अँड्राईड डिव्हाईस मॅनेजरने मोबाईल संगणकावरुन पासवर्ड देऊन लॉक केला, पण पासवर्ड टाकताना मागे मराठी युनिकोड लेआऊट सुरु असल्याने पासवर्ड युनिकोड मध्ये टाकला गेला. आता पासवर्ड मोबाईलवरुन टंकताना त्यातील एक अक्षर मोबाईलच्या किपॅडवरुन टाईपच होत नाही (ते अक्षर Shift + # असे आहे) त्यामुळे मोबाईल अनलॉक होत नाही. सदर पासवर्ड मोबाईलला एसएमएस ने पाठवून बफरमध्ये कॉपी करण्याचा प्रयत्न केला पण तसे होत नाहियं, मोबाईलच्या क्लिपबोर्डमध्येही टाकण्याचा प्रयत्न केला पण तरीही पासवर्ड अनलॉक स्क्रीनवर येत नाही. एक्स्टर्नल ओटीजी केबलने किबोर्ड जोडला तर तो फक्त इंग्लिश 26 कॅरॅक्टर किबोर्ड घेतो. मिपावरील अनुभवी मंडळींना यावर काही उपाय माहिती आहे का?
शेवटचा पर्याय मोबाईल फॅक्टरी रिसेट करणे हा आहे पण त्याने सगळा डेटा जातोय. अँड्राईड डिव्हाईस मॅनेजरच्या सपोर्टला फिडबॅक ई-मेल केला आहे पण त्याचे उत्तर येईलसे वाटत नाही. कोणाकडे काही उपाय आहे का?
प्रतिक्रिया
29 Jan 2016 - 11:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उत्तम उपाय. सुपर ब्याकप प्रो ने कॉंटेक्ट, अप्लिकेशन, फोन लॉग, एसेमस ब्याकप घ्यावा असे वाटते.फोन रुट असेल तर टीटानियम ब्याकप तर फस्क्लास असे वाटते.
-दिलीप बिरुटे
29 Jan 2016 - 8:06 pm | जव्हेरगंज
मुळात स्क्रीनच लॉक आहे तर ब्याकप वगैरे घेणार कसे?
29 Jan 2016 - 12:29 pm | राजकुमार१२३४५६
आपला play store चा जो एमैल आहे त्याच एमैल ने पीसी वरून लॉग इन करा.
आणि android device maneger मध्ये जावा. आणि परत लॉक वर क्लीच्क करून
password सेट करा.
पण मोबिले वर परिणाम होण्यासाठी त्याच्या वर इंटरनेट चालू असू द्या. पहिलेच चालू असेल तर उत्तम.
आणि नवीन password टाकून lock खोला
29 Jan 2016 - 2:01 pm | सांश्रय
मायबोलीवरील -हितेश- यांनी दिलेल्या http://trendblog.net/how-to-bypass-android-phone-lock-screen-pattern-pin... या लिंकमधील सॅमसंग फाईंड माय मोबाईलमधील - अनलॉक माय स्क्रीनने मोबाईल अनलॉक झाला. कोणाला माहिती हवी असल्यास उपयोग होईल म्हणून येथे संदर्भ देत आहे.
29 Jan 2016 - 7:54 pm | भाते
'मदत / माहिती हवी आहे' चा आणखी एक धागा. छान. बाकी चालु द्या.
29 Jan 2016 - 8:12 pm | जव्हेरगंज
मी एकदा केलेला ऊपाय:
मोबाईल रिस्टार्ट करा. अॉन झाल्या झाल्या स्क्रीन लॉक होत नसते ती पाच दहा सेकंदानी आपोआप लॉक होते . याच पाच दहा सेकंदामध्ये ते ' अँड्राईड डिव्हाईस मॅनेजर' नावाचे app uninstall करा.
बघा ट्राय करुन . फिडबँक कळवा!
29 Jan 2016 - 8:23 pm | सनईचौघडा
पासवर्ड ऐवजी १ते ५ पिन क्रमंक टाकुन पहा कधी कधी काम होते.
29 Jan 2016 - 8:59 pm | मम्बाजी सर्वज्ञ
आयला हे उपाय डेंजर आहेत! सरळ सरळ सिक्युरिटी बाय पास करता येते कि. माझा स्वतःचा अन्द्रोइद नाही पण हे खरेच असे करून चालते? १ ते ५ आकडे आणि अप्लिकेशन काढून टाकणे वगरे?
29 Jan 2016 - 11:08 pm | गामा पैलवान
सांश्रय,
तुमच्या फोनला sh वा ssh कनेक्शन मिळते आहे का? पीसी वरून टेलनेट वा पुटी वा तत्सम प्रकार वापरून? sh/ssh च्या सहाय्याने पीसीवरून लॉगिन करता येते. त्यामुळे आवश्यक ते अक्षर टंकण्यास अडचण येऊ नये. (मी आंडराड कधी वापरली नाही. आयोएसमध्ये अशी सोय असल्याने बहुधा आंडराड मध्येही तीच सुविधा असावी असा कयास आहे.)
आ.न.,
-गा.पै.
30 Jan 2016 - 10:25 am | लाडू.
जसे आधी lock केले आहे तसेच परत करा. पासवर्ड बदला आणि आता unicode बंद ठेवा