कोबीची भजी

अनन्न्या's picture
अनन्न्या in पाककृती
4 Jul 2016 - 6:14 pm

पाऊस जोरदार हजेरी लावतोय त्यामुळे गरमागरम भजी हवीतच!
साहित्यः
कोबी अर्धा कि., दोन कांदे, अर्धा कि. बेसन, अर्धी वाटी बारीक रवा, एक चमचा लसूण पेस्ट, एक चमचा आलं पेस्ट, लाल तिखट दोन चमचे, ओवा एक चमचा, मीठ चवीनुसार, तेल तळणीसाठी, अगदी थोडी हळद.

कृती:खेकडा भजीसाठी कांदा चिरतो तसाच लांब उभा कांदा चिरून घ्या, कोबीही कांद्यासारखाच चिरा. आता कांदा कोबी एकत्र करून त्यात चवीनुसार मीठ, तिखट, आलं लसूण पेस्ट मिसळा, ओवा, हळद मिसळा. दहा पंधरा मिनिटे झाकून ठेवा. कोबीला पाणी सुटले की त्यात रवा मिसळा. आता थोडे थोडे बेसन मिसळा. खेकडा भजीसारखेच भिजवायचे आहे, त्यामुळे बेसन लागेल तेवढेच वापरा. चवीनुसार लागल्यास तिखटमीठ वाढवा. तेल गरम करा. भजी तळून गरमागरम सर्व्ह करा.
मी यासोबत दह्यात कांदा लसूण मसाला, मीठ, साखर घालून दिले होते. ओव्याची पानेही बारीक चिरून घातली होती.
bhaji

प्रतिक्रिया

गणेश उमाजी पाजवे's picture

4 Jul 2016 - 6:30 pm | गणेश उमाजी पाजवे

आताही मस्त पाऊस पडतोय...त्यात हे असे गरम गरम कुरकुरीत भाजी समोर आले तर काय मज्जा येईल अहाहा....तसे कांदा भजी नेहेमीच खाल्ले जातात..हे व्हेरिएशन पण मस्त लागेल.....मातोश्रीना जाऊन मस्का मारावा लागेल असं दिसतंय :)

अजया's picture

4 Jul 2016 - 7:20 pm | अजया

अहाहा! तोंपासु.

स्रुजा's picture

4 Jul 2016 - 7:22 pm | स्रुजा

वाह !

कढीतही चांगली लागतील.कढी गोड नाही करायची.

त्रिवेणी's picture

4 Jul 2016 - 9:17 pm | त्रिवेणी

नको काका नको कढीच आणि भजीचे नाव ही नको. हौसटेल मेस चे दिवस आठवतात.

नूतन सावंत's picture

4 Jul 2016 - 7:37 pm | नूतन सावंत

वाह!आयती मिळाली तर कित्ती मस्त आणि सोबत वाफाळणारी कॉफी.

पिलीयन रायडर's picture

4 Jul 2016 - 7:41 pm | पिलीयन रायडर

"आयती" ह्या शब्दाला अनुमोदन!!

खमंग पाकृ!

रुस्तम's picture

4 Jul 2016 - 7:41 pm | रुस्तम

तोंपासु.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jul 2016 - 7:44 pm | अत्रुप्त आत्मा

व्वाहव्वा!
लै झ्याक.
बायकू अत्ता कांद्याची असलीच भजी करती हाये! आनी रातच्या ज्येवनाला तोंडिलावन ह्राऊ न ह्राऊ अश्या बेतानं मी ती उडवत हाये!

मुक्त विहारि's picture

4 Jul 2016 - 8:23 pm | मुक्त विहारि

आता पुढच्या रत्नागिरी कट्ट्याला ही भजी खायला मिळतील अशी आशा.

स्मिता_१३'s picture

4 Jul 2016 - 8:40 pm | स्मिता_१३

भजी एकदतोमस्त दिसतायत. करायलाच हवीत आता!

फोटू व पाकृ छानच दिसतायत. आता मीही करते भजी.

अभिजीत अवलिया's picture

5 Jul 2016 - 3:10 am | अभिजीत अवलिया

नजर चुकीने मी कोंबडीची भजी असे वाचले.

नाखु's picture

5 Jul 2016 - 9:33 am | नाखु

खड्ड्यात आहे ती कशाला इथे येईल !

खुलासा ते खालसा एक मिपा शंका निवारण चळवळ
(बघता काय सामील व्हा)

चांदणे संदीप's picture

5 Jul 2016 - 9:47 pm | चांदणे संदीप

संदर्भासहित स्पष्टीकरण टाईप तुमचे प्रतिसाद अतिशय रोचक प्रसंगी खोचक तसेच समयसूचक+हजरजबाब इत्यादी गुणही अंगी बाळगून असतात. यानिमित्ताने तुम्हाला मिपाचा "प्रतिसादकेसरी" हा पुरस्कार माईंच्या हस्ते देण्यात यावा ही मागणी मी मिपा मंडळाकडे करतो.

अखिलभार्तीयमिपानाखुनप्रतिसादफ्यानक्लब्मेंब्रातलाचएक
Sandy

नाखु's picture

6 Jul 2016 - 3:11 pm | नाखु

स्वगत : सध्या कुठे आहात कवीराज?

एकदा भेटाच नाखुकाकांना, फार गप्पिष्ट आहेत. समोरच्या शिंकायलाही जागा ठेवत नाहीत बोलताना !! =))

मस्तच दिसताहेत भजी...

गणपा's picture

5 Jul 2016 - 8:55 am | गणपा

खमंग
वाफाळत्या चहा सोबत आयतीच समोर आली तर कोबी नखाणाराही नाही म्हणायचा नाही.

पाकृ व फोटो दोन्ही मस्त!
बघितल्यावर कांदा भजीच वाटतात :)

पद्मावति's picture

6 Jul 2016 - 11:29 am | पद्मावति

मस्तं!

चंपाबाई's picture

6 Jul 2016 - 12:16 pm | चंपाबाई

चायनीज भजीचा चुलतभाऊ

धनंजय माने's picture

6 Jul 2016 - 12:21 pm | धनंजय माने

सज्जन गड, हरे कृष्ण वगैरे कांदा लसूण न खाणाऱ्या जागी कोबी भजी, कोबी पोहे खाल्ले आहेत. छान लागतात.
कोबी असताना कांदा नसला तरी चालतो. कोबिचं कोरडं पिठलं देखील मस्त लागतं.

इरसाल's picture

6 Jul 2016 - 2:27 pm | इरसाल

वेरीएशन म्हणजे, ह्या खेकडा न बनवता सरळ गोल गोल गोळे बनवुन त्यांना होडन-सावर ;) सुप (नॉर/मॅगीचे) बनवुन त्यात सोडतो मग ते भाताबरोबर खातो.

स्नेहल महेश's picture

6 Jul 2016 - 3:19 pm | स्नेहल महेश

अहाहा! तोंपासु.

अनन्न्या's picture

6 Jul 2016 - 5:39 pm | अनन्न्या

बघा करून! धन्यवाद सर्वांचे!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jul 2016 - 5:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान आवडली.

-दिलीप बिरुटे

विवेकपटाईत's picture

6 Jul 2016 - 6:51 pm | विवेकपटाईत

पाऊस आणि भाजी, करून बघेन

रेड्डीज मेसचे दिवस आठवले. तिथेपण अशीच भजी मिळायची..

जिन्गल बेल's picture

7 Jul 2016 - 2:11 pm | जिन्गल बेल

अनन्या ताई ....तुमची रेसिपी छानच..
पण कायप्पा वर तुमच्या नावाशिवाय फिरत आहेत कोबीची भजी... वाईट वाटले!!! :(

अनन्न्या's picture

7 Jul 2016 - 3:34 pm | अनन्न्या

एकदा आपण ऑनलाईन पब्लीक साईटवर शेअर केली रेसिपी की आपल्या हातात फारसे काही उरत नाही.तरी वॉटरमार्क टाकलाय.

जागु's picture

7 Jul 2016 - 2:51 pm | जागु

मस्त मस्त.

tushargugale's picture

7 Jul 2016 - 3:45 pm | tushargugale
अनन्न्या's picture

7 Jul 2016 - 6:00 pm | अनन्न्या

नसेल आवडली तर नाही म्हणा, धाग्याशी संबंधीत प्रतिसाद द्या,किंवा देऊच नका.

अनन्न्या's picture

7 Jul 2016 - 6:00 pm | अनन्न्या

नसेल आवडली तर नाही म्हणा, धाग्याशी संबंधीत प्रतिसाद द्या,किंवा देऊच नका.

सस्नेह's picture

7 Jul 2016 - 3:52 pm | सस्नेह

आवडती झटपट पाकृ. कोबीमुळे फार वेळ कुरकुरीत रहात नाहीत ही भजी.

विशाखा राऊत's picture

8 Jul 2016 - 2:35 am | विशाखा राऊत

कोबी भजी माय फेवरेट.. मस्त आहे रेसेपी

पियुशा's picture

10 Jul 2016 - 4:32 pm | पियुशा

सहीच !!