मामू
.......
गोष्ट जुनी आहे..
साधारण ६८-६९ साल असेल..
मी ईंजीनीअर झालो अन एका छोट्या कारखान्यात नोकरीला लागलो
"ट्रेनी ईंजिनिअर" म्हणुन
काळ जुना ..रहदारी पण रस्त्यावर तुरळक असायची. कारखाना गावाबाहेर..
मी आपला सायकल हाफत हापत कामाला जायचो..
कारखाना बाल्यावस्थेत होता साधारण स्टाफ ७-८ व कामगार १२-१५ एव्हढाच पसारा होता..
माझ ट्रेनिंग सुरु झाले टर्निंग ग्रईडीग मिलिंग हिट ट्रीटमेन्ट आदी विभागात
कामगाराशी ओळख होत होति..
कारखान्यात "महंमद कुरेशी" नावाचा कामगार होता..
त्याचे व माझे खास ट्युनिंग जमले..
सारे जण त्याला मामू म्हणत..तो व मी समवयस्क होतो
वास्तविक मुसलमान समाजात वयस्कर लोकाना मामू म्हणण्याची रित आहे..पण सारे जण याला मामू म्हणत व मी पण..
मामू फारसा शिकलेला नव्हता पण त्याला टेक्निकल ऍक्युमन व समज खुप होति..
मामू म्हणजे मजेशिर दंगेखोर कामगार होता..ह्याची छेड काढ..त्याची फिरकी घे असे त्याचे फावल्या वेळात उद्योग चालायचे.
कारखान्यास कॅंटिन नव्हते..बाजुला नुक्कड वर एका केरळ्याचे "उपाला टपरी कॅन्टीन" होते
तिथे चहा बिस्किटे..वडा भजी चिक्क्या गोळ्या तंबाखु शिग्रेट्ची पाकिटे आदी मीळत असत..
प्रत्येकाची खाते वहि असायची पगार झाला कि बिल चुकति करायची..
मामू मात्र ह्याच्या कडुन चहा उकळ त्याच्या कडुन सिगारेट असे त्याचे उप्द्व्याप चालु असायचे..
त्या काळात सिनेमा रेडिओ हिच करमणुकिची साधने असायची.
मामू ची "शर्मीला टागोर" नटी फेव्हरिट होति..त्या काळात लहान मुलांच्या पत्याच्या क्याट च्या आकाराचे नट नट्यांचे फोटो मीळायचे.
मामू च्या पाकिटात शर्मीलाचा अनुपमा सिनेमातला सोज्वळ फोटो होता..
तो फोटो त्याला फार आवडायचा...
कारखान्यात गेट वर "नरसैय्या" नावाचा वॉचमन होता..नरसैया म्हणजे पात्र होते बावळट मुद्रा.. हिंदी जेमतेम ..पण केवळ "प्रामाणीकपणा" या गुणावर म्यानेजमेंट खुष होति..व त्याची नोकरी चालु होति...
पुढे कारखान्यात रात्रपाळी करायचे ठरले..
हे कळताच नरसैयाने आपला गाववाला "भिमैय्या" ला बोलावले व नोकरित वॉचमन म्हणुन चिकटवुन दिले..
"भिमैय्या" पण एक पात्र होते १८-१९ वर्षाचा मुलगा थोडेफार हिंदी येत होते..गावातुन शहरात येण्याचा हा त्याचा पहिलाच प्रसंग...
.
मामू ने "भिमय्या" ला गि-हाईक बनवाचे ठरवले..
व भिमय्या शी दोस्ति बनवली...
एके दिवशी मामू भिमैय्याला म्हणाला...
क्यु भिमैय्या? कैसे हो?
ठिक है मामू..."भिमय्या" म्हणाला
यार "भिमय्या" तेरी तो मजा है अब पक्कि नोकरी लग गली कुच शादी बिदी का सोच रहा है क्या?
शादी चा विषय निघताच "भिमय्या" म्हणाला..वो मा बापु गाव मे तय करलेंगे उस लडकी के साथ शादी...
मामू यावर काहिच बोलला नाहि..पण जरा वेळाने म्हणाला..
नहि मैने ऐसाच पुछा ..क्यु की हमारे मोहल्लेमे एक तेलगु फ्यामीली रहति है..हमारी अछ्छी पहचान है..उनकी एक लडकी शादी कि है ईसलिये पुछा..
"नहि मामू..वो ह सब म बाप देखेंगे गावमे.."भिमय्या"
यावर मामू म्हणाला वोह ठिक है लडकी के पिताने बोला था ईसलिये पुछा..और हा लडकी का फोटु बी मेरे पास देके रखा है...मै क्या बोलतालडकी देखनेमे क्या हर्ज है? असे म्हणत मामु नी पाकिट बाहेर काढले व पाकिटातला "शर्मीला टागोर" चा फोटो "भिमय्या" ला दाखवला.
शर्मिलाच्या फोटो नी "भिमय्या" घायाळ झाला.
ठिक है मै देखनेकु तय्यार हु"
मामूच्या टप्प्यात सावज आले होते...
"भिमय्या" ऐसा थोडाना प्रोग्राम होता है देखने का? उसके लिये मामू को चाय नाष्टा देना पडता है...
अरे क्यु नहि मामू..शर्मीला च्या सौदर्याने घायाळ झालेला भिमय्या म्हणाला..
बाजुलाच चहावाला पोरगा होता..त्याला "भिमय्या" म्हणाला
देखो आज से मामू को चाय नाष्टा जो भि चाहिये देनेका और बिल मेरे खातेपे लिखना....
ठिक है भिमय्या ..मै अब्बुसे बात करता हु..मगर ये बात हम दोनो के सिवा किसिको मालुम नहि होना चाहिये
.
मामू चे काम झाले होते ..मग काय मामुची ऐश चालु झाली स्पेशल चहा क्रिम रोल तर कधी वडा पाव शिग्रेट ची पाकिटे..बिल"भिमय्या" च्या खात्यावर..
२ आठवडे मामु ची ऐश चालु होती.."भिमय्या"ने विचारले की "लडकि कि मा बिमार है" "पिताजी बाहर गाव गये" अश्या थापा मामु भोळ्या "भिमय्या"ला मारत असे..
मात्र सहकामगारांच्या डोळ्यावर मामूची ऐश आली अन त्यानी ऒळखले मामु नी कुणाला तरी बकरा बनवले आहे..शेवटी मामू ची भांडे फूटले..व एका कामगाराने "भिमय्या" सांगीतले..."भिमय्या" मामूसे बचके रहना बडा चालु लडका है
.
मामू थापा तर मारत नसेल ना? अशी शंका "भिमय्या" च्या मनात आली..
त्याच वेळी चहावाल्या पोराने "भिमय्या" बिलाचा आकडा सांगितला..
बिलाचा आकडा चांगलाच फुगलेला होता..
"भिमय्या"ने सोक्षमोक्ष लावायचे ठरवली मामूला त्याने बोलावले व दोघांची बाचाबाची सुरु झाली..एक तर बिल भरमसाठ वर मामु पण पोरगी दाखवत नव्हता..
आवाज वाढला म्हणुन मी दोघाना टेबला जवळ बोलावले अन "भिमय्या" म्हणालो.."क्यु आवाज चढाकर झगडा कर रहा है? कंपनी मे ऐसा नहि चलता..
त्यावर "भिमय्या" सांगु लागला" साब ये मामू ने मुझे फसाया..मेरे खातेपे खाया पिया..
मी मामु कडे बघितल्यावर तो म्हणाला "साब "भिमय्या"ने बोला था इस लिये खाया पिया..
बराबर है साब..मगर उसने मुझे शादी के लिये लडकी दिखानेका वायदा किया था इसलिये लालच मे आकर मैने ऐसा किया" "भिमय्या" म्हणाला.
मी मामू कडे बघितले पण तो बोलेना..तो बोलत नाहि पहाताच "भिमय्या"म्हणाला साब उस लडकी का फोटु भी उसके पाकिट मे है"
मी मामू कडे पाहिले अन हातानी खुण करत फोटो मागीतला.
मामूने फोटो माझ्याकडे दिला "शर्मीला" चा फोटो पहाताच सारे प्रकरण माझ्या लक्षात आले..
फोटो पहाताच "भिमय्या" म्हणाला "साब येच वोह लडकी है"
मी मामू ला मशिनवर काम करायला जा म्हटले.. अन मामु गेला...मू
मला मनात बिचा-या भिमय्याची किव व हसु येत होते..व मी म्हणालो
"देखो "भिमय्या"ये लडकी कोई तेलगु लडकी नहि है..ये फिल्म अभिनेत्री शर्मीला है..जो हो गया वो भुल जाऒ..और मामू के नाद को मत लगो..इसके साथ शादी क्या उसके फोटो के साथ भी तुम्हारी शादी नहि हो सकति..."
बिचारा "भिमय्या" पैसे पण गेले त्याचे दु:ख्ख होतेच पण शर्मीला शी लग्न होणार नाहि ह्या कल्पनेने तो मात्र खुप नाराज झाला..
..मामू
गाभा:
प्रतिक्रिया
14 Nov 2015 - 12:20 pm | मांत्रिक
झकासच अकुअण्णा...
मस्त लिहिता...
14 Nov 2015 - 12:24 pm | बोका-ए-आझम
सीसी करुन करीनाला पाठवा.
14 Nov 2015 - 12:36 pm | उगा काहितरीच
हाहाहाहा ! बिच्चारा भिमय्या !
14 Nov 2015 - 12:45 pm | रातराणी
अओ.
मामूला बिल द्यायला का नाही लावले तुम्ही? असं कसं फसवू दिलंत गरीबाला? ये आपने सही नही किया अकुमामू.
14 Nov 2015 - 12:46 pm | पगला गजोधर
मामू के नाद को मत लगो..
:=>}
14 Nov 2015 - 1:18 pm | शंतनु _०३१
किती सहज आपल्या चुकीची कबुली दिली … आजकाल तर खोट्या गोष्टींमध्ये ही अशी पात्र सापडत नाहीत
14 Nov 2015 - 1:33 pm | जव्हेरगंज
भारी!
14 Nov 2015 - 4:22 pm | एक एकटा एकटाच
बिच्चारा....!!!!!
15 Nov 2015 - 10:15 am | मुक्त विहारि
एकदम खुसखूशीत...
15 Nov 2015 - 10:24 am | रामदास
अभिनंदन