'इट अॅंड रन : माय अनलाइकली जर्नी टू अल्ट्रामॅरेथॉन ग्रेटनेस' ही स्कॉट ज्युरेक या असामान्य माणसाची अत्यंत रोचक, विलक्षण अशी जीवनकहाणी आहे. स्कॉट ज्युरेक हा अल्ट्रारनर आहे. अल्ट्रारनिंग म्हणजे जहॉं मॅरेथॉन खत्म होती है, वहॉंसे अल्ट्रारनिंग शुरू होती है. या पुस्तकाअगोदर मलाही मानवी रनिंगची मर्यादा म्हणजे मॅरेथॉन वा फार तर ट्राअॅथलॉन इतकीच माहीत होती. मागे सकाळमध्ये पुण्याच्या एका तरुण डॉक्टरने ट्राअॅथलॉनसाठी केलेल्या प्रयत्नांवर एक सुंदर लेख वाचला होता. नुकतेच सुपरमॉडेल मिलिंद सोमणनेही एक ट्राअॅथलॉन यशस्वीरीत्या पूर्ण केलीय वयाच्या पन्नासाव्या वर्षी, त्याचीही बातमी ताजीच आहे. तर अंतर ही इथे सर्वात महत्त्वाची बाब आहे. फुल मॅरेथॉनचे अंतर २६.२ मैल इतके असते. (किलोमीटरमध्ये ४२ कि.मी.). चूकभूल देणे घेणे. अल्ट्रारनिंग स्पर्धेचे अंतर वेगवेगळे पण सर्वसाधारण ५० ते १०० ते १३५ ते १५० मैलदेखील अनेकदा असते. आणि इथेच अर्थातच मानवी क्षमतेचा शारीरिक मानसिक अक्षरश: कस लागतो. शिवाय अल्ट्रारनिंग रोडवर तशी कमीच, पण अत्यंत खडतर अशा नैसर्गिक जागांवर खेळली जाते. प्रचंड चढउतार असलेल्या टेकड्या, बर्फाळ प्रदेश, अती उष्ण हवामान, अती खडकाळ दुर्गम प्रदेशात व जमिनीवर धावत जाऊन हे अंतर पार करण्याचे आव्हान असते. तर ज्युरेक हा अल्ट्रारनिंगच्या जगात अत्यंत खडतर समजल्या जाणार्या अशा एकाहून एक अनेक खडतर स्पर्धा जिंकणारा ग्रेट रनर आणि हे त्याचे आत्मचरित्र. त्याने इतकी रेकॉर्डस करून ठेवलेली आहेत की मला हळूहळू त्याची माहिती मिळतेय. पुस्तक संपवल्यावर मी नेटवर त्याचा अधिक शोध घेतला, तेव्हा कळले की त्याने काय काय पराक्रम केलेले आहेत. उदा. वेस्टर्न रेस १०० हार्डरॉक १०० तर तो जिंकलेला आहेच, पण त्याने जे एक रेकॉर्ड केले आहे, ते साधारण असे की त्याने साडेसहा फुल मॅरेथॉन एका दिवसात धावणे असे प्रकार केलेले आहेत. ती फारच मोठी यादी आहे. असो.
तर तो मला माणूस म्हणूनही फार आवडला. अगदी प्रांजळपणे तो त्याची कथा सांगतो. त्याची बालपणाची गरिबी असल्याने खडतर परिस्थिती, वडिलांचा अत्यंत कडक सैनिकी शिस्तीचा स्वभाव, आईचे अत्यंत कठीण असे आजारपण, त्यात त्याने घेतलेली आईची काळजी, केलेली सेवा या कठीण कष्टमय बालपणामुळे आणि आईला आपल्या डोळ्यापुढे हळूहळू खंगत जाताना पाहण्याने अत्यंत मनस्वी स्वभावाच्या या मुलाच्या मनावर होणारा परीणाम, वाचनात रमणारा त्याचा स्वभाव हे सर्व फार सुंदरपणे पुस्तकात आलेले आहे. पुढे वडिलांनी आईला नर्सिंग होममध्ये पाठवणे इ. या अत्यंत नकारात्मक वातावरणातून या सर्व वेदनेतून तो जो एस्केपचा मार्ग निवडतो, तो म्हणजे रनिंग - म्हणजे ही लिटरली रन्स अवे फ्रॉम सॉरो ऑफ लाइफ. त्या सर्वाचे रनिंगशी झालेले कनेक्शन खूप रोचक आहे, मुळातून वाचण्यासारखे आहे. वडील त्याच्याकडून खूप सारी लाकडे रचून ठेवण्याची व इतर अशी अनेक भयंकर अवजड कामे लष्करी शिस्तीत करवून घेत. त्या वेळी तो जेव्हा तक्रार करत असे, तेव्हा वडील त्याला म्हणत, "समटाइम्स यू जस्ट डू थिंग्ज." मात्र हेच खडतर बालपण व अशी कामे यातून त्याच्यातला एन्ड्युरन्स कसा डेव्हलप झाला, त्या जडणघडणीचे तो फार रोचक वर्णन करतो व 'समटाइम्स यू जस्ट डू थिंग्ज' या अपरिहार्यतेलाच तो जगण्याचे एक सूत्र बनवतो. त्याच अस्तित्ववादी विचारसरणीकडे आकर्षित होणे, ब्रदर्स कॉरमॉजॉवचे वाचन आणि ५० मैल धावणे हे आलटून पालटून करणे इ. वर्णने येतात. त्याच्या आयुष्यात आलेली अनेक इंटरेस्टिंग माणसे - त्याचा जीवश्चकंठश्च रनर मित्र डस्टी, डस्टीचा प्रचंड आक्रमक स्वभाव, उद्दामपणा (स्वत:च्या गाडीच्या टपावर तो लिहितो - हे मिस्टर, डोन्ट लाफ, युवर डॉटर माइट बी इनसाइड.. इ.) डस्टीने पुढे आयुष्यभर दिलेली अप्रतिम साथ, त्याच्या गावातला हिप्पी डॅन, त्यांच्याबरोबर केलेली रनिंग, त्याच्या रनिंगवर विचार करण्यावर वा वाचन करण्यावर हिप्पी डॅनने केलेली कानउघाडणी, पृथ्वीवर स्वत:चा कमीत कमी भार पडावा यासाठी हिप्पी डॅनचे चाललेले प्रयत्न, त्याचा सिंप्लिसिटीचा आग्रह या दोन्ही वल्लींचे वर्णनही रोचक आहे,
ज्युरेकने हे सर्व यश प्राप्त करण्यासाठी केलेले कठोर परिश्रम, घेतलेले ट्रेनिंग मती गुंग करणारे आहे. तो म्हणतो, "माझे शरीर एक लॅबोरेटरी झाले होते. नॉनव्हेजीटेरीयनकडून व्हेगनपर्यंतचा त्याचा प्रवास आश्चर्यजनक आहे. या सर्व जीवघेण्या अल्ट्रामॅरेथॉनच्या रेसेस त्याने पूर्णपणे शाकाहाराचा अंगीकार करून जिंकलेल्या आहेत, अनेकांनी त्याला वेड्यात काढले, तरी स्वत:च्या आहारावर अनेक संशोधन करून फर्म राहून तो हे सर्व कसे साध्य करतो, ते वाचण्यासारखे आहे. प्लांट बेस्ड डाएट हा त्याचा मूलाधार आहे. पुस्तकात प्रत्येक प्रकरणानंतर त्याने अनेक सुंदर एकाहून एक व्हेज पदार्थांच्या रेसिपीज दिलेल्या आहेत. खव्वय्यांसाठी, कुकिंगप्रेमींसाठी हा एक मोठा ठेवा आहे. खरे म्हणजे पुस्तक नावाप्रमाणेच रनिंग आणि रेसिपीज यांचे मस्त कॉकटेल आहे. लहानपणी आजारी आईला सांभाळत व लहान भावंडासाठी स्वत: स्वयंपाक करत करत तो एक उत्कृष्ट कुक बनतो व अनेक सुंदर व स्वत:च्या हेवी रनिंगला शरीराच्या अतिरिक्त न्युट्रीशियस फूडची पूर्तता करण्यासाठी अनेक एनर्जेटिक शाकाहारी डिशेस त्याने शोधलेल्या, शिकून घेतलेल्या आहेत.
अल्ट्रारनर्स ज्या असामान्य पद्धतीने शरीराच्या मर्यादांशीच दोन हात करून जगतात, ते हादरवून टाकणारे आहे. अत्यंत लॉंग डिस्टन्स रनिंगने होणारे शरीरावरील, मेंदूवरील परिणाम, ते हाताळताना अनेक ठिकाणी केलेला अतिरेक याची मती गुंग करणारी अनेक वर्णने पुस्तकात येतात. एक झलक पाहा नेमके काय होते..
Yet there’s a reason why top marathoners aren’t flocking to the sport, and it’s not just the lack of cash and prizes. Although the pace of an ultra is slower, maintaining that effort for hours and hours can leave the best of us huddled at the side of the road, dry heaving. For one thing, there’s the cumulative loading on the muscles and bones. Every time the foot hits the ground, the quadriceps and calf muscles have to lengthen to absorb the shock of the impact, and that adds up when you go a hundred miles, whether you’re barefoot or in Brooks, running or walking, slapping your heel or landing on your toes. Downhills are the worst of all. When you see runners shuffling across the Badwater finish line, it’s not because they’re too tired to push off, it’s because they’re too sore to land.
Even if you’re able to keep food down under these conditions, you’ll eventually hit the famous “wall” where the glycogen energy stores in your liver and muscles are depleted. In a marathon, the wall comes at the tail end of the race, but in an ultra, it’s not even at the midpoint and it happens many times. You’ll have to spend hours in the catabolic state where your body is forced to burn fat, protein, and even its own muscles to ensure adequate energy reaches the brain.
A cascade of stress-related hormones floods the body in response to the sustained exertion. Blood tests after ultras have shown elevated cardiac enzymes, renal injury, and very high levels of the stress hormone cortisol, the proinflammatory compound interleukin-6, and creatine kinase, a toxic byproduct of muscle breakdown. That’s a lot for the immune system to handle. Approximately one in four runners at the Western States gets a cold after the race, and this is in the height of summer!
Most of all, the ultra distance leaves you alone with your thoughts to an excruciating extent. Whatever song you have in your head had better be a good one. Whatever story you are telling yourself had better be a story about going on. There is no room for negativity. The reason most people quit has nothing to do with their body.
या पुस्तकात दाखवलेली रनिंगची आध्यात्मिक बाजू (हो, अध्यात्मिकच; पण व्यक्तिगत उच्चतम मानसिक पातळीवरचा अनुभव या अर्थाने, आपल्या स्टँडर्ड अर्थाने नाही) हा भाग निव्वळ अप्रतिम. अत्यंत इन्स्पायरिंग, अत्यंत मनस्वी भाग. त्याने केलेल्या चिंतनाचे या संदर्भातील हे उतारे बघा -
I wanted more—more victories, more speed, more spiritual development. I wanted more answers, and I thought ultrarunning could provide them. I pored over texts, exploring the link between endurance sports, altered states of consciousness, and wisdom—books like Running Wild: An Extraordinary Adventure of the Human Spirit, by John Annerino; Running and Being: The Total Experience, by George Sheehan; and The Marathon Monks of Mount Hiei, by John Stevens. The monks call their practice of Tendai Buddhism kaihogyo, an extensive daily pilgrimage through the mountainous terrain that encompasses hundreds of remote shrines, sacred peaks, stones, forests, glades, and waterfalls. To these monks, the sacred is everywhere.
The most devoted complete a 25-mile run every day for a thousand consecutive days. They wear straw sandals and carry a knife at their waist, to be used to kill themselves should they fail to continue. After five years, they conduct a nine-day fast, after which their senses are heightened to such a degree that they can hear ash fall from an incense stick. In the seventh year of their pilgrimage, the monks undertake the “Great Marathon” of 52.5 miles a day every day for a year. This extended circuit includes not only the rarified holy sites on Mount Hiei but also the crowded streets of downtown Kyoto. Each monk, as he runs past noodle bars and strip clubs, stops to give his blessing to the people in the city hurrying about their business. Each of the writers spoke of rewards beyond speed, beyond endurance, beyond victory.
आणि हा एक उतारा
Rick and many others helped teach me the great paradox of distance running. It’s a solitary activity, and to be a champion one must block out nearly everything except the next step and the next, and the one after that. Notwithstanding the thick ties that bind runner and pacer, teamwork doesn’t enter the strategic or tactical considerations of top ultrarunners.
And yet.
And yet ultrarunners—even the fiercest competitors—grow to love each other because we all love the same exercise in self-sacrifice and pursuit of transcendence. Because that’s what we’re all chasing—that “zone” where we are performing at the peak of our abilities. That instant when we think we can’t go on but do go on. We all know the way that moment feels, how rarely it occurs, and the pain we have to endure to grab it back again. The longer an ultrarunner competes, I believe, the more he grows to love not only the sport, not only his fellow ultrarunners, but people in general. We all struggle to find meaning in a sometimes painful world. Ultrarunners do it in a very distilled version. I had learned that by the time I met Rick.
पुस्तकात इतके काही आहे की बरेच इथे मांडणे अर्थातच शक्य नाही. म्हणजे ज्या प्रसिद्ध अल्ट्रारनिंग रेसेस होतात, त्या जागांची महती, तेथील अत्यंत खडतर नैसर्गिक परिस्थिती - उदा बॅडवॉटर रेस, किंवा हार्डरॉक १००. उदा, हार्डरॉक १००ची ही वैशिष्ट्ये पाहा - या रेसमध्ये स्पर्धकाला ११ माउंटन पासेस येतात. यातील सहा हे १३००० फुटापेक्षा अधिक उंचीचे. यात १४००० फुटाची एक अगदी सरळ चढण आणि एकूण ६६००० फुटांची उतरंड पार पाडावी लागते. (माउंट एव्हरेस्टच्या चढ-उतारापेक्षा जास्त अंतर). हे सर्व पूर्ण करण्यासाठी मॅक्झिमम वेळ दिला जातो ४८ तास. यात एक कमरेपर्यंत खोल दोन नद्यांची क्रॉसिंग, एक आख्खी रात्र जागरण विथ रनिंग, काही ठिकाणी थेट ३०० फूट खोल दरीत कोसळण्याचे चान्सेस, इ. बॅडवॉटरच्या वेळी अनेकांचे झालेले मृत्यू, अपघात, शरीरावर झालेले परिणाम.
यात रारामुरी नावाच्या एका इंडियन आदिवासी जमातीचे एक विलक्षण विश्व समोर येते, हे जगातील सर्वश्रेष्ठ प्राचीन रनर्स, ज्युरेकने त्यांच्याबरोबर धावलेल्या एका कॉपर कॅनियॉन अल्ट्रामॅरेथॉनचे वर्णन निव्वळ थरारक. ज्युरेकला एक जण निमंत्रण देतो व या आदिवासींबरोबर तो त्यांची रेस आयोजित करतो. त्यासाठी त्याने केलेली तयारी, त्या महान आदिवासी रनर्स जमातीवर 'बॉर्न टू रन' हे जगप्रसिद्ध पुस्तक आलेले आहे, तेच हे रारामुरी, जे टाराहुमारा या नावानेदेखील ओळखले जातात. त्यांच्यातला एक सर्वश्रेष्ठ रनर यात सामील होतो. तो आणि ज्युरेक यांच्यातील स्पर्धा, रनिंग हेच जीवन असलेले रारामुरी इंडियन्स, त्यांचे असामान्य जीवन, आहार, धावण्याची अमानवी क्षमता इ.चे वर्णन ग्रेट आणि ती रेस इ. यावर एक स्वतंत्र भन्नाट प्रकरण पुस्तकात येते,
तर अल्ट्रारनिंगचे एक आगळेवेगळे विश्व हे पुस्तक दाखवून देते, जिथे मानवी प्रयत्नांची पराकाष्ठा दिसते. हे सर्व इतके रोमांचक आहे की एकदा तुम्ही मुळातून पूर्ण पुस्तक वाचाच. आफ्टर ऑल, ट्रेलरमध्ये किती पिक्चर दाखवणार आणि किती स्टोरी सांगू, नाही का? मीदेखील आता ज्युरेक आणि अल्ट्रारनिंगबद्द्दल माहिती गोळा करतोय.
शेअर करा प्लीज, इफ यू फाइंड समथंग मोअर!
प्रतिक्रिया
15 Aug 2015 - 11:56 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
पुस्तकपरिचय आवडला. टू रिड लिस्ट मधे नाव लिहुन ठेवलयं.
16 Aug 2015 - 1:23 am | उगा काहितरीच
पुस्तक परिचय आवडला . लेखकाला सलाम !
16 Aug 2015 - 7:50 am | खेडूत
याबद्दल नुकतंच ऐकलं होतं. छान परिचय .
हे पुस्तक वाचायलाच हवे!
ते पुण्याचे डॉक्टर म्हणजे डॉ. कौस्तुभ राडकर.
एकला चलो रे या लोकमत च्या कार्यक्रमात त्यांची महेश म्हात्रे यांनी घेतलेली मुलाखत नुकतीच पाहिली .
स्कॉटचं संस्थळ
17 Aug 2015 - 2:15 pm | मारवा
अहो मी ज्यांच्या बद्दल बोलत होतो ते हे नाहीत. त्यांच आडनाव तुळशीबाग अस काहिस आहे नेमक आठवत नाही पण छान यांची हि माहीती तुमच्यामुळे झाली.
धन्यवाद
16 Aug 2015 - 10:44 pm | एस
खूप छान लेख. तुम्ही ३१ डिसेंबरला मिपासंन्यास घेतला होतात, त्यानंतर आज पुन्हा एकदा तुमचा लेख पाहून आनंद झाला.
17 Aug 2015 - 2:10 pm | मारवा
मिपासंन्यास कसला वाचनाचा ब्रेक घेतला इतकच.
प्रतिसादासाठी धन्यवाद
16 Aug 2015 - 11:11 pm | चाणक्य
वाचणार हे पुस्तक.
16 Aug 2015 - 11:26 pm | जव्हेरगंज
नोटेड...
16 Aug 2015 - 11:44 pm | एक एकटा एकटाच
आणि तुमचे आभार
17 Aug 2015 - 1:22 pm | बोका-ए-आझम
सुंदर लेख. पुस्तक इ-बुक format मध्ये आहे का?लगेच अवतरण करेन.
17 Aug 2015 - 2:07 pm | मारवा
अरे बोकोबा इथेच होतो इतक चांगल वाचण्यासारख होत इथे इतरांच म्हणुन वाचनमात्र झालो होतो इतकच. चांगल वाचायला मिळतय तर कशाला ते सोडुन लिहत बसायच असा विचार केला.
17 Aug 2015 - 2:27 pm | जेपी
एका वेगळ्या प्रकारची ओळख..
धन्यवाद.
17 Aug 2015 - 2:34 pm | मारवा
http://www.badwater.com/
http://www.badwater.com/2006web/2006story.html
http://running.competitor.com/2015/07/photos/photos-2015-hardrock-100_13...
http://www.spartathlon.gr/en.html
http://www.outsideonline.com/1856916/9-toughest-ultramarathons#slide-11
https://www.google.co.in/search?q=western+states+100+race+photos&biw=136...
17 Aug 2015 - 2:34 pm | मारवा
http://www.badwater.com/
http://www.badwater.com/2006web/2006story.html
http://running.competitor.com/2015/07/photos/photos-2015-hardrock-100_13...
http://www.spartathlon.gr/en.html
http://www.outsideonline.com/1856916/9-toughest-ultramarathons#slide-11
https://www.google.co.in/search?q=western+states+100+race+photos&biw=136...
17 Aug 2015 - 9:37 pm | जुइ
पुस्तकाचे लेखक यांच्या जिद्दीला सलाम!