अनबॉक्सिंग सेनहायजर सी एक्स ३.०

मदनबाण's picture
मदनबाण in जनातलं, मनातलं
25 Mar 2016 - 8:30 pm

P1
माझा हा दुसरा सेनहायजर हेडफोन आहे,पहिला एचडी २०२ अनुभवला होता. हा अनुभवच मला इतका भावला की मी सी.एक्स ३.० घेण्याचा निर्णय घेतला.हे तर मूळ कारण झाले... अजुन इतर कारणही होती,जसे आधीचे स्कलकँन्डीचे हेडफोन्स बराच काळ वापरले आणि आता ते कधी बाद होतील याची काही टोटल लावता येणार नाही. ;)
एचडी २०२ अनुभव घेउन मला माझ्या कानाची सवय बदलणे काय ते कळले... आधी ऐकलेल गाणं पुन्हा वेगळं का भासतं ? मग आधी ऐकलेली गाणी परतं ऐकुन पाहिली. फरक समजल्यावर त्यातुन अर्थातच अधिक आनंद मिळाला ! :) P2
रोज नविन गाणी ऐकण्याचा प्रयत्न करणे आणि त्यातुन आनंद घेणे आणि तो इतरांना घेता यावा म्हणुन तो जी+ वर आणि इथे देण्याचा उध्योग मी वेळ मिळेल तसा करतच असतो. ;) आता परत या हेडफोनचा काय वेगळा आनंद मिळतो आणि हा अनुभव कसा वाटतो ते पहायचे.
P3
अपेक्षे प्रमाणे वेळेत डिलेव्हरी मिळाली... आता पॅकिंग उत्तम दिसते आहे, पण कंटेंन्ट बद्धल काय ?
X
P4
या पॅकिंग मध्ये एक जोडी सिलिकॉन टीपची दिसते आहे, त्याच बरोबर अजुन दोन { एक लाहान साईज, आणि एक लार्ज} टिप्स दिले आहेत. सध्या आहेत त्याच टिपने ऐकतो, लहान ट्राय मारुन पाहिली पण ती माझ्यासाठी योग्य वाटली नाहीत... या वेळी रेड कलर निवडला,तेव्हढच बदल...
आता हेडफोन काढुन पाहतो... आणि अर्थातच ऐकायला सुरुवात देखील करतो :)
P5
हे लिहिताना देखील अनुभव घेणे चालु होते... आणि एअर विविध भारतीवर लागलेल्या गुलदस्ता या कार्यक्रमातील खालील गाणं ऐकले. :)

अगदी वरवरचं हेडफोन बाबतं सांगायच म्हंटल तर आता तरी अनुभव चांगला वाटतो आहे, टिप्स जरा कानाला घट्ट वाटतं आहे, बराच काळ वापर करुन पाहिल्यावर खरं काय ते समजेल.

जाता जाता :- मी एअर विविध भारती खालील अ‍ॅपचा वापर करत ऐकत होतो. :-
All India Radio Live
तुम्ही ट्राय मारुन पहा... :)

तुमच्या फेडफोन्स रिलेटेड अनुभवासाठी हा धागा खुला आहे... :)

तंत्रप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

माझीही शॅम्पेन's picture

25 Mar 2016 - 8:37 pm | माझीही शॅम्पेन

काळानुसार पाहिल्यास आता निळ्या दातचा (ब्लू टुथ) चा जमाना आहे , चालता चालता / पळताना / प्रवास करताना
हळूहळू वायरचे हेड फोन नाहीसे होतील :)

नाना स्कॉच's picture

25 Mar 2016 - 9:46 pm | नाना स्कॉच

किंमत???

तर्राट जोकर's picture

25 Mar 2016 - 9:48 pm | तर्राट जोकर

ह्यातून ऐकतांना जे मूळ गाणे आहे त्याची काय क्वालिटी आहे त्याने फरक पडतो का? जसे ऑडियोचे वेगवेगळे फॉरमॅट(वेव, फ्लाक, एम्पीथ्री), एमबीमधे साइझ, विकतच्या सीडीवर, डाउनलोड केलेले, बिटरेट, इत्यादी.

ह्या महागड्या हेडफोन्सचा पुरेपुर उत्तम उपभोग घेण्यासाठी कोणते फॉरमॅट चांगले? व मूळ सिस्टीमचाही काही गुण-दोष झळकतो काय? जसे लॅपटोप किंवा पीसी किंवा फोनमधे असलेले ऑडीयोसिस्टीम इत्यादी.

कंजूस's picture

25 Mar 2016 - 10:20 pm | कंजूस

WAV format हवे.= lossless.

MP3, MP4, M4a = lossy.

लंबूटांग's picture

25 Mar 2016 - 10:25 pm | लंबूटांग

किती kbps चा बिटरेट आहे (ज्याचा एमबीमधे साईझशी सरळ सरळ संबंध असतो) त्याने फरक पडतो. जितका जास्त बिटरेट तितकी जास्त क्वालिटी असे ढोबळमानाने म्हणू शकतो. अर्थात इतरही बाबींवर अवलंबून असते. कोणता कंप्रेशन अल्गोरिदम वापरला आहे वगैरे.

मूळ सिस्टमचा गुणदोष झळकतोच. यासाठीच अगदी दर्दी असतात ते external amps वापरतात. http://lifehacker.com/5903575/unleash-your-headphones-full-potential-wit...
येथे काही माहिती मिळेल.

सद्ध्या बोसचे QC15 हे noise cancelling हेड्फोन्स वापरतो. बोस तसे मिडरेन्ज समजले जातात पण मला तरी भयंकर आवडतात.

तर्राट जोकर's picture

25 Mar 2016 - 10:30 pm | तर्राट जोकर

उत्तम माहिती. खूप धन्यवाद. :-)

मदनबाणसाहेब, चांगला धागा. अजून तांत्रिक माहितीची अपेक्षा आहे.

मदनबाण's picture

25 Mar 2016 - 11:24 pm | मदनबाण

@ तर्राट जोकर
लुंबूजीने छान उत्तर दिले आहे, मी शक्यतो व्हिबीआर २१० फॉरमॅट तर कधी सीबीआर १९२ हा फॉरमॅट वापरतो.दोन्हीचे स्त्रोत भिन्न आहेत.
मूळ सिस्टीमचाही काही गुण-दोष झळकतो काय? जसे लॅपटोप किंवा पीसी किंवा फोनमधे असलेले ऑडीयोसिस्टीम इत्यादी.
हो फरक पडतो,अगदी कुठल्या प्लेअरनी आणि कोणत्या सेटींग्सनी प्ले करता हे सुद्धा आल,शिवाय इक्विलायजर वापरण्यावर सुद्धा ऐकण्यात फरक पडतो.

@ रामपुरी
हो हा इन-इअरफोन आहे,{ Ear Canal }

@ माझीही शॅम्पेन
माझ्यासाठी ऐकायला किती मस्त येत ते जास्त महत्वाचं आहे, तसेच बजेट आणि माझा सोयीचा पाहतो.

हा इतका कॉस्टली असुन सुद्धा वायर्ड आहे. ;)

@ नानुडी
इथुन घेतला :- Sennheiser CX 3.00 Red In-Ear Canal Headphone

@ कंजूस मामा
आपला प्रतिसाद आवडला... सेनहायजर मला आवडला कारण त्याचे डिटेल्स आणि सुस्पष्टता देण्याची क्षमता. एअर मराठी वर कार्यक्रम चालु असताना मुख्य २ वक्त्यांच्या मागे चालले सुक्ष्म संभाषण देखील ऐकायला आले ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tooh Tooh Tooh Tooh... ;) :- Gori Tere Pyaar Mein

रामपुरी's picture

25 Mar 2016 - 9:58 pm | रामपुरी

हा तर इयरफोन आहे

नाना स्कॉच's picture

25 Mar 2016 - 10:00 pm | नाना स्कॉच

ऑल इंडिया रेडियो ऍप डेटा वर चालते काय?? म्हणजे बिल्ट इन रेडियो ऍप सारखे असते की ऐकताना डेटा जाळते??

सर्व लाइव रेडिओ टाइप अॅपस मिनीटाला साठ एमबीपर्यंत डेटा खाऊ शकतात.तुमच्याकडे स्ट्रिमींग होताहोताच डाउनलोड करणारे अॅप असेल तर मात्र ते गाणे पुन्हा मेमरी कार्डातून ओफलाइन ऐकता येईल.

बहुगुणी's picture

26 Mar 2016 - 2:06 am | बहुगुणी

मदनबाणः अन-बॉक्सिंग आवडलं. हौसेला मोल नाहीच, तेंव्हा श्रवणानंदासाठी शुभेच्छा!

अवांतरः @ कंजूसः असे स्ट्रिमींग होताहोताच डाउनलोड करणारे अ‍ॅंड्रॉईड अ‍ॅप्स कोणते आहेत? हंगामा सारखे रेडिओ अ‍ॅप चालू असतांना रेकॉर्डिंग करता येईल का?

कंजूस's picture

26 Mar 2016 - 7:06 am | कंजूस

नोकिया / माइक्रोसॅाफ्ट लुमियात " मिक्स रेडिओ" हे अॅप आहे त्यात नवीन गाणी टाकायचे ते डाऊनलोड करता येत असे.मदनबाणने यातूनच बरीच गाणी घेतली होती.हिंदी गाणी कमी इंग्रजी खूप होती.
# MIX RADIOचा सपोर्ट चार दिवसांपुर्वीच काढला आहे.
आणखी काही अॅप सापडली तर लिहितो.मी सरळ साउंड रेकॅार्डींग ,एफेम रेकॅार्डींग करून ( WAV ,MP4,MP3 ) काम सोपे केले आहे.फोनातला साउंड रेकॅार्डर चांगला आणि WAV format मध्ये काम करणारा असावा.शिवाय decibel level दाखवायला हवी.70dB ला काम चांगले होते.

मंदार कात्रे's picture

26 Mar 2016 - 8:06 am | मंदार कात्रे

ट्युन-इन प्रो या अ‍ॅप वर लाइव्ह एफ एम स्ट्रीमिंग रेकॉर्डर सुविधा आहे

apk marketवर प्रो ची फ्री (पायरेटेड) कॉपी उपलब्ध असेल

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Mar 2016 - 10:06 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मस्तं रे बाणा. चांगला चॉईस. सेनहैसर म्हणजे जब्राट आवाजाची क्वालिटी आणि लाँगॅटिव्हीटी. एंजोय. फक्तं तम्मा तम्मा ऐकु नका =))

" अगोदर ऐकलेले गाणे वेगळे का वाटते?"
ये हुई ना ब्बात!
या सगळ्या गोष्टीत बरेच शास्त्र दडलेले आहे.फ्रिक्वन्सी रिस्पॅान्स, हेडफोन्सचा इंपिडन्स ,नॅाइज वगैरे .शिवाय ज्या डिवाइसातून गाणे वाजवता त्यातूनही 100Hz पेक्षा कमी फ्रिक्वन्सीज सप्रेस ( दाबून टाकल्या असतील ) केल्या असतील तर भीमसेन जोशीचा आवाज बरोबर येणार नाही.हेडफोनातही ती खालची फ्रिक्वन्सी हवी.नुसते bass sound लिहितात पण कोणती फ्रिक्वन्सी ते लिहित नाहीत.बाकी वायर/ वायरलेस सोयीचा भाग आहे.जेवढी जोडाजोड तेवढी स्पष्टता कमी होते.

नवीन प्रकारचा धागा आवडला.

राघवेंद्र's picture

25 Mar 2016 - 10:16 pm | राघवेंद्र

धागा व प्रतिसाद आवडले. अजुन माहितीपुर्ण प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.

सेनहायजर हे नांवच आत्ता ऐकले. वापरून पहायला पाहिजे!
माझा वापर मुख्यतः प्रवासात असतो आणि कांही काळाने जॅक् पिन जवळ वायर तुटते. कारण सतत खिशात/बॅगेत फोन ठेवून गाणी ऐकणे.
नीलदंत प्रकारचा अमेरिकेतून मागवलेला हेडफोन माझ्या दोन्ही फोनांना चालला नाही. एक एलजी फोन इंग्लंडमधे घेतलेला आणि भारतातला सॅमसंग. दुकानदाराने कांही ष्टोर्या सांगून मदत केली नाहीय.

बाकी वर सांगितलेला बोस वगैरे कितक्याला पडतात आणि ऑन लाईन घ्यावेत का?

कंजूस's picture

26 Mar 2016 - 8:33 am | कंजूस

जॅक् पिन जवळ वायर तुटते.- जोडता येते.

मंदार कात्रे's picture

26 Mar 2016 - 8:09 am | मंदार कात्रे

सेनहायजर घ्यायचा विचार आहे बर्याच दिवसापासून , फक्त इयरप्लग घ्यावेत की ओव्हर-द-इयर याबाबतीत फायनल निर्णय अजून झालेला नाही

एच डी २०२ चा काय रिपोर्ट?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Mar 2016 - 9:20 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

माझे मागच्या वेळचे हेडफोन होते ते. सुंदर आहेत. घरी वापरणार असाल तर ओव्हर द इअर घ्या. बाहेर प्रवासात वापरायचा असेल तर इन इअर घ्या (गाडी चालवताना ऐकु नका म्हणजे झालं).

रच्याकने बजेट काय आहे? एच.डी. ४ सिरिज घ्या जमत असेल तर.

माझा एक रिकामपणचा उद्योग इथे दिल्याशिवाय राहवत नाही-
दुकानात वगैरे शक्य नाही परंतू आपल्याकडचे हेडफोन्स ( अथवा कोणतेही स्पिकर्स ) टेस्ट करता येतात.आपण ज्यास चांगले म्हणू शकतो त्यात दोन गोष्टी असतात आणि त्या कानांना जाणवतात.
१) मोठा आवाज येणे ,दबका न येणे
२) स्पष्टपणा.
सोपा उपाय - बाजारात इलेक्टरोनिक्स स्टोरात कंटिन्युअटी टेस्टर मिळतो तो आणावा.स्वस्त असतो आणि दोन बटन सेलवर चालतो.याच्यासहाय्याने हेडफोनच्या पिन्सना टच करावे सोडावे.चांगल्या स्पिकरमधून येणारी "खरखर" स्पष्ट आणि मोठी ऐकू येते.शिवाय नवीन असतानाच जॅकपिनांतल्या कोणत्या दोनांचे कनेक्शन कोणत्या बाजूला जोडले आहे,कॅामन पिन हे लिहून ठेवल्यास पुढे की वायर तुटली तरी पुन्हा खात्रीने जोडता येते.

टवाळ कार्टा's picture

26 Mar 2016 - 9:29 am | टवाळ कार्टा

भारी :)

खेडूत's picture

26 Mar 2016 - 10:45 am | खेडूत

:)
हे ठाऊक आहे, पण सॉलटर्मल्टेर, मल्टीमीटर वगैरे पुण्यात रहाते अन वायर परदेशात तुटते..!

मदनबाण's picture

26 Mar 2016 - 9:42 am | मदनबाण

@ कंजूस मामा
नोकिया / माइक्रोसॅाफ्ट लुमियात " मिक्स रेडिओ" हे अॅप आहे त्यात नवीन गाणी टाकायचे ते डाऊनलोड करता येत असे.मदनबाणने यातूनच बरीच गाणी घेतली होती.
नाही,माझ्यासाठी गाण्याचा मुख्य स्त्रोत तू-नळी आहे. अधुन मधुनच एफ एम ऐकणे होते. मी जो मोटोरोला जी- ३ वापरतो आहे त्यात बिल्टइन एफ आणि रेकॉरडिंग प्लेअर आहे { ज्याला इंटरनेटची गरज लागत नाही.} परंतु घरात तितकासा स्ट्राँग सिग्नल मिळत नाही. :( म्हणुनच ऑल इंडिया रेडियो लाईव्हचे अ‍ॅप वापरुन पाहतो आहे.

@ खेडूत काका
सेनहायजर हे नांवच आत्ता ऐकले. वापरून पहायला पाहिजे!
माझा वापर मुख्यतः प्रवासात असतो आणि कांही काळाने जॅक् पिन जवळ वायर तुटते. कारण सतत खिशात/बॅगेत फोन ठेवून गाणी ऐकणे.
सेनहायजर ही जर्मन आणि ऑडियो इंडस्ट्रीमध्ये नावाजलेली कंपनी असुन या कंपनीची स्थापना Dr. Fritz Sennheiser यांनी १९४५ साली केली. सी एक्स हा टँगल फ्री आहे. तुम्ही जर याची जँक पीन पाहिलीत तर ती एल शेप ची आहे आणि त्यामुळे फोन आणि प्लेअर्ससाठी सुद्धा ती अधिक सोयिस्कर आहे, शिवाय या जॅक पीन ला गोल्ड प्लेटींग आहे, ज्याचा परिणाम अर्थातच गाण्याच्या आउट पुट क्वालिटी मध्ये फरक पडण्यात होतो.

@ मंदार कात्रे
एच डी २०२ जबरदस्त आहे,मला तो ओव्हर द इअर बसतो. हा मी मुख्यत्वे माझ्या घरच्या डेस्कटॉप युजसाठी घेतला होता. याची वायर बर्‍यापैकी लांब आहे जे आधी नकोसे वाटले होते,परंतु माझ्या पीसी कॅबिनेटचा पुढचा ऑडियो पोर्ट बाद झाल्यावर केबिनेच्या मागच्या बाजुचा पोर्ट वापरण्यासाठी हीच लांब वायर कामाला आली. परफॉमन्स मख्खन आहे ! :) माझ्या पिल्लाला देखील मी हा ऐकाला देतो आणि तिला याचे वेड लावले. :)
तुम्ही कसे आणि कुठे गाणं ऐकण्याचे ठरवता त्यावर हेडफोन्स घ्यावेत.सध्या बराच काळ स्कलकॅन्डीचे इअरफोन्स मोबल्यावर ऐकल्यावर आता सी एक्स ३.० मोबल्यावरच ऐकुन पाहत आहे,प्रथम दर्शनी उत्तम वाटले.

@ बहुगुणी काका
आपल्या शुभेच्छांसाठी धन्यवाद ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- नाचो रे नाचो रे.... :- Jai Ho

भाऊंचे भाऊ's picture

26 Mar 2016 - 10:35 am | भाऊंचे भाऊ

मग काम केंव्हा करता ? मी गाणे लावले की कामात मन एकाग्र होत नाही अन फुकटचा जास्त वेळ जातो. शेवटी गाणी थांबवून काम उरकतो. हां प्रॉब्लम ओवरकम करायला हां इयरप्लग मदत करतो का ?

#जो मोटोरोला जी- ३ वापरतो आहे त्यात बिल्टइन एफ आणि रेकॉरडिंग आहे.
- कोणते फॅारमेट आहे सेविंगचे? m4a ?

# सध्या मी ब्लुटुथ स्पिकरच्या शोधात आहे आणि त्यात " इक््सटर्नल स्पिकर सॅाकेट असले पाहिजे हे मुख्य आहे म्हणजे माझ्याकडचा स्पिकर( १० वॅाट्स ) जोडता येईल.

मदनबाण's picture

26 Mar 2016 - 11:33 am | मदनबाण

@ भाऊंचे भाऊ
मी काम करताना गाणी ऐकत नाही,कामात जरा ब्रेक घेतला असेल तर एखाद दुसरे ऐकले तर ऐकतो... जास्त गाणी ऐकणे घरातच होते, ज्यासाठी मी एचडी २०२ घेतला होता.

@ कंजूस मामा
सेविंगचा फॉरमॅट एएसी आहे. ब्लुटुथ स्पिकरच्या भानगडीत अजुन पडलो नाही,त्या बद्धल काही माहिती नाही.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- नाचो रे नाचो रे.... :- Jai Ho