जी नाईन

अभ्या..'s picture
अभ्या.. in जनातलं, मनातलं
3 Aug 2016 - 5:28 pm

रस्त्यात कालवा इतका झाला की शंकर्‍या उठलाच. खाटेवर टेकलेल्या बूडाचा आधार घेउनच अशी गिरकी फिरली की पाय खाटेखालच्या बुटावर आले. स्लीव्हलेस टीशर्टाचे खांद्यावरचे दोन कोपरे बोटाच्या चिमटीत पकडले गेले. एक हिसका देऊन दोन्ही हात सवयीने कानावरच्या केसातून फिरले. हात फिरले म्हणण्यापेक्षा हात जागेवर राह्यले, मान पुढे मागे झाली. बुटाची चेन ओढली गेली. मोरीतल्या पाण्याचा हबका तोंडावर बसला तसे ते ओले हात परत एकदा केसावर फिरवून शंकर्‍या खोलीबाहेर पडला.
रस्त्यावर नेहमीचाच सीन. मामाच्या कॅन्टीनसमोर एक अ‍ॅक्टीव्हा आडवी पडलेली. टिपटाप युनिफॉर्मातला एक गोमटा जीव मम्मी कशी रिक्षावाल्याशी भांडतेय हे पाहतोय. रिक्षावाला तर गल्लीतला सत्याच होता. गर्दीला आवडणारा परफॉर्मन्स अगदी बिनचूक पार पडला जात होता. शंकर्‍याने गर्दीत घुसताच आवाज दिला. "अय मॅडम, जरा तमीजसे बात करना. गरीब हुये तो भी इन्सान है हम" भांडून त्रासलेल्या अन शिव्याचा स्टॉक संपल्याने गोंधळलेल्या मॅडमने शंकर्‍याकडे पाहिले. गर्दीने हसायला सुरुवात केलीच होती ती आता नवीन सीनसाठी सरसावली.
"अरे ये तो नीलम है. क्या मॅडम पहचाना की नही. अपुन शंकर. जीनाईन."
"शंकर्‍या, सोड आता तरी मवालीगिरी. बघ ह्या रिक्षावाल्याने काय केलेय, त्यात अथर्वला स्कूलला लेट होतय"
..........
"ए हटा, सब हटा. सत्या चल बे. फूट इथून. अपना पुराना वास्ता है" एवढे बोलत पडलेल्या अ‍ॅक्टीव्हाला शंकर्‍याने हात घातला. च्यायला जड होतं प्रकरण. का हाडं कटकटायली. जरा दम लावून उचलताच नीलमने हिसकावल्यासारखा ताबा घेतला. मम्मीने बटनस्टार्ट करायच्या आत पोरगं मागच्या सीटवरुन तिला बिलगलं.
गर्दीचा इंटरेस्ट संपला होता. शंकर्‍या सत्याला घेउन कॅन्टींगात टेकला.
"यार वो नीलम है. अपने साबकी. बहोत पुराना लफडा. कारसे आती थी इस्कूल. आपुन उदरीइच रुकता था उसके वास्ते"
"बस कर बे, उठला आता बाजार तुझा आन तिचा पण. तिचं गाबडं दोन चार वरशात दहावीला येईल. तू आइघाल्या कवा आतनं शाळा तर पाह्यला का?"
"सत्या, मेहनत करके रिक्षापे जीता है इसलिये माफ किया तेरेकू. साले कहा नोकरी करता तो नही छोडता मांकसम"
"आता गप्पतो का भाऊ. तिच्यायला त्या मिथुननं हेंडगाळ लावलं जिंदगीला. ते बी सोडंना ठुमकं लावायचं. तुझी जवानी उतरना."
"क्या बोलता? दादाकी नयी फिल्म? "
"बस ना आता. रात्री आसतय टीव्हीवर. डॅन्सच्या शोला. केबलवर"
"दादा का डॅन्स. मांकसम. पण सत्या टीव्ही नाय ना आपल्याकडे"
"टीव्ही नाय, बीवी नाय, कुच बी नाय तुझ्याकडं गांडो. जिंदगी सगळी जीनाईन करत घाल त्या टेपमदी."
"टेपला काय बोलायचं नाय बे सत्या. जिंदगी हाय अपनी. ते जौंदे. शंभर दे की जरा."
"भाडखाव, भोनीचा पत्ता नाय ती तुझी बुढ्डी ठोकली सकाळ सकाळी. पैसे कुठनं आणू. आधीचे हजार दे परत. ग्यास भरायचाय"
"चल माफ कर दिया. मामा, अपना दो चाय लिख देना खातेपे"
"निघंय फुकन्या. इथून तिथून, सम्दं मिथुन. पुढं मागं कोन नाय तवा बोलंना तुला. न्हायतर कुत्रं इचारना तुला"
मामा लैच कोकलायच्या आत शंकर्‍या रुमवर आला. कालच्या २० रुपड्याच्या भज्याचा पुडा तसाच पडलेला. टेपची कॅसेट अर्धवट बाहेर आलेल्या जिभेगत रेकॉर्डरच्या तोंडातून लोंबत होती. खाटखाट बटनं दाबत कॅसेट बसताच शंकर्‍यानं भजी घेउन ठिय्या मारला.
जिहाले मस्ती मुकं ब रंजिश सुरु व्हायच्या आधीचा मॅडम बस चली जायेगी चा पुकारा शंकर्‍यानं जोरात केला पण आवाज साथ देईना. आवाज काय आख्खं शरीर तुटल्यासारखं झालेलं.
सालं ह्या जिंदगीला आपली जरुरत नाय. दादा अजुन फॉर्मात हायेत. उटीला कायतरी हॉटेलं हायत म्हणं. इंडस्ट्रीको जरुरत है दादाकी. बस अपनी जरुरत नही किसिको.
कळायला लागल्यापासून लागलेला नाद पिक्चरच. तवा बी आय होती, बाप नव्हता. रस्त्यावर सुध्दा डिस्को मारत जाणारा शंकर्‍या काहीही करुन जगत गेला. वाढत्या वयासोबत अक्कल मात्र मिथुनखाती गहाण पडत गेली. आय गेली ती शरीर वाढायची किल्लीच घेऊन गेली. भजीपाव भरुन अंगावर ना मांस भरणार होतं ना चमक. चमक राह्यली ती फक्त घोट्याच्या वर असलेल्या चेनच्या बुटाला. थेटर, व्हीडीओ जमंल तिथं शंकर्‍या मिथुनला डोळ्यात, मनात साठवत राह्यला. एकाच गोष्टीसाठी आईची आठवण काढत राह्यला ते म्हणजे ठेवलेले नाव शंकर. दादाच्या पिक्चरात हमखास असतंच. गरीबोंका दाता शंकर. बुराइका दुश्मन शंकर.
साला शंकर शंकर शंकर. त्याआधी जिम्मी म्हणायचे यारदोस्त. नंतर जी नाईन झालं.
जी नाईन. कमांडोतला मिथुनदा जी नाईन.
त्या नावाबरोबर स्वप्नात मंदाकीनी दिसायली तेव्हा शंकर्‍याची जवानी सुरु झाली बहुतेक.
एकदा मंदाकीनीचे घारे डोळे दिसले शाळेच्या युनिफॉर्मात. तेंव्हा शंकर्‍या सत्याची रिक्षा चालवत होता. दहावीची नीलम पीएसअयसाह्यबाची पोरगी आहे हे कळलं तसं शंकर्‍या खुलला. भ्रष्ट पोलीस अधिकारी बापाच्या तावडीतून नीलमला सोडवतोय अशी स्वप्ने तर कायमच पडायली. रात्री फुटकी फरशी रंगीत काचात बदलायची. पांढर्‍या उंच टाचाच्या बुटातला शंकर्‍या डिस्कोच्या तालावर स्वप्ने रंगवायचा. रुपाया रुपाय जोडून ड्रायरने सेटींग केलेले केस मिंटामिंटाला हाताने सेट करायचा. नीलमला बघायला शाळेच्या पायर्‍या झिजवून झाल्या. तिच्या घरासमोरचा कट्टा घासला. तिच्या बापाकडं ड्रायव्हरची नोकरीपण करुन झाली. नाचरे दिवस सरत गेले. नीलम कॉलेज बिलेज करुन सुखाने बोहल्यावर गेली. त्या लग्नात नाचायची सुपारी मात्र शंकर्‍याने नाकारली.
इतक्या दिवसात शंकर्‍या पोराचा बाप्या झालेला. जीवापाड सांभाळलेल्या केसांनी साथ सोडायला सुरवात केली. फिटींगच्या पांढर्‍या पॅन्ट आणि लूज टीशर्ट विटले. उंच बुटांसोबत जिंदगीपण घासून सपाट झाली. लग्नकार्यात नाचून नायतर ऑर्केस्ट्रात नाईटवर मिळालेल्या पैशात टेप न कॅसेटी एवढीच इस्टेट जमा झालेली. खोली तर आयच्या नावावर. ती पण जाणारच अतिक्रमणात एक दिवस.
"साला गरीबोंकी नही ये दुनिया. अपनी प्रेमप्रतिज्ञा ऐसेइच जायेंगी अपने साथ"
"नीलमचं पोरगं मोठ्ठं झालं. अपना दादा बडा आदमी बन गया. अपना क्या? "
"डॅन्स. बस्स डॅन्स."
"आयामे डिस्को डॅन्सर."
"नये लडकोंका डॅन्स जज करते है अपने दादा. अपुन जानेका क्या?"
"जानेकाच. दादा समझ लेंगे अपनी जिंदगी"
दुखर्‍या पाठीला अन भरुन आलेल्या पोटर्‍यांना सांभाळत डोक्याला रुमालाची पट्टी आवळून शंकर्‍याने टेपचा आवाज वाढवला.
"जिंदगी मेरा गाना, मै कीसीका दिवाना. तो झूमो, तो नाचो, आ मेरे साथ नाचो गावो. आयमे डिस्को डॅन्सर"
.
.
दुपारपर्यंत टेप वाजत राहिला. कॅसेट साईड बदलत राहिल्या. पाय थिरकत राह्यले.
.
.
संध्याकाळी सत्या पैसे द्यायला आला. भजी अन तुटक्या कॅसेटीच्या राड्यात डॅन्स संपला होता.
पत्र्याच्या त्या खोलीत जिवंत असलेला एकमेव जीव म्हण्जे तुटक्या रीळाच्या कॅसेटचा टेप फिरत होता.

नृत्यप्रकटन

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

3 Aug 2016 - 5:39 pm | किसन शिंदे

अफाट लिहिलंय बे.

संजय पाटिल's picture

3 Aug 2016 - 5:40 pm | संजय पाटिल

:(

कमवू's picture

3 Aug 2016 - 5:42 pm | कमवू

मस्त

मुक्त विहारि's picture

3 Aug 2016 - 5:51 pm | मुक्त विहारि

"टेपची कॅसेट अर्धवट बाहेर आलेल्या जिभेगत रेकॉर्डरच्या तोंडातून लोंबत होती."

हे...आणि....

"पत्र्याच्या त्या खोलीत जिवंत असलेला एकमेव जीव म्हण्जे तुटक्या रीळाच्या कॅसेटचा टेप फिरत होता."

ही दोन्ही वाक्ये जबरदस्त.

संदीप डांगे's picture

3 Aug 2016 - 5:58 pm | संदीप डांगे

साला, तुम एकीच लिखता, पुरा बाजार उठवता है...

नाखु's picture

4 Aug 2016 - 8:48 am | नाखु

इथून तिथून मिथून ची पारायणे करणार्या (आणि अता हयात नसलेल्या) दोस्ताची याद आली..त्याचीही जिंदगी "आज का ऐश देखो कलका मत सोचो" असे म्हणत गेली फरक इतकाच इथे कथानायकाला नायीका नाही मिळाली पण त्याला मिळाली तीही पोलिसाचीच (अगदी फिल्मी ष्टाइल लव्ह मॅरेज) पण लग्ना आधीच्या "साथ संगत" आणि नशाबाजीने विवाहाच्या सुखाला कधी सुरुंग लावला त्यालाही कळले नाही आणि ते पेरलेले भु-सुरूंग प्रत्येक वाटचालीत मध्ये आले.
मागे दोन छोटी मुले ठेऊन हा "मिथून" इथून गेला.(साल २००१)

पुण्यातून कोल्हापूरला गेल्यावर माझ्याशी संपर्क कमी-कमीच झाला होता त्याचा....

अवांतराबद्दल क्षमस्व पण मिथून बाहेर यायला हे निमित्त होते.

नि:शब्द नाखु

पद्मावति's picture

3 Aug 2016 - 5:59 pm | पद्मावति

जबरदस्त!!

सूड's picture

3 Aug 2016 - 6:02 pm | सूड

__/\__

राजाभाउ's picture

3 Aug 2016 - 6:09 pm | राजाभाउ

जबरदस्त !!!

मनुष्यस्वभावाची निरिक्षणशक्ती आणि भाषाशैलीवर प्रभुत्व अफाट आहे तुझे.

स्पा's picture

3 Aug 2016 - 6:40 pm | स्पा

खतरनाक, तोडलेस लका

सिरुसेरि's picture

3 Aug 2016 - 6:43 pm | सिरुसेरि

मिथुन फॅनची फरफट अफाट मांडली आहे . बाकी जी ९ मिथुन म्हणले की त्याचे सुरक्षा , वारदात हे चित्रपट आणि त्यातली "देखा है मैने तुझे फिरसे पलटके " , "प्यार करना तो जरुरी है " हि गाजलेली गाणी आठवतात . "जीते है शानसे " , "प्यारका मंदीर" ,"गुरु" या चित्रपटांमुळे त्याची "गरीबोंका अमिताभ" अशी इमेज बनत गेली . असे असंख्य शंकर्‍या त्याचे फॅन बनले .

संदीप डांगे's picture

3 Aug 2016 - 6:46 pm | संदीप डांगे

+१००

होय मिथुन ला गरीबोंका अमिताभ म्हणायचे, म्हणजे गरीब निर्मात्यांचा अमिताभ असेच ना ?

खेडूत's picture

4 Aug 2016 - 12:43 pm | खेडूत

नाही.
गरीब चाहत्यांचा अमिताभ...ज्यांची स्वप्नंही गरीब असतात ते.
नव्वदीच्या दशकात पुण्यात 'गरीबांचा मिथुन' पण एखाद्याची हेटाई करण्यासाठी म्हणत असत. (हे खडकी-दापोडी ला पर्यायी होतं.)
बाकी व्यक्तिचित्र एकदम आवडलं. असे मिथून पाहिले होते त्या काळी.
स्टार नावाचा कुमार गौरवचा एक पिच्चरही आठवतो.

राजाभाउ's picture

4 Aug 2016 - 1:24 pm | राजाभाउ

ओह अस आहे होय ते, मी वेगळच समजत होत.

स्पा's picture

4 Aug 2016 - 5:24 pm | स्पा

गरीबांचा मिथुन'

लोल
अपमान करायला शिकावे तर पुणेकरांकडून

कानडाऊ योगेशु's picture

6 Aug 2016 - 8:36 am | कानडाऊ योगेशु

म्हणजे गरीब निर्मात्यांचा अमिताभ असेच ना ?

ह्यावर मित्रांसोबत वादविवाद झालेला आठवतोय. गरीब जर प्रेक्षकांसाठी असेल तर त्यांना थिएटरमध्ये मिथुन्चा चित्रपट पाहायचा असेल तर तेवढेच पैसे द्यावे लागतील जितके बाकीच्या बिगबजेट चित्रपट पाहायला लागतात. त्यामुळे गरीब हे विशेषण निर्मात्यांसाठीच असेल ह्य निष्कर्षाप्रत आलो होतो.

बरोबर आहे योगेशा, ज्यावेळी अमिताभ सर्वोच्च मानधन घेत असे आणि कथा दिग्दर्शनात चुजी असे त्यावेळी मिथुनने लो बजेट आणि भारंभार फिल्म्स नव्या बॅनरखाली पण केल्या. त्यामुले हा समज वाढला.
गरिबांचा अमिताभ म्हणायला मात्र एक कारण होते. अमिताभ ताडमाड उंच, विशेष आवाज आणि रूप असलेला स्टार. पब्लिक त्याची कॉपी फक्त हेअरस्टाइल आणि कपड्यात मारू शके. त्यासारखे दिसणे अवघड असे. मिथुन मात्र सर्वसाधारण लोकांना आपला वाटणारा, त्यांचासारखा दिसणारा हिरो. केस वाढवून, कपडे आणि थोड्या डान्सच्या जीवावर लोकल मिथुन बनणे इझी होते.

कानडाऊ योगेशु's picture

8 Aug 2016 - 8:17 pm | कानडाऊ योगेशु

अभ्या,

रूप असलेला स्टार.

ह्याबाबत किंचित असहमती. ज्या ज्या गोष्टी तू गुण म्हणुन सांगितल्यास त्याबद्दलच त्याची हेटाळणी झालेली होती.
राजकुमारने त्याची ताडमाड उंची पाहुन "जानी,इनकी टांगे तो गर्दनसे शुरु होती है" अशी कॉमेंट मारली होती.रूपाबद्दल तर चेहर्या घोड्यासारखा दिसतो आणि एकुण बॉडी लेंन्ग्वेज एका दूधवाल्या भैयासारखी अशी हेटाळणी केली गेली होती. आवाजाबद्दल तर ऑल इंडिया रेडिओने हाकलुन लावले होते. कदाचित इतक्या मानहानीनंतरसुध्दा हा माणुस सुपरस्टार बनला जे अविश्वसनीयच होते सामान्य पब्लिकसाठी त्यामुळे त्यासम तोच असे मानुन कुणी त्याच्यासारखे बनण्याचा प्रयत्न केला नसावा. जी वैगुण्ये म्हणुन आधी हेटाळणी पदरात पडली होती त्याच गोष्टी त्याने स्वतःच्या स्ट्रेंथ बनवल्या. डोळ्यातल्या किंचित तिरळेपणाचा इंटेन्स सीन मध्ये जबरदस्त वापर केवळ तोच करु जाणे. (
१. दिवारमधला मेरे पास मॉ है डायलॉग नंतर स्तब्ध झालेला चेहरा फक्त डोळ्यातुन बोलतो.
२. डॉनमध्ये खोटा डॉन जेव्हा यादगाश्त चली गयी है ची अ‍ॅक्टींग करतो तेव्हा फोकस फक्त त्याच्या डोळ्यांवर आहे.
३. कालापत्थर मध्ये शत्रुघ्न सिन्हा जेव्हा त्याची उगाचच खोड काढतो तेव्हा काय भंकस माणुस आहे हा डोळ्यातुन व्यक्त केलेला भाव जबरदस्तच.
एकुण अमिताभ म्हणजे अद्वितिय व्यक्तिमत्व आहे.)

हेटाळणी स्टार होण्याआधी झालेली योगेशा. फॅन पण स्टार झाल्यावरच होतात. ते गुण कि अवगुण हा विषयच नाही. फॅन्स फक्त गुण पाहतात. हिरोसारखा थोडा जरी लाईकनेस असला तरी प्रयत्नपुर्वक तो वाढवतात. काही जण तर काहीच नसताना कॉपी मारतात. काहींचे आयुष्याचे ध्येय बनून जाते ते. तेच क्रेझी फॅन फॉलोविंग. बस्स बाकी कुछ नही यार इस कहांनिमें.

कानडाऊ योगेशु's picture

9 Aug 2016 - 8:24 pm | कानडाऊ योगेशु

प्रचंड सहमत. शाळेत असताना एक हुशार मुलगा सनी देओलचा अगदी डायहार्ड फॅन होता. सनीचा एक डोळा इंटेन्स प्रसंगात थोडा तिरळा होतो व एक भुवई उडते. हा ही डिट्टो तसेच करायचा प्रयत्न करायचा.
नोकरीच्या ठिकाणी एक शाहरुखचा फॅन होता. एकदा लंगडत लंगडत कंपनीत आला व काही दिवस असेच चालत होता.मी दुसर्या एका कलिगला विचारले ह्याला झालेय काय? तो कलिग म्हणाला कि कभी अलविदा ना कहना मध्ये शाहरुख असाचा लंगडत चालतो म्हणुन हा ही असाचा चालतोय.

सनी देवलच्या एका डोळ्यात एक काळा डाग आहे छोटासा, सेम तसाच अगदि माझ्या डोळ्यात पण आहे. पर हाथ ढाई किलोका नही ना. ;) म्या पण सनिभाऊंचा लै जबरा फॅन.

सनी देवलच्या एका डोळ्यात एक काळा डाग आहे छोटासा, सेम तसाच अगदि माझ्या डोळ्यात पण आहे. पर हाथ ढाई किलोका नही ना. ;) म्या पण सनिभाऊंचा लै जबरा फॅन.

अभिरुप's picture

3 Aug 2016 - 6:50 pm | अभिरुप

काय लिहिलंय दादा....जबर्‍या एकदम.असे दोन-तीन मिथुन बघितले आहेत. एकाने तर अक्षरशः स्वतःची किडनी विकून आलेल्या पैश्यात मिथुन बनायची हौस भागवली होती. नंतर पुन्हा भणंग जीवन वाट्याला आले त्याच्या.

आदूबाळ's picture

3 Aug 2016 - 7:08 pm | आदूबाळ

जबरदस्त लिहिलंय. भारीच!

कंजूस's picture

3 Aug 2016 - 7:29 pm | कंजूस

+++++++++

रांचो's picture

3 Aug 2016 - 7:29 pm | रांचो

कसल अफाट लिवलयस बे..

विवेकपटाईत's picture

3 Aug 2016 - 7:54 pm | विवेकपटाईत

गोष्ट आवडली. माया नगरीत मायावी दुनियेत येणार्या अधिकांश लोकांची कर्मगाथा बहुतेक अशीच असेल..

विखि's picture

3 Aug 2016 - 8:02 pm | विखि

अबे अई... कसम पैदा करने वाले की क्या.........

राघवेंद्र's picture

3 Aug 2016 - 8:08 pm | राघवेंद्र

मस्तच अभ्या !!!

तिमा's picture

3 Aug 2016 - 8:10 pm | तिमा

कं लिवलंय, कं लिवलंय!

जव्हेरगंज's picture

3 Aug 2016 - 8:24 pm | जव्हेरगंज

लईच कडक!
खतरी!!

हेमन्त वाघे's picture

3 Aug 2016 - 9:49 pm | हेमन्त वाघे

Mithunda

टवाळ कार्टा's picture

3 Aug 2016 - 8:45 pm | टवाळ कार्टा

डोस्क भंजाळलं

उडन खटोला's picture

3 Aug 2016 - 8:51 pm | उडन खटोला

अप्रतिम लिखाण अभ्या..

एखाद्या क्लासिकल सिंगर ने आपल्याला हे सुद्धा गाता येतं म्हणत एखादं फिल्मी गाणं टेचात म्हणून दाखवावं तसं लिहिलायस.

जिगर है भौ!

महासंग्राम's picture

3 Aug 2016 - 8:58 pm | महासंग्राम

कसलं लिवायलाय बे तुफान एकदम

अमितदादा's picture

3 Aug 2016 - 9:24 pm | अमितदादा

एक नंबर...

नीलमोहर's picture

3 Aug 2016 - 10:12 pm | नीलमोहर

डोक्याला शॉट..
एक नंबर लिहिलंय.

सुंड्या's picture

3 Aug 2016 - 10:14 pm | सुंड्या

खूप आठवणी जाग्या केल्या भौ...मी अश्या व्यक्तींना भेटलो आहे त्यांची 'भक्ती' अनुभवली आहे. सर्वांची स्टोरी 'अतृप्त'...राजेश खन्ना, बच्चन, शत्रुघ्न, किशोर.

क्या बात, क्या बात, क्या बात!!!

तुषार काळभोर's picture

3 Aug 2016 - 10:37 pm | तुषार काळभोर

अंगावर काटा आला राव!
शप्पथ!

ज्योति अळवणी's picture

3 Aug 2016 - 10:53 pm | ज्योति अळवणी

जबरदस्त.... खूप आवडलं. मनाला स्पर्श करणार लिहिता

बहुगुणी's picture

3 Aug 2016 - 11:23 pm | बहुगुणी

शंकर्‍या डोळ्यांसमोर पर्फेक्टली उभा केलात!

ब़जरबट्टू's picture

4 Aug 2016 - 8:53 am | ब़जरबट्टू

+1

रातराणी's picture

3 Aug 2016 - 11:23 pm | रातराणी

:(

कैलासवासी सोन्याबापु's picture

3 Aug 2016 - 11:49 pm | कैलासवासी सोन्याबापु

अभ्या, व्यक्तिचित्रण प्रकारात तुला पेडिस्टल वर ठेवले गेले आहे, अधिक काहीच बोलायला सुचत नाहीये, धन्यवाद.

गामा पैलवान's picture

4 Aug 2016 - 2:22 am | गामा पैलवान

अभ्या..,

साली काय म्हणावी शंकऱ्याची जिंदगी? मायावी दुनियेचा इतका मोह पडावा? मानवी जीवन इतकं सवंग असू शकतं? ज्याम प्रश्न पडलाय.

आ.न.,
-गा.पै.

फारएन्ड's picture

4 Aug 2016 - 6:21 am | फारएन्ड

टोटल भन्नाट लिहीले आहे!

हे एकदम टोकाचे उदाहरण्/वर्णन आहे, पण असे एखाद्या अ‍ॅक्टर ला किंवा त्याच्या एखाद्या चित्रपटातील कॅरेक्टरला तारूण्यभर जगणारे लोक बघितले आहेत. अमिताभ चा शराबीतील रोल, किंवा मुकद्दर का सिकंदर मधला वगैरे.

यशोधरा's picture

4 Aug 2016 - 7:28 am | यशोधरा

अफाट लिहिले आहेस!

हेमंत लाटकर's picture

4 Aug 2016 - 8:03 am | हेमंत लाटकर

भाषा छान जमली!

चांदणे संदीप's picture

4 Aug 2016 - 8:05 am | चांदणे संदीप

डोळ्यात पाणी आल ना दादा! :(

__/\__

Sandy

गणामास्तर's picture

4 Aug 2016 - 9:49 am | गणामास्तर

क्या बात ! क्या बात !! क्या बात !!!
तुझ्या लेखणी आणि प्रभुजी दोघांनाही सलाम.

चिनार's picture

4 Aug 2016 - 10:06 am | चिनार

अफाट व्यक्तिचित्रण !!!
लयच जबरा ना हो !!

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Aug 2016 - 10:55 am | ज्ञानोबाचे पैजार

काय जबरदस्त लिहिलस. मजा आली वाचुन.
आपला मिठुनदा आहेच जबरदस्त, काय डॅन्स काय स्टाईल आणि कसले एक एक भारी भारी ड्व्यायलॉक.
मिठुनदा सिर्फ मिठुनदा.
पैजारबुवा,

संत घोडेकर's picture

4 Aug 2016 - 11:02 am | संत घोडेकर

वा! आवडले

मृत्युन्जय's picture

4 Aug 2016 - 11:07 am | मृत्युन्जय

आई गं. चटका लिहिलयस रे भावा. तु लिहितो तेव्हा भन्नाट असतंय बघ.

वाचण्यात आलेल्या ऑनलाईन लेखकांपैकी टॉपलिस्टमधे जाऊन बसला आहेस गेल्या काही ललित लिखाणांमुळे.

अतिउत्कृष्ट.

patilachaganya's picture

8 Aug 2016 - 5:06 pm | patilachaganya

मस्त

सुमीत's picture

4 Aug 2016 - 11:15 am | सुमीत

वाचता, वाचता पहात होतो, दिसत होता जी ९ मना मध्ये.
कित्येक दिवसांनी असा मनाला झोंबनारं व्यक्ती चित्रण वाचले, लाख लाख सलाम

सिरुसेरि's picture

4 Aug 2016 - 12:19 pm | सिरुसेरि

----आपला मिठुनदा आहेच जबरदस्त, काय डॅन्स काय स्टाईल आणि कसले एक एक भारी भारी ड्व्यायलॉक.--
+१००
"कोई शक ?"
"पब्लिकके पास टाईम नहि"

मुक्त विहारि's picture

4 Aug 2016 - 12:31 pm | मुक्त विहारि

अभ्या.. ह्यांना डान्स-डान्सची एक शी.डी. कसम पैदा करनेवाले की ह्या सिनेमाची व्हिडिओ कॅसेट आणि सुरक्षा सिनेमाची २ पिटातली तिकिटे देण्यात यायची व्यवस्था करायचा विचार आहे.

जाबाली's picture

4 Aug 2016 - 12:31 pm | जाबाली

जबर्दस्त लिहिलय !

जिन्गल बेल's picture

4 Aug 2016 - 2:47 pm | जिन्गल बेल

मस्त व्यक्तिचित्रण...

लई भारी बे अभ्या, असलं लिहिणं कुठंतरी आत जाउन चटका लावुन लगेच परत जातं.

उडन खटोला's picture

4 Aug 2016 - 3:38 pm | उडन खटोला

असं नसतं म्हणायचं.
१.तुम्हाला कळवळा नाही.
२.तुम्ही निष्ठुर आहात.
३.तुम्हाला भावना नाहीत.
४.तुम्ही मानसशास्त्रीय दृष्टीने बघत नाही.
५. कैच्या कै प्रतिसाद.
६. असं कसं असं कसं???

सध्या घाईत आहे म्हणून एवढं च.

जगप्रवासी's picture

4 Aug 2016 - 3:21 pm | जगप्रवासी

चाबूक लिखाण

राही's picture

4 Aug 2016 - 4:12 pm | राही

मनाचा ठाव घेणारे व्यक्तिचित्रण.
तुमचे लिखाण अतिशय आवडत आहे.

बोलबोलेरो's picture

4 Aug 2016 - 5:17 pm | बोलबोलेरो

मनात उठलेली खळबळ व्यक्त करायला शब्द नाहीत. असंवेदनशील मनाला हडबडून जग होण्यास भाग पाडणारं लेखन. पुलेशु.

चलत मुसाफिर's picture

4 Aug 2016 - 5:33 pm | चलत मुसाफिर

एकेकाळी आम्हीही मिथुनचे पंखे होतो. पण ते सगळं ओसरलं

मोहनराव's picture

4 Aug 2016 - 6:26 pm | मोहनराव

मस्त लेखन!!

सुमीत भातखंडे's picture

4 Aug 2016 - 7:49 pm | सुमीत भातखंडे

डोळ्या समोर उभा केलात शंकर्या.

पिशी अबोली's picture

4 Aug 2016 - 7:58 pm | पिशी अबोली

:(
चटका लावून जातात तुझ्या गोष्टी.

संदीप डांगे's picture

4 Aug 2016 - 10:48 pm | संदीप डांगे

ओ मालक, आता जरा त्या airtel चं बघा काहीतरी.... ☺

उडन खटोला's picture

5 Aug 2016 - 12:06 am | उडन खटोला

कुणाला सांगताय?
अभिजीत,षेक की लाष???

टाकू हो जमलं तर मालक. सध्या काय ना कायतरी खरडत राहतोय हे काय कमी आहे. ;)

अभ्या..'s picture

5 Aug 2016 - 2:36 pm | अभ्या..

सर्व वाचक आणि प्रतिसादक मंड्ळींचे मनापासून आभार मानतो. गविराज, राहीताई, फारेण्डराव, मृत्यो, ५०, आदूबाळा, संदीप, माऊली, बहुगुणी, जव्हेरभाव सारख्या मोट्ठ्या अन अनुभवी लेखकमंडळींनी आवडल्याची पावती दिली. बापूभाव आणि इतर मित्रपरिवार तर आमच्या पाठीशी असतोच. वल्ल्ल्या, किसन्या, यशोमैय्या, ज्योतीअलवणी, सुडक्या, स्पावड्या, पद्माक्का, राघव, मंदार, उखराव, नाखून्स, दोन सुमीत्, तिमा, रांचो, खेडूत, पटाईत, हेमंत, टक्या, बोलेरो, गणा, चिनार, मुसाफीर, पिश्या, रारा, सिरुसेरी, विखी, कंकाका, अभिरुप, निलू, नीमो, सुंड्या, जाबाली, जिंगल, राजाभाव, घोडेकर, गामा आनी नुसतेच पैलवान, कमवू, प्रवासी, मोहनराव आणि बट्टू अशा सर्वांनाच खूप खूप धन्यवाद.
आगामी लेखनाबद्दल सूचना आणि काही मार्मिक मार्गदर्शन देणार्‍या वाचकांचे विषेष आभार.
आमचे मार्गदर्शक प्राडॉ सर ह्यांची उणीव जाणवली धाग्यावर पण न जाणे कुठले कनेक्षन आणि लिकेज हुडकताहेत कुणास ठाउक.
वेळ नसावा कदाचित त्यांना. :(
असो. नेक्ष्ट इव्हेंट.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Aug 2016 - 10:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन आल्या आल्या वाचलं ना दादा. दाद द्यायची राहून गेली होती. आयाम सॉरी. लेखन जबरा करतूस राजा, कलाकारी आणि लेखन दोन्ही फसक्लास. लिखते रहो.
-दिलीप बिरुटे
(अभ्यादादाचा लेखन आणि कलाकारीचा फ्यान)

हेमन्त वाघे's picture

5 Aug 2016 - 3:19 pm | हेमन्त वाघे

Dialougues

कपिलमुनी's picture

5 Aug 2016 - 3:58 pm | कपिलमुनी

डोक्यात असलेले वेड पैसे कमवून देणारा असेल तरच फायदा ! नायतर जिंदगी पोतेरा होते

( अशाच एका गरीबांच्या अर्नॉल्डची आठवण झाली )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Aug 2016 - 10:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्या एक नंबर लेखन. मिथूनच्या फ्यानची गोष्ट निराळीच. आमचा एक मिथून फ्यान म्हणायचा मिथुनदाचं अपहरण झालं तर खेड्या पाड्यातून टेंपो भरु भरु जातील म्हणे शोधायला.

बाकी, लेखनाची शैली सुंदर. मिथून दादाचा फ्यान थेट पोहोचला. लिहित राहा भो. धन्यवाद

-दिलीप बिरुटे

इडली डोसा's picture

5 Aug 2016 - 11:45 pm | इडली डोसा

डोळ्यासमोर उभा राहिला हा जी नाईन.

विप्लव's picture

5 Aug 2016 - 11:57 pm | विप्लव

भन्नाट

सचु कुळकर्णी's picture

6 Aug 2016 - 3:38 am | सचु कुळकर्णी

अभ्या भौ खतरा लिहिलय.
किन ऑबजर्वेशन लागत एव्हढ गहर लिहायला + खास तो अभ्या टच.
असे खुप डाय हार्ड फॅन बघितलेयत मिथुन चे.

चतुरंग's picture

6 Aug 2016 - 11:33 am | चतुरंग

"इथून तिथून मिथून!" हे अगदी प्रसिद्ध होतं तेव्हा...
असे बरेच केसांचं शिप्तर डोक्यावर घेऊन फिरणारे, कुठूनतरी पैदा केलेली लाल बील रंगाची जाकिटं आणि पांढरे चकचकीत बूट घालून फिरणारे बघितलेले आठवताहेत. त्याचा उगम असा मिथूनदाच्या सिनेमांमध्ये होता हे जरा उशीरा समजलं होतं.
शंकर्‍याचा शेवट मात्र चटका लावून जाणारा :(
काही गोष्टी अशा का याची संगती लावता येत नाही हेच खरं!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

6 Aug 2016 - 11:38 am | मिसळलेला काव्यप्रेमी

लगा कं लिवलय, कं लिवलय.. जियो...

यशोधरा's picture

6 Aug 2016 - 12:20 pm | यशोधरा

पुन्हा पुन्हा वाचले. वाखु साठवली.

ब्बाप्रे अफाट लिहिलय, प्रसन्ग आला डोळ्या समोर अगदी :(

भाग्यश्री कुलकर्णी's picture

6 Aug 2016 - 3:43 pm | भाग्यश्री कुलकर्णी

छान लिहिलंय. असेपण आपण फँन आहोतच अभ्याशेठ यांच्या लेखनाचे.