नरेंद्र सिंदकरांचे प्रतिज्ञापत्र आणि नेताजी सुभाषचंद्रांचा शोध

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
9 Jul 2016 - 12:26 am
गाभा: 

इतर बातम्यांच्या गोंधळात एका बातमीकडे उशिरा लक्ष गेल, गेल्या वर्षाभरात पश्चिम बंगाल सरकार आणि भारत सरकारनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विषयी बर्‍याच गोपनीय फाईल्स टप्प्या टप्प्याने खुल्या केल्या. सुरवातीस या फाईलींबद्दल जराशी उत्सुकता होती म्हणून चाळून पाहील्या गेल्या, नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या नातेवाईकांवर कशी पाळत ठेवली गेली या पलिकडे फारसे काही त्यातून निष्पन्न झाले नाही कारण सर्वात गोपनीय जी काही फाईल असेल ती इंदीराजींच्याच काळात नष्ट केली गेली. नाही म्हणावयास नंतरच्या फायली उघडण्याच्या बातम्यांकडे आताशा दुर्लक्षही होऊ लागले.

नेताजी सुभाषचंद्र बोसांवर महायुद्ध कालीन कोणत्या गुन्ह्याचे आरोपही नव्हते, नेहरु इंदीरा किंवा अजून कोणी भारतीय किंवा परकीय सुभाषचंद्र बोसांसारखी लोकप्रीय व्यक्ती जिवंत असती आणि उघडपणे भारतात वावरली असती तर त्यांचे कुणी बोटही वाकडे करु शकले नसते. ती जी काही नष्ट केलेली फाईल त्यात काय होते कुणास ठाऊक बाकी फाईलींच्या गोपनीयते बद्दल नसता गाजावाजाच अधिक झाला दिसतो पहाड खोदून उंदीरही मिळू नये इतपत कमी माहिती. नाही म्हणावयास या २९ जूनला उघडलेल्या फाईलीत एका मराठी माणसाचे नरेंद्र सिंदकरांचे (मुखर्जी कमिशनला दिलेले) प्रतिज्ञापत्र उघड झाले आहे.

हे नरेंद्र सिंदकर कोण, तर मास्को आकाशवाणीवर १९६६ ते १९९१ या काळात मास्कोस्थीत मराठी पत्रकार, (यांची काही पुस्तके बुकगंगा डॉट कॉमवर दिसतात) या नरेंद्र सिंदकरांच्या म्हणण्यानुसार रशियावासी असलेला भारतीय वंशाचा कम्यूनीस्ट 'निखील चटोपाध्याय' (नात्याने सरोजनी नायडूंचा भाचा म्हणजे अघोरनाथ चटोपाध्याय > विरेंद्रनाथ चटोपाध्याय > निखील चटोपद्ध्याय) यांचा १९४१ मध्येच सुभाषचंद्र बोसांशी परीचय झालेला होता, १९६८ साली सायबेरीयातील ओम्स्क या गावी सुभाषचंद्र बोस 'निखील चटोपाध्यायांना भेटल्याचे निखीलांनी सिंदकरांना सांगितले. सिंदकरांची माहिती १९६८ च्या उल्लेखानंतर थांबते. कम्युनीस्ट देशात सिंदकर सायबेरीयात जाऊन सुभाषचंद्र बोसांना भेटायचा शोधायचा प्रयत्न करु शकतील एवढी सोव्हित रशिया मुक्त नव्हती.

यानंतरचे काही रोचक अस्पष्ट धागे असे की याच काळाच्या नंतर उत्तर प्रदेशातील गुमनामी बाबांचा क्रम चालू होतो (चुभुदेघे) की जे सुभाषचंद्र बोस संन्यासी असल्याची वंदता होती. मी वर म्हटल्या प्रमाणे फायली उघडल्याने आंतरराष्ट्रीय संबंध बिघडावेत असे सुभाषचंद्र बोस यांच्या बाबत काही नव्हते. तरीही सरकारे आंतरराष्ट्रीय संबंधांचा हवाला देत राहीली एका शक्यतेचा यात विचार केला जात नाही तो म्हणजे सुभाषचंद्र बोस बंगाली होते आणि ते जिवंत असतील तर पूर्व बंगाल पाकीस्तानात असणे त्यांना खटकणारे राहीले असते, सुभाषचंद्र बोस जिवंत असते तर त्यांनी बाकीचा नाही तरी पूर्व बंगाल किमान पाकीस्तानपासून वेगळा करण्याचा प्रयत्न केला असता आणि या कामात्त त्यांनी इंदिरा गांधी सोबत काम केले असेल आणि सरकारला त्यांच्या बद्दल फायली उघडू नयेत असे वाटत राहीले असेल तर ची एक संशय थेअरीही अद्याप कधी विचारात घेतली जाताना दिसलेली नाही कारण ते पूर्व बंगालात नुसते गेले असते तरीही बहुधा तेथिल बंगाली लोकांनी त्यांना ओळखले असते ही माझ्या या थेअरीची मर्यादा. त्यामुळे ती खूप महत्वाची नाही.

एकुण कायतर नेताजी सुभाषचंद्र बोसांचा शोध एका मराठी पत्रकाराच्या प्रतिज्ञापत्रामुळे तसेच नेताजींच्या कथित अस्थींची जेनेटीक निश्चिती केली जाण्याच्या वळणावर थांबलेला असे म्हणता यावे. असो, सिंदकरांनी 'सत्याग्रही' नावाच्या मराठी मासिकाच्या १९९५ च्या दिवाळी विशेषांकात 'कैदी' या नावाने लेख लिहुन सुभाषचंद्र बोसांबद्दल अशिच माहिती लिहिली होती असे ते त्यांच्या प्रतिज्ञापत्रात म्हणतात. 'सत्याग्रही' नावाच्या मराठी मासिकाच्या १९९५ च्या दिवाळी विशेषांकातील 'कैदी' लेख जुने अंक असे मिळवणे कठीणच पण कुणाच्या हाती लागलाच तर.. ! मिपाकरांसोबत अवश्य शेअर करावा हि नम्र विनंती.

संदर्भ: Netaji files: Did Nehru hide the fact that Subhas Bose was in Russia? - अनुज धर

* अघोरनाथ चटोपाध्याय - यांना ८ मुले होती- हे बंगाली (आताच्या बांग्ला देशातले) गृहस्थ एडनबर्गहून शिकून हैदराबाद येथील १८८७ मध्ये स्थापित निझाम कॉलेजचे प्रिंसीपॉल झाले. (त्यांचा तत्कालीन हैदराबाद संस्थानातील आर्य समाजीय चळवळीस सॉफ्ट कॉर्नर होता - त्यामुळे तत्कालीन हैदराबादच्या प्रबोधनाच्या आरंभकाळातील नेतृत्व म्हणता येईल) अघोरनाथ चटोपाध्याय हे सरोजिनी नायडूंचे वडील त्यामुळे सरोजिनी नायडूंचा जन्म हैदराबादचा. आठ भावंडात सरोजिनी नायडू सर्वात मोठ्या, सरोजिनी नायडूंच्या पाठीवरचे म्हणजे क्रमांक २ विरेंद्रनाथ ज्यांनी जर्मनी आणि रशियातून भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले आणि स्टालीनच्या लहरीपणामुळे १९३७ मध्ये रशियात फाशी गेले. या विरेंद्रनाथांची एक पत्नी कदाचित रशियन होती ( नक्की कल्पना नाही) आणि बहुधा त्यांचा मुलगा वर उल्लेखलेला निखील चटोपाध्याय -बहुधा आई तेथे असल्यामुळे रशियातच राहीलेला- या विरेंद्रनाथांची एक तीच किंवा वेगळी शाखापिढी पश्चिम बंगालात असावी- उपरोक्त सम्दर्भावरून पण उपरोक्त संदर्भास या संदर्भाने दुजोर्‍याची गरज असावी म्हणून चुभूदेघे.

* ह्या विरेंद्रनाथांचे तत्कालीन अक्रॉस पॉलीटीकल थॉट संबंध आले असावेत, मदनलाल धिंग्रा प्रकरणानंतर इंग्रजी वृत्तपत्रात पत्र लिहून सावरकरांची जाहीर पाठराखण विरेंद्रनाथांनी केली परिणामी बडतर्फ झाले. क्रांतीकारी विचारांचे आणि कम्युनीस्ट विचारांकडे अंशतः झुकलेले असूनही याच विरेंद्रनाथांबद्दल जवाहरलाल नेहरु त्यांच्या आठवणीत गौरवोद्गार काढताना दिसतात संदर्भ इंग्रजी विकिपीडिया.

अवांतर : इंग्रजी विकिपीडियातील माहिती नुसार ओम्स्क हे सायबेरीयन गावा जवळ ओम नावाच्या छोट्याश्या नदीचा जराश्या मोठ्या नदीशी संगम होतो.

सायबेरीयातील ओम नदी

om river siberia
छायाचित्र सौजन्य इंग्रजी विकिपीडिया

प्रतिक्रिया

सही रे सई's picture

9 Jul 2016 - 1:21 am | सही रे सई

एक छान चर्चा आता या निमित्ताने वाचायला मिळो.

अनिरुद्ध प्रभू's picture

9 Jul 2016 - 9:18 am | अनिरुद्ध प्रभू

हे खर अनुज धरनं पून्हा प्रकाशात आणलं.... त्यानं यावर बरचं लिखाणं ही केलं आहे....
त्याच्या कुठल्याश्या लेखात तैवान सरकारच्या पत्राबद्दल वाचलय . त्यात अस म्हटलय कि माहिती प्रमाणे ज्या दिवशी सुभाष बाबुंचा अपघाती म्रुत्यु झाला त्याच्या मागे वा पुढे दोन दिवस तैवान मधे कोणताही विमान अपघात झाला नव्हता.(खखोदेजा) (संदर्भ शोधतो आहे)

(उत्सुकता लागलेला)
अनिरुद्ध

माहितगार's picture

9 Jul 2016 - 10:59 am | माहितगार

अनुज धरांबद्दल इंग्रजी विकिपीडियावर लेख आहे त्यात तुम्ही शोधत असलेले संदर्भ आणि कदाचित त्यावरील टिकाही मिळेल.

जिथ पर्यंत माझे वाचन झाले विमान अपघाताची नोंद आणि माणसाच्या बॉडी काढून एक माणूस सुखरुप वाचण्यासारखा अपघात झाला असेल तर अपघातीत विमानाची बॉडी मिळावयास हवी त्याचे रेकॉर्डची चौकशी नेहरुंच्याच काळात तैवानला जाऊन करावयास हवी होती तांत्रिक कारणे देऊन तैवानला कुणीही प्रत्यक्ष भेट देऊन वेळीच शहानिशा केला नाही. त्या नंतर फाइलींचे अनावश्यक प्रमाणात गोपनीय ठेवले जाणे, अस्थींची जेनेटीक टेस्ट करुन प्रमाणित करता येते ते टाळणे यामुळे संशय बळावत राहीला आहे.

अपघातात मृत्यू झाला असे सांगणारे ओरल विटनेसेस सुद्धा विश्वासार्ह वाटतात, एकिकडे नेताजींसोबत कथित शेवटच्या क्षणी असलेला हबीबूर रहमान पुढे पाकीस्तानला फुटला पाकीस्तानच्या बाजूने भारता विरुद्ध लढला पण सुभाषचंद्र बोसांच्या मृत्यू बद्दलची साक्ष त्याने बदलली नाही जर त्याची आधीची साक्ष खोटी असती तर पाकीस्तानला फुटल्यावर तो त्याची साक्ष बदलून सुभाषचंद्र बोसांना उघड करण्यात पुढाकार घेऊ शकला असता तसे झालेले नाही.

इंग्रजी विकिपीडिया संदर्भ
* Death of Subhas Chandra Bose
* Mukherjee_Commission
* Raja Habib ur Rahman Khan

(इंग्रजी विकिपीडियावरील लेख फाईल्स उघड केल्या त्या प्रमाणात अद्याप अद्ययावत झालेले नसावेत)