बाप्पाचा नैवेद्य - पंचखाद्य लाडू

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in लेखमाला
12 Sep 2016 - 7:00 am

.inwrap
{
background-color: #F7F0ED;
}
.inwrap
{
border: solid transparent;
border-width: 30px;
-moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-webkit-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-o-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
}

पंचखाद्य लाडू.

.
गणपतीसाठी नैवेद्याला दर वर्षी काहीतरी नवीन पदार्थ बनवायचा असतोच. म्हणूनच नेहमी वापरात असलेले साहित्य वापरून, तसेच कमी वेळात होणारी पाककृती देत आहे. करून पाहा, आवडेलच. गणपतीला आणि तुम्हालासुद्धा.

साहित्य :-
१. एक कप बिनबियांचा खजूर. (नेहमीचाही बिया काढून वापरू शकता.)
२. एक टेबलस्पून तूप, अर्थातच साजूक.
३. दोन टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट.
४. एक टेबलस्पून खसखस.
५. दोन टेबलस्पून गुळाची पावडर.
६. पाव चहाचा चमचा जायफळ पावडर.
७. बदामाचे काप किंवा एक चहाचा चमचा भरड पूड.

कृती :-
१. गॅसवर कढई तापवून त्यात तूप घालून खजूर मऊ होईपर्यंत परतावा. परतताना मध्ये मध्ये चमच्याने कुस्करावा. हात भराभर चालवावा, नाहीतर खजूर करपण्याची शक्यता असते.
२. खजूर छान एकजीव होतो चारपाच मिनिटात. त्यानंतर गार करण्यासठी एका ताटात पसरून द्यावा.
३. गरम कढईत खसखस आणि खोबरे मंद आचेवर भाजून घेऊन गॅस बंद करून गूळ पावडर मिसळावी.
४. आता हे मिश्रण खजुरावर घालून त्यात जायफळ पावडर आणि बदाम काप घालावे.
५. साधारण कोमट झाल्यवर मळून घ्यावे. हव्या त्या आकाराचे लाडू वळावेत किंवा मोदकाच्या साच्यात घालून मोदक करावेत. हवे असल्यास डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवावेत. त्यासाठी अर्धा टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट लागेल.

या मिश्रणाचे पेढ्याच्या आकाराचे २१ लाडू किंवा मोदक पंधरा मिनिटात तयार होतात.

गणपती बाप्पा मोरया.

प्रतिक्रिया

छान सोपी पाकृ.नक्की करुन पाहणार.

पिलीयन रायडर's picture

12 Sep 2016 - 7:54 am | पिलीयन रायडर

गणपतीच नाही तर नेहमीच खायला पौष्टीक आणि करायला सोपा लाडु!

पाकृ आवडली!

कविता१९७८'s picture

12 Sep 2016 - 8:32 am | कविता१९७८

मस्तच

अनन्न्या's picture

12 Sep 2016 - 9:38 am | अनन्न्या

आता खोबरं खवून वाळवतेच!

त्रिवेणी's picture

12 Sep 2016 - 10:00 am | त्रिवेणी

मस्त दिसतायेत लाडू. पण होस्टेलच्या दिवसात असे खजुर लाडू,चिवडा इतके खाऊन झालेत की आता नको.
कुणीतरी तिखट नैवद्य ही दाखवा की.

भ ट क्या खे ड वा ला's picture

12 Sep 2016 - 10:28 am | भ ट क्या खे ड वा ला

ट्रेक ला न्यायला ही छान आहे.
करुन पाहतो

अगदी हेच लिहिणार होतो. लॉन्ग सायकल राइड ला न्यायला अगदी उपयोगी आहेत. बहुदा खोबरे घशात अडकेल, म्हणून ते न घालता करून बघायला पाहिजे. मस्त आहे पाकृ.! एकदम सोप्पी!

इशा१२३'s picture

12 Sep 2016 - 10:43 am | इशा१२३

मस्त दिसताहेत लाडू.छानच लागतात.

स्वाती दिनेश's picture

12 Sep 2016 - 11:23 am | स्वाती दिनेश

छानच दिसत आहेत लाडू.
नैवेद्याखेरीज भटक्या खेडवाला म्हणतात त्याप्रमाने ट्रेकला, प्रवासात बरोबर ठेवायला उत्तम आहेत.
स्वाती

पद्मावति's picture

12 Sep 2016 - 11:53 am | पद्मावति

आहा! क्लास दिसताहेत लाडू.

मुक्त विहारि's picture

12 Sep 2016 - 4:14 pm | मुक्त विहारि

खजूर हा माझा अतिशय आवडता.

ह्या पा.कृ.तीत थोडे बदाम, काजू, पिस्ते, अक्रोड आणि जर्दाळूच्या बियातील गर घाटला की, मस्त आरोग्यदायी प्रकार होईल.

रेवती's picture

12 Sep 2016 - 5:56 pm | रेवती

छान व पौष्टिक पाकृ.

अंतरा आनंद's picture

12 Sep 2016 - 6:12 pm | अंतरा आनंद

छान आहेत. वेगळे आहेत.
पंचखाद्य हा प्रकार जोंधळ्याच्या लाह्या, चण्याची डाळं, शेंगदाणे, सुक्या खोबर्^याचे काप हे गुळाच्या कच्च्या पाकात घोळवून करतात. कोकणात गणपतीचा प्रसाद हाच असतो.

मस्त. मी खजुरात बदाम-पिस्ते घालून त्याचे रोल्स बनवत असते, पण ते कापणे थोडे वेळखाऊ काम आहे. लाडू वळने सिपोए वाटत आहे.

सानिकास्वप्निल's picture

13 Sep 2016 - 12:19 am | सानिकास्वप्निल

मस्तं दिसतायेत पंचखाद्य लाडू, आवडले :)
मी हे पंचखाद्य भरुन तळणीचे मोदक करते.

पूर्वाविवेक's picture

13 Sep 2016 - 2:47 pm | पूर्वाविवेक

छान सोपी आणि पौष्टीक पाककृती.

सविता००१'s picture

13 Sep 2016 - 3:47 pm | सविता००१

मस्त आणि सोपी रेसिपी

पियुशा's picture

14 Sep 2016 - 10:06 am | पियुशा

अह्हा काय दिसतय :)