तुम्हाला नक्की काय हवं आहे, ते जरा नीट विस्तार करुन सांगाल का?
डे ट्रेडिंग करणार म्हणता पण तेहि टिप वर???
म्हणजे तुमचा शेअर बाजारावर विश्वास फारसा नाहीये असं मला वाटत आहे, जर तुम्हाला तो पूर्ण जुगारच वाटत असेल तर घोड्याच्या रेस प्रमाणेच टीप पेक्षा टिप देणार्यावर जास्ती विश्वास पाहिजे. तो आंतरजालीय टिप्स देणार्यावर तुम्ही ठेवायला तयार आहात का?
जर मी तुम्हाला सांगितले की तुम्ही उद्या "ए बी सी ईंन्फ्रा" चे समभाग घ्या, तर तुम्ही घ्याल का?
दुसरं ह्या बाजारात अनेक प्रकारच्या व्यक्ती संस्था एकाच वेळी अनेक निर्णय घेत असतात, काही जण अभ्यास करुन, काही जण अभ्यासाचा आव आणुन, काहीजण मटकेपंचमी वगैरे.
त्यात जो खरच अभ्यास करुन निर्णय घेणार आहे, तो तुम्हास का म्हणुन फुकटात टिप देईल?
बाकीचे जे २ उरले, त्यांची टिप ऐकुन तुम्ही तुमचा निर्णय घेणार असाल तर तो तुमचा मूर्खपणा ठरेल. निदान मी तरी माझ्या कष्टाचे पैसे असे उधळणार नाही.
असो, तुम्हास गुंतवणुकीस (जुगारास) ऑल द बेस्ट. अजुन दोनेक वर्षाने (४०० दिवस साधारण डे ट्रेडिंग झाल्यावर) तुम्हास अश्या टिप्स चा किती फायदा झाला हे जाणुन घ्यायला खूप आवडेल.
साधारण एवरेज करुन गुंतवणुकीत सातत्य ठेवून चांगला नफा कमविता येणे शक्य आहे,चांगल्या कंपनीचा मागचा नफा तोटा व् लाभांश किती देते हे पाहून तुम्ही गुंतवणूक करू शकतात।ह्या वर्षी eicher motor ने 1000% डिविडंड दिलेला आहे आणि फ़ोर्स मोटर्स चा शेयर 19 may 2014 ला 342 होता आता तो 3785 ला पोहचुन 3247 ला स्थिरावला आहे।तेव्हा गुंतवणुक करा
जुगार आणि गुंतवणुक या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. त्यामुळे आधी काय ते नीट ठरवा.
इंट्राडे करणार्याला ट्रेडिंग तासामधे सातत्याने मॉनिटर करावे लागते, नजर हटी तो दुर्घटना घटी।
तेवढा वेळ आहे का?
मी स्वतः काही वर्षापुर्वी इंट्राडे ट्रेडिंग करत होतो, पैसा सुटायचा पण रात्रि झोप लागायची नाही. आता फ़क्त गुंतवणुक करतो. 15/20% लक्ष्य ठेवून काम करतो.
तरिही जुगार शेयर मार्केट मधे खेळायचा असेल तर बी ग्रुप मधिल वोलेटाइल स्टॉक्स पकड़ा आणि चालु करा, पैसे मिळाले तर धन्यवाद दया आणि बुडाले तर नशीब समजून गप्प रहा.
ही घ्या एक लिंक अगम्य भाषेत काहीतरी लिहिले आहे, तुम्हाला कळले तर आम्हालाही सांगा. :)) fortune's forumla
एक मोफत टिप 19 May 2016 - 11:40 am | मराठी कथालेखक
आणि अत्यंत महत्वाची ...
तुमचे इंटरनेट कनेक्शन अगदी सुदृढ आणि भरवशाचे हवे. एक से भले दो असावे असेच मी म्हणेन.
आणि स्वतःच्या घरी बसून करत असाल तरच करावा... ऑफिसमध्ये बसून करताना मध्येच कामाचा अडथळा येणार नाही याची खात्री असेल तरच,,,, :)
का कुणास ठाऊक ? पण शेयर बाजारात नफा कमावला तर मला अपराधी वाटते !
जो पैसा कमावण्यासाठी आपण कडीइतके शष्प देखील शारिरिक अथवा बौध्दीक श्रम केले नाहीत , ते पैसे आपण कसे घ्यायचे ? हा एक प्रकारचा गुन्हाच नव्हे का ? अश्या पैशावर आपला नैतिक अधिकार नाही !
तस्मा, शेयर बाजारात दमडी देखील गुंतवली नाही , भविष्यात ही गुण्तवणार नाही ! म्युचल फंडात पैसे गुण्तवले आहेत ( पीयर प्रेशर ) पण १५% रिटर्न आले की लगेच काधून घेतो
काल cnbc आवाज़ ला कुठल्यातरि सल्लागराची मुलाखत होती ,त्यात त्याला विचारले गेले की जर तुम्हाला आज 1 कोटि रुपये शेयर घ्यायला दिले तर तुम्ही काय कराल त्याने त्यावर सांगितले की मी फाइनान्स कंपनीत गुंतवेल त्याने कंपनीचे नाव नाही सांगितले ते आपण आपल्या कुवती नुसार घ्यायचे।
बजाज फाइनान्स, एल & टी फाइनान्स, प्राइवेट बैंक(यस आईसीआईसीआई एच डी एफ सी कोटक महिन्द्रा),श्रीराम ट्रांस ई ई भरपूर आहेत बघा तुम्हाला काय घ्यायचे ते।
..बाटा वर पण लक्ष असू दया
विटेकर साहेब जर आज तुम्ही 1 लाखाला प्लाट घेतला आणि उद्या जर त्याला 2 किंवा 3 लाख किंमत आली तर तुम्ही काय कराल?1 लाखाला द्याल का जी किंमत मिळत आहे त्याला द्याल?
प्रश्न अवघड आहे !
पण मुळात मी मुद्दल गुंतवले आहे आणि बाजार भावच वाढला आहे त्यामुळे घेणार्याचे नुकसान मी प्लॉट विकताना करत नाही. घेणारा आनंदाने ( मर्यादित अर्थाने) ती किंमत देत असतो. तशी आपखुशी नसेल तर व्यवहार होत नाहीत.
शेयर मार्केट मध्ये तुम्ही जेव्हा पैसे कमावता त्यावेळी कोणाचे तरी नुकसान होत असते ! करे़क्ट मी इफ आय एम रोन्ग !
शेयर मार्केट मध्ये तुम्ही जेव्हा पैसे कमावता त्यावेळी कोणाचे तरी नुकसान होत असते
चुकीची कल्पना आहे तुमची ,हे असे फ़क्त पत्याच्या किंवा आकड्याच्या खेळात होते, इथे शेयर चे भाव हे कंपनीच्या प्रगतिवर अवलंबून असतात।
काल सकाळी चांस होता मस्तं. दुपारीच मार्केट रिकव्हर झालं. एक वाक्य प्रसिद्ध आहे.
You want to be greedy when others are fearful.
You want to be fearful when others are greedy.
आज मार्केट चांगले पॉसिटीव्ह होते ज्यांनी काल शेअर्स खरेदी केले त्यांना लाभ झाला इथून पुढे ३-४ दिवस तरी मार्केट २०० ते ३०० पॉईंट्स कधी खाली कधी वरती राहील असा अंदाज आहे (मागील इतिहास पाहून अंदाज करतोय) काल Union Bank Of India चे शेअर्स खरेदी केले १२७/- ना आज त्यांची किंमत १४३/- आहे मार्केट बंद होताना. आणखी वाट बघेन उद्या १५०/- पर्यंत विक्री कारेन.
शेअर मार्केट 10 Nov 2016 - 4:22 pm | जितेन्द्र अशोक नाइक
सुरुवात करत असाल तर इंट्रा डे चा विचार अजिबात करू नका, मी स्वतः लाख भर गमावलेत लॉन्ग टर्म चांगलं आहे जे मी गमावलं ते आता थोडं थोडं परत मिळवतोय.
प्रतिक्रिया
18 May 2016 - 4:10 pm | आदिजोशी
एकच टीप - अभ्यास वाढवा
18 May 2016 - 6:15 pm | बोका-ए-आझम
शेअर बाजार हा जुगार नव्हे.
18 May 2016 - 7:07 pm | एकुलता एक डॉन
जिंक्नायची खात्री नाही ,म्हणजे जुगारच तर
18 May 2016 - 7:18 pm | बोका-ए-आझम
१. तुमची जिंकण्याची व्याख्या काय ते ठरवा.
२. हे आयुष्याबद्दल पण म्हणता येईल.
18 May 2016 - 7:49 pm | एकुलता एक डॉन
जिंदगी एक जुआ
18 May 2016 - 6:27 pm | श्री गावसेना प्रमुख
कुठलाही तज्ञ 100% खात्रीशिर माहिती देऊ शकणार नाही।त्यामुळे इंट्राडे न करता गुंतवणूक करा
18 May 2016 - 6:32 pm | प्रसाद भागवत
माहिती कोणीही देऊ शकेल.. खात्री कोण देणार??
18 May 2016 - 7:04 pm | मी-सौरभ
जुन्या मिपाकरांसाठी हा एक असा विषय आहे ज्यावर कोणीच काही बोलु ईच्छीत नाही. तेव्हा फार मोठ्या चर्चेची अपेक्षा नको.
18 May 2016 - 7:45 pm | सतिश गावडे
अपेक्षा फार मोठया नसल्या की अपेक्षा भंगाचे दु:ख सहन करावे लागत नाही.
18 May 2016 - 8:31 pm | सुबोध खरे
तुम्हाला शेअर मार्र्केट हवंय
का
जुगार खेळायचा आहे?
ते नक्की ठरवा
जुगार खेळायला उत्तम म्हणजे लास व्हेगास नाहीतर गोव्यातील कॅसिनो रॉयल.
18 May 2016 - 9:12 pm | एकुलता एक डॉन
शेअर मार्र्केट
19 May 2016 - 7:31 am | बेकार तरुण
तुम्हाला नक्की काय हवं आहे, ते जरा नीट विस्तार करुन सांगाल का?
डे ट्रेडिंग करणार म्हणता पण तेहि टिप वर???
म्हणजे तुमचा शेअर बाजारावर विश्वास फारसा नाहीये असं मला वाटत आहे, जर तुम्हाला तो पूर्ण जुगारच वाटत असेल तर घोड्याच्या रेस प्रमाणेच टीप पेक्षा टिप देणार्यावर जास्ती विश्वास पाहिजे. तो आंतरजालीय टिप्स देणार्यावर तुम्ही ठेवायला तयार आहात का?
जर मी तुम्हाला सांगितले की तुम्ही उद्या "ए बी सी ईंन्फ्रा" चे समभाग घ्या, तर तुम्ही घ्याल का?
दुसरं ह्या बाजारात अनेक प्रकारच्या व्यक्ती संस्था एकाच वेळी अनेक निर्णय घेत असतात, काही जण अभ्यास करुन, काही जण अभ्यासाचा आव आणुन, काहीजण मटकेपंचमी वगैरे.
त्यात जो खरच अभ्यास करुन निर्णय घेणार आहे, तो तुम्हास का म्हणुन फुकटात टिप देईल?
बाकीचे जे २ उरले, त्यांची टिप ऐकुन तुम्ही तुमचा निर्णय घेणार असाल तर तो तुमचा मूर्खपणा ठरेल. निदान मी तरी माझ्या कष्टाचे पैसे असे उधळणार नाही.
असो, तुम्हास गुंतवणुकीस (जुगारास) ऑल द बेस्ट. अजुन दोनेक वर्षाने (४०० दिवस साधारण डे ट्रेडिंग झाल्यावर) तुम्हास अश्या टिप्स चा किती फायदा झाला हे जाणुन घ्यायला खूप आवडेल.
19 May 2016 - 7:34 am | बेकार तरुण
सॉरी
तुम्ही स्वानुभवहि विचारला आहे - मला डे ट्रेडिंगचा शून्य स्वानुभव आहे, कधी करावेसे वाटलेहि नाही आणि भविष्यात करेन असेहि वाटत नाही.
19 May 2016 - 7:51 am | श्री गावसेना प्रमुख
साधारण एवरेज करुन गुंतवणुकीत सातत्य ठेवून चांगला नफा कमविता येणे शक्य आहे,चांगल्या कंपनीचा मागचा नफा तोटा व् लाभांश किती देते हे पाहून तुम्ही गुंतवणूक करू शकतात।ह्या वर्षी eicher motor ने 1000% डिविडंड दिलेला आहे आणि फ़ोर्स मोटर्स चा शेयर 19 may 2014 ला 342 होता आता तो 3785 ला पोहचुन 3247 ला स्थिरावला आहे।तेव्हा गुंतवणुक करा
19 May 2016 - 8:57 am | भंकस बाबा
जुगार आणि गुंतवणुक या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. त्यामुळे आधी काय ते नीट ठरवा.
इंट्राडे करणार्याला ट्रेडिंग तासामधे सातत्याने मॉनिटर करावे लागते, नजर हटी तो दुर्घटना घटी।
तेवढा वेळ आहे का?
मी स्वतः काही वर्षापुर्वी इंट्राडे ट्रेडिंग करत होतो, पैसा सुटायचा पण रात्रि झोप लागायची नाही. आता फ़क्त गुंतवणुक करतो. 15/20% लक्ष्य ठेवून काम करतो.
तरिही जुगार शेयर मार्केट मधे खेळायचा असेल तर बी ग्रुप मधिल वोलेटाइल स्टॉक्स पकड़ा आणि चालु करा, पैसे मिळाले तर धन्यवाद दया आणि बुडाले तर नशीब समजून गप्प रहा.
19 May 2016 - 11:20 am | अनंत छंदी
ही घ्या एक लिंक अगम्य भाषेत काहीतरी लिहिले आहे, तुम्हाला कळले तर आम्हालाही सांगा. :))
fortune's forumla
19 May 2016 - 11:40 am | मराठी कथालेखक
आणि अत्यंत महत्वाची ...
तुमचे इंटरनेट कनेक्शन अगदी सुदृढ आणि भरवशाचे हवे. एक से भले दो असावे असेच मी म्हणेन.
आणि स्वतःच्या घरी बसून करत असाल तरच करावा... ऑफिसमध्ये बसून करताना मध्येच कामाचा अडथळा येणार नाही याची खात्री असेल तरच,,,, :)
19 May 2016 - 11:58 am | सुधीर जी
qty b s
IRB 2100 4.1 8610 4.50 9450 840
BHARTFO 500 4 2000 2.7 1350 -650
HEXAWARE 2000 11.5 23000 12.00 24000 1000
LUPIN 300 44.5 13350 47.25 14175 825
CRUDE 50 3253 162650 3288 164400 1750
3765
he maze aajache trade
tumhala contract note suddha dakhvu shakto
mi tip det nahi, pan guidance deu shakto
20 May 2016 - 10:36 am | एकुलता एक डॉन
आज कोणते शेयर घेऊ ?
20 May 2016 - 4:22 pm | सुधीर जी
DISH TV GHYA REUSULT CHANGLA AHE CO CHA
20 May 2016 - 10:47 am | विटेकर
का कुणास ठाऊक ? पण शेयर बाजारात नफा कमावला तर मला अपराधी वाटते !
जो पैसा कमावण्यासाठी आपण कडीइतके शष्प देखील शारिरिक अथवा बौध्दीक श्रम केले नाहीत , ते पैसे आपण कसे घ्यायचे ? हा एक प्रकारचा गुन्हाच नव्हे का ? अश्या पैशावर आपला नैतिक अधिकार नाही !
तस्मा, शेयर बाजारात दमडी देखील गुंतवली नाही , भविष्यात ही गुण्तवणार नाही ! म्युचल फंडात पैसे गुण्तवले आहेत ( पीयर प्रेशर ) पण १५% रिटर्न आले की लगेच काधून घेतो
20 May 2016 - 10:50 am | विटेकर
हा टिपिकल मध्यमवर्गीय मराठी सिन्ड्रोम आहे का ? माझ्यासारखे अजून कोणी हाय का ?
20 May 2016 - 10:51 am | श्री गावसेना प्रमुख
काल cnbc आवाज़ ला कुठल्यातरि सल्लागराची मुलाखत होती ,त्यात त्याला विचारले गेले की जर तुम्हाला आज 1 कोटि रुपये शेयर घ्यायला दिले तर तुम्ही काय कराल त्याने त्यावर सांगितले की मी फाइनान्स कंपनीत गुंतवेल त्याने कंपनीचे नाव नाही सांगितले ते आपण आपल्या कुवती नुसार घ्यायचे।
बजाज फाइनान्स, एल & टी फाइनान्स, प्राइवेट बैंक(यस आईसीआईसीआई एच डी एफ सी कोटक महिन्द्रा),श्रीराम ट्रांस ई ई भरपूर आहेत बघा तुम्हाला काय घ्यायचे ते।
..बाटा वर पण लक्ष असू दया
20 May 2016 - 10:54 am | श्री गावसेना प्रमुख
विटेकर साहेब जर आज तुम्ही 1 लाखाला प्लाट घेतला आणि उद्या जर त्याला 2 किंवा 3 लाख किंमत आली तर तुम्ही काय कराल?1 लाखाला द्याल का जी किंमत मिळत आहे त्याला द्याल?
20 May 2016 - 11:06 am | विटेकर
प्रश्न अवघड आहे !
पण मुळात मी मुद्दल गुंतवले आहे आणि बाजार भावच वाढला आहे त्यामुळे घेणार्याचे नुकसान मी प्लॉट विकताना करत नाही. घेणारा आनंदाने ( मर्यादित अर्थाने) ती किंमत देत असतो. तशी आपखुशी नसेल तर व्यवहार होत नाहीत.
शेयर मार्केट मध्ये तुम्ही जेव्हा पैसे कमावता त्यावेळी कोणाचे तरी नुकसान होत असते ! करे़क्ट मी इफ आय एम रोन्ग !
20 May 2016 - 3:11 pm | श्री गावसेना प्रमुख
शेयर मार्केट मध्ये तुम्ही जेव्हा पैसे कमावता त्यावेळी कोणाचे तरी नुकसान होत असते
चुकीची कल्पना आहे तुमची ,हे असे फ़क्त पत्याच्या किंवा आकड्याच्या खेळात होते, इथे शेयर चे भाव हे कंपनीच्या प्रगतिवर अवलंबून असतात।
22 May 2016 - 2:23 pm | कपिलेश
पन लय मजा येतेना भाऊ . येक्दाम शेतिवानिच हाय बघा ते. येक डाव खेळुन तर बघा.
10 Nov 2016 - 4:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शेअर मार्केट सध्या काय परिस्थिती गुंतवणुकदारांसाठी ??
-दिलीप बिरुटे
10 Nov 2016 - 4:24 pm | अनुप ढेरे
काल सकाळी चांस होता मस्तं. दुपारीच मार्केट रिकव्हर झालं. एक वाक्य प्रसिद्ध आहे.
You want to be greedy when others are fearful.
You want to be fearful when others are greedy.
काल सकाळी पहिलं वाक्य लागू होतं.
10 Nov 2016 - 4:35 pm | जितेन्द्र अशोक नाइक
आज मार्केट चांगले पॉसिटीव्ह होते ज्यांनी काल शेअर्स खरेदी केले त्यांना लाभ झाला इथून पुढे ३-४ दिवस तरी मार्केट २०० ते ३०० पॉईंट्स कधी खाली कधी वरती राहील असा अंदाज आहे (मागील इतिहास पाहून अंदाज करतोय) काल Union Bank Of India चे शेअर्स खरेदी केले १२७/- ना आज त्यांची किंमत १४३/- आहे मार्केट बंद होताना. आणखी वाट बघेन उद्या १५०/- पर्यंत विक्री कारेन.
10 Nov 2016 - 4:22 pm | जितेन्द्र अशोक नाइक
सुरुवात करत असाल तर इंट्रा डे चा विचार अजिबात करू नका, मी स्वतः लाख भर गमावलेत लॉन्ग टर्म चांगलं आहे जे मी गमावलं ते आता थोडं थोडं परत मिळवतोय.
10 Nov 2016 - 4:47 pm | पाटीलभाऊ
शेअर मार्केट मध्ये इंट्रा डे खेळण्यापेक्षा...लॉन्ग टर्म खेळा.
संयम ठेवा.