कोबी कोफ्ता करी ..

पियुशा's picture
पियुशा in पाककृती
11 Mar 2016 - 11:48 am

कोबी कोफ्ता करी ..
आमच्या घरात कोबी म्हटले कि सगळे तोंड वाकड करतात मला स्वत:ला कोबी फार आवडतो. पण मग कधी कधी इतराना आवडत नाही म्हणून कोबी घेण आपोपाप टाळल जात म्हणून नेटवर कोबीच्या वेगवेगळ्या रेसेपी धुंडाळून हि रेसेपी मिळाली तिच्यात मी थोडे फार बदल केले न बनवली सगळ्यांना खूप आवडली देखील, म्हणून आता हा लेखन प्रपंच
साहित्य : (कोफ्त्यासाठी )
१) बारीक चिरलेला कोबी -२ वाट्या.
२) २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून.
३) लाल तिखट - १ छोटा चमचा
४) बेसन - १ वाटी
५) मीठ चवीनुसार
६) तळण्यासाठी तेल
७) कोथीबीर चिरुन - २ चमचे
कृती : चिरलेल्या कोबीत सर्व साहित्य मिसळून थोड किंचित पाणी घालून घट्टसर कालवून त्याचे लहान लहान गोळे करून घ्या न थोडे चपटे ठेवा म्हणजे आतपर्यंत तळले जातील . तेल गरम करून मध्यम आचेवर सर्व कोफ्ते तांबूस लालसर तळून घ्या .
k
3
आता ग्रेवि बनवु ..
साहित्य : -
१) ४ मोठे tomato
२) १ हिरवी मिरची
३) लाल तिखट - २ छोटे चमचे.
४ ) धने पावडर - १ चमचा .
५) जिरे पावडर - १ चमचा .
६) गरम मसाला - २ चमचे ( हा होम मेड गरम असला आहे आमचा )
७) आल लसुण पेस्ट - १ चमचा.
८) मीठ चवीनुसार.
९) ३ मोठे चमचे तेल.
१० ) हळद - १ छोटा चमचा
कृती : tomato धुवून त्यात १ हिरवी मिरची घालून त्याची मिक्सीवर प्युरी करून घ्या , कढइत तेल तापवून त्यात जिरे , चिमुटभर हिंग ,अन हळद घाला , आता त्यात आधी लाल तिखट घालून घ्या ( याने ग्रेविचा रंग लाल राहतो ) मग tomato प्युरी घाला परतून परतून घ्या अगदी तेल सुटेपर्यंत , मग अनुक्रमे गरम मसाला , धना पावडर ,जिरे पावडर घाला हे करत असताना शेजारी थोड पाणी गरम करून घ्या . सर्व मसाले निट परतल्यावर त्यात चवीनुसार मीठ घाला न तुम्हाला जशी ग्रेवी हवी त्यानुसार गरम पाणी घाला ,थंड पाणी घालण्यापेक्षा गरम पाणी घातल्यामुळे ग्रेवीची चव टिकून राहते. आता ४-५ मिनिट ग्रेवी मंद आचेवर निट उकळून घेऊन त्यात तळलेले कोबीचे कोफ्ते घाला , बारीक चिरलेली कोथीबीर घालून सजवा यात कसुरी मेथी हि घालतात. आता २ मिनिटे वाफ काढा कोबी कोफ्ता करी चापण्यासाठी तयार आहे
e
यात जरा कोफ्ते विर्घळेत ;) पण चालतय ;)
l

* तुम्ही यात कोबी ऐवजी बटाटा / भोपळा / मेथी / तुमची आवडती कुठलीही आवडती भाजी वापरू शकता.

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

11 Mar 2016 - 11:51 am | अभ्या..

हाण तेच्या मारी. पिवडे.
झक्कास.
एकदम वंटास. नुसते ड्राय चखण्याला भारी. ;)
फुल्ल मार्क्स.

नाना स्कॉच's picture

11 Mar 2016 - 11:53 am | नाना स्कॉच

व्हेज मंचूरियन ह्या इंडियन चीनी डिश चे अस्सल देसी वर्शन आवडले! करून बघणार

सस्नेह's picture

11 Mar 2016 - 12:04 pm | सस्नेह

पिवशे, पाककुशल व्हायचं चांगलंच मनावर घेतलंयस वाट्टं ! काय न्यूज ?
बाकी कोफ्ते करीत शिरताच पाघळलेले दिसतात..!

प्रचेतस's picture

11 Mar 2016 - 12:36 pm | प्रचेतस

झक्कास एकदम.
पिवशी रॉक्स...

अत्रुप्त आत्मा's picture

11 Mar 2016 - 12:54 pm | अत्रुप्त आत्मा

जिल्बुचा http://freesmileyface.net/smiley/food/ready-to-eat-19.gif भुकवलस !

निशांत_खाडे's picture

11 Mar 2016 - 12:57 pm | निशांत_खाडे

जे बात.. जबराट झालंय!! फोटूतर एकसे एक दीसायलेत.
रच्याकने, कोफ्ते बनवताना ३/४ वाटी बेसन व १/४ वाटी कॉर्नफ्लोर घेतल्यास कोफ्ते विरघळणार नाहीत.

टिप्स बद्दल धन्स हो पुढल्या वेळी असच करून बघते :)

नूतन सावंत's picture

11 Mar 2016 - 2:45 pm | नूतन सावंत

सही,पियु,झकास दिसाहेत कोफ्ते.

सस्नेह's picture

11 Mar 2016 - 2:48 pm | सस्नेह

पिवशीला 'पियु' म्हणण्याचा हक्क राखीव असून तो अजून कोणत्याही मिपाकरास मिळालेला नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

हेल्लो, मी पण पियूच म्हणते तिला आणि म्हणणार! कोई आब्जेक्शन? =))

पियु, पियु तूस झालेंय तरी काय गो? भलतीच ना गो तू सुग्रण व्हावयास लागलीस! पण कोबी? नक्को!

नूतन सावंत's picture

11 Mar 2016 - 2:45 pm | नूतन सावंत

सही,पियु,झकास दिसाहेत कोफ्ते.

फोटो! बघुनच तोपासु.ते कोफ्ते नुसतेच उचलावेसे वाटताहेत.
मुली तु दिवसेंदिवस पाककुशल होत चालली आहेस.
तर मग...

फोटो! बघुनच तोपासु.ते कोफ्ते नुसतेच उचलावेसे वाटताहेत.
मुली तु दिवसेंदिवस पाककुशल होत चालली आहेस.
तर मग...

अभ्या..'s picture

11 Mar 2016 - 2:55 pm | अभ्या..

हा ना.
ही वाक्ये याची साक्ष आहेत चक्क.

वेगवेगळ्या रेसेपी धुंडाळून हि रेसेपी मिळाली तिच्यात मी थोडे फार बदल केले न बनवली

थोडे चपटे ठेवा म्हणजे आतपर्यंत तळले जातील

आधी लाल तिखट घालून घ्या ( याने ग्रेविचा रंग लाल राहतो )

थंड पाणी घालण्यापेक्षा गरम पाणी घातल्यामुळे ग्रेवीची चव टिकून राहते.

मधुरा देशपांडे's picture

11 Mar 2016 - 2:54 pm | मधुरा देशपांडे

झक्कास. फोटो एकदम तोंपासु.

अजया's picture

11 Mar 2016 - 4:02 pm | अजया

केवडा राॅक्स ;)
पाकृकुशल गृकृद अजून काय काय ...

भुमी's picture

11 Mar 2016 - 4:30 pm | भुमी

रंग एकदम तोंपासु

पियुशा, मस्त दिसतायत कोफ्ते. पसंत आहे मुलगी ष्टाईल रेसिपी!

अन्नू's picture

12 Mar 2016 - 12:15 am | अन्नू

एकावर एक रेशीपी फ्रि??!!!!

श्रीरंग_जोशी's picture

12 Mar 2016 - 12:20 am | श्रीरंग_जोशी

मलई कोफ्ता सोडून कोफ्त्याचे इतर प्रकार खूप आवडतात.

पाककौशल्याचे नवनवीन प्रयोग जोरात सुरु आहेत. आता सादरीकरणात सुधारणा अपेक्षित.

दिपक.कुवेत's picture

12 Mar 2016 - 11:57 am | दिपक.कुवेत

हे कोफ्ते ट्राय करायचे मनात होतेच आता नक्किच पानात उतरतील....

विवेकपटाईत's picture

12 Mar 2016 - 4:33 pm | विवेकपटाईत

कृती आवडली. कोफ्ते तसे मला आवडतातच, टमाटर टाकले असते तर आणखीन मजा आली असती (तूर्त आम्हा दिल्लीकरांना प्रत्येक ग्रेवीत टमाटर टाकण्याची सवय आहे). गेल्या महिन्यात आमच्या सौ गाजर आणि गोबी किसून असेच कोफ्ते बनविले होते, जाम आवडले.

आमच्या सौ गाजर आणि गोबी किसून असेच कोफ्ते बनविले होते,

स्वल्पविराम राह्यलाय की 'ने' राह्यलाय? रेसेपी भारीच ना पण. ;)

ओ विवेकजी ४ टमाटर टाकले आहेत तुम्ही वाचलं नै नीट !

सविता००१'s picture

12 Mar 2016 - 6:06 pm | सविता००१

झक्कास रेसिपी.
सुगरण झालीस की चक्क

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Mar 2016 - 6:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दोन्ही पाककृत्या आवडल्या. मस्त सांगुन पाहतो जमतं का आम्हाला. :)

>>>आमच्या घरात कोबी म्हटले कि सगळे तोंड वाकड करतात.
या वाक्यामुळे मी पाकृ वाचायला घेतली. या कोबीचा आणि त्या भेंडीची भाजी बनू शकते याचा शोध कोणी लावला त्याला भेटून एकदा धु धु धुवायचा आहे. पण, आपल्या कोबीच्या पाकृतीने त्याला मी क्षमा केलं आहे. :)

-दिलीप बिरुटे

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Mar 2016 - 6:32 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

aa

aaaaaaaa

ह्या सिर्यलींचे एपिसोड परत चालु होणारेत म्हणे =))

रच्याकने झक्कास रेसिपी. कोबी फक्तं पछडीमधुन खात असल्याने पास. :)!!!!!!!!!!!!!!!!!!

अत्रुप्त आत्मा's picture

12 Mar 2016 - 6:53 pm | अत्रुप्त आत्मा

त्यास पचडी असे म्हणतात!
धन्यवाद.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Mar 2016 - 6:58 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुम्हालाचं ठौक असणार. आम्ही ताटात वाढलं जातं ते निमुटपणे नं खाणार्‍या वर्गात मोडतो =))

अत्रुप्त आत्मा's picture

12 Mar 2016 - 7:15 pm | अत्रुप्त आत्मा

हातोडिमारात्मबंध-खुटुक्फटुक्ज्याकुब!
................http://www.easyfreesmileys.com/smileys/free-fighting-smileys-542.gif

कंजूस's picture

12 Mar 2016 - 8:48 pm | कंजूस

झकास लागते ही.फोटू छान.
कोबीचं रशियन सलाड नावाचा प्रकारही चांगला लागतो.
आणखी एक स्टफ्ट कॅबेज ( कोबीच्या पानात गु्ंडाळलेलं पंजाबी समोशात असते ते वाटाणे बटाट्याचं सारण भरून.) थोडं जून पान खपतं.

पिंगू's picture

12 Mar 2016 - 11:20 pm | पिंगू

वाव झक्कास रेशिपी..

पद्मावति's picture

12 Mar 2016 - 11:47 pm | पद्मावति

एकदम मस्तं दिसताहेत कोफ्ते. पाककृती आवडली.

अरे वा , खंग्री दिसतायेत कोफ्ते एकदम :D

नाखु's picture

14 Mar 2016 - 11:37 am | नाखु

आणि लेकीलाही कोबी खिलवण्याचा "राजेशाही" मार्ग दाखवल्याबद्दल आभार.
चांगली पाकृ आणि कप्तानाची (समर्पक मालीका चित्रांनी) धागा सजावट पुर्ण झाली.

कोबी देव्ष्टा बालक असलेला पालक नाखु

पैसा's picture

14 Mar 2016 - 11:41 am | पैसा

मस्त रेसिपी! कोथिंबिरीचं एकेक पान काढून सजावट करायचा पेशन्स आला का?

हासिनी's picture

14 Mar 2016 - 1:10 pm | हासिनी

रेसिपी मस्तय ग!! खायला केव्हा बोलवतेस? ;)

पियुशा .. बर्याच दिवसानी ग. मस्त एकदम .. निट वाचुन बघतो करुन