व्यथा एका कठपुतळी राजाची

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
19 Dec 2015 - 9:27 am

कठपुतळीचा खेळ सर्वांनाच आवडतो. मलाहि आवडतो. विशेषकरून राक्षसाच्या तावडीतून सुंदर राजकुमारीची सुटका करणारा राजकुमार. हा खेळ बघताना सर्व खरेच वाटायचे. स्वप्नात हरवून जायचो. असे वाटायचे, राजकुमारीची सुटका करण्यासाठी मीच त्या राक्षसाची युद्ध करतो आहे. पण कधी-कधी जोरात वारा आला कि परदा हवेत उडायचा आणि कठपुतलीनाचविणार्याचे हात दिसायचे. क्षणात स्वप्नभंग व्हायचे, हे काही खर नाही, याची जाणीव व्हायची.

एकदा भरपूर जनता जमली कि कठपुतलीचा खेळ दाखविणारे सरकारी धोरणाचा हि प्रचार करायचे. कथा नेहमीचीच, राजा आपल्या प्रधानाच्या सोबत जनतेचे कष्ट दूर करण्यासाठी घोड्यावरून राज्याचा दौरा करायला निघतो. प्रजेला कष्ट देणार्यांना चोर, डाकू, तस्कर, काळाबाजार करणार्यांना धडा शिकवितो. सर्वत्र आनंदी आनंद. लोक हि टाळ्यावाजवूनराजाची प्रशंसा करतात. खेळ संपतो.

एकदा असाच खेळ सुरु होता. पांढरे शुभ्र स्वच्छ वस्त्र धारण करून, पांढर्या शुभ्रघोड्यावर स्वार इमानी राजा मंचावर अवतारला. येताच त्याने आरोळी ठोकली, प्रधानजी कुठे आहात. अचानक, काळ्या घोड्यावर स्वार एक काळाकुट्ट माणूस मंचावर प्रगटला. राजाने विचारले, कोण रे तू, आणि एवढा काळा का.? लोक तुला पाहून घाबरतील. त्याने राजाला मुजरा करीत म्हंटले, महाराज, मी तुमचा प्रधान. पूर्वी मी असा काळा नव्हतो. काळ्याकुट्ट अमावस्याच्या रात्रीत मी काळ्या लक्ष्मीची कठोर अघोरी उपासना केली. काळ्या लक्ष्मीची कृपा मजवर झाली.त्यामुळे मी असा काळा आहे. मला आपल्यासोबत राज्याच्या दौऱ्यावर घेऊन चला, काळ्या लक्ष्मीची कृपा तुमच्यावर हि होईल. त्याचे बोलणे ऐकून, राजाची तळपायाची आग मस्तकात गेली. या दुष्ट माणसाला मंचावरून खाली फेकून द्यावे, पाहिजे, असे राजाला वाटले. पण राजाने असे काहीही केले नाही. माणसाच्या हातांच्या तालावर नाचणे, हेच त्याच्या नशीबात होते. तेवढ्यात संगीत सुरु झाले, घोड्यांच्या टापा आणि माणसाचा आवाज गुंजला, आधीच उशीर झाला आहे, चला प्रधानजी निघू या, टप टप, दुड दुड करत राजा काळ्याकुट्ट प्रधानासोबत दौर्यावर निघाला, प्रजेच्या कल्याणासाठी ????

बालकथाआस्वाद

प्रतिक्रिया

कैलासवासी सोन्याबापु's picture

19 Dec 2015 - 11:12 am | कैलासवासी सोन्याबापु

रूपक छान आहे पण संदर्भटोटल लागली नाही, जरा विस्कटुन सांगा

-बाप्या

नितिन थत्ते's picture

19 Dec 2015 - 11:26 am | नितिन थत्ते

निवडणूक दीड वर्षांपूर्वी संपली. पण हे रूपक सध्याच्या राजाविषयी असेल तर ठाऊक नाही.

विवेकपटाईत's picture

19 Dec 2015 - 6:11 pm | विवेकपटाईत

इमानदार राजा कुठे आहे. माझ्या माहिती प्रमाणे देशात एकच व्यक्ती इमानदार आहे ज्याचा जवळ इमानदारीचे प्रमाणपत्र वाटण्याचा कापी राईट आहे.
'ज्याचावर डाग होते असा प्रधान सचिव कुणी ठेवला. का ठेवावा लागला, स्वच्छ पांढर्याशुभ्र बिनादाग वाला त्याला का नाही सापडला. काय मजबुरी होती. किंवा तो हि सर्वशक्तिमान हातांच्या तालावर नाचणारच निघाला.

एस's picture

19 Dec 2015 - 6:42 pm | एस

रूपक आवडले.

कैलासवासी सोन्याबापु's picture

19 Dec 2015 - 7:43 pm | कैलासवासी सोन्याबापु

ओ!! ते होय!! चालू दे चालू दे, जमल्यास कधीतरी मसर्रत आलम नामे देशभक्तावर ही लिहा सर, पीडीपी नामे आपल्या सख्ख्या देशभक्त पक्षाबद्दल सुद्धा ! "आपलं ठेवायचं झाकून" नामे एक सज्जड़ मराठी रूपक अन म्हण आठवली होती पण ते चाय से केटली गरम मॅटर झाले असते म्हणून मोह आवरतो,

बाकी, दिल्लीवालों को उनके कर्मो की जन्मजन्मांतर की सजाएँ मिल रही है उसपर हम बाहरी नाचीज क्या बोलेंगे!

मोगा's picture

20 Dec 2015 - 9:35 pm | मोगा

दोन वर्ष झाली . नवा राजा आला. तरी क्ठपुतळ्या राजाची अजुन आठवण येते !

अत्रुप्त आत्मा's picture

21 Dec 2015 - 8:26 am | अत्रुप्त आत्मा

छान लेखन

अत्रुप्त आत्मा's picture

21 Dec 2015 - 8:26 am | अत्रुप्त आत्मा

छान लेखन