काही शब्द अनाथ बालकांसाठी

माहीराज's picture
माहीराज in काथ्याकूट
2 Jan 2016 - 11:16 am
गाभा: 

कोण पालक या अजाण बालकांचा  ..

या दिनकराच्या लख्ख प्रकाशाने उजळलेल्या अथांग सभागृहात अचानक कुट्ट काळोख पडावा असा अंधकार या निरागस जीवाच्या नशीबी का यावा? काय चुक आहे यांची?
हे ईश्वरा, परमेश्वरा, ही सारी तुझीच लेकरं तरी एकाच्या मुखात तुप रोटी आणि दुसरा उपाशी पोटी असा भेदभाव का ? आणि कशासाठी?
एखाद्या बीजाला अंकुर फूटतो तसा एखादा निरागस जीव जन्माला येतो.पण डोळ्यांना स्वप्न दिसण्याआधीच त्याला कुठल्या तरी कचऱ्याच्या डब्यात किंवा उकिरड्यावर फेकलं जातं, का? आपल्या नाजुक पायावर उभं राहण्याआधीच त्याच्या पायात या फुटक्या नशिबाच्या बेड्या का घातल्या जातात?

जन्म आणि मरण यांच्यातला प्रवास म्हणजे जीवन.. पण यांनी हे जीवन कसं जगावं?  कोणाकडे पाहून जगावं? कोणाला माऊली म्हणावं? कोणाच्या कुशीत शिरून रडावं हसावं? कोणाकडे हट्ट करावा आणि कोणाला सांगावं की भुक लागली आहे,जेवायला दे!

आज काळाने मानवतेवर असे काही घाव घातलेय की प्रत्यक्ष स्वर्गासारख्या वाटणार्‍या या दुनियेत या अजाण बालकांना आपलं म्हणणार कुणीच उरलं नाही ?

एक कळकळीची विनंती आहे तुला की देवा,परमेश्वरा,करूणाकरा जरी मला स्वार्थाचा ध्यास असला तरी आधी त्यांना सुखाचा घास दे .. माझी झोळी रिकामी राहीली तरी चालेल पण त्या जीवाला दोन वेळची पोळी दे..
जसा माझ्या मनात तुझा आदर तसा त्या जीवाला तुझ्या मायेचा पदर दे..

प्रतिक्रिया

जे वाटले ते निखळ मनाने लिहीले .. आशा आहे की किमान या बालकांना आपला आशिर्वाद मिळावा.

लीना घोसाळ्कर's picture

6 Jan 2016 - 4:14 pm | लीना घोसाळ्कर

माहीराज.....

कोणाकडे पाहून जगावं? कोणाला माऊली म्हणावं? कोणाच्या कुशीत शिरून रडावं हसावं? कोणाकडे हट्ट करावा आणि कोणाला सांगावं की भुक लागली आहे,जेवायला दे!...

Jenva jenva hya vishayacha vichar karte tenvha tenvha hech sagle prashna manaat yetat.....