नॉस्टॅल्जिया आणि गुलजार...

मैत्र's picture
मैत्र in जनातलं, मनातलं
16 Aug 2008 - 9:37 pm

देशातून राणीच्या देशात आल्यापासून नॉस्टॅल्जिया आणि जुन्या आठवणी पाठ सोडत नाहीयेत.
तसं मला सगळ्या जुन्या गोष्टींचं वेड आहेच... पण समजत नाही मनात इतके जुने संदर्भ कुठे दडून बसलेले असतात आणि असं कुठून काय उफाळून येतं!
गुलजारची गाणी लावली आज खुप दिवसांनी... असं काय उदास लिहितो हा माणूस... असं मन ढवळून निघतं आणि मग तळाशी बसलेलं काही बरं वाइट वर येतं... जुन्या डायरीची पानं चाळल्यासारखं...
थोडं शेवाळ, थोडी माती.. कुठे काचेचे काही रंगीत तुकडे... काही जपून ठेवलेल्या वस्तू ... ज्या ठेवल्या आहेत याचा विसर पडला आहे ... काही अनवधानाने राहिलेलं आणि काळाच्या ओघात खाली बसलेलं ... लक्षात येतं की सगळं काही विसरलं हरवलं नाहीये.. काही तरी विचित्र वाटतं.. मला माहीत नाही मीच असा हळवा होतो का गुलजारचे शब्द आणि ती अभिजात गाणी शब्द आणि अर्थाच्या संदर्भापलिकडे काही अनाहत नाद जाणवतात...

दिल ढुंढता है फ़िर वही फ़ुरसत के रात दिन
बैठे रहे तसव्वुरे जाना किये हुए

त्या सुरेल द्वंद्वगीतापेक्षा भूपिंदर च्या आवाजतलं स्लो गाणं तर विलक्षण अस्वस्थ करून सोडतं...
तेवढयात पुढचं गाणं हळुच बोट धरून येतं

एक अकेला इस शहर में, रात में और दोपहर में
आबोदाना ढुंढता है आशियाना ढुंढता है
दिन खाली खाली बर्तन है
और रात है जैसे अंधा कुआ....

असं काय असतं जे माणसाला खुणावत राहतं? आणि का? कशामुळे?... इतक्या सुंदर देशात सुबत्ता असताना कार्पेटच्या सुखद स्पर्शात अचानक वीस वर्ष जुना शहाबादी फरशीचा तो खडबडीत स्पर्श आठवतो जणू आत्ता पायाखाली आहे...
आणि ज्याला विअर्ड म्हणावं असं काही ... तो जुना स्पर्श अधिक हवा हवासा वाटतो...

नाम गुम जायेगा चेहरा ये बदल जायेगा ...

एखादी कलती दुपार - थोडीशी संध्याकाळ छान उन्हं घेऊन येते... पश्चिमेच्या खिडकीतून घरात कवडसे डोकावतात... चक्कर मारायला आणि उन खायला बाहेर पडतो... एखाद्या सुबक सुंदर बैठ्या घराच्या आवारात गोड गोरी मुलं खेळत असतात... आणि अचानक तो एक विशिष्ट जुन्या लाकडाचा वास येतो... ओकचा असावा. आणि त्यामागोमाग दरवळतो इंग्लिश चहाचा परिचित वास... आणि अक्षरशः खेचल्यासारखं मन मागे जातं ... एखाद्या मस्त रविवारी घरचं साधंच पण मस्त जेवण जेवून एक कादंबरी घेऊन पडायचो .... थोड्या वेळाने एक मस्त डुलकी काढायची... आणि मग थोड्या वेळाने सुस्तावलेल्या घराला जाग यायची... स्वैपाकघरात थोडी लगबग... आधण चढवलं आहे असा अंदाज करावा तोवर कप बशा मांडल्याचे आवाज ... अखेर हाक कानावर आली की पलंगावरून उठण्याचा नाइलाज आणि ती चहाची तलफ़ अशा द्विधा विचारात तो दुधाळ आणि लालसर चहा समोर... कुठल्या तरी गप्पा... बागेत पाणी सोडल्याने येणारा तो एक ठराविक वास..
एकदम जरा थंडी वाजते .... मी भानावर येतो... ही लंडनची हवा नेहमीप्रमाणे बदलत असते.... घाईघाईत घरी येतो...
चहा टाकतो... परत गुलजार आठवणी जाग्या करतो...
छोड आये हम वो गलियां....

वाफाळता चहाचा कप घेऊन मी बाहेरच्या बदललेल्या ऋतू कडे आभाळाकडे पाहत राहतो...
आशा मागे स्वराबरोबर मनाच्या तारा छेडत राहते...

ये लम्हा फ़िलहाल जी लेने दे....
गुलजार च्या शब्दां बरोबर नॉस्टॅल्जिया घर भरून राहतो...

वाङ्मयविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

16 Aug 2008 - 9:44 pm | प्रकाश घाटपांडे

आवाल्ड बुवा!
गुजरा हुवा जमाना आता नही दुबारा!
प्रकाश घाटपांडे

भडकमकर मास्तर's picture

17 Aug 2008 - 12:47 am | भडकमकर मास्तर

मस्त लेख...
९४ मध्ये पी एल मध्ये गुलजारची कॅसेट लावून अभ्यास करत बसायचो, त्याची आठवण झाली...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

शितल's picture

17 Aug 2008 - 8:43 am | शितल

एकदम गुलजारमय लेख.
मेरा गोरा रंग लै ले, मोहे शाम रंग दै दे...
हे तर माझे एकदम आवडते गाणे आहे.

विसोबा खेचर's picture

17 Aug 2008 - 8:56 am | विसोबा खेचर

इतक्या सुंदर देशात सुबत्ता असताना कार्पेटच्या सुखद स्पर्शात अचानक वीस वर्ष जुना शहाबादी फरशीचा तो खडबडीत स्पर्श आठवतो जणू आत्ता पायाखाली आहे...
आणि ज्याला विअर्ड म्हणावं असं काही ... तो जुना स्पर्श अधिक हवा हवासा वाटतो...

केवळ अप्रतीम लेखन...! दुसरे शब्द नाहीत....

गुलजारसाहेबांच्या एकेका गाण्यासोबत छानशी संध्याकाळ घालवावी!

तात्या.

अवांतर : परंतु लेखन थोडं थोडक्यात व त्रोटक वाटलं. पोट भरलं नाही. अजूनही लिहा, अगदी भरभरून!

डॉ.प्रसाद दाढे's picture

17 Aug 2008 - 11:38 am | डॉ.प्रसाद दाढे

इतक्या सुंदर देशात सुबत्ता असताना कार्पेटच्या सुखद स्पर्शात अचानक वीस वर्ष जुना शहाबादी फरशीचा तो खडबडीत स्पर्श आठवतो जणू आत्ता पायाखाली आहे...
आणि ज्याला विअर्ड म्हणावं असं काही ... तो जुना स्पर्श अधिक हवा हवासा वाटतो...

क्या बात है!
(डोळ्यात का कुणास ठाऊक, पाणी आल॑..कचरा गेला बहुतेक..)

बबलु's picture

17 Aug 2008 - 12:27 pm | बबलु

मैत्र रे.... ए-वन !
गुलजार डबल ए-वन !! :)

http://www.gulzaronline.com/

....बबलु-अमेरिकन

मुशाफिर's picture

20 Aug 2008 - 4:29 am | मुशाफिर

मैत्र, फार छान लिहिलयं तुम्ही!

गुलजारची सगळीचं गाणी काही वैशिष्ट्यपूर्ण ओळी घेवून येतात आणि त्यातील काही काही उपमा तर फारचं वेगळ्या असतातं.

जसं, तुम्ही वर उल्लेख केलेल्या 'छोड आये हम' मधल्या या ओळी,
'जहां तेरी एडी सें धूप उडा करती थी,
सुना है उस चौखट पे अब शाम रहा करती है!'

अशा चमत्क्रुतीपूर्ण रचना हे त्याच्या काव्याचं व्यवच्छेदक लक्षणं आहे. आणि अशा रचनांमधून नेहमीच एक प्रकारची उदासीही जाणवत राहते.

गुलजार हे नावं घेतलं की मला हटकून आठवतं, ते म्हणजे 'ईस मोड से जाते है!'.
अप्रतिम काव्य म्हणजे काय? याचा प्रत्यय ह्या नितांतसुंदर गाण्याने मला वारंवार दिला आहे.
त्यातल्या,
' उस मोड पे बैठा हू!
जीस मोड से जाती है,
हर एक तरफ राहे,
इक रोज तो वोह होगा,
इस मोड पर आकर तूम,
रूक जाओगी कह दोगी,
वोह कौनसा रस्ता है?
जिस राह पे जाना है!'
ह्या ओळींनी तर कितीतरी वेळा एक अनामिक हूरहूर लावली आहे.

लता आणि किशोर यानीं ह्या काव्यातले भाव असे काही व्यक्त केले आहेत की क्या कहने?

गुलजारविषयी लिहाल तेव्हडं थोडचं आहे. पण अजून थोड लिहाचं!

मुशाफिर.

प्राजु's picture

20 Aug 2008 - 8:18 am | प्राजु

"फिरसे आईयो बदरा बिदेसी, तेरे पंख पे मोती जडूंगी' हे अतिशय आवडतं गाणं आहे..
तुम्ही सुंदर लिहिले आहे. इजाजत, लेकिन, रूदाली, खुबसूरत, अंगूर, बसेरा, सद्मा,नरम गरम.. किती नावे घ्यावीत. शब्दांची श्रीमंती आहे त्यांच्याकडे...
मी गुलझार साहेबांची खूप मोठी फॅन आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अनिल हटेला's picture

20 Aug 2008 - 8:31 am | अनिल हटेला

अगदी मनाला भावला हा लेख !!!

जुन्या आठवणी अगदी ताज्या झाल्या.......

आणी लेखन थोडं थोडक्यात व त्रोटक वाटलं. पोट भरलं नाही. अजूनही लिहा, अगदी भरभरून!

हेच म्हणतो.....

तुझसे नाराज नही जिंदगी ,हैराण हु मै........

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

स्वाती दिनेश's picture

20 Aug 2008 - 12:08 pm | स्वाती दिनेश

इतक्या सुंदर देशात सुबत्ता असताना कार्पेटच्या सुखद स्पर्शात अचानक वीस वर्ष जुना शहाबादी फरशीचा तो खडबडीत स्पर्श आठवतो जणू आत्ता पायाखाली आहे...
आणि ज्याला विअर्ड म्हणावं असं काही ... तो जुना स्पर्श अधिक हवा हवासा वाटतो...

अगदी सह अनुभूती झाल्यासारखे वाटले.

सुंदर लेख. गुलजारसाहेबांबद्दल अजूनही लिहा ना.. त्यांची शब्दांची श्रीमंती मोहून टाकते.
स्वाती

अमिगो's picture

20 Aug 2008 - 2:53 pm | अमिगो

सुंदर लेख...
तात्या म्हणतात तसे..गुलजारसाहेबांच्या एकेका गाण्यासोबत छानशी संध्याकाळ घालवावी!

गुलजारसाहेबांच असच एक गाण..
*****
मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है
सावन के कुछ भिगे भिगे दिन रखे है
और मेरे एक खत मैं लिपटी रात पडी है
वो रात भुला दो, मेरा वो समान लोटा दो
मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है

पतझड है कुछ... है ना ?
पतझड मैं कुछ पत्तों के गिरने की आहट
कानों मै एक बार पहन के लोट आयी थी
पतझड की वो शाख अभी तक काप रही है
वो शाख गिरादो, मेरा वो समान लोटा दो

एक अकेली छत्री मै जब आधे आधे भिग रहे थे
आधे सुखे आधे गिले, सुखा तो मैन ले आयि थी
गिला मन शायद बिस्तर के पास पडा हो
वो भिजवादो, मेरा वो समान लोटा दो

एक सो सोलह चांद की राते एक तुम्हारे खंदे का तिल
गिली मेहंदी कि खुशबु, झुट मुट के सिखवे कुच
झुट मुठ के वादे भी, सब याद करा दो
सब भिजवा दो, मेरा वो समान लोटा दो

एक इजाजत दे दो बस, जब ईसको दफनाउंगी
मैं भी वही सो जाउंगी
मैं भी वही सो जाउंगी

पद्मश्री चित्रे's picture

20 Aug 2008 - 3:10 pm | पद्मश्री चित्रे

लेख..
अजुन गाणी आणि लिखाण वाचायला आवडलं असतं...