चुकलेल्या पक्ष्याची गोष्ट..

शैलेन्द्र's picture
शैलेन्द्र in भटकंती
1 Feb 2016 - 11:12 pm

माणूस चुकतो,

कधी अज्ञानाने चुकतो कधी अहंकाराने चुकतो, कधी गमतीत चुकतो तर कधी संगतीत चुकतो..

पण पक्षी, तेही चुकतात?

अशाच एका चुकलेल्या पक्षाची ही गोष्ट..

बार हेडेड गूस(पट्टकादंब) दर हिवाळ्यात मध्य आशिया किंवा त्यापलीकडून भारतात येतात. अत्यंत उंचावरून उडणारा हा देखणा पक्षी भारतात अनेक ठिकाणी आढळतो. पश्चिम महाराष्ट्रातील नेहमीची ठिकाणं म्हणजे भिगवण अन वीर जलाशय. विदर्भातही अनेक जलाशयात हा पक्षी उतरतो, साधारण 20-30 पक्षांचा एक असे अनेक थवे एकत्र असतात. अत्यंत जोमदार हालचालींसह जोरदार उड्डाण हे या पक्षाचे वैशिष्ट्य. अनेकदा एवरेस्ट ओलांडून उडताना या पक्षांना गिर्यारोहकांनी पाहिलंय असं म्हणतात.

या वर्षीही हे पक्षी भिगवणला आले अन त्यांच्या मागोमाग पक्षीप्रेमीही तिथे पोचले.भिगवण जवळच्या कुंभारगावमधे संदीप नागरे नावाचा एक पक्षीप्रेमी आहे. भिगवणाला येणाऱ्या पर्यटकांना मार्गदर्शन करणे, निवारा अन जेवणखाण, तसेच बोटीची सोय करणे हा त्याचा व्यवसाय. त्याला या पट्टकादंबाच्या घोळक्यात एक वेगळाच पक्षी 2-3 वेळा दिसला. सुरवातीला त्याला वाटलं की हा यांच्यातलाच चिखलात माखलेला एखादा पक्षी आहे,पण वारंवार त्याला पाहिल्यावर त्याचा वेगळेपणा लपून राहिला नाही, तो होता व्हाईट फ्रँटेड गूस (मराठीत श्वेतचर्या बदक म्हणूयात)...

हे पक्षी कधीतरीच चुकुन भारतात येतात, यांचा खरा अधिवास युरोप अन मध्य आशियात. पट्टकदंबाच्या घोळक्यात त्यांच्याबरोबर उडताना एखादा श्वेतचर्या त्यांच्या मागोमाग चुकून इकडे येत असावा.

ह्या पक्षाच्या आगमनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली अन भिगवणला आधीच असलेली गर्दी अजून वाढली. फरक इतकाच पडला की या वेळी गर्दीचा केंद्रबिंदू कुंभारगाव होता.

माझे जेष्ठ पक्षीप्रेमी मित्र संजय कुलकर्णी यांच्याबरोबर हा पक्षी बघायला जायचं ठरलं, शनिवारी संध्याकाळी डोंबिवलीतून निघून रात्री कुंभारगाव गाठायचं, रविवारी संध्याकाळपर्यंत पक्षी बघून परत डोंबिवली.. असा फुल्ल प्रूफ प्लॅन ठरला.

शनिवारी डोम्बिवलीतून निघायला 6 30- 7 झाले, 9 30 ला पुणे ओलांडून सोलापूर रस्ता पकडला, जेवायचं कुठे हा प्रश्न होता आणि थोडं हटके खायची इच्छा होती त्यामुळे रस्त्यात दिसणाऱ्या एकेका धाब्यावर काट मारत आम्ही सुसाट पुढे गेलो. घड्याळाचा काटा पुढे सरकत होता आणि आमचा चोखंदळपणा वाढत होता. कुरकुम गेलं, चौफुला गेला तरी मनासारखं हॉटेल मिळेना आणि आमचा वेगही कमी होईना.

शेवटी एका क्षणी आमच्या लक्षात आलं की आम्ही भिगवण ओलांडून 10 km पुढे आलोय, नवीन हाय वे आणि रात्रीमुळे गोंधळ झाला होता, रात्रीचे 11 30 झाले होते आणि आता आम्हाला जेवायला हॉटेल शोधायच होतं, माज अंगाशी आला होता..
सगळे हॉटेलवाले अब मेरी बारी असं सांगत शेटर ओढून झोपले होते.

बऱ्याच प्रयत्नांनी एक मच्छी खानावळ उघडी मिळाली, चीलापी नावाचा मासा मिळतो भिगवनच्या जलाशयात , खानावळवाल्याने बनवलाहि चांगला होता, भूकही चांगली लागली होती, थंडीही चांगलीच होती, एकंदर सगळ चांगल झालं ..
जेवून कुंभारगावाच्या दिशेने निघालो , दोन्ही बाजूला दाट उसाची शेती, मधून संपूर्ण निर्मनुष्य रस्ता, जवळ जवळ पायवाटच..

आणि अचानक हा दिसला , मराठीत रातवा , इंग्रजीत NIGHT JAR

Night Jar

गाडीच्या दिव्याला बुजून एका ठिकाणी शांत बसला, मग काय, टिपला क्यामेरयाने

तिथून निघालो, कुंभार गावात पोचलो , २ वाजले होते, आता आला झोपायचा प्रश्न , संदीप नागरेला इतक्या रात्री उठवणे प्रशस्त वाटत नव्हते, गावच मंदिर सुरेख वाटलं, मोकळा स्वच्छ सभामंडप, स्लीपिंग ब्येग काढली आणि नीट झोपून घेतलं.

पहाटे ४-४ ३० पासूनच मंदिरात एक दोन जण यायला सुरवात झाली, मग उठलो आणि एक चक्कर मारली, प्रसन्न पहात होती, नुकताच सूर्य उजवीकडे वर चढायला लागला होता.

sunrise

संदीपच्या घरी गेलो चहा घेतला, फ्रेश झालो.

आता मिशन पक्षीदर्शन

तळ्याकाठी गेलो आणी एकेक पक्षी टिपायला सुरवात केली..

Grey Heron

Gull With Fish catch

mirror

Painted stork

Painted Stork again

Grey Heron

Diff Angle

Gull

1

Bar Headed Goose in Flight

इतर सगळे होते, मागावर आलो होतो त्याचा पत्ता नव्हता .. त्याला शोधायला पट्टकादंबांचा थवा शोधायला हवा, संदीपची नाव घेतली आणी निघालो त्याच्या मागावर , पाण्याने वेढलेल्या एकेका बेटाला देत..

थोड्याच वेळात एक वाईट बातमी कळली, काही अतिउत्साही पर्यटक नेमके हा थवा उतरला होता त्या बेटावर गेले आणि बावचळून सगळे पक्षी उडाले. बरं हा काही कबुतरांचा थवा नव्हे की या गच्चीतुन उडाला आणि तिकडे जावून बसला, एकदा उडाले कि काही किलोमीटर लांब जातात हे पक्षी.. थोडक्यात सकाळ वाया गेली होती, डिक्सळच्या बाजूला चक्कर मारायची ठरवली.

गाडी काढली, भिगवण गाठलं, डिझेल टाकलं, थोडी पोटपूजा केली, डिक्सळच्या बाजूला गेलो..

पक्षी तर नाही पण दुष्काळ दिसला, उजनी जलाशय 50% रिकामा आहे, उन्हाळा कसा निघणार काय माहीत.

परत आलो, झोप येत होती, स्लीपिंग बॅग अंथरून सरळ झाडाखाली ताणून दिली, साडेतीन वाजता परत जलाशयाकडे गेलो आणि बोटीत बसलो, सकाळच्याच बेटावर पुन्हा आलो

आणि तो दिसला..

White fronted Goose

Bar headed goose with white fronted goose

BHG WHG

मला तो फारच केविलवाणा वाटला, आपल्या जोडीदारापासून हजारो किमी दूर, एकटा.
अचानक मनावर एक मळभ आले .

In Flight

मग पट्टकादंबांचेही मनोसोक्त फोटो घेतले

Bar headed Goose

BHG

BHG

पलीकडच्या बाजूला पेंटेड स्टोर्क गोळा होते

Painted Stork

अचानक आमच्या नावाड्याला फोन आला की ऒस्प्रे त्याच्या नेहमीच्या जागी विश्रांतीला आलाय, मग निघालो तिकडे

Osprey

Osprey

Osprey

Osprey

परतीच्या प्रवासाला लागलो,

Sunset

सुर्य बुडत होता, पाण्यात वितळत होता

Sunset
काही छान आठवणी घेवून डोम्बिवलीचा रस्ता पकडला..

प्रतिक्रिया

शैलेन्द्र's picture

1 Feb 2016 - 11:18 pm | शैलेन्द्र

कोणी फोटो ऍडजस्ट करून देईल का, गंडलेत ते..

पैसा's picture

1 Feb 2016 - 11:46 pm | पैसा

फोटो शेअरिंगचा प्रॉब्लेम आहे. पब्लिक शेअर कर. फोटो वर राईट क्लिक केलं तर लॉग इन स्क्रीनला जाते आहे.

शैलेन्द्र's picture

2 Feb 2016 - 12:14 am | शैलेन्द्र
कंजूस's picture

2 Feb 2016 - 5:10 am | कंजूस

फक्त Osprey चे दोन फोटो दिसताहेत.

मोदक's picture

2 Feb 2016 - 7:58 am | मोदक

फोटो दिसत नाहीयेत.

बाकी आम्ही कुंभारगांवला २७ जानेवारीला भेट दिली, संदिपच्याच होडीतून पक्षीनिरीक्षण केले, स्पूनबिल, फ्लेमिंगो आणि बरेच वेगवेगळे पक्षी पाहिले (मला पक्ष्यांची नावे लक्षात राहत नाहीत)

तुमची परवानगी असेल तर फोटो टाकतो.

शैलेन्द्र's picture

2 Feb 2016 - 1:45 pm | शैलेन्द्र

टाका ना, मी कोण परवानगी देणार

फोटो दिसत नाहीत. मलाही दोनच पक्षी दिसताहेत कंजूसकाकांसारखे.

यशोधरा's picture

2 Feb 2016 - 9:14 am | यशोधरा

फोटो दिसत नाहीयेत.

पक्षाची ऐवजी पक्ष्याची असं करा..

शैलेन्द्र's picture

2 Feb 2016 - 1:46 pm | शैलेन्द्र

धन्यवाद, सुधारणा केलीय

शैलेन्द्र's picture

2 Feb 2016 - 3:05 pm | शैलेन्द्र

धन्यवाद, सुधारणा केलीय

छान फोटो आहेत दोन्ही हि. बाकीचे दुरुस्त करा संपादन मध्ये जाऊन

पैसा's picture

2 Feb 2016 - 11:34 am | पैसा

सुंदर फोटो! असे चुकार पक्षी दुसर्‍या कळपातून चुकून येतात, पण तेही इतके लांब उडून येऊ शकतात असा त्याचा अर्थ ना!

शैलेन्द्र's picture

2 Feb 2016 - 1:42 pm | शैलेन्द्र

बरोबर,पण त्यात जरा धोका असतो, अर्ध्या वाटेवर थकले तर

प्रचेतस's picture

2 Feb 2016 - 11:43 am | प्रचेतस

क ड क.

एकापेक्षा एक सरस फोटो.

नाखु's picture

2 Feb 2016 - 12:16 pm | नाखु

अशेच म्हणतो

पद्मावति's picture

2 Feb 2016 - 12:18 pm | पद्मावति

मस्तं लेख. फोटो फारच छान आहेत. अप्रतिम.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Feb 2016 - 1:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

भन्नाट आहेत सगळे फोटो !

पिलीयन रायडर's picture

2 Feb 2016 - 1:48 pm | पिलीयन रायडर

मस्त फोटो!!! वृतांत आवडला!

त्या एकट्या पक्ष्यासाठी वाईट वाटले. घेईल तो इथेही जमवुन.. वरी नॉट!

मस्त फोटो आणि वृत्तांत.
सगळ्यांबरोबर जमवून घेईल तर नाही पडायचा एकटा!

शरभ's picture

2 Feb 2016 - 2:12 pm | शरभ

खूप छान.

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 Feb 2016 - 3:23 pm | राजेंद्र मेहेंदळे

सुपर्ब फोटो आणि मस्त वृत्तांत!! भिगवणला एकदा जायलाच पाहिजे

स्पा's picture

2 Feb 2016 - 3:30 pm | स्पा

जबराट, हाय क्लास फोटो

आता दिसले फोटो.क्रमांक टाका .अजून क्लोजप हवेत. नांदूरमाध्यमेश्वरही करा.

अन्नू's picture

2 Feb 2016 - 3:35 pm | अन्नू

मस्त फोटू आलेत.

मास्टरमाईन्ड's picture

2 Feb 2016 - 4:21 pm | मास्टरमाईन्ड

छानच काढलेयत फोटो.