हे झोल नेमके आहेत तरी काय ?

कोंबडी प्रेमी's picture
कोंबडी प्रेमी in काथ्याकूट
21 Feb 2015 - 11:04 am
गाभा: 

एक क्षणभर स्वस्थपणे थांबून कुणी खालील मुद्द्यांवर ह्यावर प्रकाश टाकेल काय ?

१. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर नक्की आक्षेप काय आहेत ?
२. स्वातंत्र्यवीर सावरकर: नक्की आक्षेप काय आहेत ?
३. कम्युनिझम : नक्की आक्षेप काय आहेत ?
४. सुभाषचन्द्र बोसांवर आलेली कोन्ग्रेसमधून हकालपट्टी ची आफत का आली होती
(थोडे ऑफ द ट्रॅक पण तरीही)
५. रेडियोवर पूर्वी असलेली हार्मोनियम / ऑर्गन वर बंदी का होती आता ती का बदलली

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

21 Feb 2015 - 11:24 am | माईसाहेब कुरसूंदीकर

कोंबडी प्रेम्या,पहिल्या चार प्रश्नांची उत्तरे द्ययची तर एक क्षण काय्,एक महिनाही पुरा पडणार नाही मिपावर.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Feb 2015 - 11:50 am | डॉ सुहास म्हात्रे

माईसाहेब, त्यांचं तेच म्हणणं दिसतयं ! लिहिलेले / न लिहीलेले / दोन ओळींमधले / इ इ परत वाचून पहा. म्हणजे तुम्हाला असे दिसेल... "एक क्षणभर स्वस्थपणे थांबून (भले महिनो-महिने चर्चा करा, करत रहा, करत रहा *... )"

दोन क्षणभर स्वस्थपणे थांबून वाचल्यास त्यांत मुविंचा हजारी प्रतिसादांचा विक्रम तोडण्यासाठी केलेला क्षीण पयत्नही दिसू शकेल +D

=======

* "धुवत रहा, धुवत रहा... " टीव्हीवरील जाहिरातीच्या सुरात म्हणा :)

मितान's picture

21 Feb 2015 - 12:56 pm | मितान

मला फक्त ५ वा प्रश्न विंट्रेष्टिंग वाटतोय. वाट बघते उत्तराची.

कोंबडी प्रेमी's picture

21 Feb 2015 - 12:59 pm | कोंबडी प्रेमी

एवढेच नम्रपणे सांगतो ...

संदीप डांगे's picture

21 Feb 2015 - 1:45 pm | संदीप डांगे

५. रेडियोवर पूर्वी असलेली हार्मोनियम / ऑर्गन वर बंदी का होती आता ती का बदलली

भारतामध्ये सुरुवातीला जेंव्हा हार्मोनिअम हे वाद्य आले तेंव्हा ते पाश्चात्य सुरावटी व त्यांच्या संगीतासाठी पूरक अशा प्रकारचे होते. भारतीय अभिजात संगीतातली नजाकत, स्वरांची आंदोलने, आरोह, अवरोह, मिंड इत्यादी गोष्टींना इतर देशी वाद्यांच्या तुलनेत ते पुरे पडत नव्हते. बरेच शास्त्रीय गायक साथीला हार्मोनिअम घेत नव्हते ते याचसाठी. त्याचबरोबर थोडा देशभक्तीचापण भाग होता.

याच कारणांसाठी १९४० ते १९७१ पर्यंत ऑल इंडिया रेडिओवर हर्मोनिअमला बंदी होती. पुढे भारतीयांनी या वाद्यात आपल्या सोयीनुसार बरेच बदल करून घेतले आणि शास्त्रीय साथीला त्यास सिद्ध केले. परंतु अजूनही रेडिओवर एकल वादनास (solo performance) हार्मोनिअमवर बंदी आहे

असो. शास्त्रीय गायनास अजूनही साथीसाठी जे वाद्य घेतले जाते त्यात सारंगीला तोड नाहीच.

बादवे, ह्या उत्तरास किती मार्क मिळतील?
(जाहिरात: बारावी भारतीय संगीत इतिहासाच्या विषयात १०० पैकी ८० मार्क मिळवलेला संगीतप्रेमी) :-)

कोंबडी प्रेमी's picture

21 Feb 2015 - 2:12 pm | कोंबडी प्रेमी

म्हणजे ऑर्गन /हार्मोनियम जर साथीला पूरक नव्हते तर गायक ते साथीला नं घेते ... अर्थात त्या काळापर्यंत नाट्यसांगितला ऑर्गन तर सर्रास वापरला जाई ...म्हणजे गायकांचा विरोध नसावा ...

पुढे भारतीयांनी या वाद्यात आपल्या सोयीनुसार बरेच बदल करून घेतले आणि शास्त्रीय साथीला त्यास सिद्ध केले

कोणते बदल??

शास्त्रीय गायनास अजूनही साथीसाठी जे वाद्य घेतले जाते त्यात सारंगीला तोड नाहीच

गेल्या २०-२५ वर्षात सारंगी साथीला घेणारे प्रमुख / महत्वाचे कलाकार कोण ?

संदीप डांगे's picture

21 Feb 2015 - 3:03 pm | संदीप डांगे

प्रश्नांतून फक्त प्रश्न निर्माण होत असतील तर या विषयावर स्वतंत्र धागा काढायला लागेल...

कोंबडी प्रेमी's picture

21 Feb 2015 - 5:11 pm | कोंबडी प्रेमी

मला वितंडवाद नाही घालायचा ...पण खरच उत्तरे शोधतोय..

संदीप डांगे's picture

21 Feb 2015 - 5:39 pm | संदीप डांगे

म्हणूनच म्हटले की हा एक स्वतंत्र अभ्यासपूर्ण लेखाचा विषय आहे. मी वर जे दोन चार ओळीत उत्तर दिले ते फक्त तुमच्या प्रश्नाचे थेट उत्तर आहे. पण त्यासोबतच त्याविषयाला धरून इतरही राजकिय, सामाजिक, सांस्कॄतिक मुद्दे आहेत जे विस्तॄत मांडल्यास एकूण इतिहास स्पष्ट होइल. आंजावर काही संदर्भ मिळ्तात का ते बघतो...

बहुगुणी's picture

22 Feb 2015 - 6:37 am | बहुगुणी

या दुव्यानुसार आकाशवाणीच्या या निर्णयामागे गुरूदेव रविंद्रनाथ टागोर होते असं दिसतं.

सोयीसाठी खालील उतारा उधृत करतो आहे:

The real reason behind this decision was Rabindranath Tagore, who did not think that the harmonium has or should have anything to do with Indian music. So, he had shot off a terse letter to the then Calcutta Bureau chief of Akashvani, Shri Asoke Kumar Sen, on 19/21 January, 1940.

Uttarayan

Santiniketan, Bengal

January 19/21, 1940

Ref: D.O. GC 1414 dated 17.1. 40

————–

Dear Ashoke,

I have always been very much against the prevalent use of the harmonium for purposes of accompaniment in our music and it is banished completely from our asrama. You will be doing a great service to the cause of Indian music if you can get it abandoned from the studios of All India Radio.

Yours sincerely,

Rabindranath Tagore

————————

Sj. Ashoke Kr. Sen

All India Radio

1, Garstin Place, Calcutta

And who can disregard Tagore of the late 1930s? Naturally the harmonium, promptly and with an air of finality, did make an exit from radio stations beginning March 1, 1940. It reappeared on July 9, 1974 on AIR,

विशाखा पाटील's picture

21 Feb 2015 - 1:55 pm | विशाखा पाटील

प्रश्न गंभीर आहेत खरे. त्यावर यात उल्लेख केलेल्या तीन पंथांची मंडळीच प्रकाश टाकू शकतील. या प्रश्नांची उत्तरे शोधताना लोक आयुष्य घालवतात. त्यातलं कुणी क्षणभर स्वस्थपणे थांबून सांगतात का बघायचे...

म्हया बिलंदर's picture

21 Feb 2015 - 6:20 pm | म्हया बिलंदर

कोंबडी पयले की अंडा ??
आयच्यान खरंच उत्तरं शोधतोय

संदीप डांगे's picture

21 Feb 2015 - 6:58 pm | संदीप डांगे

सगळं काही अंड्यातूनच निपजलं आहे.

म्हया बिलंदर's picture

22 Feb 2015 - 8:31 am | म्हया बिलंदर

ते अंडं कोणी दिलं??

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Feb 2015 - 8:36 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

जगन्माउली डार्विननं =))

म्हया बिलंदर's picture

22 Feb 2015 - 11:50 am | म्हया बिलंदर

बिलंदर खुश...............................

विवेकपटाईत's picture

21 Feb 2015 - 6:55 pm | विवेकपटाईत

पुरोगामित्व आणि धर्मनिरपेक्षत्व सिद्ध करण्यासाठी क्र. १-३ चा विरोध आवश्यक आहे.
गांधीजींचे अनुयायी अहिंसक वृत्तीचे, मागे चालणार्या शेळींसारखे. नेताजी तडफदार वृत्तीचे. हकालपट्टी होणारच..

श्रीगुरुजी's picture

21 Feb 2015 - 9:13 pm | श्रीगुरुजी

विचारवंत, बुद्धीप्रामाण्यवादी, निधर्मी, पुरोगामी, लोकशाहीवादी, बहुजनसमाज हितकर्ता, दलित हितकर्ता, अल्पसंख्याक हितकर्ता इ. पदव्या हव्या असतील भारतामध्ये तर "हिंदू" या शब्दाची अ‍ॅलर्जी असणे सक्तीचे आहे. त्यामुळे "हिंदू" हा शब्द ज्यांच्या अभिमानाचा विषय आहे ते आपोआपच अंधश्रद्ध, जातीयवादी, प्रतिगामी, साम्राज्यवादी, राष्ट्रवादी, हुकूमशाहीवादी, बूर्झ्वा, ब्राह्मण्यवादी, बहुजनसमाजविरोधी, दलितविरोधी, अल्पसंख्याकविरोधी इ. ठरतात.

या वस्तुस्थितीचा आधार घेऊन तुमच्या प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे -

>>> . राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर नक्की आक्षेप काय आहेत ?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही अंधश्रद्धा जोपासणारी, जातीयवादी, प्रतिगामी, साम्राज्यवादी, राष्ट्रवादी, हुकूमशाहीवादी, बूर्झ्वा, ब्राह्मण्यवादी, बहुजनसमाजविरोधी, दलितविरोधी, अल्पसंख्याकविरोधी इ. असलेली संघटना आहे कारण ही संघटना 'हिंदू' संघटन, भारत राष्ट्र इ. विषयी कार्य करते.

>>> २. स्वातंत्र्यवीर सावरकर: नक्की आक्षेप काय आहेत ?

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अहिंसेच्या मार्गाने जाण्याऐवजी सशस्त्र क्रांतीचा मार्ग चोखाळण्याची चूक केली. त्याबरोबरीने ते सुद्धा 'हिंदू' संघटन, भारत राष्ट्र इ. विषयी बोलत व लिहीत असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल जे आक्षेप आहेत तेच आक्षेप त्यांच्या बाबतीतही आहेत.

>>> ३. कम्युनिझम : नक्की आक्षेप काय आहेत ?

हुकूमशाही, सशस्त्र उठाव, अमेरिकेचा आंधळा विरोध, चीन व रशियाविषयी आंधळे प्रेम, हिंसाचार वर्ज्य नसणे, विरोध सहन न होणे, अराजक माजविणे, भांडवलदारांना विरोध, पोथीनिष्ठता ... असे अनेक आक्षेप आहेत.

>>> ४. सुभाषचन्द्र बोसांवर आलेली कोन्ग्रेसमधून हकालपट्टी ची आफत का आली होती

अहिंसेऐवजी सशस्त्र मार्गाने स्वातंत्र्य मिळविण्याचे केलेले प्रयत्न, गांधीजींच्या इच्छेविरूद्ध मिळविलेले काँग्रेसचे अध्यक्षपद इ. कारणे असावीत.

श्रीरंग_जोशी's picture

22 Feb 2015 - 9:42 am | श्रीरंग_जोशी

प्रश्न क्र. २ साठी मिपाकर राजघराणं यांच्या चेपुवरील खालील पोस्ट्स वाचून पाहा. नेमकी उत्तरे मिळतील का ते सांगणे अवघड आहे पण या विषयावर मोलाची माहिती मिळेल हे नक्की.