"तुमको भेजा नही" ह्या वाक्यावरून वाद

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in काथ्याकूट
1 Sep 2008 - 10:59 pm
गाभा: 

असंच एकदा मी आमच्या धाके कॉलनीच्या बिल्डींग मधून आमच्या फ्लॅट्च्या बाल्कनीतून पाहिलं की खाली खूप गर्दी जमली होती आणि एका पोस्ट्मन बरोबर एक अनोळखी माणूस हुज्जत घालत होता.मुंबईला अशा प्रसंगी गर्दी जमायला वेळ लागत नाही.
सहज कुतुहल म्हणून मी पण खाली उतरून काय चाललं आहे म्हणून आणखीन एक बघ्याची भर असे समजून ऐकायला गेलो.
"भेजा" या शब्दावर वाद चालाला होता.पोस्टमन ही व्यक्ति नेहमी प्रमाणे लोकल मराठी माणूस,ज्याला भुमी पुत्र म्हणातात तसाच काहिसा प्रकार. बहूतेक कोकणातून आलेला पक्या वेगुर्लेकर किंवा सोन्या तुळसकर पैकी आसावा.दुसरी तवातावाने हातवारे करणारी आगांतूक उत्तरप्रदेशची सुशिक्षीत भय्या म्हणावा अशी व्यक्ती होती.
बघ्यातला एखादा नक्कीच,
"क्या हूवा ?"
हा चर्चा चालु ठेवण्याचा परवलीचा प्रश्न चर्चा सुरू ठेवतो तो प्रश्न केला. तसं झाल्यामूळे संभाषण ऐकण्याच्या कुतुहलाने मी मान पुढे करून कान तीक्ष्ण करत ऐकू लागलो.
"तुमकू क्या करनेका है?"
हे वाद न वाढवण्यासाठी त्या परवलीच्या प्रश्नाला, दोघातल्या एका वाद घालणाऱ्याने,डोळे मोट्ठे करून आणि रागाने नाक फेंदारून उत्तर दिलं.

सगळे -मी धरून- क्षणभर शांत होतो.लगचेच तो पोस्टमन जाणून बुजून म्हणाला,
"ह्याने विचारलं, हमारा खत आया क्या?तो मैने बोला "तुमकू भेजा नही,
तो उसकू घुस्सा आनेका क्या कारण है? "
हे ऐकून तो आगांतूक लगेचच म्हाणाला,
"ये खूद्कु क्या समजता है मै क्या पागल हू जैसे मेरेकू भेजा नही है?
इसकू भेजा है तो पोस्ट्मनका काम क्यूं करता है?"
त्यावर,
"साब इसमे मेरा क्या गलती है बोलो.उसकू भेजा नही तो मै क्या करू?
खत काहासें लाऊ? बोलो?"
असं अगदी साळसूद होवून पोस्ट्मन सांगत होता.
"फिर ऐसा बोलो ना!, तुम्हारा खत नही है करके,हमको भेजा नही ऐसा गलत क्युं बोलता है?"
आता ह्या बघ्या मधे जरा हिरोगिरी करणारा पुढे सरसाऊन त्यांचा वाद त्याला आताच जणू काय कळला आहे असा अविर्भाव करून म्हणाला,
"ऐसा है क्या ?"
त्याची ट्युबलाईट जर उशिराच पेटलेली दिसली.त्या दोघाना बाजुला करत तो म्हणाला
"खाली पीली तुम दोनो झगडा करके राई का पर्बत करता है."
"राई का पर्बत ? "हा वाकप्रचार न समजून,
"ये राई का पर्बत क्या हो ता है? ऐसे हमने क्या किया ?"
असा त्या आगांतूक भय्याने लगेचच प्रश्न केला.

एव्हड्यात तो पोस्ट्मन हळूच त्या गर्दीतून सटकला.पुढच्या एका दुकानदाराचे पत्र त्याला देत म्हणाला,
"साले कुठून खोगीर भरती करून मुंबईला येतात.भेजा या शब्दाचे दोन अर्थ आहेत ते आम्हाला कुठे ठाऊक आहेत.भेजा म्हणजे "पाठवणे "आणि दुसरा अर्थ "मेंदु" हे कसं कळणार? "
आगांतूकाची इतरानी समजूत घातली आणि गर्दी विखरून गेली.
वर आल्यावर मला,
"काय समजलं तुम्हाला?"
ह्या माझ्या पत्नीच्या प्रश्नाला मी फक्त तिला ऐकू जाईल पण माझ्या मनात म्हणालो,
"फोव नाय कातळी फक्त सुको काजर"
हे माझं व्याक्य ऐकून तिने माझ्यावर जो कटाक्ष टाकला त्याने माझ्या चटकन लक्षात आलं की आता ह्या वाक्यावरून घरात भांडण होणार.
(मालवणीतल्या त्या वाकप्रचाराला"गैर समजामुळे भांडण" हा त्याचा अर्थ आहे हे तिला कुठं माहित होतं?)

श्रीकृष्ण सामंत