हिमाचली पदार्थ - पोष्टिक आणि स्वास्थ्यवर्धक - झोल

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in पाककृती
15 Jun 2016 - 8:34 am

सक्रेणी माता

(चित्रात सक्रेणी देवीचे मंदिर)

हिमाचल मध्ये मंडी जिल्ह्यातील सक्रेण घाट. चहु बाजूला उंच आणि कठीण हिरवेगार पर्वतराजी. या भागात पाऊस हि भरपूर पडतो. पाऊस झाला कि पर्वत इथे नेहमीच ढासळतातच. पावसाळी दिवसात तर बाहेरच्या जगाशी संबंध हा नेहमीच तुटतो.

या भागात वसाहत विरळ आहे. इथले लोक उंचपुरे हृष्ट्पुष्ट आणि काटक शरीरयष्टीचे असतात. माझ्या लेकीचे सासर हि याच भागात आहे अर्थात मंदिरा जवळच आहे. झोल, हा तांदूळापासून बनणारा पोष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ आहे, शिवाय बनवायला अत्यंत सौपा. तांदूळा खेरीज मक्याच्या कणसाचे दाणे किंवा सोयाबीन इत्यादी कडधान्याचा वापर हि झोल बनविताना होतो. नुसत्या तांदुळाचा हि झोल बनविता येतो.

साहित्य: तांदूळ २ वाट्या (तुकडा तांदूळ जास्ती चांगला), मक्याच्या कणसाचे दाणे १ वाटी, मेथी दाने ६-७, काळी मिरी जिरे पूड १ चमचा किंवा स्वादानुसार आणि मीठ. (जिरे मिरे पुडच्या जागी चाट मसाला हि वापरू शकतात किंवा दोन्ही हि). लोणी काढलेली छाछ, किंवा १/२ किलो दह्याची थोड़े पानी टाकून केलेली लस्सी किंवा बाजारात मिळणारी अमूलची लस्सी ४०० gmचे २ पॅकेट.

गावात हा पदार्थ चुल्ह्या वर बनवितात. पण शहरी माणसाजवळ टाईम नाही व शिवाय कुकर हि घरी असतोच.

आधी मक्याच्या दाण्यांना एका खलबत्यात थोडे कुटून घ्या. एका दाण्याचे २-३ तुकडे झाले तरी चालतील. कुकरमध्ये तांदूळ आणि मक्याचे कुटलेले दाणे आणि मेथी दाणा टाकून दीड गिलास पाणी टाकून गॅस वर ठेवा. एक सिटी झाल्यावर गॅस बंद करून, थोडे थंड झाल्यावर भाताला पळीने घोटून घ्या. थोडी लस्सी त्यात घाला. नंतर मंद गॅसवर ठेऊन हळू-हळू सर्व लस्सी त्यात घाला. (अंदाजाने आपल्याला जास्त पातळ आणि जास्त घट्ट झोल करायचा नाही आहे). पळीने सतत चालविणे आवश्यक आहे अन्यथा लस्सी फाटू शकते. नंतर त्यात जिरे-मिरे पूड आणि स्वादानुसार मीठ हि टाका. (सर्व करताना चाट मसाला हि टाकल्या जाऊ शकतो). उकळी आल्यावर गॅस बंद करा.

उन्हाळ्याच्या दिवसात हा पेय थंड करून आणि हिवाळ्यात गरमागरम पिण्याची पद्धत आहे. उन्हाळ्यात फ्रीज मध्ये दोनेक दिवस झोल सहज टिकतो.

झोल

प्रतिक्रिया

छान. नवीन पदार्थ माहीत पडला. कृतीबद्दल धन्यवाद.

मंदार कात्रे's picture

15 Jun 2016 - 10:03 am | मंदार कात्रे

लस्सी म्हणजे खारी लस्सी का?
गोड लस्सी घालून काहीतरी विचित्र व्हायचे म्हणून विचारले

उल्का's picture

15 Jun 2016 - 10:18 am | उल्का

वेगळी पाकृ आवडली.
मीठ असल्यामुळे गोडी लस्सी नसावी असे वाटते. साधे ताक असावे. हो ना पटाईतजी?

उल्का's picture

15 Jun 2016 - 10:18 am | उल्का

वेगळी पाकृ आवडली.
मीठ असल्यामुळे गोडी लस्सी नसावी असे वाटते. साधे ताक असावे. हो ना पटाईतजी?

मेघना मन्दार's picture

15 Jun 2016 - 12:24 pm | मेघना मन्दार

२००५ साली मनाली ला ट्रेकिंग ला गेले होते तेंव्हा खाल्ला होता हा पदार्थ. थंडी मध्ये गरम गरम खूप च छान लागतो हा पदार्थ ..

पद्मावति's picture

15 Jun 2016 - 1:20 pm | पद्मावति

वाह! मस्तं वेगळाच पदार्थ.

विवेकपटाईत's picture

15 Jun 2016 - 2:32 pm | विवेकपटाईत

हिमाचली लोक लोणी काढलेले ताक वापरतात. तिथे थंडी असल्यामुळे ताक आंबट होत नाही. ताक शक्यतो आंबट नसावे. मुंबई सारख्या ठिकाणी दह्याची लस्सी केली किंवा बाजारातले अमूल किंवा मदर डेरीचे ताक वापरणे उचित. काळजी फक्त एकच. ताक टाकल्यावर उकळी येत पर्यंत सतत पळीने ढळवत राहिले पाहिजे. बाकी स्वाद करता आवडीनुसार जिरे मिरे पूड किंवा चाट मसाला टाकला जाऊ शकतो.

रेवती's picture

15 Jun 2016 - 3:35 pm | रेवती

वेगळाच पदार्थ आहे.

प्रभाकर पेठकर's picture

15 Jun 2016 - 5:04 pm | प्रभाकर पेठकर

छान वाटतो आहे पदार्थ. नक्कीच करून पाहेन.

प्रीत-मोहर's picture

15 Jun 2016 - 5:10 pm | प्रीत-मोहर

मस्त दिस्दतोय पदार्थ. नक्कीच करुन पाहिल्या जाईल

भारीच! कढीभातासारखा प्रकार दिसतोय. बहुत आभार.

पिलीयन रायडर's picture

15 Jun 2016 - 5:58 pm | पिलीयन रायडर

वेगळाच पदार्थ! प्रयत्न करुन बघेन..

छान लागत असेल गरमागरम.करुन बघेनच.सोपा वाटतोय.

अनिरुद्ध प's picture

15 Jun 2016 - 10:33 pm | अनिरुद्ध प

नाव का ठेवण्यात आले असेल ? बाकी नवीन वेगळा पदार्थ कळला , धन्यवाद पटाईत काका

विजुभाऊ's picture

16 Jun 2016 - 3:23 pm | विजुभाऊ

झोल हा बंगाली लोकांकडून आलेले नाव आहे. शिजवलेल्या पातळ द्रावणाला ते झोल म्हणताय.
उदा: "फिश करी" ला बंगालीत "माछेर झोल" म्हनतात
मुंबईत वापरतात त्या अर्थाने झोल नव्हे

रमेश आठवले's picture

16 Jun 2016 - 9:21 pm | रमेश आठवले

एका बंगाली मित्राने हे सांगितले होते
मागोर माछेर झोल
जुबा नारी कोल
बेटा हरी हरी बोल

रुपी's picture

16 Jun 2016 - 12:34 am | रुपी

वा.. मस्तच.. हा पदार्थ मक्याचे दाणे न घालता आणि थोडा घट्ट असा "खाटी घाट" म्हणून बर्‍याच वेळा खाल्ला होता. एकदा घरी बनवण्याचा प्रयत्न केला, पण बहुतेक दही फारसं आंबट नसल्यामुळे खायला फार मजा नाही आली. आता पुन्हा एकदा करुन बघेन.

यशोधरा's picture

16 Jun 2016 - 12:50 am | यशोधरा

मंडी एकदम सुरेख आहे! तिथे राहते तुमची लेक? भारीच :)

स्रुजा's picture

16 Jun 2016 - 1:37 am | स्रुजा

सुंदर पदार्थ, नक्की करुन बघेन.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jun 2016 - 4:55 am | डॉ सुहास म्हात्रे

हिमाचल भेटीची आठवण आली :) थंडीत भुरकायला मस्तं पदार्थ !

इशा१२३'s picture

16 Jun 2016 - 4:28 pm | इशा१२३

मस्त वेगळाच पदार्थ!

सस्नेह's picture

16 Jun 2016 - 4:38 pm | सस्नेह

ताकातल्या तांदळाच्या किंवा ज्वारीच्या कण्या साधारण अशाच करतात.

"ज्वारीच्या कण्या साधारण अशाच करतात."
फार छान लागतात.ओडिशातले लोक "पछाड" करतात- भातामध्ये रात्री पाणी घालून ठेवतात आणि सकाळी ताक घालून खातात.वर्धा नागपूरकडे उन्हाळ्यात आंबिल- ज्वारीच्या पिठाची पातळ कांजी दिवसभर पितात ,उन्हाळ्याचा त्रास होत नाही.
झोल दिल्याबद्दल धन्यवाद.

रमेश आठवले's picture

16 Jun 2016 - 9:14 pm | रमेश आठवले

आपल्या कडे तांदुळाच्या कण्या वापरून कण्हेरी थोडी फार अशीच करतात.