ओट फ्लेक्सची बिस्किटे

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
25 Sep 2008 - 2:06 pm


साहित्य -
२५० ग्राम ओट फ्लेक्स,२०० ग्राम बटर,१२५ ग्राम साखर,
१२५ ग्राम मैदा,२ टीस्पून बेकिंग पावडर,१ अंडे,१चिमूट मीठ
वॅनिला अर्क १.५ चमचा
कृती -
मैदा+बेकिंग पावडर+१ चिमूट मीठ एकत्र करणे.बटर गरम करम करणे,त्यात हा बे.पा.+मीठ घातलेला मैदा घालणे, ओटफ्लेक्स घालणे,अंडे फोडून घालणे,वॅनिला अर्क व साखर घालणे व सगळे मिश्रण एकत्र करणे‌.
बेकिंग ट्रे मध्ये बेकिंग पेपर ठेवणे.एका टेबलस्पूनमध्ये जेवढे मिश्रण येईल तेवढे एका बिस्किटासाठी बेकिंगपेपरवर सांडग्याप्रमाणे घालणे.असे सांडगे अंतराअंतरावर घालणे.
१८० ते २०० अंश सेंटीग्रेड तापमानावर साधारण २० मिनिटे बेक करणे.
वि.सू.
१.दोन बिस्किटात अंतर ठेवावे कारण बेकिंग पावडर असल्याने बिस्किटे फुलतात आणि अंतर नसेल तर एकमेकांना चिकटतात.
२.बिस्किटे तयार झाली की अवन मधून एका ट्रेमध्ये/ ताटामध्ये काढून घेणे व पूर्ण गार झाली की डब्यात भरणे अन्यथा वाफ धरून बिस्किटे मऊ पडतात.

प्रतिक्रिया

शाल्मली's picture

25 Sep 2008 - 2:29 pm | शाल्मली

स्वाती ताई,
फारच मस्त दिसत आहेत बिस्किटं.
आता मी पण नक्की करुन बघीन.

कॉर्न फ्लेक्सची अशीच बिस्किटे होतील का?
--शाल्मली.

बिन्धास्त बबनी's picture

25 Sep 2008 - 5:35 pm | बिन्धास्त बबनी

हे सगळे करत बसण्यापेक्षा ओट दुधात घालून खाल्ले तर चालणार नाही कां? ते अधिक पौष्टिक असतात म्हणे.

अण्णा हजारे's picture

25 Sep 2008 - 6:43 pm | अण्णा हजारे

ओट पहिले खा मग दुध प्या..ते सोपं नाही का?

अण्णा..

कुंदन's picture

25 Sep 2008 - 6:59 pm | कुंदन

तुम्हाला उपोषण सोडायला चालेल का ओट आणि / किंवा दुध?

विसोबा खेचर's picture

25 Sep 2008 - 7:02 pm | विसोबा खेचर

कृपया चर्चा पुरे...

खरडवह्यांचा वापर करावा...

प्रत्येकच ठिकाणी अवांतर चर्चा आणि गप्पाष्टकं मांडू नयेत अशी कळकळीची विनंती...

विसोबा खेचर's picture

25 Sep 2008 - 5:43 pm | विसोबा खेचर

या पाकृबद्दल बेकरीमालक स्वाती डिकास्टाचे आभार.. :)

तात्या पेस्ताव.

यशोधरा's picture

25 Sep 2008 - 6:08 pm | यशोधरा

कुरियर कर गं बिस्किटं स्वातीताई :)

रेवती's picture

25 Sep 2008 - 7:42 pm | रेवती

स्वातीताई,
मुलांना शाळेतून आल्यावर रोज (वेगळा, पौष्टीक) काय खाऊ द्यायचा असा जो प्रश्न असतो तो तुम्ही बर्‍याच प्रमाणात सोडवलाय.
ही बिस्कीटे करून पाहीन. दिलेल्या साहित्यात साधारण किती बिस्कीटे होतात?

रेवती

स्वाती दिनेश's picture

25 Sep 2008 - 7:47 pm | स्वाती दिनेश

साधारण १ पोळ्यांचा डबा भरून बिस्किटे होतात.
स्वाती

रेवती's picture

25 Sep 2008 - 7:54 pm | रेवती

त्याप्रमाणात करून पाहिन व कळवीन.

रेवती

लिखाळ's picture

25 Sep 2008 - 9:15 pm | लिखाळ

बिस्किटे मस्त आहेत. हाफरफ्लोकेन घरात आहेच. कणकेत मिसळून पोळ्या बर्‍या होतील असे कुणी सांगीतले होते म्हणून आणले होते.
भ्रमण मंडळाच्या येत्या भटकंतीमध्ये अधुनमधुन खायला ही बिस्किटे चांगली वाटतील असे वाटते :) (संबंधितांनी गंभीरपणे विचार करावा!)
--(फ्राफूला जाउन खादाडिचे बेत आखणारा) लिखाळ.

प्रभाकर पेठकर's picture

25 Sep 2008 - 9:53 pm | प्रभाकर पेठकर

हाफरफ्लोकेन हे काय असते, भाऊ?

स्वाती दिनेश's picture

25 Sep 2008 - 11:55 pm | स्वाती दिनेश

हाफरफ्लोकेन म्हणजेच ओट फ्लेक्स.

छोटा डॉन's picture

26 Sep 2008 - 1:10 pm | छोटा डॉन

>> भ्रमण मंडळाच्या येत्या भटकंतीमध्ये अधुनमधुन खायला ही बिस्किटे चांगली वाटतील असे वाटते

अगदी असेच म्हणतो ...
संबंधितांनी जरुर विचार करावा ...

बोला " बिस्किटे जिंदाबाद " !!!

--(फ्राफूमध्ये बसुन खादाडिचे बेत आखणारा)छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

प्राजु's picture

25 Sep 2008 - 10:59 pm | प्राजु

यातले बरेच पदार्थ घरात आहेत. फक्त ओट फ्लेक्स घेऊन यावे लागेल. मस्त आहे रेसिपी..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/