अत्युच्च साहसी सायकलिंग...

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
6 Mar 2015 - 11:34 am

सायकल चालवणे ही काहींच्या सर्वसामान्य जीवनातली आवश्यकता आहे तर इतरांसाठी आरोग्यदायक व व्यायाम आहे. काहींसाठी ते स्वतःतील धमक आणि त्राण सहन करण्याची सीमा (stamina) सिद्ध करण्याचा आनंददायक खेळ आहे. काही थोड्यांनी या वरवर साध्या व सोप्या वाटणार्‍या आणि केवळ मानवी ताकदीवर चालवल्या जाणार्‍या दोनचाकी वाहनाला आपल्या साहसाची भूक भागविण्यासाठी एका उच्च स्तरावर नेऊन ठेवले आहे... तो खेळ, छंद अथवा वेड साहसी सायकलिंग (adventure cycling) या नावाने ओळखला जातो. ह्या खेळाची आवड असणारा काहीसा वेडा असलाच पाहिजे ! पण असले वेडेच "अशक्य म्हणजे जे आतापर्यंत केले नाही ते." हे सतत सिद्ध करत मानवी शक्यतेच्या सीमारेखा सतत विस्तारत आलेले आहेत !!!

डॅनी मॅक्आस्किल् हा त्यापैकी एक वेडा. त्याने स्कॉटलंडमधील स्काये बेटावरील एका पर्वतशिखरावर चक्क सायकल घेऊन चढाई केली. पर्वतशिखर काबीज करून तेथे तो सायकलवर बसलेला असताना काढलेल्या एका फोटोची नॅशनल जिऑग्रफिकच्या "20 Best Adventure Photos" मध्ये निवड झाली आहे. तो हा फोटो नॅशनल जिऑग्राफिकच्या संस्थळावरून साभार...

आणि हे त्याच्या चढाईचे चलत्चित्र, युट्युबवरून साभार...

क्रीडाआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Mar 2015 - 11:44 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

फारिनचा मोदक =))

पॉइंट ब्लँक's picture

6 Mar 2015 - 11:55 am | पॉइंट ब्लँक

जबरदस्त!

अद्द्या's picture

6 Mar 2015 - 11:59 am | अद्द्या

जिगर . .

कैलासवासी सोन्याबापु's picture

6 Mar 2015 - 12:07 pm | कैलासवासी सोन्याबापु

नसांत एड्रेनालाईन जाणावले !! उत्कृष्ट

अत्रन्गि पाउस's picture

6 Mar 2015 - 2:05 pm | अत्रन्गि पाउस

बघतांना

मोहनराव's picture

6 Mar 2015 - 2:35 pm | मोहनराव

अचाट साहस!!

असले कार्यक्रम आवडीने पाहतो.
नवीन प्रकारच्या धाग्याबद्दल इएक्का धन्यवाद.

ज्ञानोबाचे पैजार's picture

6 Mar 2015 - 2:51 pm | ज्ञानोबाचे पैजार

भन्नाट व्हिडीओ.

पैजारबुवा,

पियुशा's picture

6 Mar 2015 - 3:01 pm | पियुशा

भारी ....जिगरा लागतो अस कै करायला :)

बाप रे!चित्र बघुनच श्वास अडकला! बरं आहे हे लोक आपल्या घरातले नसतात!!

माम्लेदारचा पन्खा's picture

6 Mar 2015 - 4:44 pm | माम्लेदारचा पन्खा

(माताय...काय प्रश्न पडतात मला... ह्याचा विमा कोण काढणार? खास मध्यमवर्गीय विचार !!)

रेवती's picture

6 Mar 2015 - 5:08 pm | रेवती

बापरे! भारी मनुष्य आहे. आपल्याला नाही जमायचं!

कानडाऊ योगेशु's picture

6 Mar 2015 - 5:10 pm | कानडाऊ योगेशु

विडिओ पाहुन खरेच चाट पडलो. जास्त काय भावले असेल तर त्यानेही सायकलला सहचारिणीच समजुन दिलेली साथ.विडिओत मी हेच पाहत होतो कि पूर्ण शिखर तो सायकल वरुनच गेला आहे कि काय? तर तसे नाही आहे. तर त्याने तेव्हा सायकला व्यवस्थित पाठीवर घेऊन आपल्यासोबत शिखरावर नेले आहे. हॅट्स ऑफ. व शिखरावरच्या फोटोत ही तो सायकलवर नसुन सायकलसोबत आहे. अर्थात तिथे तेवढी जागाही नाही आहे पण तसे जुळुन आले आहे हे मात्र खरे.विडिओ च्या शेवटी विश्रांती म्हणुन बसताना त्याने सायकललाही अगदी अलगद जमिनीवर ठेवतानाच प्रसंगही खासच.! ही डॉक्युमेंटरी जितकी साहसिक आहे मला ती तितकीच रोमँटीक ही वाटली. धन्यवाद एक्का साहेब.!

अजया's picture

6 Mar 2015 - 6:19 pm | अजया

इतका थरारक व्हिडिओ आहे हा.मुलाला अभ्यासातुन उठवुन बघायला लावला!तो सायकल त्याच्या शरीराचाच भाग असल्यासारख्या वाट्टेल त्या कोनातुन उड्या मारतो,दगड ओलांडतो,न घसरता लीलया खाली येतो!वर जाताना डोंगराच्या धारेवरुन तर हायवेवरुन चालल्यासारखा आरामात चालवतो सायकल.हॅट्स अाॅफ.
धन्यवाद,शेअर केल्याबद्दल.

सौन्दर्य's picture

6 Mar 2015 - 8:22 pm | सौन्दर्य

नुसतं बघतानाच पाय थरथरले, पुढे काय बोलू !

उपाशी बोका's picture

6 Mar 2015 - 8:28 pm | उपाशी बोका

ही एक फिल्म आहे आणि डॅनी हा प्रोफेशनल आहे. तूनळीवरील Dreez76 ची प्रतिक्रिया बोलकी आहे.

I'm not saying this is fake, but in a way it is.. because everything he does is pre-scouted and he knows exactly where to go. It would be an entierly different matter if it wasn't.
When he rides down the mountain, the path has been checked beforehand to see which is the best way down, checking for loose rocks and boulders which otherwise could cause a slip or fall.
It would be like having someone racing through the streets with a formula One car, but first you make sure there aren't any pedestrians or cars around that can cause an accident.

Not saying i could do it, i get tingling in my legs just watching those heights, just saying; try doing it un-scouted next time and film it - directors cut style.

चिगो's picture

27 Mar 2015 - 1:01 pm | चिगो

ही एक फिल्म आहे आणि डॅनी हा प्रोफेशनल आहे.

मान्य.. शंभर टक्के मान्य.. पण म्हणून काय प्रोफेशनल माणसाने काळजी घेऊ नये?

When he rides down the mountain, the path has been checked beforehand to see which is the best way down, checking for loose rocks and boulders which otherwise could cause a slip or fall.

म्हणजे काय? (हे त्या प्रतिसादकर्त्या/कर्तीसाठी) डॅनीची एक चूक, पायाखाली असलेली प्रचंड खोली बघून क्षणभरासाठी आलेली भोवळ त्याच्याकरीता प्राणघातक ठरु शकते. असं असतांना त्याने "स्काऊट" करु नये, ढिसूळ किंवा लूज रॉक्सवरुन सायकल चालवावी, हा बिनडोक सल्ला का? तो तिथे त्याची साहसिक खाज मिटवायला गेला होता, मरायला नाही.. हे म्हणजे "विमानातून उडी मारतांना पॅराशूट घालून उडी मारण्यात कसलं आलं साहस? दम असेल तर बिनापॅराशूट उडी मार" असा दिवानखान्यातून सला देण्यासारखं आहे..

डॅनीचे अभिनंदन आणि त्याच्या वेड्या साहसाला सलाम.. इएसाहेबांचे लेख आणि विडीओसाठी धन्यवाद..

मोदक's picture

27 Mar 2015 - 1:28 pm | मोदक

When he rides down the mountain, the path has been checked beforehand to see which is the best way down, checking for loose rocks and boulders which otherwise could cause a slip or fall.

हे सुटे दगड किंवा खडक "फायनल टेक" च्यावेळीही कोसळू शकतातच.

एकाच रस्त्यावरून; त्याच वेळी; तशाच वातावरणात कोणत्याही वाहनाने केलेला प्रवास "पूर्वीच्या एखाद्या वेळेसारखा" कधीही नसतो. शारिरीक क्रीडाप्रकारात तर नाहीच नाही.

मोदक यांच्या सायकलींग करताना..
या धाग्यावरील माझा एक जुना प्रतिसाद आठवला.
थोडा विरंगुळा हवाच जीवनात! आयुर्हित - Fri, 10/10/2014 - 13:09

एक एकटा एकटाच's picture

6 Mar 2015 - 10:13 pm | एक एकटा एकटाच

जबरदस्त!!!!!!!

प्रचेतस's picture

7 Mar 2015 - 9:04 am | प्रचेतस

जबरदस्त व्हिडियो आहे.

काय वेडं लागलय? नुसत पायाने चढण नाही जमायचं आणि सायकल आणि कशाला म्हणते मी?

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Mar 2015 - 9:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा अजून एक "साहसी सायकलिंग आणि फ्री फॉल" यांचे जुळे असलेल्या खेळ (इथे खेळ या शब्द सर्व अर्थांनी खरा आहे !) नॅशनल जिऑग्राफिकवर सापडला...

वेडाची केवळ परिसीमा !!!

मोदक's picture

26 Mar 2015 - 10:46 pm | मोदक

भारी व्हिडीओ...!!

वेल्लाभट's picture

27 Mar 2015 - 2:12 pm | वेल्लाभट

कहर्र !
जबर आवडलंय....

वेड... एकच शब्द.

स्थितप्रज्ञ's picture

20 Feb 2017 - 12:38 pm | स्थितप्रज्ञ

असले पर्वत शिखर मी सायकल सोडा पण रांगत पण नाही चढू शकणार....हा पठ्ठ्या सायकल खांद्यावर घेऊन चदला.....टोप्या बाहेर!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Feb 2017 - 1:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा एक पठ्ठ्याच्याही करामती पाहण्यासारख्या आहेत (जालावरून साभार)...

स्थितप्रज्ञ's picture

20 Feb 2017 - 3:17 pm | स्थितप्रज्ञ

अर्रर्रर्रर्रर्र.....हा विडिओ ब्लॉक झालाय

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Feb 2017 - 6:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

मला तर दिसतोय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Feb 2018 - 9:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा एक्स्ट्रीम सायकलिंगचा अजून एक नमूना... रेड बुल रँपेज...

डॉ श्रीहास's picture

20 Jun 2018 - 6:01 am | डॉ श्रीहास

डॅनी ....

आम्हा हौशी सायकलीस्ट्स चा देव आहे हा माणूस _/\_ .