तुला खात्री आहे?

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जे न देखे रवी...
9 Aug 2008 - 10:26 pm

भोवती बघ..
थोडं तु खाली बघ
इथे दिसणारे चेहरे बघ...
तुला खात्री आहे?तुला इथेच पोचायचं होतं?

हे तुझ्या भोवतीचे मित्र...
पण हे आहेत का "खरे" मित्र?
ते करतील का तुझ्यावर माझ्याइतकं प्रेम?
तुला खात्री आहे? तुला इथेच पोचायचं होतं?

तु "हे" आयुष्य जगायच्या इतक्या घाईत आहेस
त्यासाठी इतक्या वेदना दिल्यास.. दुखावलं आहेस

भोवती बघ.. अगदी नीट बघ
फक्त दोघे..तु आणि मी
तुला खात्री आहे? तुला इथेच पोचायचं होतं?

माझ्या अश्रुंमुळे मन वळवू नकोस, मी रडत नाहि...
हे अश्रु हल्ली माझा भाग झाल्यासारखे वाटतात

भोवती बघ.. अगदी नीट बघ
सगळ्या भोवतालच्या सवयीच्या लोकांना बघ
तुला खात्री आहे? तुला इथेच पोचायचं होतं?

हे एका इंग्रजी गाण्याचं शब्दशः भाषातंर आहे. (होय इथे हे स्वैर / मुक्तछंदात वाटणारी कविता असली तरी गाणंच आहे ;) )
बघा ओळखता येतंय का? मुळ गाणं फार प्रसिद्ध आहे की नाहि कल्पना नाहि पण मला खूप आवडतं. भाषांतर करताना गाण्याच्या आशयाचा दर्जा घसरला आहे याची पुरेपुर जाणीव आहे. पण एक शब्दशः भाषांतर करायचा प्रयत्न करायचं फार दिवस मनात होतं म्हणून हे!

उत्तर व्यनीतून कळवा... पुढच्या शनिवारी इथे उत्तर देईनच

मुक्तकप्रतिभाभाषांतर

प्रतिक्रिया

पिवळा डांबिस's picture

9 Aug 2008 - 10:32 pm | पिवळा डांबिस

मूळ गाणं ओळखता आलं नाही...
पण कविता मात्र भावली.
अतिशय समर्पक....
:(

स्वाती दिनेश's picture

9 Aug 2008 - 10:35 pm | स्वाती दिनेश

ऋषिकेश,
मूळ गाणं ओळखता आलं नाही...
पण कविता मात्र भावली.
सुलेशबाबूंसारखेच म्हणते.
स्वाती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Aug 2008 - 10:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋषी,
मूळ गाणं ओळखता आलं नाही...
पण कविता मात्र भावली.

विसोबा खेचर's picture

10 Aug 2008 - 3:56 am | विसोबा खेचर

सुंदर कविता रे ऋषिकेशा!

तात्या.

प्राजु's picture

10 Aug 2008 - 4:25 am | प्राजु

गाणे कोणते आहे रे?? सांग ना...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

ऋषिकेश's picture

23 Aug 2008 - 10:22 pm | ऋषिकेश

मुळ गाणं:

Willie Nelson LyricsAre You Sure Lyrics

उशीरा दिल्याबद्दल क्षमस्व

-('मिसळ'लेला) ऋषिकेश