थाई स्वीट चिली सॉस

केडी's picture
केडी in पाककृती
3 May 2016 - 2:38 pm

Sweet Chilli Sauce

कोकोनट बियर ब्याटर श्रिम्प/प्रांन्स रेसिपीत लिहिलेल्या थाई स्वीट ग्रीन चिली सॉस ची रेसिपी इथे देत आहे

साहित्य
५ ते ६ हिरव्या मिरच्या, चिरून (लाल मिरच्या मिळाल्या तर उत्तम)
६ ते ८ लसूण पाकळ्या
१/४ कप व्हाइट व्हिनेगर
१/२ कप साखर
१/२ कप पाणी
१/२ चमचा मिठ
१ टेबलस्पून कॉर्न फ्लावर किंवा कॉर्न स्टार्च
२ टेबलस्पून पाणी

Ingredients

कृती
वरील साहित्यातील पहिले ६ जिन्नस (मिरच्या ते मीठ) मिक्सर मधून काढून घ्या, जराशी जाडसर भरड काढली तरी हरकत नाही. हे मिश्रण एका पँन मध्ये काढून घ्या. मध्यम आचेवर ते मिश्रण शिजवून घ्या. मिश्रणाला एक उकळी आली कि गॅस बारीक करून शिजवून घ्या (मिरच्या आणि लसणीचा कच्चट वास गेला पहिजे.)
२ टेबलस्पून पाणी आणि कॉर्न फ्लावर/स्टार्च एकत्र करून त्याची एक जाडसर पेस्ट तयार करून घ्या. हि पेस्ट पँन मध्ये घालून मिश्रण ढवळत राहा. मिश्रण दाट आणि सिरप सारखे झाले कि गॅस बंद करून मिश्रण थंड करून घ्या आणि स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बाटलीत किंवा बरणीत भरून ठेवा. हा सॉस फ्रीज मध्ये महिनाभर टिकून राहतो.

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

3 May 2016 - 2:41 pm | पिलीयन रायडर

छानच. प्रयत्न करुन बघेन.

विजय पुरोहित's picture

3 May 2016 - 2:47 pm | विजय पुरोहित

छानच!

अरिंजय's picture

3 May 2016 - 5:58 pm | अरिंजय

गृहमंत्र्यांना दाखवलीय. उद्या होईल बहुतेक.

...आणि चव आवडली का ते सांगा!

विवेकपटाईत's picture

3 May 2016 - 7:51 pm | विवेकपटाईत

रेसिपी आवडली, बघू प्रयत्न करून