यात फ़ारच कमी बाबतीत व्याख्या देण्यात आलेल्या आहेत हा ही एक मोठा आक्षेप आहे. उदा. due warning इ.इ.
तसेच क्रिमीनल प्रोसीजर कोड अंतर्गत दंगा नियंत्रणावेळेस दिल्या गेलेल्या पॉवर्स पेक्षा यांचे स्वरुप फ़ार भिन्न आहे. व कमीतकमी उत्तरदायित्व ठेऊन या अधिकाधिक पॉवर्स दिल्या आहेत.
शिवाय सर्वाधिक वादग्रस्त तरतुद आहे ती अशी की यात जर एखादा सैनिक दोषी असेल आरोप असेल तरी त्याच्यावर न्यायालयात खटला दाखल करायचा असेल तर त्यासाठी केंद्र शासनाची परवानगी अनिवार्य करण्यात आलेली आहे. उदा. जर वरील केसमधील मृताच्या संबंधितांना कोर्टात केस दाखल करायची असेल तर त्याला परवानगी आवश्यक आहे त्याशिवाय न्यायालय केसच स्वीकारत नाही.पोलिस तक्रार घेणार नाही, न्याय होणे बाजु ऐकली जाणे इ. फ़ार पुढच्या बाबी आहेत. इथे कोर्टापर्यंत पोहोचणचं मोठ अवघड करुन ठेवलेलं आहे. मुळ तरतुद अशी आहे की
No prosecution, suit or other legal proceeding shall be instituted, except with the previous sanction of the Central Government, against any person in respect of anything done or purported to be done in exercise of the powers conferred by this Act.
मिनीस्ट्री ऒफ़ डिफ़ेन्स मध्ये सैन्यदलाच्या सैनिकावरील कायदेशीर कारवाईची परवानगी मागावी लागते. तसेच अर्ध्वसैनिक दलाच्या सैनिका विरोधात केस दाखल करायची असेल तर अर्ज मिनिस्ट्री ऑफ़ होम अफ़ेयर्स कडे करावा लागतो. यावर अशी "Blanket Immunity " देण्यावर प्रचंड आक्षेप घेण्यात आलेले आहेत. सरकारला हा परवानगीचा अधिकार देण्याबाबत, यातुन होत असलेल्या अत्यंत मुलभुत अशा न्यायाच्या हक्काचेच सरळ उल्लघन होते अशी मोठी तक्रार आहे. अशा कायदेशीर कारवाईला परवानगी देण्याचे केंद्र शासनाचे प्रमाण अत्यल्प आहे. या संदर्भात एक माहीतीच्या अधिकाराखाली याचिका दाखल केलेली होती की किती अर्ज आले व किती अर्जांना केंद्र सरकारने न्यायालयीन खटला चालवण्यास ( केवळ खटला दाखल करण्यास ) परवानगी दिली तर त्याच्या उत्तरात जे आकडे आले ते धक्कादायक आहेत. हे सर्व आपण विस्ताराने पुढील आर्ग्युमेंट्स च्या भागात बघु. सध्या थोडी कल्पना यावी यासाठी इतके पुरेसे ठरावे.
याशिवाय अनेक बाबी आहेत पण इथे समावेश करणे शक्य नाही. आपण अजुन मोजक्याच प्रोसीजरल बाबी अगदी थोडक्यात फ़क्त बघु. उदा. एक बाब अशी की केंद्र सरकार किंवा राज्य सरकार एखादा परीसर भुप्रदेश अगोदर जर कायदा व सुव्यवस्थेची फ़ारच बिकट परीस्थीती निर्माण झाली तर "Disturbed Area" म्हणुन घोषीत करते. यात अगोदर राज्य सरकारलाच हा अधिकार होता त्यानंतर केंद्र सरकारची घटनेच्या एका कलमानुसार प्रत्येक राज्याचे बाह्य आक्रमण व आंतरीक यादवी पासुन संरक्षण करणे ही जबाबदारी आहे या आधारावर केंद्र सरकारलाही स्वत:हुन एखाद्या राज्याचे क्षेत्र "Disturbed Area" घोषीत करण्याचा अधिकार मिळाला. हा ही एक मोठा वादग्रस्त मुद्दा आहे. तर केवळ अशा "Disturbed Area" तच अॅफ़्स्पा लागु असतो. एरवी इतर कुठल्याही ठिकाणी हा लागु करता येत नाहे. एक प्रकारे आणीबाणी व एक्स्ट्रॉऑर्डीनरी सिच्युएशन्स मध्येच हा लागु होतो व व्हावा अशी अपेक्षा आहे. दर ६ महीन्यांनी याचा Review होतो व परीस्थीतीचा आढावा घेतल्यावर आवश्यकतेनुसार याला मुदतवाढ मिळते किंवा नाही. प्रत्यक्षात केवळ एकदा लागु झाल्यावर पंजाबमधुन हा १४ वर्षांनी उठवण्यात आला. जम्मु काश्मीर मध्ये गेल्या १९९० ते आजपर्यंत सतत 25 वर्षे अमलात आहे. व ईशान्य राज्यात ( काही अपवाद त्रिपुरा, आसामचा काही भाग मणिपुरचाही इम्फ़ाळ म्युनिसीपल एरीया इ नेमका विदा माझ्याकडे नाही. ) उठवलेला आहे. तरी मणिपुर व इतरही ईशान्य राज्ये जरी धरली तरी तब्बल जवळ जवळ ६० वर्षे अॅफ़्स्पा सातत्याने दर ६ महीन्याने मुदतवाढ मिळुन अंमलात आहे. विचार करा ६० वर्षे सातत्याने भारतातल्याच एका राज्याचे नागरिक एका वेगळ्याच कायद्याखाली जगत आहेत. हा इतका दिर्घकाळ अंमल अनेक प्रश्न निर्माण करतो. उदा. इतक्या दिर्घ वर्षात जर बळाच्या वापराने हा प्रश्न सुटतच नाही तर नक्कीच याची कारणे अधिक गुंतागुंतीची व खोलवर अशी सोशियो-इको-पॉलिटीकलच आहेत. आर्मी तर एक साधनासारखी केवळ वापरली जाते. जो कायदा केवळ आणीबाणीसाठी विशेष परीस्थीतीसाठीच आहे तो इतका दिर्घ काळ वापरणे योग्य आहे का ? ज्या सैन्याची मूळ रचना निर्मीती परकीय आक्रमण रोखण्यासाठी आहे त्याचा असा वापर आतंकवाद विरोध करतांना त्याच बरोबर नागरिकांविरोधातच त्यांच्या मुलभुत हक्काविरोधातच जर होत असेल तर ते योग्य आहे का ? सततच्या मिलीटरी प्रेझेन्स मुळे निर्माण झालेले अनेक गंभीर प्रश्नही आहेत जे सैनिकांच्या व नागरीकांचे दोहोंचे आहेत. एकुण लोकशाही राष्ट्र असलेल्या भारताच्या एखाद्या राज्याचे मिलीटरीलायझेशन करण्यासंदर्भातीलही आहेत. तसेच सेनेची सीमावर्ती भागातली तैनाती ही नागरी भागातील तैनातीपेक्षा अधिक महत्वाची आहे तिथुन मुळ नियंत्रण मिळवणे इ. व त्यावर भर असावा असेही एक सतत मत मांडण्यात येते.
अॅफ़्स्पा संदर्भातील महत्वाच्या केसेस व निकाल आणि आयोग व अहवाल.
या कायद्या संदर्भात विचार करतांना या कायद्याचा सखोल व्यवस्थित अभ्यास करुन ज्यांनी महत्वाचे मुद्दे सुचना मांडलेल्या आहेत अशा काही आयोग व त्यांच्या अहवाला मधील मुद्या संदर्भात जाणुन घेणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रंमाणे सुप्रीम कोर्टातील दोन केसेस अत्यंत महत्वाच्या आहेत त्याही बघणे अत्यावश्यक आहे
[१] Naga People,s Movement of Human Rights, V/s Union of India- 27-Nov.1997
.तर यातील पहीली केस "नागा पिपल्स मुव्हमेंट ऑफ़ ह्युमन राइट्स विरुद्ध युनियन ऑफ़ इंडिया" या केसला यापुढे "नागा केस" असे थोडक्यात लिहीत जातो. २७ नोव्हेंबर १९९७ मध्ये सुप्रीम कोर्टाने अॅफ़्स्पा संदर्भात दाखल केलेल्या या केसवर अतिशय महत्वाचा निकाल दिला होता यातील काही महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
१-अॅफ़्स्पा च्या घटनात्मक वैधतेवर (Constitutional Validity ) वर शिक्कामोर्तब केले होते.
२-केंद्र शासनाने अॅफ़्स्पांतर्गत केलेली सैन्य तैनाती ही केवळ "in aid of the civil power" च्या मर्यादेतच राहील हे स्पष्ट केले होते. इथे याचा अर्थ असा की ज्या राज्यात डिस्टर्ब्ड एरीयात सैन्याची नियुक्ती केलेली आहे. त्या राज्याचेच अंतिम शासन असेल. केंद्राच्या फ़ौजेची नियुक्ती हे तेथील स्थानिक राज्य सरकारच्या केवळ मदतीकरता आहे. या सेनेने राज्य सरकारच्या निर्देशानुसारच काम केले पाहीजे. हा कायदा राज्य सरकारला व त्याच्या सत्तेला पर्याय नाही. हा राजकीय दृष्ट्या महत्वाचा निर्णय आहे.
३-सेक्शन ३ खाली दिलेला अधिकार ज्याने एखादे राज्य वा त्यातील प्रदेश "Disturbed Area" म्हणुन गव्हर्नर इ. कडुन घोषित केला जाऊ शकतो. हा जो अधिकार आहे तो मनमानीपणे वापरता येणार नाही त्यासाठी ठोस कारणे असलेली कायदा व सुव्यवस्थेची गंभीर परीस्थीती निर्माण झालेली पाहीजे. शिवाय एरीया नॉर्मल झाला की नाही याची दर ६ महीन्याने आढावा घेण्याची अट ही या निकालाने टाकण्यात आली. व जरी केंद्राला स्वत:हुन जरी एखादा भुप्रदेश "Disturbed Area" असे घोषित करण्याचा अधिकार असला तरी संबंधित राज्याशी यासाठी सल्लामसलत करणे व मत घेणे अनिवार्य केले गेले. यात इमर्जन्सी लादण्या संदर्भातील महत्वाचा मुद्दा येतो.
४-वर आपण बघितलेल्या सेक्शन ४ च्या तरतुदी या Arbitrary नसुन अनरीझनेबल नसुन तसेच या तरतुदी घटनेच्या आर्टीकल १४ व १९ व २१ चे उल्लंघन करत नाहीत.
५-तसेच सेने ने स्वत:हुन ठरवलेल्या Do,s and Dont,s दोन प्रकारात तसेच Ten Commandments ( यात सेनेने स्वत:च्या सैनिकांसाठी स्वत:हुन काही गाइडलाइन्स जारी केलेल्या होत्या ज्यात वरील ज्या सेक्शन ४ च्या तरतुदी आपण पाहील्या त्यातल्या अधिकारांचा वापर करतांना उदा, शुट अरेस्ट इ. त्या संदर्भात सैनिकांनी काय काळजी घ्यावी कशी खबरदारी बाळगावी लहान मुला, स्त्रियांच्या संदर्भात कशी हाताळणी असावी इ इ. चे मार्गदर्शन आहे. या दोन प्रमुख प्रकारात आहेत जवळ प्रत्येकी दहा बारा मुद्दे आहेत) या तरतुदींना उचलुन धरत कोर्टाने त्यांना याचे उल्लंघन सैनिकाने केल्यास त्याला आर्मी अॅक्ट १९५० च्या अंतर्गत कारवाई करण्याच्या सुचना दिल्या तसेच या गाइडलाइन्स ला कायद्यात आवश्यक तेथे सुधारणा करुन थोडक्यात कायद्याचे ठोस स्वरुप एकप्रकारे द्यावे अशा अर्थाचा आदेश दिला.
६-या व्यतिरीक्त केंद्र शासन जेव्हा न्यायालयीन चौकशीची मागणी नाकारेल तेव्हा त्याने त्याची कारणे दिली पाहीजेत व हा नकार ज्युडिशीयल रीव्ह्यु च्या अटीसहीत असेल असे म्हटले. हा मुद्दा मला नीट कळला नाही. अजुन हा मुद्दा मी समजुन घेण्याचा प्रयत्न करत आहे माहीती घेत आहे.
[2] Extra Judicial Execution Victim Families Association (EEVFAM) V/s Union of India- 08- July-2016
यानंतर दुसरी महत्वाची केस Extra Judicial Execution Victim Families Association (EEVFAM) विरुद्ध Union of India याला यापुढे सोयीसाठी "असोसिएशन केस" असे म्हणतो. नागा केसपेक्षा याचा निकाल भिन्न होता. मुख्य म्हणजे मुद्देही वेगळे होते. हा निकाल अगदी ताजा ८ जुलै २०१६ चा आहे. अजुन केस सुरु आहे अजुन पुढील टप्पे बाकी आहेत. मात्र एक निर्णायक काही मुद्दे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेले आहेत. या दोन्ही केसेसेची जजमेंट कॉपी नेटवर आहे व ती मुळातुन वाचण्यासारखी आहेत. तर यात
१- मानवी हक्काचे गंभीर उल्लंघन झाले असा दावा करणारी ही पिटीशन घटनेच्या आर्टीकल ३२ च्या अनुसार या कोर्टात मेंटेनेबल आहे. ( ती नाहीच असा दावा होता)
२-पुढे कोर्ट "नागा केस" च्या निकालातील मुळ आग्रह निर्णय उचलुन धरत म्हणते. that the use of excessive force or retaliatory force by the Manipur Police or the
armed forces of the Union is not permissible. As is evident from the Dos and Don’ts and the Ten Commandments of the Chief of Army Staff, the Army believes
in this ethos and accepts that this principle would apply even in an area declared as a disturbed area under AFSPA and against militants, insurgents and terrorists.
There is no reason why this principle should not apply to the other armed forces of the Union and the Manipur Police
.
३- "नागा केस "च्या निकालाचाच हवाला देऊन that an allegation of excessive force resulting in the death of any person by the Manipur Police or the armed forces in Manipur must be thoroughly enquired into.
४-सर्वात महत्वाचा भाग म्हणजे एखाद्या व्यक्तीचा अशा घटनेत मृत्यु झाल्यास संबंधित अधिकार्याची चौकशी क्रिमीनल कोर्टात ( कोर्ट मार्शल न करता ) करण्याची स्पष्ट परवानगी तरतुद करणारा मुद्दा या शब्दात दिला. that in the event of an offence having been committed by any person in the Manipur Police or the armed forces through the use of excessive force or retaliatory force, resulting in the death of any person, the proceedings in respect thereof can be instituted in a criminal court subject to the appropriate procedure being followed. या अगोदर आर्मीच्या गटाचा क्रिमीनल कोर्टात अशा केसेस नेण्यास तीव्र विरोध व विरोधकांचा तीव्र आग्रह होता. हा मोठा निकाल मानला जातो.
५- अजुन महत्वाचे म्हणजे एकुण १५२८ केसेस असोसिएशन ने कोर्टासमोर आर्मी विरोधात दाखल केल्या ज्यात बलात्कार, हत्या, Fake Encounters, Enforced Disappearance ( हा एक महत्वाचा भाग आर्मीने अनेकांना संशयित म्हणुनचा Arrest without warrant चा वापर करत घरुन उचलुन नेल्यानंतर पुढे त्यांचा काहीच ठावठिकाणा लागला नाही अशा बेपत्ता होण्याला करण्याला ही कायदेशीर व्याख्या वापरलेली आहे.)
[३] जस्टीस संतोष हेगडे आयोग व त्यांचा अहवाल
या केस मध्ये ज्या एकुण १५२८ केसेस चा दावा पिटीशनर्स ने केला होता त्यापैकी एकुण ६२ केसेस चा अर्जदारांनी अत्यंत विस्तृत असे डॉक्युमेंटेशन करुन विविध पुराव्यासहीत सर्वकाही जोडलेले होते शिवाय साक्षीदारांचीही उपलब्धता होती. या ६२ केसेस मधुन सुप्रीम कोर्टाने ६ सॅम्पल केसेस वेगळ्या काढुन त्याची सखोल चौकशी करण्यासाठी की खरोखरच अर्जदारांच्या तक्रारीत काही अर्थ आहे की नाही हे बघण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश संतोष हेगडे यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नेमले यात सदस्य म्हणुन जे एम लिंगडोह माजी डि.जी.पी. अजय कुमार सिंग हे नामवंत अनुभवी लोक होते. यात कमिशनला चौकशीचे पुर्ण स्वातंत्र्य देऊन प्रत्येक केसची खोलात चौकशी करुन, कथित बळींचाही पास्ट रेकॉर्ड क्रिमीनल होता का नाही इ. तपासुन, प्रत्यक्ष घटनेवेळची परीस्थीती तपासुन, ते मारले कसे गेले इ. चौकशी करुन रीपोर्ट सादर करण्यास सांगितले. कमिशनने सर्व ६ केसेसची पुर्ण चौकशी कागदपत्रे, मुलाखती , घटना, साक्ष घेऊन पुरावे पोस्ट मॉर्टेम रीपोर्ट इ.तपासुन सुप्रीम कोर्टाला रीपोर्ट सादर केला. यात सर्वच्या सर्व ६ केसेस या Fake Encounters च्या आहेत व पिटीशनरचा दावा बरोबर आहे असा स्पष्ट निर्णय हेगडे कमिशनने दिला. शिवाया Do,s and Dont,s ज्या सेनेने इश्यु केलेल्या गाइडलाइन्स आहेत त्या संदर्भातही चौकशी करुन सैनिकी कारवाई दरम्यान प्रत्यक्षात यांचे पालन केले जाते की नाही हे तपासुन या संदर्भात विविध प्रत्यक्ष उदाहरणे देत हेगडे कमिशन निर्णयात म्हणते
" it is found that the important conditions laid down by the hon,ble Supreme Court and the Do,s and Dont,s issued by the Army Hqrs. have remained largely on paper only, They (guideleines ) are mostly followed in violation. By no stretch of imagination can this be called minimum force is used by the security forces to secure their objective On the contrary the maximum force is visible in all the six cases "
इतरही अनेक बाबी या ११४ पानांच्या रीपोर्ट मध्ये आहेत ज्या केवळ चकीत करुन टाकतील अशा आहेत. तर हेगडे कमिशन च्या या रीपोर्ट संदर्भात सुप्रीम कोर्ट म्हणाले की While recording its gratitude for the painstaking effort put in by the three-member Commission, this Court noted that the Commission had found that in all the six cases, the killing of the victims was not in any true encounter with the police or the security forces.
याचपैकी एका केस संदर्भात एन एच आर सी ( नॅशनल ह्युमन राइट्स कमिशन ) ने कोर्टाला माहीती दिली की गुवाहाटी हाय कोर्टानेही हेच फ़ेक एनकाउंटर आहे असे मान्य करत पाच लाख रुपये मृताच्या आईस देण्याचे आदेश देत आसाम रायफ़ल्स च्या सैनिकांना यात दोषी मानले होते. तसेच इतर सर्व ५ केसेस मध्ये एन एच आर सी ने मणिपुर राज्य शासनाला प्रत्येकी ५ लाख रुपये भरण्यासंदर्भात अगोदरच रेकमेंडशेन केलेले होते. हा हेगडे कमिशनच्या व्यतिरीक्त स्वतंत्र चौकशीत एन एच आर सी चे निष्कर्ष होते. व कमिशनचा याचा काही संबंध नव्हता. म्हणजे दोन स्वतंत्र बाजुने झालेल्या चौकशीत एकच निकाल आलेला होता की सर्व ६ एनकाउंटर्स फ़ेक होते. या कमिशनचा रीपोर्ट अत्यंत धक्कादायक आहे. एक एक केस मुळातुन वाचण्यासारखी आहे.
[४] N.H.R.C. ( National Human Rights Commssion ) - Toothless Tiger ?
या "असोसिएशन केस" मध्ये कमिशनच्या एकुण अकार्यक्षमतेवर, कमी अधिकार असण्यावर, निरुपयोगी असण्याचा इ.इ. आरोप करत अर्जदारांनी N.H.R.C. ला " Toothless Tiger "असे संबोधले होते. शिवाय मणिपुर स्टेट कमिशन मध्ये पुरेशा सदस्यांची नेमणुकही होत नाही याचीही तक्रार केली होती.प्रत्येक राज्याला हे बांधील आहे की प्रत्येक पोलीस /आर्मी कस्टडीत झालेल्या मृत्युसाठी N.H.R.C. ला किमान ४ रीपोर्ट सबमिट करणे, यात. मॅजेस्टेरीयल एनक्वायरी रीपोर्ट, पोस्ट मॉर्टेम रीपोर्ट, इनक्वेस्ट रीपोर्ट व बॅलीस्टीक एक्सपर्ट रीपोर्ट. मात्र कुठलेच राज्य एन.एच.आर.सी. ला फ़ारसे गंभीरतेने घेत नाही व हे ४ रीपोर्ट सादर करण्यात विलंब ,टाळाटाळ वा चुका करतात व कमिशनने केलेल्या या रीपोर्ट फ़ॉरमॅट संबधित मार्गदर्शक तत्वांना न जुमानणे असे प्रकार करतात अशी तक्रार N.H.R.C. ने विशेषत: मॅजेस्टेरीयल रीपोर्ट संदर्भात केली तसेच पोस्ट मॉर्टेमचे व्हिडियो चित्रीकरण करण्याची दिलेली सुचनाही कोणीच मानत नाही. इ.इ. अनेक तक्रारींचा पाढा N.H.R.C कडुन या केस मध्ये आपली बाजु मांडतांना कोर्टापुढे वाचला होता.
सुप्रीम कोर्टाने वरील ६२ केसेस संदर्भात N.H.R.C. ला जो स्वतंत्र रीपोर्ट देण्यात सांगण्यात आलेला होता त्यात N.H.R.C. चा या एकुण ६२ केसेस संदर्भातील रीपोर्ट संक्षिप्त स्वरुपात असा देण्यात आला.
कॉम्पेनसेशन अवार्डेड बाय एन.एच.आर.सी. ऑर हाय कोर्ट- २७
शो कॉज नोटीस पेन्डींग फ़ॉर अवॉर्ड फ़ॉर कॉम्पेनसेशन- ०४
पेन्डींग डिसपोजल वुइथ एन एच आर सी - १७
केसेस क्लोज्ड - ०७
नो केस रजीस्टर्ड वुइथ एन एच आर सी. - ०७
टोटल केसेस = ६२‘
वरील रीपोर्ट तपासल्यानंतर कोर्टाने म्हटले की यावरुन हे स्पष्ट होते की किमान ३१ केसेस मध्ये स्पष्टपणे Fake Encounters च्या च होत्या. शिवाय ज्या ७ केसेस N.H.R.C. कडुन क्लोज्ड करण्यात आल्या त्या विषयी कोर्ट म्हणाले की As regards, the cases that have been closed, we find from a perusal of some orders produced before us that some of these complaints have been closed without any application of mind and simply because of the conclusion arrived at in the Magisterial Enquiry report, which is really an administrative report.
(यातुन मॅजेस्टेरीयल एनक्वायरी रीपोर्ट ज्या विषयी N.H.R.C. ने अगोदरच कोर्टासमोर दिलेल्या शपथपत्रात आमच्याकडुन वेळोवेळी राज्यसरकारांना ( मणिपुर सहीत ) ज्या गाइडलाइन्स Magisterial Enquiry report संदर्भात केल्या जातात त्यांचे कधीही राज्यसरकारांकडुन पालन केले जात नाही. या तक्रारीला सुप्रीम कोर्टाने एक प्रकारे मान्यता दिली.)
N.H.R.C चा एकुण रोल व उपयोग व क्षमता हा ही एक मोठा स्वतंत्र विषय आहे तरी इथे थोडक्यात इतकेच की सर्व बाजु ऐकुन घेतल्यावर, सर्व दावे प्रतिदावे झाल्यावर, कोर्टाने निकालात खालील स्टेटमेंट दिलेले आहे. ते या शब्दात आहे.
However, it is pointed out (perhaps with a tinge of frustration) that the petitioners might not be very wrong in describing the NHRC as a toothless tiger! हे पुर्ण वाक्य कंसासहीत सुप्रीम कोर्टाचे आहे. यावरुन असे स्पष्ट दिसुन येते की सुप्रीम कोर्टाने निराशेने एक प्रकारे मान्य केले आहे की N.H.R.C (नॅशनल ह्युमन राइट्स कमिशन) "Toothless Tiger" आहे या अर्जदारांच्या दाव्यात तथ्य आहे.
शेवटी जुलै २०१६ च्या या निकालात १५२८ -६२ = उर्वरीत एकुण १४६६ केसेसचे व्यवस्थित डिटेल या ६२ सारखेच व्यवस्थित Documentation करण्याचा व त्यांना टॅब्युलर फ़ॉर्म मध्ये सादर करण्याचा आदेश दिला. यानंतर एक महीन्याने म्हणजे ऑगस्ट मध्ये कोर्टात पुन्हा तारीख होती पुढे काय झाले याचे ताजे अपडेट सध्या तरी माझ्याकडे नाही केस अजुन सुरुच आहे. इतर १४६६ मध्ये अजुन काय सत्य बाहेर येते ते बघणे अगत्याचे ठरावे.
[५] जस्टीस जे.एस. वर्मा आयोग व त्याचा अहवाल.
याशिवाय आजपर्यंत अॅफ़्स्पावर अजुन दोन कमिशनच्या रीपोर्ट चा थोडक्यात विचार करणे आवश्यक आहे. एकुण ३ महत्वाचे कमिशन झाले. एक हेगडे कमिशन ज्यांनी ६ केसेस संदर्भात महत्वाचा निकाल दिला जो आपण वर बघितला. पण एक प्रकारे हे कमिशन मर्यादीतच उद्देशासाठी होते. दुसरे एक कमिशन होते जस्टीस जे.एस. वर्मा कमिशन हे खर म्हणजे अॅफ़्स्पा शी सरळ संबधित नव्हते. दिल्लीत डिसेंबर २०१२ त झालेल्या निर्भया हत्याकांडानंतर बलात्काराशी संबंधित विविध कायद्या्तील अस्तित्वात असलेल्या तरतुदींचा अभ्यास करुन यातील आरोपींना त्वरीत ट्रायल व शिक्षेत वाढ व सध्याच्या कायद्यातील कुठल्या तरतुदी चुकीच्या आहेत व सुधारणा काय असावी इ. संदर्भात अभ्यास करुन अहवाल देण्यासाठी याची नेमणुक झालेली होती. यांच्या बलात्कारा व स्त्री अन्याय संदर्भातील अभ्यासातुन यांनी A.F.S.P.A. जे रीमार्क्स व सुचना केलेल्या होत्या त्यातील काही अशा होत्या
To this end, we make the following recommendations for immediate implementation: खालील बाबींची तत्काळ अंमलबजावणी व्हावी यात प्रामुख्याने
१
मानवी हक्क संघटनांनी केलेली जुनी मागणी की बलात्कार इ.च्या केसेस मध्ये कोर्ट मार्शल न करता त्या केसेस नेहमीच्या क्रिमीनल कोर्टात रीतसर घेण्यात याव्या.तीच शिफ़ारस वर्मा कमिशनने केली..खालील शब्दात केली.
Sexual violence against women by members of the armed forces or uniformed personnel must be brought under the purview of ordinary criminal law;
२
सशस्त्र दला विरोधातील महीला तक्रारदारांच्या सुरक्षितते संदर्भात कमिशन म्हणते की
Special care must also be taken to ensure the safety of women who are complainants and witnesses in cases of sexual assault by armed personnel;
३
विशेष आयुक्तांच्या नियुक्ती संदर्भात
There should be special commissioners – who are either judicially or legislatively appointed – for women’s safety and security in all areas of conflict in the country. These commissioners must be chosen from those who have experience with women’s issues, preferably in conflict areas. In addition, such commissioners must be vested with adequate powers to monitor and initiate action for redress and criminal prosecution in all cases of sexual violence against women by armed personnel
४
आणि सर्वात महत्वाचे विधान प्रत्यक्ष अॅफ़्स्पा च्या फ़ेरविचारा संदर्भात
There is an imminent need to review the continuance of AFSPA and AFSPA-like legal protocols in internal conflict areas as soon as possible. This is necessary for determining the propriety of resorting to this legislation in the area(s) concerned; and Jurisdictional issues must be resolved immediately and simple procedural protocols put in place to avoid situations where police refuse or refrain from registering cases against paramilitary personnel.
५
जुन एक महत्वाचे स्टेटमेंट म्हणजे वर्मा कमिशन म्हणते की अॅफ़्स्पा कायदा सैनिकाने ड्युटी दरम्यान केलेल्या लैंगिक अत्याचारा ला जणु कायदेशीर कवच प्रदान करतो. या शब्दात
At the outset, we notice that impunity for systematic or isolated sexual violence in the process of Internal Security duties is being legitimized by the Armed Forces Special Powers Act, which is in force in large parts of our country. It must be recognized that women in conflict areas are entitled to all the security and dignity that is afforded to citizens in any other part of our country. India has signed the International Convention for the Protection of All Persons from Enforced Disappearance106, which has to be honoured. We therefore believe that strong measures to ensure such security and dignity will go a long way not only to provide women in conflict areas their rightful entitlements, but also to restore confidence in the administration in such areas leading to mainstreaming.
[६] जस्टीस बी.पी.जीवन रेड्डी आयोग व त्याचा अहवाल.
तरीही हे दोन्ही आयोग अॅफ़्स्पाचा विशेष विचार करता एक प्रकार मर्यादीतच होते. आणि ६० वर्षाच्या या कायद्याच्या संदर्भात एकमेव असे रेड्डी कमिशनच होते ज्याची खास अॅफ़्स्पा संदर्भात हा पुर्णपणे रद्द करावा की नाही ? कि यात बदल करावा ? केला तर कसा करावा ? किंवा याला पर्याय कुठला दुसरा कायदा आणावा ? इ.या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या कमिशनची नेमणुक करण्यात आली. आणि केव्हा केली ?का केली ? तर वर आपण बघितले ज्या मनोरमा ची आसाम रायफ़ल्स च्या जवानांकडुन कथित बलात्कार करुन हत्या झाली होती त्यानंतर अॅफ़्स्पा विरोधात जो असामान्य असा उसळलेला जनप्रक्षोभ व आक्रोश शांत करण्यासाठी या कमिशनची तत्कालिन सरकारने नेमणुक केलेली होती. तत्कालीन प्रधानमंत्रींना तेव्हा मणिपुरचा दौरा करावा लागला होता. व तेव्हा मग १९ नोव्हेंबर २००४ ला बी.पी.जीवन रेड्डी या सुप्रीम कोर्ट च्या माजी न्यायाधीशां च्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना करण्यात आली यात आर्मी चे माजी जनरल व्ही.आर.राघवन, विख्यात पत्रकार संजय हजारीका, नामवंत ज्युरीस्ट डॉ. एस.बी.नकाडे इ. दिग्गजांचा समावेश होता.
या आयोगाने एक असामान्य ऐतिहासीक म्हणावे असे काम या प्रश्नावर पहील्यांदाच केले. या रेड्डी कमिशनने एकुण १३ मिटींग्ज घेतल्या. १७ पब्लीक हियरींग्ज , एकुण ७ स्टेट एजन्सीज कडुन कमिशनला ब्रिफ़ींग्ज मिळालीत. एकुण ५४ व्यक्तींनी लिखीत तसेच एकुण ५१ विविध संघटनांनी लिखीत सविस्तर निवेदने दिली. १६९ पुरुष व २७ महीलांनी विविध ठिकाणी सादरीकरण केले मुलाखती दिल्या.चर्चेच्या अनेक फ़ैरी झाल्यात. प्रत्येक ईशान्य राज्यात कमिशन ने स्वत: जाऊन ज्या पब्लीक हियरींग्ज घेतल्या त्यात आर्मीचे अनेक वरीष्ठ कमांडर्स, आसाम रायफ़ल्स इ. चे मोठे अधिकारी, राजकारणी मुख्यमंत्री, विद्यार्थी संघटनांचे नेते, राजकीय नेते, मानवी हक्क कार्यकर्ते, विद्रोही संघटनांचे नेते, युनिव्हर्सीटीज मधील प्राध्यापक, लॉयर्स व माजी जजेस समाजाच्या सर्वच स्तरातील लोकांनी उत्स्फ़ुर्त प्रतिसाद देत आक्रमकतेने, अभ्यासपुर्ण रीतीने. आपापलेल अॅफ़्स्पा संदर्भातील पक्ष, अनुभव, वेदना,इ. मांडले. संबंधित राज्यांनी आपापल्या भुमिका लिखीत मध्ये दिल्या. कमिशनने तुम्हाला आर्मी व अॅफ़्स्पा दोन्ही जावयास हवे आहे का ? इ. अनेक परखड प्रश्नही विचारले. अनेक प्रश्नोत्तरे चर्चा मंथने झाली., प इतका व्यापक इतका सर्वसमावेशक अभ्यास प्रत्यक्ष जागेवर प्रत्येक स्टेकहोल्डर ला भेट देऊन समजुन घेतलेला विषय पुर्ण खोलात जाऊन केलेल अॅफ़्स्पाच्या समस्येच अत्यंत सखोल विश्लेषण व त्यासाठी घेतलेले परीश्रम थक्क करणारे आहेत. खास अॅफ़्स्पा साठी बनलेला एकमेव ऐतिहासीक आयोग व त्याचा रीपोर्ट त्यामुळे फ़ारच महत्वाचा आहे. मात्र आज जवळ जवळ १० वर्षाहुन अधिक काळ लोटला. आयोगाच्या कुठल्याही शिफ़ारसींची अंमलबजावणी काही झाली नाही. केवळ चर्चांत संदर्भ देण्यापुरताच तो राहीला हा एक मोठा काळा विनोदच म्हणावा लागेल. कि एक लोकशाहीत असा आयोगही होतो कामही करतो व अहवालही देतो आणि अंमलबजावणी शुन्य. तरीही त्यामुळे किमान जागरुकता निर्माण होते व प्रश्न प्रखर होऊन स्पष्ट स्वरुपात समोर येतो हे ही नसे थोडके. १५० पानांचा हा अद्वितीय अहवाल मुळातुनच वाचण्यासारखा आहे तर आयोगाची मते निष्कर्षे अगदीच थोडक्यात.
१
सर्वप्रथम आयोगाने अॅफ़्प्साचा कायदा पुर्णपणे रद्द करण्याची शिफ़ारस आग्रहाने केली. ती या शब्दात.
The Armed Forces (Special Powers) Act, 1958 should be repealed. Therefore, recommending the continuation of the present Act, with or without amendments, does not arise. The Act is too sketchy, too bald and quite inadequate in several particulars. It is true that the Hon'ble Supreme Court has upheld its constitutional validity but that circumstance is not an endorsement of the desirability or advisability of the Act.
२
कमिटीने अॅफ़्स्पा ऐवजी यु.ऎ.पी.ए. हा कायदा यात काही नविन बदल करुन नविन तरतुदी करुन अॅफ़्स्पा ऐवजी हा कायदा लागु करण्याची शिफ़ारस सविस्तर कारणमीमांसे सहीत केली.
The Committee is also of the firm view that it would be more appropriate to recommend insertion of appropriate provisions in the Unlawful Activities (Prevention) Act, 1967 (as amended in the year 2004) - which is a cognate enactment as pointed out in Chapter III Part II of this Report instead of suggesting a new piece of legislation.
३
तक्रार केंद्रं स्थापन करण्याची आग्रही शिफ़ारसही या शब्दात केली
We may also refer in this connection to the necessity of creating a mechanism, which we may designate as the "Grievances Ceil"- Over the years many people from the region have been complaining that among the most difficult issues is the problem faced by those who seek information about family members and friends who have been picked up and detained by armed forces or security forces. There have been a large number of cases where those taken away without warrants have "disappeared", or ended up dead or badly injured. Suspicion and bitterness have grown as a result.
विस्तारभयास्तव थांबतो पण अजुन बरेच काही या अहवालात आहे जे इथे घेणे शक्य नाही इतकेच नमुद करुन पुढे जाऊ. व हा मुळातुन वाचावा ही विनंती.
[७] आंतरराष्ट्रीय कायदा व भारताने मान्य केलेल्या आंतरराष्ट्रीय करार संदर्भातील अॅफ़्स्पा कायदा.
भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:हुन काही करारांवर स्वाक्षरी केलेली आहे. ज्या अंतर्गत मुलभुत मानवी हक्कांचे उल्लंघन करणारे कायदे व तशा तरतुदी न ठेवण्याचे असल्यास त्या काढण्याचे मान्य केलेले आहे. या विषयात अजुन जास्त न जाता अगदीच थोडक्यात इतकेच नमुद करतो की किमान ज्या आंतरराष्ट्रीय करारांशी भारताने बांधिलकी दाखवली आहे. त्यानुसार अॅफ़्स्पा काढुन टाकण्यास वा त्यातील तरतुदींमध्ये आवश्यक बदल करण्यास वेळोवेळी संबंधित सुचनांचे अहवाल भारताला देण्यात आलेले आहेत. उदा.एकच नमुद करतो. युनायटेड नेशन्स च्या ह्युमन राइट्स कौन्सील ने Report of the Special Rapporteur on extrajudicial, summary or arbitrary executions, Christof Heyns यांनी भारत सरकारच्या आमंत्रणावरुन १९ ते ३० मार्च २०१२ ला भेट दिली होती व जो रीपोर्ट दिला होता (आपल्या देशाने हा स्वत:हुन लिखीत मान्य केलेला आंतरराष्ट्रीय कायदा आहे व याचे फ़ायदेही असतात हे लक्षात असु द्यावे )
या रीपोर्ट मध्ये अॅफ़्स्पा रद्द करण्याची वा त्यात किमान बदल करण्याची आग्रही शिफ़ारस केलेली होती. यात अनेक बाबी आहेत व मोठा विषय आहे हा नंतर कधीतरी सविस्तर घेतो. सध्या इथेच थांबतो.
पुढील भागात या अॅफ़्स्पा संदर्भात विविध बाजुंनी काय आर्ग्युमेंट्स केलेली आहेत. आर्मीच्या बाजुने, विरोधी बाजुने, मानवी हक्क बाजुने , राजकीय आर्थिक सामाजिक बाजुने जी अतिशय महत्वाची व सर्वात शेवटी कायदेशीर बाजुने जी आर्ग्युमेंट्स झालेली आहेत ती बघुया. व त्यानंतर च्या भागात या विषयावर जी "सोल्युशन्स" सुचवलेली आहेत ती बघु या.
संदर्भ
१- वरील दोन्ही केसेसची जजमेंट कॉपी आणि तिन्ही आयोगांच्या अहवालाची कॉपी इ. सर्व ओरीजनल मटेरीयल नेट वर सहज उपलब्ध आहे. वरील माहीतीसाठी त्याचा वापर केलेला आहे.
२- य़ा विषय़ासाठी अनेक संदर्भ वापरलेले आहेत ते सर्व इथे देत बसणे शक्य नाही पण ज्याला रस असेल विषयात त्यांनी या भागापुरते किमान हे एकदा वाचावे अशी शिफ़ारस करतो.
Armed Forces Special Powers Act = The Debate Editor- Vivek Chadha by I,D,S,A,
Marginal on the map = Hidden Wars and Hidden Media in the north east by Arijit Sen
Democracy Encountered- Rights Violation in Manipur- Indipendent,s Citizen,s Fact finding report to the Nation
India and it,s North east exception - From Frontier to forefront.- Akshita Manjari Bhanjdeo.
३-वरील वाचनात फ़ार रस नसल्यास यु ट्युब चा वापर करुन AFSPA सर्च मारल्यास या विषयावरील अनेकोनेक उत्तम चर्चांचे कार्यक्रम बघु शकता. त्यातुनही अनेक मुद्दे लक्षात येतात.
शेवटी सर्वात महत्वाचे मी वरील सर्व व इतर मला उपलब्ध मर्यादीत सोर्सेस चा वापर करुनच हा लेख लिहीलेला आहे. यात माझे व्यक्तीगत कुठलेही संशोधन नाही व कार्य नाही तसेच मी कुठल्याही प्रकारचा कार्यकर्ता वा या कॉज साठी खस्ता खाल्लेला माणुस नाही. शिवाय मी पिडीतांपैकी ही नाही. मला व्यक्तिगत अॅफ़्स्पाची झळ कधीच पोहोचली नाही हे स्पष्ट करुन थांबतो.
प्रतिक्रिया
7 Sep 2016 - 10:08 pm | मोदक
धन्यवाद.
निवांत वाचेन,
एकच सुचवतो - फारसे प्रतिसाद आले नाही तरी लिखाण सुरू ठेवा. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
8 Sep 2016 - 11:22 am | प्रसाद_१९८२
एकच सुचवतो - फारसे प्रतिसाद आले नाही तरी लिखाण सुरू ठेवा.याच्याशी सहमत,
इंटरनेट वर फार कमी ठिकाणी, तीही मराठीत ह्या कायद्याबद्दल माहीती उपलब्ध आहे.
तेंव्हा तुम्ही ह्या विषयावर सविस्तर लिहावे हि विनंती
8 Sep 2016 - 12:13 pm | राजाभाउ
+१ असेच म्हणतो.
10 Sep 2016 - 4:38 pm | पगला गजोधर
उडदामाजी काळे गोरे
मारावाजी, आपल्या भारतीय सैन्यासारखे चारित्र्यवान सैन्यदल जगात कमीच आहेत,
हे जरी खरे असले तरीही, काही लोक अशीही पाहण्यात येतात,
की त्यांनी केलीली (स्वार्थापोटी इगोपोटी सॅडीस्टवृत्तीपोटी) कुठलीही
गोष्ट, हे ते देशभक्ती च्या नावाखाली खपवू पाहतात, व स्वतःच्या कृत्यांवर पडदा टाकायला बघतात. इतरांसमोर भलेही
ते ऑनेस्टी कोड लॉयल्टी अशे मोठे शब्द फेकीत असतील, भलेही त्यांनी कधी युद्धभूमीवर जाऊन गोळी झाडली नसेल,
यांचा अटीट्युडसुद्धा असा की खरी देशभक्ती आमहालाच कळते. समाजात जाऊन सुद्धा ते आपल्या कोत्यावृत्तीला
धार्मिक /राष्ट्रवादाचा मुखवटा चढवण्यात वाकबगार असतात.
एकूण भारतीय सैन्याच्या संख्येच्या तुलनेत *अशे लोकं संख्येने अतिशय अल्प असली,
तरी ते या समाजात आहेत, आणि आपल्या मिलिटरी पार्श्वइतिहासाचा ते खुबीने वापर करत असतात.
असो काल्पनिक उदाहरण म्हणून खालील चित्रपटाचा भाग पहा.
ऑनेस्टी कोड लॉयल्टी
10 Sep 2016 - 7:28 pm | मारवा
फ्यु गुड मेन विषयीचा तुमचा व हा व अगोदरचा प्रतिसाद वाचला. मात्र हा चित्रपट नेमका कशाविषयी आहे हे सांगितल अगदी थोडक्यात तर बर होइल. तुम्ही दिलेला दुवाही नक्कीच बघतो मात्र मला याविषयी काहीच माहीत नाही तर ते कदाचित कळणार नाही म्हणून विचारतोय.
व सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या धागा विषयाशी हा कसा संबंधित आहे इथल्या कुठल्या समस्ये प्रश्ना संदर्भात साम्य आहे ते अगदी प्राथमिक सांगितल तर मी ही आपल्या अनुभवाशी कनेक्ट होऊ शकेल.
दुवा रात्री बघतो.
11 Sep 2016 - 12:30 pm | अनुप ढेरे
या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सिनेमा बघाच बघा असं सुचवतो. आपल्याकडे यावरून बेतलेला शौर्य नावाचा सिनेमा आला होता. आणि सध्या मुक्ता बर्वे असलेलं कोड मंत्र नावाचं नाटक देखील चालू आहे. पण दोन्ही रुपांतरांमध्ये इंग्रजी सिनेमात असलेला एक महत्वाचा टोन गायब आहे/केलेला आहे.
11 Sep 2016 - 3:17 pm | मारवा
आपल्याकडे यावरून बेतलेला शौर्य नावाचा सिनेमा आला होता.शौर्य मी बघितलेला आहे व तो काही बाबतीतला मतभेद असुन ( मुस्लिम एलीमेंट, स्टीरीयो टाइप थोडा आलाच होता. ) तरीही आवडलेला होता.
सुंदर होता चित्रपट. सध्याच्या "रुस्तम" पेक्षा हजार पटीने उजवा होता हे निश्चीत.
दोन्ही मध्ये मात्र शौर्य चा जावेद व रुस्तम चा नायक "सत्या" च्या तुलनेत सेनेची "प्रतिष्ठा" महत्वाची मानतात. हे काही पटत नाही.
यातुनच मग ऑगस्टा वेस्टलॅन्ड प्रकरण दाबा
जनरल व्ही.के.सींग ने पदावर टिकुन राहण्यासाठी केलेल्या उचापत्या, घातलेले घोळ त्यांच्या "पोस्ट" चा "सम्मान" बघा म्हणुन दडपा.
असला चमत्कारीक विचीत्र भावनिक आग्रह धरला जातो.
पावित्र्याची, सम्मानाची लेबले लावुन नग्न सत्या पासुन पलायन करण्याचा प्रकार पटत नाही. कुठल्याच बाबतीत.
11 Sep 2016 - 3:36 pm | मारवा
हा "फ्यु गुड मेन" चित्रपट नक्की कशावर आधारीत आहे ? ते गजोधर भैय्या काही सांगत नाहीत तुम्हीच सांगावे ही विनंती करतो.
पण दोन्ही रुपांतरांमध्ये इंग्रजी सिनेमात असलेला एक महत्वाचा टोन गायब आहे/केलेला आहे.दोन्ही रुपांतरामध्ये म्हणजे हे दोन्ही "फ्यु गुड मेन " वर बेतलेले आहेत का ? अस काय आहे या चित्रपटात ? थोडक्यात सांगा कृपया मी गजोधर यांचा दुवा बघितला पण तो क्लायमॅक्स सीन आहे असे वाटते म्हणुन मुद्दाम काल रात्री बघितला नाही. म्हटल पुर्णच चित्रपट बघु एकदम क्लायमॅक्स बघितला तरी हरकत नसते रीव्हर्स ची मजा असतेच पण नकोच म्हणून टाळला. व गुगलुनही बघितल नाही कारण कधी प्रमाणापेक्षा जास्त माहीती मिळाली तर आपले मत पुर्वग्रहदुषित होते.
तुम्ही थोड थोडक्यात सांगाच अनुपजी फ्यु गुड मेन विषयी.
11 Sep 2016 - 5:36 pm | पगला गजोधर
मारवाजी
म्हणूनच सर, तुम्ही हा चित्रपट पाहा, एन्जॉय करा,
:)
11 Sep 2016 - 5:52 pm | मारवा
इका मतलब ह्मार ध्यान मे आत है
तुम हमार कहत हो की
मै कहता ऑखन की देखी
तु कहता कागज की लेखी
ठीक है गजोधर भैय्या
चलो पुरी फिलम्वाही देख लेत है पहले.
फिर बात करेंगे
अंबुआ तले बैठ के.
11 Sep 2016 - 6:00 pm | कैलासवासी सोन्याबापु
मारवाजी, एकंदरीत तुमचे विचार वाचले, कुठेच विसंगती दिसली नाही मला, एक्सेसेजला विरोध करणे हे जिवंत लोकशाहीचे प्रतीक आहे अन तुम्ही ते करताय ह्या बद्दल तुमचे अमाप कौतुक अन स्तुती करतो मी, अफस्पा संबंधित एक्सेसेज भयानक असतात/आहेत फे खरेच आहे.
बाकी गजोधर भैया अन अनुपजींशी सहमती,
फ्यु गुड मेन नक्की नक्की नक्की पाहा!! खासकरून जॅक निकोलसन जेव्हा आपला तोल गमावतो अन "you cannot enjoy the freedom I provide you and question the way of Its provision" का असा काहीसा डायलॉग मारतो तेव्हा त्यात अफस्पाची काळी बाजू नक्कीच दिसते :(
11 Sep 2016 - 6:38 pm | मारवा
सोन्याबापुजी धन्यवाद !
आपल्या अनुभवाचा फायदा विषय समजुन घेण्यात खरे म्हणजे माझ्या समजण्यात चुका होत असल्यास सुधारुन देउन करावा
म्हणजे माझ्याकडुन चुकीची फॅक्ट प्रसारीत होणार नाही.
लेखामध्ये कुठे मुद्द्दा चुकीचा वा सत्याला पुरेसा न्याय देणारा वाटल्यास कृपया निदर्शनास आणुन द्यावे ही
अत्यंत आग्रहाची विनंती त्याने मी व इतर मिसगाइड होणार नाहे.
व हे आपण आपल्या अनुभवाने नक्कीच करु शकतात.
बाकी चित्रपटा विषयी आपण अनुपजी व गजोधर भैय्या तिघांनी ज्या पॅशन ने रीकमेंड केलेल आहे .
त्यानंतर तो पाहण हे मस्ट सी यातच टाकलेल आहे
नक्कीच बघतो
वरील विनंतीचा विचार करावा
पुन्हा एकदा धन्यवाद.
11 Sep 2016 - 5:59 pm | अनुप ढेरे
सहमत आहे. म्हणूनच सांगितलं नाही. शौर्य मधला धर्म द्वेश वगैरे थीम नाहीच मूळ चित्रपटाची(नाटकाची). सैन्य, सैनिक, अधिकारी, आदेश, शिस्त यांमधला सबंध ही थीम आहे.
7 Sep 2016 - 10:44 pm | चंपाबाई
आदिवासींची भारतात सामील व्हायची इच्छा नव्हती तर त्यांच्यावर निर्णय का लादण्यात आला ?
7 Sep 2016 - 10:46 pm | अमितदादा
अपेक्षेपेक्षा जास्त अभ्यासू लेख. खूप चांगल काम केलात तुम्ही. काही प्रतिसाद द्यायच्या अगोदर काही आफ्स्पा विरोधक लोकाविषयी असणारे गैरसमज दूर करू इच्छितो.
१. आफ्स्पा विरोधक लोक आर्मी विरोधक आहेत
हा मोठा गैरसमज आहे. बहुतांश आफ्स्पा विरोधक हे आर्मी वर प्रेम करणारे सामान्य लोक आणि कार्यकर्ते आहेत. त्यांना आर्मी ने सामान्य लोकासाठी केलेलं बलिदानाची पूर्ण जाणीव आहे परंतु हा कायदा जे blanket impunity देते त्यविषयी हि ओरड आहे कारण आर्मी जवान आपल्याच समाजातून आल्यामुळे त्यात हि चांगली वाईट लोक आहेत. आणि हा कायदा अश्या वाईट लोकांना प्रोस्साहन देतो. विशेतः मानसिक तणावात असलेले जवान.
२. हा कायदा काढला कि भारतीय सुरक्षा धोक्यात येयील, आर्मी ला काम करता येणार नाही
याचावर बरेच मार्ग उपलब्द आहेत. हा राक्षसी कायदा कडून टाकून त्या जागी soft कायदा आणला जावू शकतो. ज्यामध्ये जवानांना आतंकवादी किंवा संशयित आतंकवादी यांच्या विरुद्ध केलेल्या कारवाई ला पूर्ण संरक्षण मिळेल, मात्र स्त्रिया वरील अत्याचार, बालाकावरील अत्याचार, घरांची तोडफोड, इतर कोणतेही बेकायदेशीर काम याला संरक्षण नाही मिळणार.
३. आफ्स्पा विरोधक लोक मानवतावादी आहेत, दहशदवादी लोकांचे छुपे समर्थक आहेत
हो काही लोक ह्या category मध्ये मोडतात, पण बहुतांश लोक फक्त त्यांचासारख्या दुसर्या भारतीयाला होणार्या त्रासाबद्दल दुखी आहेत. ६० वर्ष होवून सुधा काही भारतीयांना भीतीच्या छायेत जगाव लागत आणि अन्याय होवून सुधा दाद मागता येत नाही हा प्रमुख मुद्दा आहे.
४. जे आफ्स्पा विरोधक आहेत ते फुकाचे विचारवंत आहेत त्यांना ह्या भागातील अनुभव नसल्याने काही मत मांडायचा अधिकार नाही.
हे साफ चूक आहे, वरील लेखात दिलेले निकाल तसेच विविध कमिटी ने केलेला सखोल अभ्यास पहा. सामान्य बुद्धिमत्तेचा माणूस हे वाचून आपले मत बनवू शकतो. अन्यथा सगळे लेख, पेपर बंद करावे आणि सगळ्यांना field visit पाठवावे लागेल, तसेच हा न्याय आफ्स्पा समर्थक लोकांना हि लागू होतो. तेंव्हा ह्या मुद्यात काही दम नाही.
५. सगळे गुन्हे हे खोटे आहेत.
बहुतांश गुन्हे खोटे आहेत हे सिद्ध जालय, परंतु काही भयानक गुन्ह्यात प्रथमदर्शनी सत्यता आढळते. २०१० साली काश्मीर मध्ये झालेले निलोफर हत्याकांड घ्या किंवा २०१६ मध्ये आत्ता झालेल्या एका प्राध्यापकाच्या हत्या घ्या. दोन्ही घटनात आर्मी ने गुन्हा मान्य केलाय. अशा घटना करण्याची हिम्मत फक्त ह्या कायद्यामुळ झाली.
६. अश्या घटनात फक्त आर्मी involve आहे.
नाही अश्या बेकायदेशीर घटनात आर्मी, केंद्रीय सुरक्षा बले तसेच राज्य पोलीस सुधा involve आहेत. मणिपूर मध्ये तर ज्या खोट्या चकमकी झालेत त्यात लोकल राज्य पोलिसांचा मोठा वाटा आहे.
हि सर्व मत माझी वैयक्तिक आहेत.
7 Sep 2016 - 11:10 pm | अमितदादा
२०१० माचील हत्याकांड झालेले. निलोफर हत्याकांड २००९ मध्ये झाल.
हे पहा
http://www.gktoday.in/blog/armed-forces-special-powers-act-afspa/
आणखी एक गोष्ट नागलंड मध्ये हा कायदा लागू आहे पण गेल्या ५ वर्षात तिथ एक सुधा गोळी चालवली नाही कि एका हि सैनिकाचा बळी गेला नाही.
8 Sep 2016 - 7:50 pm | मारवा
सर्वप्रथम अभ्यासपुर्ण प्रतिसादासाठी मनापासुन धन्यवाद !
एक प्रश्न आहे. अॅफ्स्पा समजुन घेतांना काही बाबतीत मला माहीती हवी होती उदा. तुम्ही जे म्हणालात
बहुतांश गुन्हे खोटे आहेत हे सिद्ध जालय, परंतु काही भयानक गुन्ह्यात प्रथमदर्शनी सत्यता आढळते.तर यात गुन्हे खोटे वा सत्य आढळले ते नेमके कुठल्या न्यायालयीन प्रक्रीये संदर्भातील विधान आहे. म्हणजे आपण जे म्हणताय ते गुन्हे
कोर्ट मार्शल या आर्मी च्या कोर्ट केसेसच्या प्रक्रियेतुन जाऊन गुन्हे खोटे वा सत्य आढळले आहेत का ?
की रेग्युलर कोर्ट च्या प्रक्रियेतुन जाऊन खोटे वा सत्य आढळले आहेत ?
माझ्या माहीतीप्रमाणे कन्व्हेनींग ऑफीसर ला बेसीकली सर्वाधिकार असतात. व कन्व्हेनींग ऑफीसर हा मेंबर्स व प्रॉसिक्युटर आणि डिफेन्स लॉयर दोघांची नेमणुक करतो. शिवाय एक जज अॅडव्होकेट ची नियुक्ती ही काही केसेस मध्ये केली जाते. ज्याचे काम केवळ कन्व्हेनींग ऑफीसर ला कायदेशीर सल्ला पुरवणे इतपतच मर्यादीत असते. तो नावाच्या नेमके उलट जज ही करत नाही व अॅडव्होकेशन ही करत नाही आणि विशेष म्हणजे तो तक्रार बचाव व कन्व्हेनींग ऑफीसर तिघांना केवळ कायदेशीर बाबीं संदर्भात मार्गदर्शन करतो. आता प्रश्न असा आहे की याचा अर्थ ज्या केस मध्ये जज अॅडव्होकेट नाहीये त्यात तर उरलेल्यांच्या बाबतीत केवळ मिलीट्रीतला नोकरीचा अनुभव इतकेच क्वालिफीकेशन न्यायदानासाठी पुरेसे गृहीत धरलेले आहे का ?
शिवाय ही कोर्ट मार्शल मुळात टेम्पररी अॅरेंजमेंट असते म्हणजे जसे रेग्युलर कोर्टातल्या जज ला जे कायद्याची पदवी व काही किमान वर्षांचा अनुभव वा काही किमान परीक्षा पास होणे आवश्यक आहे बिफोर पासींग एनी जजमेंट तसे काही इथे आवश्यक नाही का ? की आहे ? असल्यास पातत्रेसंदर्भात नेमका नियम काय आहे ?
दुसरा प्रश्न
वरील प्रक्रियेत चारही घटक कोर्ट मेंबर्स, प्रॉसिक्युटर व डिफेन्स लॉयर व जज अॅडव्होकेट हे कन्व्हेनींग ऑफीसरपेक्षा कनिष्ठ दर्जाचे असतात हे खरे आहे का ? असल्यास त्याचा या कन्व्हेनींग ऑफीसरचा या कनिष्ठ दर्जाच्या चार घटकांशी संबंध अप्रेझल रीपोर्ट, पोस्टींग, प्रमोशन संदर्भात येत असेल तर त्याचा अंतिम प्रभाव या घटकांच्या कामावर पडत नाही का ? म्हणजे हे सर्व जर त्याच्या दबावात काम करत असतील किंवा इंटरेस्ट्स अॅफेक्ट होत असतील तर ते काम निष्पक्षतेने निर्भयतेने कसे करतात ?
म्हणजे माझी माहीती कुठे चुकत असेल तर कृपया दाखवावी व मला अचुक काय आहे परीस्थीती ती स्पष्ट करावी ही
विनम्र विनंती.
8 Sep 2016 - 8:28 pm | मारवा
आर्मी अॅक्ट १९५० च्या सेक्शन ७० अनुसार खालील दोन गुन्हे खुन व बलात्कार (अटींसहीत) कोर्ट मार्शल च्या कक्षेत येत नाहीत. व हे सिव्हील ऑफेन्सेस कोर्ट मार्शल मध्ये ट्रायेबलच नाहीत.
Civil offence not triable by court- martial. A person subject to this Act who commits an offence of murder against a person not subject to military, naval or air force law, or of culpable homicide not amounting to murder against such a person or of rape in relation to such a person, shall not be deemed to be guilty of an offence against this Act and shall not be tried by a court- martial, unless he commits any of the said offences-
(a) while on active service, or
(b) at any place outside India, or
(c) at a frontier post specified by the Central Government by notification in this behalf.
मात्र जर तो खालील तीन कंडीशन मध्ये असेल तर कोर्ट मार्शल होइल. म्हणजे पहीलीच कंडीशन तो अॅक्टीव्ह सर्व्हीस मध्ये असतांना जर त्याने बलात्कार वा खुन केला तर मात्र तो कोर्ट मार्शल च्या कक्षेत येइल. व त्याचे कोर्ट मार्शल होइल. हे असेच आहे का ? व दुसरे त्याच पुढच्या सेक्शन ७० मध्ये कोर्ट मार्शल मार्फत दोषींना कुठल्या प्रकारच्या शिक्षा देण्याचे अधिकार आहेत त्या शिक्षांची उदाहरणे दिलेली आहेत त्यात
Punishments awardable by courts- martial. Punishments may be inflicted in respect of offences committed by persons subject to this Act and convicted by courts- martial, according to the scale following, that is to say,-
(a) death;
(b) transportation for life or for any period not less than seven years;
(c) imprisonment, either rigorous or simple, for any period not exceeding fourteen years;
(d) cashiering, in the case of officers;
(e) dismissal from the service;
(f) reduction to the ranks or to a lower rank or grade or place in the list of their rank, in the case of warrant officers;
व खाली अजुन लांबलचक शिक्षांची यादी आहे
तर प्रश्न असा खुनाचा खटला चालवण्याचा अधिकार व थेट मृत्युदंडापर्यंत कोर्ट मार्शल मध्ये शिक्षा देण्यापर्यंतचा अधिकार.
बलात्कार च्या बाबतीतही तेच. तर इतका गंभीर स्वरुपाचा गुन्हा रेप व मर्डर व पात्रता केवळ जज अॅडव्होकेट या एकाच घटकाची इतर तीन घटक मेंबर्स डिफेंन्स व प्रॉसिक्युटर्स ची तर पात्रता वेल डिफाइन्ड केलेली दिसत नाही.
म्हणजे मला असे वाटत असेल की पात्रता गुन्ह्याच्या स्वरुपा व शिक्षा देण्याचा अधिकार यांच्या तुलनेत कमी आहे व स्वातंत्र्य इतर तिघांच मेंबर्स व डिफेन्स व प्रॉसिक्युटर च ज्यांची नेमणुक कोर्ट मार्शल स्थापन करणार्या कन्व्हेनींग ऑफीसर च्या सबॉर्डीनेट असण्याने व त्यांच्या अप्रेझल रीपोर्ट प्रमोशन पोस्टींग संदर्भातील त्यांचे इंटरेस्ट्स जर कन्व्हेनींग ऑफीसरशी संबंधित असले तर
न्याय होण्याची निष्पक्ष न्याय होण्याची आशा मंदावते का ?
मी अत्यंत प्रामाणिकपणे विनम्रतेने केवळ प्रश्न विचारत आहे सत्य नेमक काय आहे ते समजुन घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे याची खात्री बाळगावी. माझी माहीती चुकत असल्यास कृपया सुधारावी
धन्यवाद
8 Sep 2016 - 11:28 pm | अमितदादा
धन्यवाद. तुम्ही अत्यंत स्पेसिफिक प्रश्न विचारले आहेत ज्याची उत्तरे माझ्याकडे नाहीत कारण मी एक सामान्य वाचक आहे यातील जाणकार नाही. तुम्ही मिपावर जे जाणकार आहेत त्यांना जर विनंति केली तर तुम्हालाही उत्तरे मिळतील आणि मिपा वाचकांना हि माहिती मिळेल.
तुमच्या ह्या प्रश्नाबाबत मी बोलू शकतो
जे काही ठराविक गुन्हे आर्मी जवानाबाबतीत सिद्ध झालेत ते आर्मी च्या कोर्ट मार्शल प्रोसेस मधून झालेत. रेग्युलर सिव्हिलिअन कोर्टातून आर्मी च्या लोकांना शिक्षा झालेली मी वाचली नाही. खालील लिंक पहा यात फेमस अश्या 10 अफस्पा केसेस अभ्यासल्या आहेत त्यात फक्त माचिल चकमकी मधील सैनिकांना शिक्षा झालीय. एका तर केस मध्ये CBI ने पुरावे सुद्धा दिलेत तरी आर्मी ने निर्धोषत्व जाहीर केलंय.
http://www.countercurrents.org/nitesh171114.htm
होय भरपूर केसेस ह्या खोट्या असतात. अश्या भागात काम करताना दाहशदवाद्यांना सहानभूती असणारी लोक केसेस दाखल करतात. अर्थात कोणत्या केसेस खऱ्या आणि कोणत्या खोट्या हे आर्मी आणि सरकार ठरवत. पण ह्या बाबतीत आपण आर्मी वर विश्वास ठेवू शकतो कारण खूप लोक आर्मी ला गोत्यात आणण्यासाठी केसेस दाखल करतात हे उघड सत्य आहे. खालील लिंक पहा। यात लिहलाय कि
96% of the complaints against the army in Jammu and Kashmir have been dismissed as “baseless or false” or aimed at “maligning the image of Armed Forces”. As of December 2011, the army human rights cell had received 1,532 complaints from various parts of the country. Of these, only 54 were considered “true” and 129 military personnel had been prosecuted.
http://scroll.in/article/737667/25-years-of-afspa-in-j-k-demonstrates-a-...
9 Sep 2016 - 7:45 am | मारवा
अमितजी
यात काही मुद्दे जर समराइज केले तर असे होतात व काही प्रश्न पुन्हा निर्माण होतात.
१- तुम्ही जो वर संदर्भ दिला की ९६ % तक्रारी बेसलेस व फॉल्स होत्या. इथे नेमका प्रश्न आहे की हे कोणी ठरवले व कसे ठरविले ? हे आर्मीने ठरवले किंवा सरकारने ठरविले. इथेच नेमका मोठा आक्षेप आहे. उदा. असे घेऊ की एखाद्या कॉलेजमध्ये रॅगींगची केस झाली व त्यात एका मुलाचा मृत्यु झाला. तर याची चौकशी व निर्णय देण्याचा अधिकार केवळ त्या कॉलेजच्या समितीला दिला ज्यात कॉलेज हॉस्टेल चा रेक्टर कॉलेजचेच प्राध्यापक कॉलेज जी शैक्षणिक संस्था चालवतेय त्यांचे चेयरमन इ. चा च भरणा असेल व सर्वांचे हितसंबंध एकमेकांशी गुंतलेले असतील व अतिंमतः संस्था व कॉलेजच्या प्रतिष्ठेशी निगडीत असतील व ते सर्व मिळुन जर निर्णय घेतील की ही रॅगींग होती की निराशेतुन केलेली आत्महत्या होती ? तर पहीला साधा प्रश्न निष्पक्षतेचा व विश्वासहार्तेचा निर्माण होतो. साधी क्रिकेट मॅच असेल न्युझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया तर अंपायर श्रीलंकेचा असतो असे सर्वसाधारण असते. कोर्ट मार्शल मध्ये प्रथमदर्शनी तरी हितसंबंध एकमेकांशी व अंतिमतः सेनेशी गुंतलेले दिसतात. पात्रता हा मुद्दा आहेच. मुलतः कोर्ट मार्शल च्या व्यवस्थेची अंगभुत मर्यादा हे एक सत्य आहे. त्याची तुलना रेग्युलर कोर्टाशी कशी होऊ शकते ?
२- हे ही एक दुसरे सत्य आहेच की आर्मीची प्रतिमा मलिन करण्यासाठी, त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी, काही आतंकवादींशी सहानुभुती असलेल्या व्यक्ती व संस्था जाणीवपुर्वक कुटील कारस्थानांतर्गत खोट्या केसेस दाखल करतात.
३- मात्र आर्मीच्याच कोर्ट मार्शल ने निर्दोष जाहीर केलेल्या तसेच अॅफ्स्पाच्या विशेष संदर्भात बोलायचे तर ज्यात सेक्शन ६ अंतर्गत केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स ने ज्यात पिडीत व्यक्तीच्या जवाना विरोधात न्यायालयात केस चालवण्यासाठी मागणी केलेल्या अर्जावर जर नकार देण्यात आला ( अत्यल्प केसेस मध्ये सरकारने अॅफ्स्पा अंतर्गत केस चालवण्यास परवानगी दिलेली आहे हे आकड्यांत उपलब्ध असलेल सत्य आहे )
४- आता दोन घटक आहेत
एक आर्मीच्या कोर्ट मार्शल ने निर्दोष सिद्ध केलेला जवान.
दोन अॅफ्स्पांतर्गत मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स ने ज्याच्यावर मुळात केस चालवायलाच नकार दिलेला आहे असा जवान.
समजा पिडीत ठाम आहे की त्याच्यावर अन्न्याय झालेला आहे व पिडिताच्या पॉइंट ऑफ व्ह्यु बघितले तर आता पिडिता कडे न्याय मिळवण्यासाठीचे कुठले पर्याय उपलब्ध आहेत ?
कोर्ट मार्शल ने निर्दोष सिद्ध केलेल्या जवाना विरोधात पिडितेला अपीलचा अधिकार आहे असे प्रथमदर्शनी दिसते. वरील संदर्भात जो दावा सेनेचा आहे की ९६% खोट्या केसेस त्यातील किमान काही केसेस तरी रेग्युलर कोर्टातुनही तसाच निर्णय मिळवुन आल्यात का ? तसा काही विदा आहे का ? की कोर्ट मार्शल व रेग्युलर कोर्ट दोघांनी व ( विशेष म्हणजे कोर्ट मार्शल नंतर) जवान निर्दोष आहे असा निर्वाळा दिला. मला तरी असे कुठेही आढळले नाही.
या उलट हेगडे कमिशनने दिलेल्या ६ फेक एनकांउटर्स च्या निकालाला एक दुजोरा स्वतंत्रपणे चौकशी झालेल्या हायकोर्ट किंवा एन.एच.आर. सी.केलेल्या निकालांनी दिलेला विदा उपलब्ध आहे. जो वरील लेखात दिलेला आहे.
मग मिलिट्रीचा जो दावा ९६ % बेसलेस केसेस हा त्यांच्या स्वत: केलेल्या कोर्ट मार्शलच्या निकालापुरताच आहे इतकाच याचा मर्यादीत अर्थ घ्यावा लागेल.
केंद्र सरकारचा नकार हा ज्युडिशीयल रीव्ह्यु ने बद्ध आहे असे अॅफ्स्पा संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या "नागा केस " तील निकालात म्हटलेले आहे. तो नेमका कसा होतो ? हा ज्युडिशीयल रीव्ह्यु नेमका काय आहे ? आणि आजपर्यंत सरकारने नकार दिलेल्या किती प्रकरणांचा असा ज्युडिशीयल रीव्ह्यु झाला व त्यातुन काय सत्य बाहेर आले ? हे प्रश्न महत्वाचे आहेत असे मला वाटते. मी अजुन याचा शोध घेत आहे मात्र अजुन काहीही समाधानकारक माहीती मिळाली नाही.
विषय समजुन घेण्यात मला मदत करावी ही विनंती,
9 Sep 2016 - 10:33 am | अमितदादा
तुम्ही म्हणताय ते अगदी सत्य आहे आणि याची मला पूर्ण कल्पना आहे. मी माझ्या प्रतिसादात म्हंटले आहे की
जे काही ठराविक गुन्हे आर्मी जवानाबाबतीत सिद्ध झालेत ते आर्मी च्या कोर्ट मार्शल प्रोसेस मधून झालेत. रेग्युलर सिव्हिलिअन कोर्टातून आर्मी च्या लोकांना शिक्षा झालेली मी वाचली नाही. तुम्ही हि तीच माहिती सांगता आहात. थोडक्यात काय ह्या कायद्याअंतर्गत मुलकी कोर्टात कोणालाही शिक्षा झाली नाही. जरी काही judicial review केसेस उच्च आणि सर्वोच न्यायालयात पेंडिंग असल्या तरी त्या indivisual गुन्ह्यांच्या केसेस नाहीत, तर त्या गुन्यांशी संबंधीत केसेस आहेत. तसेच हे हि सत्य आहे की
मिलिट्रीचा जो दावा ९६ % बेसलेस केसेस हा त्यांच्या स्वत: केलेल्या कोर्ट मार्शलच्या निकालापुरताच आहे इतकाच याचा मर्यादीत अर्थ घ्यावा लागेल.
मला याचा मागे काय लपल आहे याची थोडीफार माहिती आहे. काही ठराविक भयानक गुन्हे मी वाचले आहेत त्यात कोणतीच शिक्षा झाली नाही. पण हा विषय खूप संवेदनशील आहे आणि मी इथे त्याच्यावर जास्त बोलणार नाही.
9 Sep 2016 - 11:58 am | मारवा
अमितजी
तुम्ही जे म्हणालात त्याची पुर्ण कल्पना आलेली आहे....
आपण हा विषय या मर्यादेतच इथेच सोडुन देऊ या.
या अती संवेदनशील विषयात जाणे अयोग्यच आहे.
आपण त्या व्यतिरीक्त जो भाग आहे तिकडे वळु या.
9 Sep 2016 - 9:59 pm | अमितदादा
मरावजी पूर्ण सहमत आहे. कारण
आपण ज्यांच्यातील चुका बद्दल बोलत आहोत तेच आपले संरक्षण करत आहेत.
याची जाणीव ठेवून एका मर्यादेमध्येच चर्चा करूयात. तुम्ही पुढील लेख दोन्ही बाजू (आर्मी तसेच पीडितांची ) मांडून लिहा हि विनंती.
7 Sep 2016 - 11:00 pm | पगला गजोधर
माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीच्या वाचनात अश्या (मणिपूर रेप)काही घटना आल्या की मी 'राशोमान डायलेमात' जातो, व शेवटी विचार करणे पेनफुल झाले, की इतरांप्रमाणे आपल्या संरक्षण दलाला बेनेफिट ऑफ़ डाउट देऊन, विचार झटकून टाकतो.
अवांतर: पहिल्यांदा 'फ़्यु गुड मेन' पहिला तेव्हा टॉम क्रुझ च्या पात्राचा खूप राग आलेला, पण नंतर पुन्हा पाहण्यात आल्यावर हळू हळू सिनेमा कळायला लागला, मग त्या पात्राचा राग येईनासा झाला.
7 Sep 2016 - 11:37 pm | एस
वाचतोय. तिन्ही भाग वाचल्यावरच मत प्रदर्शन करेन.
8 Sep 2016 - 8:31 am | बोका-ए-आझम
संरक्षण दलं ही चुका करूच शकत नाहीत असं अजिबात म्हणायचं नाहीये पण असा कायदा अस्तित्वात आणावा लागणं हेच एकप्रकारे परिस्थिती बिघडू शकते याचं निदर्शक आहे असं माझं मत आहे. असो. पुढील भागांच्या प्रतीक्षेत. वाखुसाआ.
8 Sep 2016 - 9:12 am | असंका
अत्यंत वेदनादायी. प.ग. यांच्या प्रतिक्रियेशी सहमत
:(
(रच्याकने., आपण नक्की किती जण मिळून मारवा हा आय डी वापरता?
काय तो अभ्यास, आणि काय ते लेखन!! )
8 Sep 2016 - 11:04 am | पुंबा
हेच म्हणायचं आहे.. मारवा यांचा व्यासंग अफाट आहे. शिवाय लिखाण कुठेही विस्कळीत होत नाही.
8 Sep 2016 - 9:53 am | अनुप ढेरे
मस्तं लेख.
8 Sep 2016 - 10:15 am | गणामास्तर
AFSPA चा उत्तम आढावा. बरीचं माहिती मिळतेय. या लेखाच्या निमित्ताने ईशान्येकडील राज्यात प्रत्यक्ष काम केलेल्यांचे या संदर्भातील मतं वाचायला मिळाली तर उत्तम. अर्थात, चिगो आणि सोन्याबापूंच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत.
पुढील भाग लवकर लिहावा हि विनंती.
8 Sep 2016 - 12:37 pm | झुमकुला
AFSPA बद्दल खरंच उत्तम माहिती. पुभाप्र.
8 Sep 2016 - 12:56 pm | अनिरुद्ध.वैद्य
अफ्स्पाबद्दल माझे काहि गैरसमज समज दुर झालेत! पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
8 Sep 2016 - 12:56 pm | अनिरुद्ध.वैद्य
अफ्स्पाबद्दल माझे काहि गैरसमज समज दुर झालेत! पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
8 Sep 2016 - 12:59 pm | तिमा
या कायद्याबद्दल एवढी विस्तृत माहिती नव्हती. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
8 Sep 2016 - 1:08 pm | संदिप एस
चिगो आणि सोन्याबापूंच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत>>
लेख आणी प्रतिक्रीया तर अजून अप्रतिम! आवडले!!
8 Sep 2016 - 1:37 pm | अभ्या..
डिट्टेलमध्ये आहे लेखन. मारवाजींचा व्यासंग खरोखर दांडगा आहे. त्यांच्याशी कुठल्याही विषयावर गप्पा मारणे (व्यनितून) हा अत्यंत आनंददायी प्रसंग असतो.
8 Sep 2016 - 4:10 pm | बाळ सप्रे
छान लेख ..
उत्सुकता होतीच अॅफ्स्पाविषयी महिती करुन घेण्याची. पण आंतर जालावरील माहिती फार विस्कळीत होती.
पुढील भागांच्या प्रतीक्षेत..
8 Sep 2016 - 4:10 pm | पक चिक पक राजा बाबू
मारवा जी खुप छान आणि माहितिपूर्ण लेख
8 Sep 2016 - 4:21 pm | यशोधरा
ह्या लेखासाठी धन्यवाद. वाखू साठवली आहे. व्यवस्थित वाचायला हवा असा हा विषय आहे.
9 Sep 2016 - 8:29 am | भंकस बाबा
मारवाजी उत्तम माहिती, पुढील लेखाच्या प्रतिक्षेत
9 Sep 2016 - 12:05 pm | सुबोध खरे
दुसरी बाजू
१) आर्मी(थलसेना) हि देशाच्या सीमेचे संरक्षण करण्यासाठी आहे आणि इतर निमलष्करी दले आणि पोलीस हे अंतर्गत सुरक्षा राखण्यासाठी असतात.
२) आर्मीला स्थानिक किंवा केंद्र सरकार स्थानिक प्रशासनाच्या मदतीसाठी बोलावते तेंव्हा परिस्थिती साधारणपणे इतर दलांच्या हाताबाहेर गेलेली आहे असे समजले जाते.
३) आर्मीला बोलावल्यावर त्यांच्या सैनिकांना हात बांधून काम करायला लावणे हि चूक गोष्ट आहे. याचे कारण आर्मी चा जवान हा स्थानीक राजकारण आणि वातावरण याच्याशी अनभिज्ञ असतो आणि त्याला फक्त कायदा आणि सुव्यवस्था पाळणे या सीमित कामासाठी बोलावले जाते.
४) कोणताही आर्मीचा जवान किंवा अधिकारी स्वतःच्या मर्जीने किंवा त्याला तेथील राजकारण/ अर्थकारणात रस आहे म्हणून मणिपूरला जायचे आहे असे म्हणत नाही तर तो आपले कर्तव्य म्हणून मिळालेल्या आज्ञेचे पालन करीत असतो.
५) लष्कराकडून मानवी अधिकारांचे उल्लंघन नक्कीच होते यात शंकाच नाही आणि ते थांबले पाहिजे यातही दुमत नाही पण लष्कराच्या जवानांचे पण मानवी अधिकार असतात हे बऱ्याच वेळेस विसरले जाते.
याचे एक टोकाचे उदाहरण देत आहे( याचा काथ्याकूट नको त्यातील तत्व लक्षात घ्या).
एक आर्मीचा जनरल आणि एका आरामखुर्चीतील विचारवंत यांचा दिल्लीतील ल्युटेन्स या सरकारी बंगल्यात वाद चालला होता तेंव्हा विचारवंत जनरल साहेबाना मानवी अधिकाराबद्दल आडवे तिडवे प्रश्न विचारत होते. तेंव्हा जनरल साहेबानी सांगितले कि जो न्याय तुम्ही लावता तोच आम्ही लष्करात लावतो. तेथील हिरवळीवर चर्चा करीत चालत असताना विचारवंत एका ठिकाणी उभा राहिले तेंव्हा त्यांच्या पायाला एक मुंगी कडकडून चावली. पायाला आग व्हायाला लागली तेंव्हा विचारवंत साहेबानी खाली पहिले तर ते एका वारुळाशेजारी उभे होते आणि खाली मुंग्यांची रांग चालली होती. झालेल्या आगीने चिडून विचारवंत साहेबानी तेथे असलेल्या बऱयाच मुंग्यांना चिरडून टाकले.
जनरल साहेबानी हसत हसत विचारले कि तुम्ही एवढ्या मुंग्यांना का चिरडून टाकले. त्या मुंग्या तर तुम्हाला चावल्या नव्हत्या ना? विचारवंत म्हणाले कि त्या मुंग्या मला किंवा दुसऱ्या कुणाला चावल्या असत्या ना?
जनरल साहेब हसत म्हणाले हाच न्याय माझ्या सैनिकानी दहशतवाद्यांसाठी लावला तर?
माझे सैनिक एखाद्या माणसाबद्दल नक्की दहशतवादी आहे अशी माहिती मिळाल्याखेरीज मारत नाहीत परंतु तो दहशतवादी आहे असे न्यायालयात "सिद्ध करणे" अशक्य गोष्ट आहे. न्यायालयात दहशतवाद्याच्या बाजूने लढायला असंख्य मोठे मोठे मानवतावादी वकील असतात परंतु माझ्या सामान्य सैनिकाच्या बाजूने लढायला एक भुक्कड असा सरकारी वकील असतो. कारण हा सैनिक छळवादी आणि शोषक "अशा सरकारचा" प्रतिनिधी असतो.
असो.
काही वस्तुस्थितीदर्शक गोष्टी खाली देत आहे.. या गोष्टी विकीलिक्स मधून बाहेर आलेल्या गोष्टी आहेत. लष्कराने किंवा सरकारने मुद्दाम प्रसारित केलेली माहिती नाही. ज्या अमेरिकेचे कॉन्सुल जनरल यांनी अमेरीकी सरकारला पाठविलेल्या केबल उघड केलेल्या आहेत.
(C) SUMMARY. August 22-25 ConGen visited the Northeast Indian state of Manipur to assess the security situation and to follow the investigation of the August 16 grenade attack on the International Society for Krishna Consciousness (ISKCON) temple in Imphal (REFTELS). Manipur suffers from over 30 active insurgency groups claiming to represent various ethnic and community interests but mostly are simply kidnapping and extortion rackets. In interactions with government officials and non-government (NGO) representatives, all interlocutors felt that insurgency violence was increasing and could not be effectively addressed due to rampant corruption, poor political leadership and the corrosive affects of persistent human rights violations. END SUMMARY.
Manipur State Youth Congress leader L. Tilottama speaking in ""hypothetical"" terms about politicians' motivations to protect insurgents said, ""If I take 1 crore (rupees) (USD 217,000) from a businessman building a flyover, and the insurgents get a share, I want to keep quiet about it.""
http://www.thehindu.com/news/the-india-cables/the-cables/article1556742.ece
आणि
The Indian civil servants were also clearly frustrated with their inability to stem the growing violence and anarchy in the State, feeling their efforts to effectively control the insurgencies were hamstrung by local politicians either in league with or at least through corruption, helping to finance the insurgents, he said.
Rampant corruption was complicating the effort to control the rising violence and a lot of money was being taken as kickbacks from contracts and government projects, the cable reported, adding: “The corruption results in a nexus between politicians and the insurgent groups. At a dinner reception, Chief Secretary [Jarnail] Singh noted that many politicians have links with or receive support from the insurgent groups.”
http://www.thehindu.com/news/the-india-cables/article1556697.ece
सैनिकांना सारखे फरशी पुसायला बोलावले जात आहे. पण वरून गळणाऱ्या छपराची दुरुस्ती होत नाही तोवर सामान्य सैनिक ओल्या फरशीबद्दल शिव्या खात राहील.
हि जखम खोल आहे आणि अधिक खोल चरत गेलेली आहे. लष्कराला "वरून" मलमपट्टीसाठी बोलावले जाते आणि मग जखम धुताना होणाऱ्या वेदनेबद्दल आणि जखम बरी होत नसल्याबद्दल लष्करालाच जबाबदार धरले जात आहे.
10 Sep 2016 - 1:11 am | मारवा
सुबोधजी आपण जे विधान केलेलं आहे
आर्मीला बोलावल्यावर त्यांच्या सैनिकांना हात बांधून काम करायला लावणे हि चूक गोष्ट आहे.आश्चर्य म्हणजे याच नेमक्या याच आक्षेपावर जो सुप्रीम कोर्टाच्या अॅफ़्स्पा वरील अगदी ताज्या केसच्या ( आपण वर बघितलेल्या "असोसिएशन केस" जुलै-२०१६ ) निकालात याच मुद्याच स्पष्टीकरण सुप्रीम कोर्टाकडुन देण्यात आलेल आहे. हा निकाल इतका मार्मिक व सुंदर आहे व भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा दर्जा कधी कधी किती उच्च नैतिक पातळीपर्यंत जातो त्याचा अक्षरश: प्रत्यय देणारा आहे म्हणुन मी स्वत:चे उत्तर न देता केवळ या निकालातला हा भाग " हात बांधुन काम करायला लावणे " संदर्भातील देतो. आपण जमल्यास पुर्ण निकाल वाचावा.
तर सुप्रीम कोर्ट सर्वप्रथम पान नं ५२ वर Use of excessive force and retaliation हा मुद्दा घेते.
सर्वात अगोदर राजेश कुमार विरुद्ध धर्मवीर केसच्या निकालाचा हवाला देत कोर्ट म्हणते की स्व-बचावाचा हक्क हा हक्क मान्य आहे वैध आहे मात्र requital सुड घेण्याचा किंवा reprisal प्रतिआक्रमण करण्याचा अधिकार हा अधिकार नाही. कोर्टाच्या शब्दात.
“To put it differently, the right is one of defence and not of requital or reprisal. Such being the nature of right, the High Court could not have exonerated the accused persons of the charges levelled against them by bestowing on them the right to retaliate and attack the complainant party.”
त्यानंतर व्ही सुब्रमनि विरुद्ध तामिळनाडु सरकार च्या निकालाचा हवाला देत कोर्ट अत्यंत वास्तववादी दृष्टीकोणातुन हे देखील मान्य करते की अशा चकमकीच्या घटनेत दोष निश्चीत करतांना अती तांत्रिकतेचा आग्रह धरणेही पुर्णपणे चुकच आहे. त्यावेळची आरोपीची मनस्थिती व ज्या एका उत्तेजनेच्या क्षणात स्वत:चा बचाव करतांना त्याच्या हातुन चुक घडुन जात असेल तर त्यालाही माफ़ी आहेच. मात्र जर परीस्थीतीजन्य पुरावा जर दाखवत असेल की जर स्व-बचावा च्या नावाने जर समोरील ओरीजनल अॅग्रेसर कडुन धोका नसल्याची शाश्वती असतांनाही जर त्याच्यावर हल्ला केलेला सिद्ध होत असेल तर हे चुक आहे. मान्य नाही कोर्टच्या शब्दात
“Due weightage has to be given to, and hypertechnical approach has to be avoided in considering what happens on the spur of the moment on the spot and keeping in view normal human reaction and conduct, where self-preservation is the paramount consideration. But, if the fact situation shows that in the guise of self-preservation, what really has been done is to assault the original aggressor, even after the cause of reasonable apprehension has disappeared, the plea of right of private defence can legitimately be negatived. The court dealing with the plea has to weigh the material to conclude whether the plea is acceptable. It is essentially, as noted above, a finding of fact.”
पुढे रोहताश कुमार विरुद्ध हरीयाणा सरकार च्या निकालाचा हवाला देतांना ज्यात कोर्ट म्हणते बळाचा आक्रमणासाठी वापर हा केवळ ज्या व्यक्तीवर केला आहे ती अट्टल गुन्हेगार होती म्हणुन केला या सबबीवर करता येत नाही. एखादी व्यक्ती केवळ अट्टल गुन्हेगार आहे म्हणुन त्या व्यक्तीला थंडपणाने इन कोल्ड ब्लड मारण्याचा अधिकार नाही या शब्दात
this Court cautioned against the use of retaliatory force even against a dreaded criminal. It was held: “It also appears that he [the appellant] was declared absconder. But merely because a person is a dreaded criminal or a proclaimed offender, he cannot be killed in cold blood. The police must make an effort to arrest such accused. In a given case if a dreaded criminal launches a murderous attack on the police to prevent them from doing their duty, the police may have to retaliate and, in that retaliation, such a criminal may get killed. That could be a case of genuine encounter. But in the facts of this case, we are unable to draw such a conclusion.”
यानंतर सुप्रीम कोर्ट म्हणते की वरील निकालातुन हे सुस्पष्ट आहे की स्व रक्षणाचा हक्क व आक्रमणासाठी बळ वापरणे या सर्वस्वी दोन भिन्न गोष्टी आहेत.
From the above, it is abundantly clear that the right of self-defence or private defence falls in one basket and use of excessive force or retaliatory force falls in another basket. Therefore, while a victim of aggression has a right of private defence or self-defence (recognized by Sections 96 to 106 of the IPC) if that victim exceeds the right of private defence or self-defence by using excessive force or retaliatory measures, he then becomes an aggressor and commits a punishable offence.
त्यानंतर हे आर्ग्युमेंट कोर्ट "सरकार" जेव्हा अधिकृतरीत्या बळाचा वापर करते त्याकडे निर्देश करत अत्यंत निसंदिग्ध शब्दात त्याचा निषेध करते व समाज तसेच घटनेला हे मान्य नाही असे आग्रहाने सांगते व त्याचे कारणही नमुद करते ते असे.
When the State uses such excessive or retaliatory force leading to death, it is referred to as an extra-judicial killing or an extra-judicial execution or as this Court put it in People's Union for Civil Liberties v. Union of India it is called “administrative liquidation”. Society and the courts obviously cannot and do not accept such a death caused by the State since it is destructive of the rule of law and plainly unconstitutional.
त्यानंतर कोर्ट म्हणते जेव्हा मुद्दा अतिरेक्यांचा येतो तेव्हा सरकार आमच्याकडे तक्रार करते की आम्हाला यांच्याशी लढतांना एक हात पाठीमागे बांधुन काम करावे लागते आणि यावर जे प्रत्युत्तर सुप्रीम कोर्टाने दिलेल आहे त्यावर काय सांगु इतका मार्मिक निर्णय व तो ही त्यांनी एका इजराएल या देशाच्या ( ज्या देशाच्या आक्रमकतेची उदाहरणे आपल्याकडे रोज दिली जातात ) सुप्रीम कोर्टाच्या प्रेसींडेंट चे उदाहरण देऊन दिलेला आहे तो भाग निव्वळ अप्रतिम असा आहे.
The problem before the courts tends to become vexed when the victims are alleged to be militants, insurgents or terrorists. In such cases, how does anyone (including the court) assess the degree of force required in a given situation and whether it was excessive and retaliatory or not? Scrutiny by the courts in such cases leads to complaints by the State of its having to fight militants, insurgents and terrorists with one hand tied behind its back. This is not a valid criticism since,
पुढे तुमच्या मुंगी चिरडण्याच्या उदाहरणाशी कमालीचे साम्य दाखवत एक उदाहरण येते कोर्ट म्हणते की इथे एनकाउंटर नाही तर "स्मोकींग गन " ही स्कृटीनी खाली येते.
and this is important, in such cases it is not the encounter or the operation that is under scrutiny but the smoking gun that is under scrutiny. There is a qualitative difference between use of force in an operation and use of such deadly force that is akin to using a sledgehammer to kill a fly; one is an act of self-defence while the other is an act of retaliation.
This concern, both from the perspective of the State and from the perspective of preserving and protecting human rights of a citizen is adverted to by Prof. Aharon Barak a former President of the Supreme Court of Israel who acknowledges that sometimes a democracy must fight with one hand tied behind
its back in the following words:
इथे तुमच्या हात बांधलेल्या अवस्थेतच काम करण्या संदर्भातील प्रत्यक्ष उत्तर
“While terrorism poses difficult questions for every country, it poses especially challenging questions for democratic countries, because not every effective means is a legal means. I discussed this in one case, in which our Court held that violent interrogation of a suspected terrorist is not lawful, even if doing so may save human life by preventing impending terrorist acts:
आणि अखेरीस चरम बिंदु वर जात लोकशाही मुल्यांचे महत्व प्रस्थापित करणारा हा शेवटचा परीच्छेद
“We are aware that this decision does not make it easier to deal with that reality. This is the fate of democracy, as not all means are acceptable to it, and not all methods employed by its enemies are open to it. Sometimes a democracy must fight with one hand tied behind its back. Nonetheless, it has the upper hand. Preserving the rule of law and recognition of individual liberties constitute an important component of its understanding of security. At the end of the day, they strengthen its spirit and strength and allow it to overcome its difficulties.
मुळ निकाल एकदा तरी वाचाच अशी सर्वांना हात जोडुन आग्रहाची विनम्र विनंती,
10 Sep 2016 - 1:46 am | अमितदादा
मरावाजी सर्वोच न्यायालयाने नोंदवलेली मते अत्यंत थेट आणि भेदक आहेत . माझी मते एवढी भेदक नाहीत हे प्रामाणिक पने मान्य करतो. आतंकवाद्यांना लोकशाही समजत असती तर सगळेच प्रश्न सुटले असते, त्यामुळं ज्याच्या हाती बंदूक आहे त्याला बंदुकीने , जो चर्चा करू इच्छितो त्याला चर्चेने आणि सामान्य नागरिंकाना न्यायाने आणि सन्मानाने वागवले पाहिजे ह्या मताचा मी आहे. तुमचे जे काही मत असेल त्याचा मला आदरच राहील.
10 Sep 2016 - 7:29 am | मारवा
ज्या क्षणी ही मर्यादा तोडली जाईल त्या क्षणी सर्वच सिस्टीम कोसळेल.
आपल्या मतस्वातंत्र्या विषञी मलाही नक्कीच आदर आहे.
लेट अस अॅग्री टु डिसअॅग्री डिसेंटली. डेमॉक्रॅटीकली !
10 Sep 2016 - 10:28 am | सुबोध खरे
मारवा साहेब
आपण म्हणता तशी लोकशाही मूल्ये हि तुमच्या माझ्या सारख्या सुशिक्षित लोकांमध्ये जितकी घट्ट रुजलेली आहेत तितकी ती सामान्य सैनिकात नसता. जो माणूस वयाच्या १८ व्य वर्षापर्यंत खाप पंचायतीने चालविलेल्या प्रणालीत लहानाचा मोठा झाला त्याला हि मूल्ये पटकन समजावणे कठीण असते.
एक उदाहरण म्हणून देत आहे. नौदलाच्या एका जहाजावर एका अधिकार्याने एका वेश्येला( हे बऱ्याच सैनिकांना माहित होते) आपली पाहुणी म्हणून जहाजावर आणले. जहाजावर येणाऱ्या कोणाच्याही पाहुण्याला जहाजाच्या शिडीजवळ असणाऱ्या नौसैनिकाने(क्वार्टर मास्टर) सलाम करायचा असतो. येथे हि स्त्री वारयोषिता आहे म्हणून त्या क्वार्टर मास्टरने सलाम करण्यास नकार दिला. अधिकाऱ्याने त्याला सलाम कर म्हणून हुकूम दिला तरी त्याने सांगितले "सर ऐसी औरत को हं सलाम नाही करेंगे ये हमारे युनिफॉर्म कि मर्यादा का भंग है " आणि सलाम करण्यास नकार दिला. त्यावरून त्याचे समरी कोर्ट मार्शल झाले. त्यावेळेस त्याला नियम भंग केला म्हणून शिक्षा दिली गेली. आपण म्हणता तशी मूल्ये कि एका स्त्रीला स्त्रीचा सन्मान दिला गेला पाहिजे हे बरोबर आहे परंतु हि गोष्ट अशा जाट सैनिंकाला समजावणे कठीण आहे. परंतु यामुळे त्या जहाजावर सैनिकांमध्ये बऱ्यापैकी असंतोष पसरला होता. ( त्या अधिकाऱ्याला हि समज दिली गेली) अशी परिस्थिती लष्करी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष युद्धभूमीवर हाताळायला लागते.
(RETROSPECTIVELY EVERYBODY IS WISE)
अजून बरेच लिहायचे आहे.
क्रमशः
10 Sep 2016 - 11:55 am | मारवा
सुबोधजी
वर आपण जो प्रत्यक्ष अनुभव दिलेला आहे त्यात त्या स्त्री चा सम्मान केला पाहीजे की नाही हा एक मुद्दा आहे. मात्र आपल्या मुळ धागा विषयाच्या दृष्टीने त्याच्या संदर्भात जो दुसरा मुद्दा आहे जो की त्यात ज्या अधिकाराचा वापर ज्या प्रेरणेतुन ( जी न्यायाच्या अपेक्षेपेक्षा अहंकाराच्या प्रेरणेतुन केलेली प्रथमदर्शनी तरी दिसते.) झालेला व ज्या शैलीत झालेला आहे व सर्वात महत्वाचे ज्या "समरी कोर्ट मार्शल" च्या यंत्रणेंतर्गत झालेला आहे. ती नेमकी कोर्ट मार्शल चा भाग असलेली समरी कोर्ट मार्शल अनेक ठीकाणी आर्बिट्ररी, पक्षपाती, अन्यायकारक दिसते. असे माझे मत आहे. आता इथे समरी कोर्ट मार्शल वा एकुण कोर्ट मार्शलचाच मुद्दा मी का घेत आहे कारण तो वरील मुळ धागा विषयाशी सरळ संबंधित आहे. अनेक कोर्ट मार्शल मध्ये आम्ही योग्य न्याय करतो व दोषी अधिकार्यांना योग्य शिक्षा दिलेली आहे असा आर्मीतर्फे दावा केला जातो. तर मुळात ही कोर्ट मार्शल ची सिस्टीम किती सक्षम आहे ? की नाही ? व किती घटनानुकुल व किती निष्पक्ष आहे ? याची चिकीत्सा करणे अॅफ्स्पा च्या संदर्भातही अत्यावश्यक व अगत्याचे ठरते. त्या कोर्ट मार्शल च्या व्यवस्थेतच जर मोठया फटी उणीवा असतील तर न्यायाची शक्यता पिडीत त्याच प्रणाणे सैनिक दोघांसाठी कमीच आहे. त्यातही माझ्या मर्यादीत अभ्यासाने व कुवतीने माझ्या असे लक्षात आले की " कोर्ट मार्शल " च्या या विशेषतः " समरी कोर्ट मार्शल " मध्ये तर अनेक मर्यादा त्रुटी व गैरवापर झालेला आढळतो. तो भाग इथे माझ्या कुवतीनुसार मांडतो माझ्या काही चुका होत असल्यास दुरुस्ती करावी आपण प्रत्यक्ष अनुभवी आहात म्हणुन ही नम्र विनंती.
काही केसेस आहेत अगदी थोडकयात एका केसमध्ये रणजीत ठाकुर च्या ज्यात जवानाने केवळ वरीष्ठ अधिकारीच्या सी.ओ. च्या निर्णया विरोधात तक्रार केली म्हणुन त्याच सी.ओ. ने त्याचे तात्काळ स.को.मा. करुन त्याला २८ दिवसांची शिक्षा दिली व हातकडी घालुन जेल मध्ये ठेवले. त्यानंतर त्याने दुसरा गुन्हा जेल मध्ये केला तो असा की जेल मध्ये दिलेले अन्न सुभेदार ने आदेश दिल्यावर ही खाण्यास केवळ नकार दिला दुसर्याच दिवशी सी.ओ.ने पुन्हा स.को.मा. केले व त्याला यासाठी १ वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली व नोकरीतुनही डिसमीस केले. या विरोधात तो हाय कोर्टात व नंतर सुप्रीम कोर्टात गेला. या समरी कोर्ट मार्शल चे मुळ ब्रिटीशांनी १८५७ चे बंड चिरडल्यानंतर केलेल्या कायद्यात आहे. ज्यात कमांडींग ऑफीसरच्या पॉवर्स मध्ये मोठी वाढ करत १८६९ मध्ये पहील्यांदा याचा समावेश केला गेला. वरील केस व इतर सर्व इथे आहेत.
हा लेख अनेक बाबी स्पष्ट करतो.
http://www.legalserviceindia.com/article/l30-Summary-Court-Marital-And-T...
बाकी तीन
जनरल कोर्ट मार्शल
डिस्ट्रीक्ट कोर्ट मार्शल
समरी जनरल कोर्ट मार्शल
विषयी आपण माहीती द्यावी अशी विनंती करतो. शिवाय आपल्या मते ही जी काय रचना आहे कोर्ट मार्शलची त्यात आपली केस कोणत्या कॅटेगरीत होती ? व आपल्याला ती प्रक्रिया मुळात न्यायपुर्ण वाटते का ?
समरी कोर्ट मार्शल विशेषतः तर फारच आर्बिट्ररी वाटते. अजुन एक म्हणजे आर्मी रुल्स १९५४ हे जे उपलब्ध आहे ते फायन्ल मानावेत की त्यानंतर चे मॅन्युअल काही अस्तित्वात आहे ?
10 Sep 2016 - 12:01 pm | मारवा
आपली केस व्यक्तिगत आहे. व कदाचित ती आपल्याला शेअर करणे आवडणार नाही. तसे असल्यास तो भाग सोडुन द्या.
आपण हायकोर्टाचा उल्लेख केला तर त्या अगोदर ती कोर्ट मार्शलच्या प्रक्रियेत होती का ? असा काहीसा माझ्या समजण्यात गोंधळ झाल्याने तो प्रश्न मी विचारला मात्र तो व्यक्तिगत विषय सोडुन द्यावा ही विनंती,
व एकुण कोर्ट मार्शल संदर्भातील आपली मते मांडावीत ही विनंती
10 Sep 2016 - 8:59 pm | सुबोध खरे
दोन परस्पर विरुद्ध वाटणाऱ्या म्हणी प्रसिद्ध आहेत.
१)justice delayed is justice denied
२) justice hurried is justice buried
अर्थात उशिरा न्याय म्हणजे अन्याय आणि झटपट न्याय म्हणजे अन्याय.
याला मी एक पुरवणी जोडतो ती म्हणजे न्यायालयात न्याय मिळत नाही तर तेथे निकाल मिळतो.
किंवा न्यायालयात जे मिळते त्याला न्याय म्हणायचे.
यात पहिली गोष्ट मुलकी न्यायालयात आहेत आणि दुसरी गोष्ट लष्करी न्यायालयात आहेत.
सत्य हे दोन्हीच्या मध्ये कुठे तरी आहे.
समरी कोर्ट मार्शल मध्ये अनेक वेळेस तुम्ही किंवा मी जे म्हणतो तशा तर्हेने न्याय मिळत नाही हि वस्तुस्थिती आहे.
परंतु निदान झटपट न्याय केला जातो हि वस्तुस्थिती आहे.
आपण म्हणता तसे एक लष्करी अधिकारी एखाद्या सैनिकाला समरी जनरल कोर्ट मार्शल करून नोकरीतून बडतर्फ करू शकतो हि वस्तुस्थिती फक्त आर्मी ऍक्ट मध्ये आहे. वायुसेना आणि नौसेना ऍक्ट मध्ये कोर्ट मार्शल करून एका अधिकाऱ्याच्या कोर्टाला ते अधिकार नाहीत तर व्यवस्थित तीन न्यायाधीशांचे खंडपीठ असावे लागते. या त्रुटीबद्दल मी लष्कराच्या ज्युनियर कमांड कोर्स मध्ये मोठ्या हिरीरीने वादविवादहि केला होता आणि एका माणसाच्या पूर्वग्रहदूषित मतामुळे एखाद्या सैनिकांची नोकरी जाऊ शकते हे कायद्याच्या मूळ तत्वाला हरताळ फासणारे आहे असेही ठाम पणे मांडले होते.
अर्थात त्याचे पुढे काहीच झाले नाही.
पण कमांडिंग अधिकारी यांचे मत पूर्वग्रहदूषित असेल तर कनिष्ठ सैनिकांना शिक्षा जास्त मिळते हि वस्तुस्थिती मी पाहिलेली आहे.
दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालय जेवढे " पवित्र आणि अधिष्ठित" असल्याचा आव आणते तशी वस्तुस्थिती नाही. त्यांच्या स्वतःच्या मोठ्या चुकांबद्दल आपण बोललो तर तो न्यायालयाचा "अवमान" होतो.
जस्टीस सीरियाक जोसेफ यांनी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश असताना चार वर्षात फक्त ७ निकाल लिहिले
It turns out that Cyriac Joseph authored only seven judgments during his tenure as a Supreme Court judge from July 7, 2008 to January 27, 2012.
http://thewire.in/3843/he-gave-only-7-judgments-in-3-years-so-how-did-cy...
याच न्यायाधीशांनी दिल्ली उच्च न्यायालयात १०० च्या वर केसेस ची सुनावणी पूर्ण झाली आणि निकाल राखून ठेवला आणि हा निकाल न देताच ते तेथून पायउतार झाले यामुळे या सर्व खटल्यांची फेरसुनावणी घ्यायला लागली. He had reserved more than 100 judgments and went out on being transferred, without delivering the judgments, so that all the cases had to be reheard.
https://www.saddahaq.com/justice-cyriac-joseph-illustrates-how-bad-colle...
या १०० पक्षकारांवर अन्याय झाला याची दाद कोणाकडे मागायची मानवाधिकार आयोगाकडे? कशी मागायची?
कारण हेच महाशय सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाल्यावर मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष झाले. याहून न्यायाचा अवमान अजून काय असेल
पैसे आणि वेळ याचा हा अपव्यय पहिला तर वाटते कि कोर्ट मार्शल मध्ये जे काही मिळते( त्याला न्याय म्हणा अथवा नाही) ते निदान वेळेत तरी मिळते आणि माणूस आयुष्य पुढे चालू ठेवतो. घटस्फोटाचे खटले पहा दहा वर्षे चालल्यावर एखाद्याला घटस्फोट मिळाला तर त्याला न्याय म्हणता येईल का?
जे न्यायालय आपणच सर्वोच्च आणि पवित्र आहे अशा आवेशात बोलत असते तेथेच पायाखाली काय जळते ते हि त्यांना दिसत नाही. यांचे तर हात कुणी बांधलेले नाहीत. याना लष्करासारखे झटपट न्याय द्या म्हणून कोणी सांगत नाही.
दोन्ही गोष्टी प्रत्यक्ष पाहून मी हे बोलतो आहे. दोन्ही बाजू लंगड्याच आहेत आणि दोन्ही सत्यापासून फार दूर आहेत.
असो.
माझी केस कोर्ट मार्शलची नव्हती. नोकरी सोडण्यासाठी मी तीन वेळेस राजीनामा देऊनही मला लष्कर सोडत नव्हते. (बॉण्ड तीन वर्षे अगोदर संपला होता मला निवृत्तीवेतन किंवा कोणताही फायदा मिळणार नव्हता तरीही) म्हणून मी उच्च न्यायालयात रिट अर्ज दाखल केला होता. तेथे मी जिंकलो त्याविरुद्ध लष्कर सर्वोच्च न्यायालयात गेले होते. तेथे आयुष्याची बहुमूल्य साडे तीन वर्षे आणि बारा महिन्यांचा पगार वकिलावर खर्च करून माझ्या हातात काय लागले. फक्त स्वातंत्र्य. अर्थात त्याची किंमत काय आहे हे मी सर्वसामान्य माणसांपेक्षा जास्त चांगली जाणतो.
पुढे मागे कधी तरी यावर एक लेख माला लिहिण्याचा विचार आहे.
11 Sep 2016 - 12:23 pm | मारवा
सुबोधजी
तुम्ही स्वतःच्या न्याय्य हक्कासाठी ज्या हिरीरीने संघर्ष केलात व शेवटी ते मोठी किंमत मोजुन मिळवुन दाखवले त्यामागील सत्याच्या आग्रहाला संघर्षाला सलाम. त्यावर तुम्ही खरोखर लेखमाला लिहाच हा आग्रह त्याने एक अवेयरनेस येइल असे वाटते.
दोन मुलकी व लष्करी न्यायालयांमधला जो महत्वाचा फरकाचा मुद्दा आपण दाखवला व ज्या अत्यंत समर्पक कोट्स ने त्या ठळक केल्या ते ही आवडल व पुर्णपणे पटल. हे एक वास्तवच आहे.
भारतीय न्यायसंस्था पवित्र आहे व पुर्णपणे दोषरहीत आहे वा त्यातील एकही न्यायाधीश करप्ट वा चुकीचे नाहीत वा त्यांनी चुकीचे निकाल दिले नाहीत असे माझे किंवा कुणाचेच म्हणने नसावे इतके पुरावे बातम्या आपल्या अगदी रोजच्याच परीचयाच्या आहेत. मी कुठल्याही " माणसांच्या" संस्थेला पवित्र वा अपवित्र असे दोन मध्ये तोडुन पाहत नाहीत.
माणसांना व त्यांच्या समाजाच्या संस्थांना अशी रेडीमेड स्टीकर्स लावु नयेत असे गौरवीकरण वा दानवीकरण दोन्ही टाळावेत असे माझे स्पष्ट मत आहे व चिकित्सेला सर्वांना सामोरे जाण्यास भाग पाडावे जे जे योग्य आहे ते पुरस्कृत करावे जे जे अयोग्य आहे ते ते त्यागावे असे मी समजतो. अर्थात भावनिकता हा एक प्रॉब्लेम कधी कधी होऊन जातो तो भाग बाजुला ठेउ.
तर आपला मुळ धागा विषय अॅफ्स्पा च्या संदर्भातुन कोर्ट मार्शल च्या एकंदरीत व्यवस्थे संदर्भात माझे वरील काही प्रतिसाद सातत्याने आले त्याचे कारण असे की एक माझ्या मते एक रीझनेबल असा प्रश्न /आक्षेप अॅफ्स्पा विरोधकांनी " कोर्ट मार्शल " च्या प्रक्रियेसंदर्भात उपस्थित केलेला आहे तो पुरेसा "अॅड्रेस" झालेला नाहीये असे मला वाटते. एकवेळ रेग्युलर कोर्टाचा मोठा अनुभव जनतेला असतो मात्र "कोर्ट मार्शल" सामान्य माणसासाठी एक गुढ आहे. मी जो काय कोर्ट मार्शल समजुन घेतला त्यावरुन अगदी प्राथमिक असे दिसते की ही एक मुलतः ब्रिटीशांनी त्याकाळी नेटीव्ह सैनिकांना गोर्या कमांडरच्या कह्यात ठेवण्यासाठीच्या हेतुने केलेल्या काही आर्बिट्ररी तरतुदी ज्यात आहेत. त्याला कॉलोनियल लीगसी आहे. शिवाय कायदेशीर ज्ञानाची जी पात्रता, त्यातल्या सदस्यांचे स्वातंत्र्य व हितसंबंध हा न्याय मिळण्याला मोठा मारक भाग दिसतो. रेग्युलर कोर्ट याच्या तुलनेने जे मेकॅनिझम वापरतात ज्यात जजची पात्रता, हितसंबंध टाळता येणे, जज बदलुन मागणे, अनेक बाबी ज्या रेग्युलर कोर्टच्या मेकॅनीझममध्येच मुलतः न्यायानुकुल आहेत त्याचमुळे कोर्ट मार्शल चे निर्दोष सोडलेले रेग्युलर कोर्टात टिकत नाहीत. शिवाय हायकोर्ट व सुप्रीम कोर्टात अपील जे ठेवल आहे ते कुठेतरी याची मर्यादांची जाणीव तसेच न्यायाची आवश्यकता व पर्यायांचा विचार करुनच दिलेली तरतुद आहे. अन्यथा कोर्ट मार्शल चा निर्णय अंतिम ठेवला असता त्याविरोधात पुढे एक पर्याय दिला आहे.
तसेच होते काय की ज्युरीसडिक्शन चा ही एक मुद्दा आहे चॉइस कुठल्या ठीकाणी खटला चालवावा दोन पैकी यावरही मोठा खल झालेला आहे. अजुन एक आक्षेप असा की कुठल्याही केस चे पहीलीच पातळी कोर्ट मार्शल प्रिज्युडाइस्ड असेल तर त्याचा पहील्या साक्ष पुरावे तपासण्यावर निर्णयावर निगेटीव्ह परीणाम पडण्याची शक्यता वाढते.
त्या तशा मार्शल कोर्टात आढळत नाहीत व अॅफ्स्पा संदर्भात व गंभीर गुन्हे रेप व मर्डर संदर्भात कोर्ट मार्शल चे मुळ मेकॅनिझमच आर्बिट्ररी तकलादु अपुर्ण अन्यायानुकुल वाटते. तत्याची चिकीत्सा होण्या हेतुने जाणण्या हेतुने ते प्रतिसाद होते. ज्याचे अजुन समाधानकारक स्पष्टीकरण मिळालेले नाही व्यक्तीगत शोध सुरुच आहे.
यात अॅफ्स्पा पिडींतांचा प्रश्नाचा सरळ संबंध कोर्ट मार्शल च्या मेकॅनिझम च्या मुद्द्याशी निगडीत आहे म्हणुन व आपण अनुभवी आहात म्हणुन ते प्रश्न उपस्थित केलेले होते इतकेच. असो मात्र आता हा विषय नंतर बघु. इतर मुद्देही आहेतच.
11 Sep 2016 - 8:57 pm | सुबोध खरे
मारवा साहेब
आपण उपस्थित केलेले मुद्दे अत्यंत योग्य आणि यथोचित आहेत.
माझ्या मर्यादित ज्ञानाप्रमाणे समरी कोर्ट मार्शल हे खून ,सदोष मनुष्य वध आणि बलात्कार या गुन्ह्यांबद्दल कधीच वापरले जात नाहीत.
परंतु इतर गुन्ह्यांबाबत समरी कोर्ट मार्शल वापरले जाते तेंव्हा जर हे गुन्हे लष्कर विरुद्ध नागरी असे असतील तर त्या प्रक्रियेत युनिट चा कमांडिंग ऑफिसर किंवा त्याच्याशी निगडित असा कोणताही अधिकारी वकील किंवा न्यायाधीश असत नाही. असे जर काही केसेस मध्ये आढळले तर तो अपवाद आहे आणि स्पष्ट अन्याय आहे यात शंका नाही.
हे सर्व गृहीत धरले तरीही कोर्ट मार्शल मध्ये लष्करी अधिकाऱ्यांना सैनिकांबद्दल १०० % सहानुभूती असते आणि त्यामुळे संशयाचा फायदा हा सैनिकांना दिला जातो हि सुद्धा वस्तुस्थिती आहे. यामुळे अशांत भागातील जनतेवर अन्याय होतो हि वस्तुस्थिती आहेच. याबद्दल कोणीही समतोल लष्करी अधिकारी अनमान करणार नाहीच.
दुर्दैवाने समरी कोर्ट मार्शलच्या ऐवजी मुलकी न्यायालये जर हे खटले चालवायला लागली तर पुरावे गोळा करणे आणि केस दाखल करणे हि कामे स्थानिक पोलिसाना करावी लागतील. एकंदर पोलिसांच्या आणि कनिष्ठ न्यायालयांच्या कीर्तीबद्दल बोलायचे तर ना सैनिकाला ना जनतेला त्यात न्याय मिळेल फक्त वर म्हटलेल्या लोकांच्या तुंबड्या भरल्या जातील.
दुर्दैवाने हि गोष्ट उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांना सुद्धा माहीत आहे त्यामुळे सहसा कोर्ट मार्शलचे खटले हे परत दुसऱ्या कोर्टात चालवा असे ते म्हणत नाहीत. अधिकारकक्षेचा भाग त्यात येतो हि वस्तुस्थिती असली तरीही.
इथपर्यंत आपण कायदा आणि समानता हा भाग पाहिला आणि त्यात सामान्य नागरिकांवर अन्याय होतो हि सुद्धा वस्तुस्थिती आहे.
आता याचीच दुसरी बाजू आपण पाहू -- लष्कराच्या अधिकाऱ्यांना किंवा जवानांना नक्की माहित असते कि हा अमुक तमुक माणूस दहशतवादी आहे तेंव्हा ते त्याच्या मागावर जातात. तो कोंडीत सापडला कि तो शरण यायला तयार होतो. कारण त्याला माहीत असते कि आता शरण आलो नाही तर मृत्यू नक्की. आणि पकडले गेलो तरी फाशी होण्याची शक्यता १ % सुद्धा नाही. आणि फाशी झाली तरीही त्याची अंमल बजावणी करायला ११०-१२ वर्षे नक्की जातील.
मुळात अशा माणसाविरुद्ध साक्ष द्यायला कोण तयार होणार? तेंव्हा दहशतवाद्याला सुटण्याची खात्री आसतेच. या विरुद्ध लष्कराला माहीत असते कि याला जिवंत पकडले तर एक दोन महिन्यात हा जामिनावर सुटून बाहेर येणार आणि परत आपला सूड घ्यायला तयार होणार. वापरून गुळगुळीत झालेला संवाद म्हणजे एका खुनाला फाशी आणि दहा खुनाला फाशीच मग असे सुटून आलेले दहशतवादि दुप्पट चिडीने हल्ले करतात. हे सर्व होऊन आपल्या सैनिकांचा बळी जाण्यापेक्षा याला आत्ताच इथे संपवा. जेंव्हा मृत्यू समोर असेल तेंव्हाच या लोकांना उपरती होते आणि ते शरण येऊन हत्यारे ठेवायला तयार होतात. जेंव्हा सरकार आवाहन करते कि शास्त्रे ठेवा तुमचे पुनर्वसन करुऊ तेंव्हा यातील बरेच लोक तयार होत नाहीत कारण यातून मिळणाऱ्या पैशाची हवं असतेच सराईत दरोडेखोर जसे कष्टाने मिळणाऱ्या भाकरीसाठी तयार होत नाहीत तशीच स्थिती यांची असते. मूळ जर स्थानिक राजकारणी लोकांची साथ संपून दहशतवादाला मिळणार पैशाचा स्रोत आटला तरच हे दहशहतवादि नागरी जीवनाकडे वळायला तयार होतील. हे कोणाही स्थानीक राजकारण्याला नको आहे पण केवळ AFSPA रद्द करून हवा आहे म्हणजे यांची कुरणे चालू राहतील. दुर्दैवाने अरुंधती रॉय सारखे हरामखोर तथाकथित मानवतावादी याला साथ देत असतात. त्यांना दहशतवाद्यांनी केलेल्या मानवीहक्कांची पायमल्ली कधीच दिसत नाही जी सशस्त्र दलांनी केलेल्या अत्याचारांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते.कारण आंतर राष्ट्रीय पैसा आणि सवंग लोकप्रियता याचा त्यांचा हि रमणा चालू राहायला हवा.
१९९०-९१ साली माझे अनेक मित्र काश्मीर मध्ये डॉक्टर म्हणून तैनात होते.त्यांच्या कमांडिंग अधिकाऱ्यांनी सैनिकांना सरळ आदेश दिलेले होते कि दहशतवादी दिसलं कि संपवा पकडून आणू नका. यामुळे त्यातही ल दहशतवाद बऱ्यापैकी नियंत्रणात आला होता. हीच परिस्थिती मुंबईत पोलीस आयुक्त रिबेरो यांनी गॅंग वरच्या माणसांना संपवण्यासाठी वापरली होती.
यात सामान्य नागरीकाचा नाहक बळी जातो हि वस्तुस्थिती आहे. परंतु लष्करी भाषेत याला collateral damage( अप्रत्यक्ष नुकसान) म्हणतात. आणि हा किती स्वीकारायचा हा निर्णय सरकारचा असतो लष्कराचा नाही.
आदर्श परिस्थिती मध्ये फक्त दहशहतवाद्यांचा बळी गेला पाहिजे किंवा ते पकडले गेले पाहिजे आणि एकही सैनिक आणि नागरिक बळी जाऊ नयेत. असे जगात कुठेच आणि कधीच होत नाही. मग प्रश्न येतो किती पातळी पर्यंत असे collateral damage( अप्रत्यक्ष नुकसान) स्वीकारार्ह आहे. हा निर्णय लष्कराचा नाही तर केंद्र आणि राज्य सरकारचा आहे. या कारणास्तव सरकार कोणत्याही पक्षाचे असो इतक्या वर्षात AFSPA रद्द कधीही झालेला नाही.
शेवटी शूट आउट ऍट लोखंडवाला या सिनेमात जेंव्हा घेरलेल्या गॅंगवॉर च्या गुंडाना सोडून द्या म्हणून एकाची आई आयुक्ताला विनंती करते तेंव्हा असलेला संवाद असा आहे "ये घिरे हुए लोग महात्मा गांधी तो नाही"
मुळात मणिपूर सारख्या अशांत प्रदेशात AFSPA जर काढून टाकला आणि तेहींतील लष्कर/ निमलष्करी दले काढून घेतली तर तेथे निर्नायकी आणि यादवी होईल आणि फार मोठ्या प्रमाणावर (GENOCIDE) नरसंहार होईल. कारण तेथे २३ टक्के जनता हि नागा आहे आणि बाकी जनता अनेक टोळ्यात विभागलेली आहे . नागा लोकांना नागाप्रदेश आणि मणिपूरच्या नागा बहुसंख्य विभाग याचा मिळून स्वतंत्र नागा देश हवा आहे. याला मणिपूरच्या जनतेचा आणि टोळ्यांचा विरोध आहे. हे सर्व मुद्दे मी दिलेल्या दुव्यांत सविस्तर पणे दिलेलं आहेत. त्याची पुनरुक्ती नको.
केवळ आफ्स्पा आणि त्यातून होणाऱ्या मानवी हक्कांची पायमल्ली हा एकमेव मुद्दा घेऊन विचार करून चालणार नाही. ते म्हणजे हत्तीची शेपूट पाहून हा साप आहे आणि ताबडतोब ठेचायला हवा असे म्हणण्यासारखे आहे.
AFSPA का चालू ठेवला आहे हे विचारात घेणे अत्यावश्यक आहे आणि तो काढला तर त्याला पर्यायी पण सशक्त उपाय काय हे आज कुणीच सांगू शकत नाही
हि खरी शोकांतिका आहे.
11 Sep 2016 - 9:58 pm | मारवा
सखोल समतोल प्रतिसाद
कोलॅटरल डॅमेज चा मुद्दा अत्यंत कळीचा अत्यंत वादग्रस्त.
इतरही अनेक मुद्दे महत्वाचे आहेत.
मला असे प्रामाणिकपणे वाटते की हाच योग्य बिंदु आहे
की मी आता दुसरा भाग लिहायला पाहीजे
मी तेच करतो.
तोपर्यंत तुमच्या प्रतिसादासाठी अनेक धन्यवाद.
11 Sep 2016 - 10:21 pm | चंपाबाई
सैनिक मेला तर त्याच्या नातेवाईकाना मिळालेली भरपाई व कोलॅटरल डॅमेजमध्ये मेलेल्या माणसाच्या नातेवाइकाना मिळालेली भरपाई सारखीच असते का?
11 Sep 2016 - 10:36 pm | सुबोध खरे
सुडोसेक्युलर भरपूर आहेत कि त्यांना ( आणि स्वतःला) भरपूर भरपाई द्यायला./ मिळवून द्यायला.
बाकी डोक्यावर दोन मुसलमान पोरांनी हातोडा मारल्यामुळे मेलेल्या पोलीस शिपायाला २५ लाख रुपये भरपाई आणि मुलाला नोकरी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. अशी नुकसान भरपाई मिळाली. ती बिचार्या कोणत्याच लष्कराच्या सैनिकाला मिळत नाही. कारण भरपूर नतद्रष्ट लोक आहेत ना हे त्यांचे "कामच होते" म्हणायला.
11 Sep 2016 - 10:45 pm | सुबोध खरे
उगाच व्हॉट्स अँप वर आलेली माहितीवर बोलू नका.
सैनिक मेला तर त्याच्या विधवेला फक्त पूर्ण निवृत्तीवेतन मिळते. ( अन्यतः कुटुंबाचे निवृत्तीवेतन अर्धे असते) . बाकी त्याच्या विम्याची रक्कम आणि भविष्य निर्वाह निधी मध्ये असणारे पैसे जे त्याचे स्वतःचेच असतात तेही मिळतात. यावर एक दमडी मिळत नाही. माझ्या माहितीतील कितीतरी वैमानिकांच्या विधवाना मिळालेले पैसे मला माहिती आहेत.
12 Sep 2016 - 1:59 pm | चंपाबाई
बरोबरच आहे. सैनिकाना पगार लढायला ( व मरायलाच ) मिळतो.
लढाईत मरणं हे सिव्हिलियनचं कर्तव्य नव्हे... म्हणुन त्याला जास्त भरपाईच मिळाली पाहिजे.
12 Sep 2016 - 2:01 pm | चंपाबाई
जास्त भरपाई मिळालीच पाहिजे
12 Sep 2016 - 7:53 am | राजेश घासकडवी
एका विशिष्ट मर्यादेपर्यंत कोलॅटरल डॅमेज होणार यासाठी सामान्य नागरिकाची तयारी असते. प्रश्न निर्माण होतो तो 'इंडियन आर्मी रेप अस, किल अस' म्हणत तीस बायका भर चौकात नागड्या उभं राहाण्याची तयारी दाखवण्याची वेळ येते तेव्हा. एका मुलीच्या योनीत सोळा गोळ्या झाडलेल्या दिसल्या तर अशी कृत्यं करू शकणाऱ्यांना संपूर्ण इम्युनिटी मिळण्यावर प्रश्न उभे राहातात.
निर्भया बलात्कारानंतर 'हे करणारांना भर चौकात फाशी द्या' 'त्यांचं लिंग कापून टाका' अशा मागण्या झाल्या होत्या हे आठवलं.
पुढचे भाग वाचण्याबाबत उत्सुक.
12 Sep 2016 - 11:43 am | सुबोध खरे
अशी कृत्यं करू शकणाऱ्यांना संपूर्ण इम्युनिटी मिळण्यावर प्रश्न उभे राहातात.
Recently, in December 2014, in a case filed at Supreme Court of India, the apex court told to government to pay a compensation of Rs. 10 lakhs to Manorama's family. Case is accepted for hearing in the court
पण जे कुणी दोषी असतील त्यांना शिक्षा हि झालीच पाहिजे याबद्दल दुमत नाही.
12 Sep 2016 - 1:39 pm | कपिलमुनी
तुफान आवडला !
9 Sep 2016 - 12:11 pm | सुबोध खरे
मणिपूरमध्ये होणारे अत्याचार याबद्दल माहिती घेण्याबरोबरच मणिपूरची राजकीय परिस्थिती समजून घ्या. यासाठी खालील तीन दुवे वाचून पहा.
http://www.idsa.in/strategicanalysis/ManipurandArmedForcesSpecialPowerAc...
http://www.idsa.in/policybrief/the-naga-peace-accord-manipur-connections...
http://www.idsa.in/policybrief/educated-unemployment-and-insurgency-in-m...
9 Sep 2016 - 12:59 pm | मारवा
सुबोधजी सर्वप्रथम सविस्तर परखड प्रतिसादासाठी धन्यवाद.
आपले प्रतिसाद वाचल्यानंतर ( लिंका अजुन वाचलेल्या नाहीत काळजीपुर्वक वाचाव्या लागतील ) माझ्या असे लक्षात आले की मी आपल्या अनेक मुद्द्यांशी पुर्णपणे सहमत आहे. त्यातले जे आपण म्हणता
१-
याचे कारण आर्मी चा जवान हा स्थानीक राजकारण आणि वातावरण याच्याशी अनभिज्ञ असतो आणि त्याला फक्त कायदा आणि सुव्यवस्था पाळणे या सीमित कामासाठी बोलावले जाते.हे अगदी खरे आहे याच संदर्भात की बाहेरुन आलेला जवान हा किती तणावात असतो व कशा परीस्थितीत काम करत असतो यावरील ऐसी वर दिलेला प्रतिसाद इथे देतो.
२- सैनिकांना सारखे फरशी पुसायला बोलावले जात आहे. पण वरून गळणाऱ्या छपराची दुरुस्ती होत नाही तोवर सामान्य सैनिक ओल्या फरशीबद्दल शिव्या खात राहील. हि जखम खोल आहे आणि अधिक खोल चरत गेलेली आहे. लष्कराला "वरून" मलमपट्टीसाठी बोलावले जाते आणि मग जखम धुताना होणाऱ्या वेदनेबद्दल आणि जखम बरी होत नसल्याबद्दल लष्करालाच जबाबदार धरले जात आहे.वरील विधानाशी व अत्यंत अचुक तर्कयुक्त उदाहरणाशीही पुर्णपणे सहमत आहे. सैनिक हा मुळ उपद्रवाचे कारण नाही. सैनिक हा मुळ समस्येचे कारण नाही. सैनिकाला वापरणारी राजकीय शक्ती अधिक जबाबदार आहे. यात काहीच दुमत नाही. सेना बरोबर किंवा सेना चुक या दुहेरीच भुमिकेतुन इतर सर्व पैलु टाळुन पाहणे चुकीचेच आहे. डायबेटीक माणसाची पायाची जखम बरी होत नाही यासाठी नेहमीच्या साध्या जखमेवरील साध्या मलमांच्याच क्षमतेवर टीका करण्यासारखे ते आहे. यात काहीच शंका नाही.
हे नोंदवुन झाल्यानंतर जिथे आपल्याशी नेमका सहमत नाही ते माझे असहमतीचे मुद्दे मी नंतर सविस्तर मांडतो.
धन्यवाद.
9 Sep 2016 - 10:25 pm | अमितदादा
उत्तम प्रतिसाद, तसेच खरे साहेबांच्या प्रतिसादातील काही मुद्दे पटले. ह्या लेखावरती जवानांची सुद्धा बाजू मांडली पाहिजे तसेच समजून घेतली पाहिजे. अश्या अशांत भागात जवान कसे काम करत असतील याची मला कल्पना आहे. माझा आक्षेप दहशतवाद्याबाबद्दल नाही. दहशतवादी किंवा त्यांचे समर्थक यांना गोळ्या च घातल्या पाहिजेत असे माझे मत आहे . माझा विरोध फक्त जे भयानक गुन्हे जाणीवपूर्वक करण्यात आलेले आहेत त्याला आहे (याची उदाहरणे मी देऊ शकतो ), कारण काय होतंय कि जिथे अशांतता आहे तिथे आर्मी तैनात केलीय, तिथे जेंव्हा असे भयानक गुन्हे होतात ते मोठे करून सांगितले जातात , याची परिणीती परत असंतोषात होते. म्हणजे काय हे loop तयार होत. मग हे कूठ तरी मोडाय हवं ना. बर ज्यांच्यावर असा अन्याय झाला त्यांचे कुटुंबीय , नातेवाईक , पुढची पिढी भारत विरोधी होतीय याची मला भीती आहे. आफ्स्पा विरोधी रिपोर्ट देणारी जीवन रेड्डी कमिटी पहा त्यात आर्मी च्या एका जनरल व्ही.आर.राघवन यांचा हि समावेश आहे . त्यांना ह्या परिस्थितीच गांभीर्य कळलं म्हणूनच विरोध केला ना . असो hypothetical उदाहरणापेक्षा ह्या भागातील तैनात जवानांची अवस्था, त्यांच्या पुढे येणारी परस्तीथी कळली तर हा विषय सर्व बाजूने समजेल. तसेच भविष्यात काय करता येयील जेणेकरून जवान हि सुरक्षित राहतील आणि अश्या भयानक घटना हि होणार नाहीत यावरती मते जाणून घ्यायला आवडतील.
9 Sep 2016 - 1:18 pm | मारवा
न्यायालयात दहशतवाद्याच्या बाजूने लढायला असंख्य मोठे मोठे मानवतावादी वकील असतात परंतु माझ्या सामान्य सैनिकाच्या बाजूने लढायला एक भुक्कड असा सरकारी वकील असतो.हे विधान कथेपुरतेच आहे की आपण एक वस्तुस्थितीही मांडत आहात. वस्तुस्थिती अशी आहे असे आपणास सुचवायचे असल्यास आपण हे नेमक कोणत्या संदर्भात प्रत्यक्षात होत असत असे म्हणत आहात ?
म्हणजे माझा प्रश्न असा की कोर्ट मार्शल च्या प्रक्रीयेत जवानाला भुक्कड सरकारी वकील उपलब्ध असतो असे म्हणायचे आहे की रेग्युलर क्रिमीनल कोर्टात ?
दुसरा भाग वकील असणे व त्याचा दर्जा हा मुळात केस कोर्टात कुठल्याही ( कोर्ट मार्शल वा रेग्युलर कोर्टात ) गेल्यानंतरची गोष्ट आहे.
मुळात अॅफ्स्पा अंतर्गत जर जवाना विरोधात केस नुसती नोंदवायची असेल सुरु करायची असेल तर त्यासाठी केंद्र शासनाची परवानगी लागते.
यात पॅरामिलीटरी फोर्सेस च्या जवानाविरोधातील अर्ज - मिनिस्ट्री ऑफ होम अफेयर्स
मिलिटरी फोर्सेस च्या जवानाविरोधातील केस दाखल करण्यासाठी अर्ज - मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स
कडे करावा लागतो. यांनी म्हणजेच परवानगी दिली तरच केस दाखल होत असते. तोपर्यंत एफ.आय.आर. ही होत नाही. कोर्टातही डायरेक्ट पिडीताला जाता येत नाही. हि अॅफ्स्पा लागु असेल तर वस्तुस्थिती आहे. तर इथे तुम्ही वापरलेल्या छळवादी आणि शोषक सरकारच्या हातात पहीला निर्णय व पहीला बॉल त्याच्याच कोर्टात आहे.
आणि आजवर जितके अर्ज आले त्याच्या अत्यल्प अत्यल्प अर्जांवर न्यायालयात केस दाखल करण्याची परवानगी मुळात सरकारकडुन देण्यात आलेली आहे. ही एक वस्तुस्थिती आहे.
म्हणजे वकील भुक्कड किती ही दुरची बाब झाली मुळात न्यायालयापर्यंत पोहोचण्यातच एक मोठा परवानगीचा अडसर सरकार या रुपात जवानाच्या बाजुने उभा आहे.
जवान नसेल साधारण नागरिक असेल तर तात्काळ एफ.आय.आर. दाखल होते व तात्काळ खटला दाखल होतो.
जवान असेल तर वरील दोन्ही पैकी काहीही तात्काळ होत नाही.
तर आपण या बाबी ध्यानात घेतलेल्या आहेत का ?
या शिवाय कोर्ट मार्शलच्या पात्रते व निष्पक्षते व स्वातंत्र्य संदर्भात आपली भुमिका काय आहे ती ही स्पष्ट केल्यास बरे होइल.
धन्यवाद.
9 Sep 2016 - 7:11 pm | सुबोध खरे
मारवा साहेब
हे विधान कथेपुरतेच नाही तर एक वस्तुस्थितीही मांडत आहे. जेथे AFSPA लागू नाही तेथे सैनिकांविरुद्ध अशा तर्हेचे खटले चालू असतात आणि त्यामुळे त्यांना अतिशय मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते.
एक प्रत्यक्ष उदाहरण- माझा मित्र वायुसेनेच्या बिहटा या ठिकाणी तैनात होता. तेथे सैन्य भरती साठी आलेल्या अक्षरशः हजारो लोकांपैकी शेकडो लोकांना ते शारीरिक दृष्ट्या अपात्र आहेत म्हणून नापसंत केले असतात त्याच्या विरुद्ध पाटण्याच्या कोर्टात १३ खटले दाखल केले होते. त्याला पुढील दोन वर्षे आपल्या दुसऱ्या पोस्टिंग च्या जागेतून डेहराडून येथून समन्स आले कि खेटे मारायला लागत. जरी जायचा यायचा खर्च आणि रेल्वेचे वॉरंट सरकार देत होते तरी बारावीत असलेल्या मुलाकडे लक्ष द्यायचे सोडून होणाऱ्या कटकटीला सामोरे जायला लागत असे. त्याच्या बरोबर JAG चा एक अतिशय कनिष्ठ अधिकारी कोर्टात "मम" म्हणायला हजर राहत असे.
हा विषय फार खोल आणि रुंद असा पसरलेला आहे आणि यात फार लोकांना रस नाही आणि त्यातून मेगाबायटी प्रतिसाद आल्यावर त्यात असलेला उरला सुरला रस हि नाहीसा होईल. प्रत्यक्ष भेटीत आपण हे बोलू शकू.
जेथे AFPSA लागू नाही अशा अशांत भागात जर सैनिकाच्या विरुद्ध खोटा खटला दाखल केला तर ज्या सैनिकाला इंग्रजी सुद्धा येत नाही असा सैनिक काय आपला बचाव करणार आणि कसा करणार? जेंव्हा प्रकरण गळ्याशी येते तेंव्हाच संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी जागे होतात. या कारणासाठीच आतापर्यंत सगळेच्या सगळे वरिष्ठ लष्करी अधिकारी AFSPA रद्द करण्याच्या विरुद्ध आहेत.
AFSPA मुळे मानवी हक्कांची पायमल्ली होते हि वस्तुस्थिती आहेच. पण तो आजच्या स्थितीत रद्द करायचा असेल तर मणिपूर, काश्मीर सारखी राज्ये आपल्या हातातून जातील आणि तिथे निर्नायकी अवस्था येईल (आज इराकची सीरियाची आहे तशी) आणि शत्रू अगदी आपल्या दारात येईल याची तयारी ठेवली पाहिजे.
राहिली गोष्ट कोर्ट मार्शलची. अशा अशांत भागात कोर्ट मार्शल हे सैनिकांच्या बाजूचे/ पक्षाचे असते पण तरीही ते पूर्ण पूर्वग्रह दूषित नसते याचे कारण कोर्ट मार्शल विरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागता येते आणि तिथे आपला कचरा होऊ नये अशी कोणत्याही कोर्ट मार्शल जज ची इच्छा असते त्यामुळे तेथे बऱयापैकी न्याय मिळू शकतो.
9 Sep 2016 - 7:36 pm | कपिलमुनी
चर्चा अतिशय मुद्देसूद चाललेली आहे .
याच व्यासपीठावर लिहिल्यास सर्वांनाच माहिती मिळेल.
9 Sep 2016 - 7:59 pm | सुबोध खरे
बऱ्याच वेळेस कोर्ट मार्शलचे निर्णय उच्च न्यायालयात पुराव्या किंवा कायद्याच्या मुद्द्यापेक्षा तांत्रिक कारणांवर फिरवले जातात. उदा. आरोपपत्र ९० दिवसांऐवजी ९१ व्या दिवशी दाखल केले गेले इ. कारण कायद्याची प्रक्रिया फार किचकट असते आणि लष्करी लोक असा शब्दांचा किस पाडण्यात मागे पडतात असे आढळून आलेले आहे.
9 Sep 2016 - 6:03 pm | कैलासवासी सोन्याबापु
परंतु माझ्या सामान्य सैनिकाच्या बाजूने लढायला एक भुक्कड असा सरकारी वकील असतो.
कुठल्याही सैनिकाला रिप्रेझेंट करायला जॅग कोर चे लोक नसतात का? जॅग कोरला भुक्कड लोक असतात का??
9 Sep 2016 - 7:55 pm | सुबोध खरे
बापूसाहेब
JAG मधला सर्वात कनिष्ठ आणि अननुभवी अधिकारी अशा खटल्यात उभे केले जातात.
माझ्या स्वतःच्या उच्च न्यायालयातील खटल्याचे वेळेस ( WRIT PETITION) नौदलाकडून एक एल एल बी होऊन नुकताच भरती झालेला "सब लेफ्टनंट" JAG म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात उभा राहिला होता. त्याच्यापेक्षा मला लष्करी कायद्याचे ज्ञान जास्त असल्यासारखे वाटत होते.त्याच्या मदतीने CGSC (CENTRAL GOVT STANDING COUNSEL) तेथे वादविवादास उभे असत.
माझे वकील गोव्याचे महाधिवक्ता (ADVOCATE GENERAL) श्री आत्माराम नाडकर्णी होते. ते आता दिल्लीत additional solicitor general (ASG) आहेत.
माझ्यासाठी हि आरपारची लढाई होती पण सरकारच्या दृष्टीने हि अनेक केस पैकी एक होती.
जेंव्हा उच्च न्यायालयात नौदल हरले आणि न्यायालयाने बरेच ताशेरे ओढले आणि त्यांनी निकालात दिलेल्या गोष्टी लष्कराच्या पुण्याच्या दक्षिण कमांड मधील बऱ्याच केसेस ना (मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षेत येणाऱ्या सर्व आर्मी नौदल आणि वायुदल कमांड ना) "लागू"( BINDING) झाल्या तेंव्हा संरक्षण मंत्रालय जागे झाले. आणि सर्वोच्च न्यायालयात माझ्या विरुद्ध त्यांनी additional solicitor general (ASG) ना उभे केले.
अशी परिस्थिती असताना एका सैनिकासाठी स्थानिक कोर्टात सरकार काय रस घेणार?
10 Sep 2016 - 12:08 pm | सतीश कुडतरकर
chhan charcha. vaachtoy.
10 Sep 2016 - 4:57 pm | अमितदादा
मारवाजी, मला तुमचं काही मुद्यांवरील मत किंवा भूमिका जाणून घ्यायची आहे. ती तुम्ही मांडावी हि विनंती करतो.
मी अफस्पा संदर्भात बोलताना आतंकवादी आणि सामान्य जनता असा भेद करतो, सामान्य जनतेवर होणाऱ्या अन्यायामुळे माझा ह्या कायद्याला विरोध आहे. सर्वोच न्यायालय मात्र असा कोणताही भेद करत नाही. सर्वोच न्यायालय अतिशय आदर्शवादी आणि थेट भूमिका मांडत आहे. ते अंतांकवादी आणि सामान्य लोक ह्यांच्यात कोणताच भेद करत नाही.
This is the fate of democracy, as not all means are acceptable to it, and not all methods employed by its enemies are open to it. Sometimes a democracy must fight with one hand tied behind its back.
खरोखरच जर अस एक हात पाठीमाग बांधून सैन्याला काम कराय लावलं तर अंतर्गत सुरक्षा धोक्यात येईल असं वाटतंय. मुळात सैन्यदल असे काम करील (आदर्शवादी भूमिकेत राहून) हा हि प्रश्नच आहे.
मी idealism आणि realism यांची योग्य ती सांगड घालून राज्य कराय हवं ह्या भूमिकेशी सहमत आहे, मात्र सर्वोच न्यायालय idealism चा पुरस्कार करत. तर तुम्ही कोणती भूमिका पुरस्कृत करता? सर्वोच न्यायालयाचा आदर्शवाद अवलंबून दाहशतवादावर विजय मिळेल काय?
11 Sep 2016 - 12:53 pm | मारवा
सर्वप्रथम कुठल्याही प्रश्नांची सोपी उत्तरे मिळवण्यापेक्षा मुळ प्रश्न "जिवंत" ठेवण मी योग्य समजतो. कारण साध आहे असा "मारुन मुटकुन " टाकलेला प्रश्न पुन्हा पुन्हा डोके वर काढतो. त्यापेक्षा एकीकडे त्या प्रश्नाने निर्माण केलेला "ताण" संयमाने सहन करत दुसरीकडे त्याच्या "उत्तरा" साठी परीश्रम करावेत असे मला माझ्यापुरते वाटते.
दुसराही एक चोर मार्ग असतो प्रश्न न सोडवता त्याचं घोंगड भिजवत ठेऊन त्या "अनिर्णित" अवस्थेचा स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करणे हा ही मी चुकीचा मानतो जे आपले राजकारणी करतांना आपण रोज पाहतो.. म्हणजे दोन्ही बाजुंनी प्रामाणिकतेचा कस लागतो. एकीकडे सोपी ना-लायक उत्तरे नाकारत राहण्याचा प्रामाणिकपणा ठेवणे व दुसरीकडे उत्तरासाठीच्या सोडवणूकीच्या प्रयत्नातही प्रामाणिकपणा ठेवणे.
आता आपण सामान्य माणस आहोत. आपण काय करु शकतो ?
सर्वप्रथम आपण प्रश्न मुळात त्याच्या विवीध पैलुंसह काय आहे ते समजण्याचा प्रयत्न केला पाहीजे. त्याची निर्भय चिकीत्सा मुळात केली पाहीजे. सध्याचे वातावरण असे आहे की मुळात प्रश्न च नाही त्याचे अस्तित्वच अमान्य करण्यापासुन सुरुवात आहे केले मान्य तर त्यानंतर तो "इतका गंभीर " नाहीच तो "दाखवला" जातोय. व शेवटी मान्यही झाला की आहे हा गंभीर प्रश्न तर " पटपट काय ते ठरवा सोपा उपाय सुचवा बुवा " हा उतावळेपणा. अशी एक चेन आहे जी आपण तोडली पाहीजे व नग्न सत्याला सामोरे गेले पाहीजे सखोल चिकित्सा केली पाहीजे जो पर्यंत आपली क्षमता आहे तितक्या खोलात गेलेच पाहीजे. व कोसळुन पडल्यावर शेवटी मग जे निष्कर्ष येतील त्यावर ठाम आग्रही वाटचाल केली पाहीजे.
राजु परुळेकर यांनी शिवसेनेची मार्मिक चिकीत्सा करणारा एक लेख लिहीलेला त्यात ते शिवसेनेच्या त्या काळच्या एका मोठ्या मर्यादेवर बोट ठेवतांना म्हणतात की शिवसेनेकडे बाळासाहेंबाकडे प्रश्नांची सोपी उत्तरे तयार असत टाका एक बॉम्ब संपवा तो पाकचा प्रश्न, मराठी माणुस गरीब आहे टाका वडापावची गाडी कारण कोण आहे याला मद्रासी बजाव पुंगी हटाव लुंगी इ.इ. नेमके आठवत नाही तर यातील निर्रथकता परुळेकरांनी दाखवलेली होती. एक उदाहरण देतोय.
कसाब को बंद करो बिर्यानी करा एक घाव दोन तुकडे काय खटला चालवता ? यात न्यायव्यवस्थेचे काय महत्व आहे ? ते तसे करण्याचा खटला चालवुन प्रोसीजर फॉलो करण्याचा दिर्घकालीन फायदा काय आहे ? ती तत्वे एकुण समाज पुढील १००० वर्ष चालवण्यासाठी का उपयुक्त आहे याचा विचार क्षणिक उत्तेजक विचारात होत नाही.
असा दृष्टीकोण व प्रोसीजर मी उत्तरावर येण्याआधी मी वापरतो ही माझी मुळ भुमिका आहे.
आता तुमचा प्रश्न
मात्र सर्वोच न्यायालय idealism चा पुरस्कार करत. तर तुम्ही कोणती भूमिका पुरस्कृत करता?
याचे उत्तर मला न्यायालयाच्या निकालातील आदर्शवाद योग्य वाटतो जवळचा वाटतो त्या बाजुने मी कललेला आहे.
तुमचे विधान
मी अफस्पा संदर्भात बोलताना आतंकवादी आणि सामान्य जनता असा भेद करतो, सामान्य जनतेवर होणाऱ्या अन्यायामुळे माझा ह्या कायद्याला विरोध आहे. सर्वोच न्यायालय मात्र असा कोणताही भेद करत नाही. सर्वोच न्यायालय अतिशय आदर्शवादी आणि थेट भूमिका मांडत आहे. ते अंतांकवादी आणि सामान्य लोक ह्यांच्यात कोणताच भेद करत नाही.या विधानाशी पुर्णपणे असहमत आहे सर्वोच्च न्यायालय असे करत नाही. सर्वोच्च न्यायालय अतिरेकी जेन्युइन एनकाउंटर मध्ये मारला गेला तर त्यावर काहीही आक्षेप घेत नाही.
शेवटचा प्रश्न
सर्वोच न्यायालयाचा आदर्शवाद अवलंबून दाहशतवादावर विजय मिळेल काय?हा माझ्यासाठी अवघड प्रश्न आहे मला याचे उत्तर ठाम पणे ब्लॅक अॅन्ड व्हाइट मध्ये देता येत नाही. हा प्रश्न व या प्रश्नाचा "ताण" मी कायम ठेवतो. मान्य करतो.
धन्यवाद.
11 Sep 2016 - 1:02 pm | अमितदादा
मारवाजी धन्यवाद ! आपल्यात काही मतांतरे आहेत हे मान्य कदाचित वस्तुस्थितीचा विचार न करता मांडलेल्या आदर्शवादी भूमिका मला पटत नसल्यामुळे असेल. परंतु ह्या कायद्यावारती जनमाणसात चर्चा आणि विश्लेषण झाल पाहिजे, हा कायदा हटवला पाहिजे हे माझे मत आहे. आफ्स्पा नंतर काय यावरती आपली मते भिन्न असतील, परंतु याची आपण साधक बाधक चर्चा नक्की करूयात. पुढील लेख लवकर घेवून या हि विनंती करतो.
13 Oct 2016 - 12:39 pm | पुंबा
मारवाजी पुढचा भाग येऊ द्या ना..
13 Oct 2016 - 3:08 pm | स्वाती दिनेश
लेख आणि प्रतिसाद आज वाचले. रोचक आहे विषय.
पुभाप्र.
स्वाती