देव कोण आहे?

सचिनकदम's picture
सचिनकदम in काथ्याकूट
30 Aug 2008 - 12:34 pm
गाभा: 

नमस्कार मी आज तुम्हांला असा प्र्श्न विचारणार आहे कि देव हा कोण आहे मला अस उत्तर नको कि तो माणसात आहे .मला हे सांगा कि तो दयाळु आहे कि सर्वशक्तिमान जर तो दयाळू आहे जर तो दयाळू आहे तर मग जगात दु:ख का आहे आणि जर तो दयाळू नाही तर तो देव नाही आणि तो जर सर्वशक्तिमान आहे तर तो ह्या दु:खाला थांबवत का नाही म्हणुन जर तो दयाळू आहे तर सर्वशक्तिमान नाही जर तो सर्वशक्तिमान आहे तर तो दयाळू नाही तुम्हांला काय वाटत ते सांगा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

30 Aug 2008 - 12:37 pm | अवलिया

बोळा अडकलेला दिसतो
ताण असह्य झाला कि असे होते
जरा ताण कमी करंण्याची सोय करा किंवा ताण निर्मुलन विधी करा
हा विधी घरच्याघरी आपल्या हाताने करता येतो
माहितगार व्यक्तिकडुन मार्ग दर्शन घ्या
देव दयाळु आहे
ताणाने तुम्हाला आलेले दुःख तो नाहीसे करेल

सुचेल तसं's picture

30 Aug 2008 - 12:40 pm | सुचेल तसं

>>मला हे सांगा कि तो दयाळु आहे कि सर्वशक्तिमान जर तो दयाळू आहे जर तो दयाळू आहे तर मग जगात दु:ख का आहे आणि जर तो दयाळू नाही तर तो देव नाही आणि तो जर सर्वशक्तिमान आहे तर तो ह्या दु:खाला थांबवत का नाही म्हणुन जर तो दयाळू आहे तर सर्वशक्तिमान नाही जर तो सर्वशक्तिमान आहे तर तो दयाळू नाही

देव दयाळु आहे का ते माहित नाही, पण हे तुमचं वरचं लिहिलेल वाचून तुम्ही वाचकांसाठी दयाळु नाहीत असे दिसते.

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

अनिल हटेला's picture

30 Aug 2008 - 12:58 pm | अनिल हटेला

हेहेहेहेहे!!

काय चाललये काय ?

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Aug 2008 - 1:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नाना आणि सुचेल तसं,

नवीन लोकांना फार नका रॅग करू, पळून जातील ते!
=))

अगदी बरोबर
इथे फक्त नेहमी चे लोकच बोलतात
म्हणून मी सुध्धा पळून जात आहे.
या सन्केतस्थळाला माझा कायमचा राम राम.

विसोबा खेचर's picture

30 Aug 2008 - 4:09 pm | विसोबा खेचर

या सन्केतस्थळाला माझा कायमचा राम राम.

धन्यवाद! लवकरच आपला आयडी ब्लॉक केला जाईल आणि या संस्थळावर येण्याकरता आपला आयपी ऍड्रेसही ब्लॉक केला जाईल!

तात्या.

II राजे II's picture

31 Aug 2008 - 11:00 am | II राजे II (not verified)

हा जबरा बुच मारला :D

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Aug 2008 - 1:28 pm | बिपिन कार्यकर्ते

नाना.... ज ह ब ह र्‍या............. =))

बिपिन.

मृगनयनी's picture

30 Aug 2008 - 1:39 pm | मृगनयनी

देव दयाळु आहे
ताणाने तुम्हाला आलेले दुःख तो नाहीसे करेल

सहमत नाना....

आणि बोळा नक्की कुठे अडकलाय.......हेही त्या सर्वशक्तिमान देवालाच ठाऊक असेल.....

:)

विसोबा खेचर's picture

30 Aug 2008 - 2:41 pm | विसोबा खेचर

माझं मत -

चांगुलपणा, जे जे उत्तम, उदात्त, उन्नत ते ते सर्व म्हणजे देव. जे पाहताच क्षणी, अनुभवताच क्षणी मनाला भिडतं त्या सगळ्यात देवत्वच असतं. अनेकांगी, बहुआयामी असं एक निर्गुण तत्व म्हणजे देव!

काही मंडळी त्याला एखाद्या सुबक मूर्तीचं रूप देतात आणि ते तत्व सगुण होतं. मग ती गणपतीची एखादी मूर्ती असेल किंवा कृष्णाची असेल किंवा अन्य कुठल्या देवाची असेल. हे ३३ कोटी देव म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये देवत्वाचं स्थान मिळालेली ती सर्व सगुण रुपं आहेत. एखाद्याला आईत देवत्व दिसेल, एखाद्याला एखादा छानसा डोंगर भुरळ पाडेल, एखाद्याला एखाद्या कलेत देव दिसू शकेल, तर कुणाला एखाद्या नदीचा काठ आठवेल तर कुणाला सावरकरांचे अंदमानातले हाल दिसतील! काहीही असू शकेल!

आता काही प्रश्नोत्तरे -

१) हा जो मूर्तीरुपी, सगुणरुपी देव आहे तो माझं काय भलं करतो?

उत्तर : मला माहीत नाही!

२) मग मी त्याची पूजा का करतो?

उत्तर : कारण मला बरं वाटतं! छानशी अंघोळ करून शुचिर्भूत होऊन गणपतीच्या देखण्या मूर्तीला हिरव्या गार ताज्या दूर्वा, लालचुटुक जास्वंदीचं फूल वाहिल्याने, एखादी मंद सुवासाची उदबत्ती लावल्याने, लहनश्या निरांजनाने त्या मूर्तीला ओवाळल्याने, छोट्याश्या वाटीत त्याला दूधसाखरेचा नेवेद्य दाखवल्याने मला बरं वाटतं! That's it...

३) ह्या पूजेकरता मी किती वेळ खर्च करतो?

उत्तर : ५ मिनिटं!

४) ही पूजा करताना मी संस्कृतातले कुठले अवघड मंत्र वगैरे म्हणतो का? सोवळं ओवळं, जानवं घालतो का?

नाही!

५) पूजा झाल्यावर मी प्रार्थना करतो का?

नाही. मी फक्त काही सेकंद मनोभावे/भक्तिभावे त्या सगुणरुपाला नमस्कार करतो..

६) अशी पूजा करून माझं सगळं भलं होणार आहे, माझ्यावर कुठलंही संकट येणार नाही असा माझा समज आहे का?

मुळीच नाही!

६) मग मी पूजा का करतो?

दोन करणं -

अ) मगाशी म्हटल्याप्रमाणे असं केल्याने मला बरं वाटतं म्हणून आणि,

ब) अशी पूजा केल्याने माझी मन:शक्ति वाढते असा माझा विश्वास आहे. येणारी संकटं येणारच असतात, ती देवही दूर करू शकत नाही. परंतु संकटांच्या काळात सर्वात महत्वाचं काय असतं तर माझी मन:शक्ति, माझा स्वत:वरचा विश्वास! वर सांगितल्याप्रमाणे ५ मिनिटांची पूजा करून मन:शक्ति आणि स्वत:वरचा विश्वास या गोष्टी मला मिळतात/मिळतील असा माझा विश्वास आहे!

बाकी - खाण्यात, गाण्यात, मौजमजेत आणि अनेक गोष्टीत देव आहेच! तोही मला आवडतो..! :)

असो..

आपला,
(ह भ प) संत तात्याबा महाराज!

अवलिया's picture

30 Aug 2008 - 3:02 pm | अवलिया

ओ तात्या
कुठे दगडावर दुध वतताय?
आवो ह्याचा बोळा आडकलाय बोळा
कवाचा ह्यो निगुन नाय रायला अन त्यात आता भादवा येवु रायला
ह्यो मिसळपावावरिल पोरीबाळींस्ना 'मुझसे दोस्ती करोगे॑' अशा भिका खरडुन राह्यलाय
अवो याला म्या सांगितलेलाच उतारा हवा
तुमचा डोस लय हेवि होईल अन
तुंबलेला ह्यो तुमाला बी इचारायला कमी करनार नाय की 'मुजसे दोस्ती करोगे?'
तवा तुमी काय कराल? सांगा मला येक डाव ..सांगाच
तुमी व्हय म्हनाल का? मंग
अव लव म्यारेज का अरेंज वरुन जो यकदम देवावर येतो तो किती तुंबला असल ह्ये तुम्हास्नी समजायला नग का?
उगा आपल परवचन लावुन दिल. हा नाय तर काय...

ए पळ ए
देव बिव काय नाय या जगात चल पळ मोकळा व्हय अदुगर

क्लिंटन's picture

30 Aug 2008 - 4:01 pm | क्लिंटन

तात्या द ग्रेट. त्यांच्याशी सहमत.

अवांतरः 'देव म्हणजे कोण' हा प्रश्न बघताच एक वाह्यात उत्तर सुचले, 'ऋषी कपूर'. थोडा प्यार थोडा मॅजिक चित्रपट बघितला असेल तर माझे उत्तर नक्कीच कळेल.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

श्रीकृष्ण सामंत's picture

30 Aug 2008 - 10:51 pm | श्रीकृष्ण सामंत

(ह भ प) संत तात्याबा महाराज!
कुणी तरी गीता एका वाक्यात सांगितली असं म्हणतात.
महाराज,
आपण जे लिहिलंत ते वाचल्यावर असं वाटतं,
आपल्या तोंडूनच देव बोलला.
"होणारे न चूके जरी तया ब्रम्हदेव होई आडवा"
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

मनस्वी's picture

1 Sep 2008 - 1:48 pm | मनस्वी

सहमत.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

प्रभाकर पेठकर's picture

30 Aug 2008 - 2:42 pm | प्रभाकर पेठकर

नमस्कार मी आज तुम्हांला असा प्र्श्न विचारणार आहे
का विचारणार आहे?

मला अस उत्तर नको कि तो माणसात आहे .
पण तो खरच माणसात असतो, जनावरात असतो, चराचरात असतो. मग असे उत्तर का नको?

मला हे सांगा कि तो दयाळु आहे कि सर्वशक्तिमान
सर्वशक्तीमान दयाळू असू शकत नाही का? म्हणजे त्याने एक तर दयाळू असावे किंवा सर्वशक्तिमान असावे, दोन्ही असू नये असे तुम्ही आडून आडून सुचविता आहात. खरंच, असं तू असंच असावेस आणि असे असे असू नयेस, असे आपण देवास सुचवू शकतो का?

जर तो दयाळू आहे जर तो दयाळू आहे तर मग जगात दु:ख का आहे
हा डबल दयाळू पणा त्याच्या जवळ आहे म्हणूनच तो हे सर्व सहन करतोय. नाही तर त्याने तो फक्त सर्वशक्तिमान आहे असे सहज सिद्ध केले असते.

आणि जर तो दयाळू नाही तर तो देव नाही

का बरे? सुष्टांचे संरक्षण करताना दुष्टांचा संहार त्याला करावाच लागतो. म्हणजेच दुष्टांसाठी तो दयाळू नाहीए. तरी पण सुष्टांसाठी तो देवच आहे.

तो जर सर्वशक्तिमान आहे तर तो ह्या दु:खाला थांबवत का नाही
त्याने सर्व दु:खांना थांबविले तर सर्वत्र सुख होईल आणि सुखात (दु:खाची अजिबात भिती उरली नसताना) कोण कशाला देवाची आठवण काढेल? हे एक.
दूसरे, पाप केले की देव तुमच्या वाट्याला दु:ख देतो. (असा समज आहे) म्हणजे तुम्ही पाप करायचे(च) आणि देवाने दु:खांना थांबवायचे हा देवावर अन्याय होईल. तो काय सोसायटीचा गुरखा आहे?

तुम्हांला काय वाटत ते सांगा

मला वाटतं तो दयाळू आहे (जर्दाळू नाही) पण त्याच्या दयाळूपणाचा कोणी (चर्चेसाठीसुद्धा) गैरफायदा घेऊ नये म्हणून त्याला सर्वशक्तिमान असणं भाग आहे. सर्वशक्तिमान ह्याचा अर्थ कुणा गुंड/मवाल्यासारखा येणार्‍या-जाणार्‍याला उगीचच त्रास देणारा नाही. सुष्टांसाठी दयाळू आणि दुष्टांसाठी सर्वशक्तिमान अशी त्याची प्रतिमा आहे.

असो. वरील चर्चा मी काही विशेष गांभीर्याने घेतलेली नाही. माझी मतेही जास्त गांभीर्याने घेऊ नयेत, ही विनंती.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Aug 2008 - 9:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काका,

मानलं तुम्हाला पुन्हा एकदा! हहपुवा!

अदिती

अहो शालीतुन जोडे का मारता राव.......त्यांना खाजगीत तुबंलेला बोळा कसा काढावा सांगितलेतरी पुरे.
मला हे कळाले नाही देव दयाळु आहे आणि तो सर्वशक्तीमान आहे हे तरी ह्याना कोणी सांगितले. सचीनराव तुम्हाला देवाचा इतका राग का आहे? कशाला राव देवाविषयी विचार करुन दु:खी होता.
वेताळ

वल्लरी's picture

31 Aug 2008 - 5:09 pm | वल्लरी

वरील सर्व प्रतिसाद वाचुन खुप हसु आले कि किमान १५ मिनिटे तरि हसु थाम्बे ना.
परिणाम पट्कन सद्स्य झाले.
नाना चेगट पटेल असे बोलता हो तुम्ही.

वृषाली's picture

31 Aug 2008 - 5:25 pm | वृषाली

तूम्हांला नक्की कसले दु:ख आहे.
नक्कीच counselling ची गरज आहे.
वृषाली

हेरंब's picture

31 Aug 2008 - 5:39 pm | हेरंब

सर्व प्रतिक्रियांत तात्यांची दुसरी प्रतिक्रिया उत्तम आणि मनाला १०० टक्के पटणारी वाटली.
देव असो की नसो, आपली मनःशक्ती कायम सशक्त राहिली पाहिजे मग माणूस कुठल्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतो.
तात्यासाहेब, धन्यवाद , एका सुंदर व अचूक शब्दातल्या निरुपणाबद्दल!

सहज's picture

31 Aug 2008 - 10:27 pm | सहज

तात्याची प्रतिक्रिया आवडली.

मकरंद's picture

31 Aug 2008 - 8:26 pm | मकरंद

काय राव
देवाला बोलण्यापुवि स्वःत कडं बघा राव

मानव's picture

1 Sep 2008 - 12:52 am | मानव

देव शोधन्या पेक्शा आपल्यतिलच माणुस शोधुयात ! आजकाल त्याचिच जास्त गरज आहे ! आनि नाना जरा सबुरिन घ्या , वयाबरोबर परिपक्वपना येतो हळूहळू , आपन

सगलेच रोज नविन काहिना ना काहि शिकतोच कि आयुश्यात , हा पोरगापन शिकेल त्याला पन सन्धि द्या !

alkadarade's picture

1 Sep 2008 - 12:24 pm | alkadarade

there is sorrow in our life and we always remember God to help us.He is not creating the sorrow but he is helping us to come out from sorrow.
alka

विसोबा खेचर's picture

1 Sep 2008 - 1:29 pm | विसोबा खेचर

तुम्ही विंग्रजीमध्ये लिहिताय हे मात्र सॉरोदायक आहे! :)

सर्किट's picture

1 Sep 2008 - 1:33 pm | सर्किट (not verified)

विंग्रजीत लिव्तायत ताई, म्हण्जे नक्की मलेशियात असनार, काय ?
-- सर्किट

अमेयहसमनीस's picture

2 Sep 2008 - 9:51 am | अमेयहसमनीस

काका,

:)) >:) =))

मन's picture

1 Sep 2008 - 2:26 pm | मन

माझ्या अल्पमतीनुसार,
देव-आनंद आहे..
देवानंद आहे.(त्याच्या पिक्चराचा हल्ल्ली आनंदीआनंद आहे.)
त्याचा भाउ विजय्-आनंद आहे.
म्हणुनच देव आहे तिथे विजय आहे.

आपलाच,
मनोबा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Sep 2008 - 2:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> म्हणुनच देव आहे तिथे विजय आहे.
=))

पण मला हल्ली अशी शंका येत्ये की "मन"च देव आहे!

मन's picture

1 Sep 2008 - 2:36 pm | मन

एका कवीनं (बहुदा ग्रेस ह्यांनी )सांगितलय....
(कविता/गाणं आहे:- मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा....)

"......मन देवाचे पाउल;
मन सैतानाचा हात!"

आपलाच,
मनोबा

मन's picture

1 Sep 2008 - 3:18 pm | मन

हा प्रश्नच न्हाइ.
ह्ये तर उत्तर हाये.
माहा दोस्त आशिश द्येव(देव) गनितप्रेमी हाये.
त्येच्या कारट्याचं नाव हाये "कोन"(भू-मिती मदला "कोन")
म्हनुनच पब्लिक म्हन्ती "देव कोन आहे"

तर,मित्रहो.......
सांगायचं म्हणजे, वरील शीर्षकात प्रश्नचिन्ह हे चुकुन घातले गेले असावे.
सदर शीर्षक हे माहितीपुर्ण मानण्यात यावे अशी सर्वांना नम्र पण गंभीर विनंती.

आपलाच,
मनोबा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Sep 2008 - 3:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

त्येच्या कारट्याचं नाव हाये "कोन"(भू-मिती मदला "कोन")
=))

सदर शीर्षक हे माहितीपुर्ण मानण्यात यावे अशी सर्वांना नम्र पण गंभीर विनंती.
(गंभीर) अदिती

भास्कर केन्डे's picture

6 Sep 2008 - 12:38 am | भास्कर केन्डे

चर्चा वाचून लय हासाय झालय बगा. नानांच्या प्रतिसादापसून ते मनाच्या पस्तोर एक्दम पडूस्तोर हासाय होतय.

पण मध्येच तात्यांच्या (क्षमा, ह भ प तात्या महाराजांच्या) दुसर्‍या प्रतिसादाने तसेच प्रभाकरपंतांच्या प्रतिसादाने माणसाळल्यासारखे झाले.

एकंदरीत काय तर एका भांगार प्रस्तावाला उघडून वाचल्यानेही वेळ सत्कारणी लागला.