काल ममता बॅनर्जींच्या त्रिणमूल काँग्रेसने विरोधीपक्षांना टिकेचे लक्ष्य बनवण्यासाठी काही छायाचित्रे आणि दोन व्हिडीओ त्यांच्या फेसबुकपानावरुन प्रसृत केले. त्यातील एक छायाचित्र - ज्यात भाजपाचे राजनाथ कम्युनीस्ट पक्षाच्या करात यांना लाडू खाऊ घालताना दाखवले - ते छायाचित्र बनावट असल्याचे निष्पन्न होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याने. संदर्भ छायाचित्र विवाद्य होऊन त्रिणमूलने वापस घेतल्याचे तर त्रिणमूलच्या विरोधी पक्षांनी विशेषतः कम्युनीस्टांनी कायदेशीर कारवाईची शक्यता नाकारता येत नसल्याचे म्हटले असावे.
ते मुद्दे प्रत्यक्ष न्यायालयापर्यंत पोहोचतील अथवा नाही हे सांगणे कठीण आणि पोहोचले तरी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचून अंतीम निकाल हाती येई पर्यंत नेमके पणाने काही निश्चितपणे सांगणे कठीण तरीही राजकीय बाजू गौण ठेऊन कायदे विषयक बाजू कश्या कश्या असू शकतील याचा या निमीत्ताने उहापोह करता आल्यास पहाणे हा धागा लेखाचा उद्देश्य आहे.
१) पहिला प्रश्न कॉपीराईट बद्दल येतो. छायाचित्रावर कॉपीराईट मालकांना क्रेडीट-श्रेय देणे नमुद करणे अभिप्रेत असते किमान या केस मध्ये असे श्रेय नमुद केलेले दिसत नाही.
२) टिका करण्यासाठी कॉपीराईटेड मटेरीअल वापरणे हा कॉपीराईट कायद्यात सन्मान्य अपवाद दिलेला वापर असू शकतो, त्रिणमूलच्या फेसबूक पानावर राहूल गांधींच्या भाषणांचे व्हिडीओ वापरुन केरळात काँग्रेस कम्युनीस्टांची कुस्ती तर पश्चिम बंगालात दोस्ती करत असल्याचा विरोधाभास दाखवून दिला आहे. टिकेसाठी वापरले आहे वस्तुस्थिती दाखवली आहे तेव्हा कॉपीराईट बद्दल केवळ मूळ छायाचित्राचे श्रेयनामांकन केले की कॉपीराईट आणि बदनामी विषयक प्रश्न रहात नाहीत.
३) इतर छायाचित्रे ज्यात सोनीया गांधी आणि मोदी व सिताराम येचूरी आणि अडवाणी भेटींची छायाचित्रे आहेत तिथेही छायाचित्रे टिकेसाठी वापरली आहे वस्तुस्थिती दाखवली आहे तेव्हा कॉपीराईट बद्दल केवळ मूळ छायाचित्राचे श्रेयनामांकन केले की कॉपीराईट आणि बदनामी विषयक प्रश्न रहात नाहीत.
४.१) आता प्रश्न रहातो मॉर्फ केलेल्या विवाद्य छायाचित्राचा. अभिव्यक्ती स्वातंत्र्य टिका करण्यासाठी वापरता येते, विडंबनासाठी वापरता येते, बदनामी करण्यासाठी वापरता येत नाही. मॉर्फ करण्याच्या आधीच्या मूळ छायाचित्राचा कॉपीराईट धारकाचे श्रेय आणि मॉर्फ करणार्या छायाचित्र संपादकाचे श्रेय नमुद केलेले नसणे हि त्रुटी आहेच.
४.२) छायाचित्र मॉर्फ करणार्या छायाचित्रकाराला मूळ छायाचित्र टिका करण्यासाठी अथवा विडंबन म्हणून मॉर्फ करवयाचे आहे समजा मॉर्फ करणार्या छायाचित्रकाराने मूळ छायाचित्रकारांचे श्रेयनामांकनही केले आहे. टिका करण्यासाठी अथवा विडंबन म्हणून मूळ छायाचित्र मॉर्फ करणे कायदेशीर दृष्ट्या -मी नैतीकतेची इथे चर्चा करत नाही- रास्त आहे किंवा नाही.
माझ्या व्यक्तिगत मते मॉर्फ केले छायाचित्र वस्तुस्थिती नसून कलाकारी कल्पना मात्र आहे असे सुस्पष्ट नमुद (क्लिअर) करत असेल तर त्याला त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तसेच कॉपीराईट अपवादांचा लाभ घेता यावयास हवा. छायाचित्र वस्तुस्थिती नाही खरे आहे असे भासवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला तर ती बदनामी ठरावी. अर्थात बहुधा असे विषय सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन निकाल येत नाहीत तो पर्यंत निश्चित सांगणे कठीण जाते.
प्रतिक्रिया
24 Apr 2016 - 12:41 pm | DEADPOOL
त्रून्मूलची काहीही फालतूगिरी चालू आहे!
26 Apr 2016 - 1:36 am | माहितगार
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गैरवापराचा हा एक प्रकार पुढे आला आहे. उत्तरप्रदेशातील समाजवादी सरकारवर असहिष्णू पोस्टरवर कारवाई करण्यासाठी दबाव आणण्या एवजी भाजपा नेत्यांना दैवत निंदेची पडली आहे. लोकांना कायदे कधी समजणार.
26 Apr 2016 - 5:47 pm | तात्या
मॉर्फ म्हणजे असे फोटो का ?
26 Apr 2016 - 10:07 pm | माहितगार
बरोबर, इंग्रजी विकिपीडियातील व्याख्या खालील प्रमाणे आहे.
हे करण्यासाथी कलात्मक स्वातंत्र्याची कक्षा काय असावी ? पुर्वी व्यंगचित्रकारीचि नैसर्गिक कला मर्यादीत लोकांकडे होती. आता सोफ्टवेअर मुळे हे सोपे झाले आहे. मी अधिकतम व्यक्तीस्वातंत्र्याच्या बाजूने आहे तरीही कोणातरी जिवीत व्यक्तीचे मुंडके कापल्याप्रमाणे दाखवणे ते चरित्र हननासाठि बनावट छायाचित्रे बनवणे यातील नैतीक सीमा रेषा आणि कायदेशीर सीमा रेषा कशा ठरवाव्यात ?