मराठी टंकलेखन आणि कीबोर्ड लेआउट

सांरा's picture
सांरा in तंत्रजगत
8 May 2016 - 2:17 pm

नुकताच मी नवीन संगणक विकत घेतला आहे व त्यात विंडोस १० आहे. त्यामध्ये मी मराठी आणि जपानी भाषा निवडली आहे. इंग्रजी तसेच जपानी भाषा सुद्धा मस्त चालते. परंतु मराठी चा कळफलक (कीबोर्ड लेआउट) अत्यंत वेगळा आणि कठीण वाटला. गूगलवर शोधल्यावर कोणालाच काही त्रास असल्याचा दिसलं नाही. अजून शोधल्यावर कळले कि तो नवीन कळफलक inscript असून अन्य भारतीय भाषांना पूरक म्हणून बनविलेला आहे. मला यावर काही शंका आहेत.

  • हा inscript वापरण्याआधी शिकवा लागेल. मला वाटते त्यासाठी स्वतंत्र कळफलक नसल्याने शिकतांना अडचणी येतील. जपानी कळफलक फोनेटिक असून वापरण्यास अत्यंत सोपा आहे. इंग्रजी येत असल्यास बाकी काही शिकण्याची गरज पडत नाही. तसेच notepad, word प्रत्येक ठिकाणी चालतो. तसेच उबुंतूवर सुद्धा marathi फोनेटिक कळफलक उपलब्ध आहे. तर विंडोसवर का नाही. ?
  • हा inscript कळफलक कोण कोण वापरत ?
  • मराठीत सर्व वापरू शकतील असा unicode कळफळक नाही का ? मी मकरंद गद्रे यांचा कळफलक वापरून बघितला पण तो खूप हळू चालतो. गूगल IME अजून वापरला नाही. तो offline वापरता येईल का ?
  • समज मी दुसरा कोणता कळफलक वापरला तरी त्यामुळे encoding problems होऊन data loss होईल का ? तसेच दुसरा कळफलक unicode वापरेल का ? कारण याआधी कृतीदेव font नसल्याने भरपूर मनस्ताप झाल्याचा अनुभव आहे. unicode बद्दल तर शंकाच शंका आहेत.

आपला आज्ञाधारक राक्षस.

प्रतिक्रिया

माहितगार's picture

8 May 2016 - 2:43 pm | माहितगार

तुम्ही मराठी युनिकोड टायपींगचा उपयोग कोण कोणत्या गोष्टी टाईप करण्यासाठी करता ?

मिपावरचे मराठी लेखन आपण कोणती सुविधा वापरुन केले आहे ?

सांरा's picture

8 May 2016 - 2:51 pm | सांरा

मी मिपा वरच उपलब्ध असलेल्या गूगल IME वरून केलेले आहे.
मी जवळपास सर्वच टायपिंग मराठीत करतो. उबुंतूवर OS आणि टायपिंग दोन्ही मराठीच होते. आत्ता आत्ताच मी विंडोस वर शिफ्ट झालो.

माहितगार's picture

8 May 2016 - 4:10 pm | माहितगार

-सर्वप्रकारच्या उत्तरदायकत्वास नकार लागू
४)

"समज मी दुसरा कोणता कळफलक वापरला तरी त्यामुळे encoding problems होऊन data loss होईल का ?

युनिकोडचा उद्देशच encoding problems कमी करण्याचा आहे त्यामुळे युनिकोडाचा कोणताही कळफलक वापरला तरी सहसा प्रॉब्लेम यावयास नको. अर्थात आधी ट्रायल एरर करुन खात्री करुन घ्यावी.
३)

...गूगल IME अजून वापरला नाही. तो offline वापरता येईल का ?

होय मागेतरी डाऊनलोड करावयाची सोय उपलब्ध होती, सद्यस्थिती विषयी तुम्हाला गूगल शोध घ्यावा लागेल. पण तुम्हाला मिपामुळे सवय असल्यामुळे तुर्तास हा पर्याय अधिक उत्तम वाटतो.

२) हा inscript कळफलक कोण कोण वापरत ?
मी वापरत नाही मागे मी केलेल्या सर्वे नुसार साधारणतः ४ ते ६ टक्के लोकच इन्स्क्रीप्ट वापरतात. लर्नींग कर्व मोठा असतो सिडॅक्च्या संस्थळावरुन टायपिंग प्रॅक्टीस ट्यूटोरीअल डाऊनलोड करता येते. अधिक वेग मिळण्याचा या मंडळींचा दावा असतो पण कोणत्याही तौलनीक टायपींग स्पर्धातून या दाव्यांची चाचपणी झालेली नसावी आणि लॉजीकवर व्यक्तिशः मला सिद्ध न केलेले दावे साशंकतायुक्त वाटतात. (-मला इनस्क्रीप्टपण जमते पण मी ते सरावात ठेवण्याचे टाळतो)
१)

..तसेच उबुंतूवर सुद्धा marathi फोनेटिक कळफलक उपलब्ध आहे. तर विंडोसवर का नाही. ?

माझ्या माहिती प्रमाणे विंडोसवरपण उपलब्ध आहे. अर्थात मी स्वतः अद्याप वापरले नसल्यामुळे इतरांकडून माहिती करुन घ्यावी

इनक्रीप्ट आणि आयएमई दोन्हीची माहिती देणारे सुशांत देवळेकरांचे युट्यूब बर्‍यापैकी माहितीपूर्ण आणि उपयूक्त ठरावेत असे वाटते.

(चुभूदेघे)

माहितगार's picture

8 May 2016 - 4:12 pm | माहितगार

इनक्रीप्ट आणि आयएमई

दोन्हीही शालेय अभ्यासक्रमात दहाविच्या वर्गात असावे, शिक्षक आणि मुलांना येण्याबद्दल खात्रीने सांगता येणार नाही पण त्यांच्या आयसीटीच्या पुस्तकातही या विषयावर माहिती मिळावी.

माहितगार's picture

8 May 2016 - 4:16 pm | माहितगार

महाराष्ट्र राज्यसरकार मार्गदर्शन वेबसाईट : मराठी भाषा संगणनाचे उत्कृष्टता केंद्र

सांरा's picture

8 May 2016 - 5:57 pm | सांरा

तेथेही inscript च आहे सगळीकडे.

सांरा's picture

8 May 2016 - 5:53 pm | सांरा

मी वापरत नाही मागे मी केलेल्या सर्वे नुसार साधारणतः ४ ते ६ टक्के लोकच इन्स्क्रीप्ट वापरतात. लर्नींग कर्व मोठा असतो

म्हणूनच फार लोक inscript वापरतील यावर शंका आहे. आणि यामुळेच मी पर्यायाच्या शोधत आहे.

माझ्या माहिती प्रमाणे विंडोसवरपण उपलब्ध आहे. अर्थात मी स्वतः अद्याप वापरले नसल्यामुळे इतरांकडून माहिती करुन घ्यावी

मला विंडोस किंवा गुगल किंवा भारत सरकार अशा स्रोतांकडून हवा आहे. त्यामुळे त्यात चुका कमी असतात किंवा नसतात आणि intergration चांगले असते.

कंजूस's picture

8 May 2016 - 2:58 pm | कंजूस

inscript म्हणजे काय?

शाम भागवत's picture

8 May 2016 - 5:39 pm | शाम भागवत

निवडणूक आयुक्त असताना निवडणूक ओळखपत्र तयार करण्यासाठी सर्व भारतीय भाषांसाठी कीबोर्ड लेआउट सी-डॅक ने तयार केले होते. थोडक्यात ती भारतीय भाषांसाठी कळफलक मानके आहेत.
आता ते लेआउट येथे पहायला मिळतील.

त्यामुळे युनिकोडाचा कोणताही कळफलक वापरला तरी सहसा प्रॉब्लेम यावयास नको.

postgresql मधे गुगल कीबोर्ड मधून भरलेला देवनागरी युनिकोड डाटा व बराहा डायरेक्ट मधून भरलेला देवनागरी युनिकोड डाटा दिसायला सारखा दिसतो पण इन्डेक्सिंग करून सर्च करताना वेगवेगळी उत्तरे येतात. त्यामुळे कोणती तरी एकच पध्दत वापरा असे गिर्‍हाइकाला स्पष्टपणे सांगायला लागते.

सांरा's picture

8 May 2016 - 6:04 pm | सांरा

गूगल इनपुट टूल्स download केले आणि वापरले. अगदी जसे पाहिजे होते तसे...!!!! प्रतिसादासाठी धन्यवाद. बाकी जपानी व इंग्रजी कळफलक MICROSOFT IME वापरत आहे तर मराठीसाठी गूगल. आता इन्स्क्रिप्त शिकावे लागेलसे वाटत नाही.

आतिवास's picture

8 May 2016 - 6:05 pm | आतिवास

हा inscript कळफलक कोण कोण वापरत ?
- मी वापरते
हा inscript वापरण्याआधी शिकवा लागेल.
- पहिल्यांदा वर्डमध्ये सगळी अक्षरं साधी आणि शिफ्ट की वापरून टाईप करून घेतली. एक दोन दिवसांत हात बसला. तुम्ही किती नियमित मराठी टंकलेखन करता त्यावर हात बसण्याचा वेग अवलंबून आहे.
- मिपावर इन्स्क्रिप्ट वापरून लिहिते. काही अडचण येत नाही.

अभ्या..'s picture

8 May 2016 - 6:14 pm | अभ्या..

हा inscript कळफलक कोण कोण वापरत ?

मीही वापरतो. मला व्यवसायात श्री लिपी आणि आयेसेम वापरावे लागते. श्रीलिपिसाठी डीओई हा जवळपास इन्स्क्रीप्ट लेआउट मी शिकलेलो होतो त्यामुळे लगेच जमला. माझ्या ऑफीसातली ऑपरेटर मुले ३ दिवसात फक्त एका कीबोर्ड लेआउटाच्या प्रिंटवरुन जोडाक्षरेसहीत इन्स्क्रीप्ट वापरायला शिकली. मराठी टायपिंगमधल्या जवळपास सार्‍या शक्यता इन्स्क्रीप्ट मध्ये शक्य होतात.

सांरा's picture

8 May 2016 - 6:10 pm | सांरा

एक प्रोब्लेम आहे. गूगल IME वापरून विंडोस १० च्या डेस्कटॉप मध्ये काही सर्च करता येत नाही. तसेच notepad वर बरोबर वापरतांना त्रास होतो. बाकी मस्त चालू आहे.

शाम भागवत's picture

8 May 2016 - 6:25 pm | शाम भागवत

हा कळफलक गोदरेज कीबोर्डला पर्याय म्हणून आलेला आहे. जे टंकलेखक आहेत त्यांचेसाठी हा उपयुक्त आहे. जलद टंकन करायला हा उपयुक्त आहे. मात्र त्यासाठी मुद्दामहून प्रॅक्टिस करायला लागते. एकदा जमायला लागल्यावर कळफलक लक्षात ठेवण्यासाठी डोक्याचा वापर कमी कमी होत जाऊन वेग वाढू शकतो. शेवटी निव्वळ प्रतिक्षिप्त क्रियेवर
टंकन जमायला लागते.

उदाहरणार्थ "करमरकर" हे सोपे आडनाव टाईप करायचे असल्यास inscript कळफलकात "kjcjkj" येवढेच टाईप करायला लागेल.

मात्र फोनेटीक मधे "karamarakara" येवढे टाईप करायला लागेल. तसेच येथे थोडासातरी डोक्याचा वापर कळफलक लक्षात ठेवण्यासाठी करायला लागतो. निव्वळ प्रतिक्षिप्त क्रियेद्वारे टंकन जमणे त्यामानाने अवघड असते.

माहितगार's picture

8 May 2016 - 9:41 pm | माहितगार

वेग ?

इन्स्क्रिप्ट वापरकर्ते आणि इनस्क्रिप्टेतरांनी तौलनीक स्पर्धांमध्ये भाग घेऊन कोणता वेग अधिक हे सिद्ध केलेले नाही. वेगाच्या बाबतीत स्वतःच स्वतःला प्रमाणपत्र देणारे इन्स्क्रीप्टकर मराठी/देवनागरीही मोठ्याप्रमाणावर जोडाक्षरवाली लिपी आहे हे विसरतात, इन्स्क्रीप्ट मध्ये जो वेळ व्यंजनांचे पाय d टायपून खर्च करतात तेथे इनस्क्रिप्टेतर सेव्ह करतात, त्या शिवाय गूगल आयएमई वापरकर्त्यास सरावाची झाली की नेहमी वापरला जाणारा शब्द पर्याय अधिक सुलभतेने उपलब्ध करुन वेळ वाचवते असा दावाही डेव्हेलपर कडून ऐकलेला आहे तेव्हा प्रत्यक्ष स्पर्धा हाच सिद्ध करण्याचा सर्वोत्कृष्ट उपाय असावा.

मतांतरासाठी क्षमस्व

एकदम बरोबर.

१९९५ सालापासून जे टंकलेखक इन्स्क्रिप्ट कीबोर्ड वापरतात त्यांच्या अनुभवावर माझी पोस्ट आधारित होती. त्यामधे त्यांनी जे तर्क मांडले होते व त्यांना जो अनुभव आला होता तेवढेच मी मांडले. मी स्वतः दोन्ही कीबोर्ड वापरतो. टॅबवर इन्स्क्रिप्ट व संगणकावर फोनेटीक. असो.

मात्र पण मला स्वतःला काहीही सिध्द करायचे नसल्याने तसेच मला कोणतेही सर्टिफिकेट द्यायचे/घ्यायचे नसल्याने माझा ह्या स्पर्धेत सहभाग नसणार आहे.
:))

माहितगार's picture

9 May 2016 - 7:20 am | माहितगार

:)

तसे पहावयाचे झाल्यास बहुसंख्य (९९ %?) लोक संगणका सोबत जो काही कळफलक येतो आणि जो मुलतः इंग्रजीसाठी म्हणून बनलेला आहे तोच मराठी इनस्क्रीप्टासाठी वापरतात त्यात ! उद्गारवाचक आणि ? प्रश्नार्थक महिरपी कंस इत्यादी वापरावयाचे असल्यास इनस्क्रीप्ट मधून इंग्रजीत शीफ्ट ओव्हर करावे लागते आणि या चिन्हांचा कुणाचा वापर अधिक असेल तर जिकीरीचे होत नसेल का अशी शंका येते.

मराठी इन्स्क्रीप्टसाठी विशेष कळफलक (हार्डवेअर) मार्केटमध्ये मिळते ते बरोबर असावे असा कयास. ९९.९९ टक्के लोक संगणकासोबत येणारा वस्तुतः इंग्रजी साठी असलेला कळफलकच मराठी इनस्क्रीप्टासाठी वापरतात आणि त्यामुळे तो तांत्रिकदृष्ट्या परीपूर्ण यात कितपत मोडतो या बाबत साशंकता वाटते.

शाम भागवत's picture

9 May 2016 - 8:59 am | शाम भागवत

हा कळफलक गोदरेज कीबोर्डला पर्याय म्हणून आलेला आहे. जे टंकलेखक आहेत त्यांचेसाठी हा उपयुक्त आहे. जलद टंकन करायला हा उपयुक्त आहे. मात्र त्यासाठी मुद्दामहून प्रॅक्टिस करायला लागते. एकदा जमायला लागल्यावर कळफलक लक्षात ठेवण्यासाठी डोक्याचा वापर कमी कमी होत जाऊन वेग वाढू शकतो. शेवटी निव्वळ प्रतिक्षिप्त क्रियेवर टंकन जमायला लागते.

माझ्या पोस्टमधील ठळक केलेल्या वाक्यांचा संदर्भ सोडून माझी पोस्ट वाचल्यास तुम्ही काढलेले निष्कर्ष बरोबर येत आहेत.

माहितगार's picture

9 May 2016 - 2:39 pm | माहितगार

हम्म.. आपल्या पहिल्या दोन वाक्यांनी उर्वरीत परिच्छेद क्वालीफाय होतो हे खरे, उर्वरीत बहुतांश असे इनस्क्रीप्ट उपयोगकर्ते उर्वरीत मजकुरावर विश्वास ठेऊन दावे करताना दिसतात त्यांच्यासाठी माझे प्रतिसाद राखून ठेवतो.

आभार.

शाम भागवत's picture

9 May 2016 - 8:07 pm | शाम भागवत

:-))

पाषाणभेद's picture

8 May 2016 - 11:07 pm | पाषाणभेद

तुम्ही गमभन वापरा किंवा किरण फॉन्ट वापरा. दोन्ही मराठी माणसांनी तयार केलेले असल्याने व मराठी भाषेच्या खाचाखोचा त्यांना माहीत असल्याने ते सर्वार्थाने योग्य आहेत.

माहितगार's picture

9 May 2016 - 7:03 am | माहितगार

किरण पुर्वीतरी युनिकोडात उपलब्ध नव्हता, अलिकडे काही बदल झाला आहे का ?

पाषाणभेद's picture

9 May 2016 - 8:17 pm | पाषाणभेद

किरण फॉन्ट युनिकोडमध्ये अजूनही नाही, तत्राप किरण भावे याने एक युटीलीटी तयार केली आहे ज्यायोगे आपण युनिकोडमध्ये टाईप केलेले एका क्लिकमध्ये किरण फॉन्टमध्ये कन्व्हर्ट होते.
अतिशय सोपे आहे ते. सरळ युनीकोडमध्ये टाईप करा अन कन्व्हर्ट करा. बास.

आणि डायरेक टाईप करायचे असल्यास किरणचा किबोर्डही सोपा आहे.
फक्त युनिकोड ते किरण फॉन्ट ही युटीलीटी केवळ काही शे रूपयात किरण देतो. मी एक कमर्शीयल पुस्तक लिहीले आहे, त्या कारणास्तव मी ती युटीलीटी विकत घेतली आहे. सरळ गमभन युनीकोड मध्ये टाईप केले अन कन्व्हर्ट केले. कित्येकदा मी मिपाचा हाच इडीटर (जो गमभन मध्ये आहे) तोच वापरलेला आहे.

ती युटीलीटी मी कॉपी करून देवू शकतो पण ते योग्य नसल्याने कुणालाही दिलेली नाही.
आपल्यासाठी जर काम सोपे होत असेल तर थोडे पैसे खर्च करण्यात काही हरकत नाही.
(मी किरण फॉन्टचा केवळ वापरकर्ता आहे. मी किरणफॉन्टची जाहीरातही करत नाही. एक मराठी माणसाने योग्य रित्या केलेला फॉन्ट असल्याने किरण फॉन्टचा वापरकर्ता म्हणून मला अभिमान आहे.)

माहितगार's picture

10 May 2016 - 7:12 am | माहितगार

युनिकोड > ते नॉन युनिकोड असा प्रवास केलात!, किरण फॉन्टची दृश्यता टाईप फेस आपल्याला आवडतात का ? व्यक्तिगत आवड निवड असल्यास ठिकच.

आजच्या काळात दृश्यतेसाठी सुद्धा युनिकोडात मोफत सुद्धा बर्‍या पैकी पर्याय उपलब्ध असावेत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 May 2016 - 12:16 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

'कीबोर्ड क्रिएटर' नावाचं एक सॉफ्टवेअर वापरून मी बोलनागरीसारखा कळफलक विंडोजसाठी बनवला. (त्याबद्दल अधिक माहिती इथे.) तो फारसा वापरला जात नाही कारण विंडोज वापरण्याचीच वेळच माझ्यावर फार येत नाही.
माझ्याकडे विंडोज-७ आहे, अजून विंडोज-१० वर जाण्याची हिंमत झालेली नाही.

यात अडचण अशी की स्वर टंकण्यासाठी लिनक्स+बोलनागरीमध्ये राईट+आल्ट अशी सोय आहे ती विंडोजमध्ये नाही. त्याऐवजी कंट्रोल बटण आहे. मग स्वर टंकण्यासाठी कंट्रोल+आय किंवा अशी बटणं वापरली की त्या-त्या सॉफ्टवरचे भलते पर्याय निवडले जातात. त्यात काही बदल करता येतात का नाही हे मी तपासलं नाहीये.

गूगल आयएमईसारखे (अतिशहाणे) पर्याय मला आवडत नाही. मला समजा साो असा शब्द टंकायचा असेल तर त्याची सोय गूगल किंवा गमभन दोन्हीमध्ये नाही. त्यातल्या त्यात गमभन बरं, कारण त्यात चोप्य-पस्तेसारखे शब्द सहज टंकता येतात.

सांरा's picture

10 May 2016 - 3:20 pm | सांरा

unicode हा broken असल्याचे ऐकले होते. त्याबद्दल काय मत आहे.

https://vimeo.com/४२४६९४३

http://unidevmarathi.blogspot.in/

माहितगार's picture

10 May 2016 - 4:07 pm | माहितगार

ब्लॉग वरवर चाळला सविस्तर वाचल्या शिवाय उत्तर देणे योग्य नाही ते सवडीने करेन पण अशा पद्धतीचे मुद्दे विकिपीडियावरही पाहण्यात आले आहेत.

युनिकोडात रेंडरींग आणि प्रमाणिकरणाचे इश्यूज शिल्लक आहेत नाहीत असे नाही. काही इश्यूज हे युनिकोडाचे नसून ऑपरेटींग सॉफ्टवेअर आणि/अथवा ब्राऊजरचे असू शकतात हे बर्‍याचदा ल़क्षात घेतले जात नाही. मुद्यांची गल्लत आणि सरमिसळ करत राहील्यामुळे, तर्कशुद्ध अभ्यासपुर्ण पद्धतशीर प्रमाणिकरणे करुन सार्वजनीक सहमती घडवून संबंधीत संस्थां आणि आस्थापनांना अधिकृतपणे कळवले न गेल्यामुळे अथवा पाठीमागे राहील्यामुळे विवीध प्रकारच्या त्रुटी शिल्लक असल्याचे बारकाईने पाहणार्‍यांना लक्षात येते.

काही मुद्दे रास्त असले तरीही मुद्यांची गल्लत आणि सरमिसळ करुन युनिकोड विरोधात लागू न पडणारे सरसकटीकरण बर्‍याचदा होताना दिसते.

अकिलिज's picture

6 Jul 2016 - 1:38 pm | अकिलिज

कालच अँड्रॉईडवरून iOS वरती शिफ्ट झालो. आल्या आल्या पहिलं काम, मराठी कळफलक चढवला.
अँड्रॉईडवर सॅमसंगचा मराठी कळफलक ५० अक्षरांचा होता. पुर्ण बाराखडीच समोर असल्यामूळे हातात बसला होता.

iOS वर आल्यावर पाहिलं तर ही काय अतरंगी भानगड. मग कळलं, ईथेही inscript.
आता शिकायलाच लागणार.
गोदरेजचा 'मतजल चवपन' तसा काळाच्या आडच आहे. अभ्या आणि शाम भागवत च्या अनुभवावरून तरी असं वाटतंय, की सोपा तर आहेच.

एक चांगलं झालं. सी-डॅकची मेहनत फळाला आलीय असं वाटलं. मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅपल सारखे मोठे उत्पादक जर inscript चा पर्याय देत असतील तर हा स्टॅन्डर्ड मराठी कळफलक बनू शकतो.