गाभा:
माझा हा मिसळपाव वरचा पहिलाच लेख.
आपल्या भोवती अनेक माणसे असतात जसे नातेवाईक, मित्र, मैत्रिणी, सहकारी वगैरे. प्रत्येक माणसाचे काही चांगले गुण आणि काही वाईट गुण असतात. इथे आपण एखाद्या माणसाचे चांगले गुण आणि वाईट गुण यांची यादी करू. त्यातून कदाचित नवीन चांगले गुण कळतील. आणि एखाद्याकडे बघण्याचा नवीन दृष्टीकोन मिळेल. आणि वाईट गुण टाळता येतील. माणसाचा उल्लेख करण्याची आवश्यकता नाही. नुसत्या गुण दोष चर्चा करूया.
उदाहरणार्थ- चांगले गुण- टापटीप पणा, शिस्त, साधेपणा
वाईट गुण - विचार न करता एकदम बोलणे, टोमणे मारणे वगैरे वगैरे.
प्रतिक्रिया
14 Oct 2014 - 9:08 pm | स्पा
अमची माऊ ताई खुप खुप चांगली आहे. ती गोड गोड साबुदाण्याच्या गोळ्या खायला देते,चान चान पुस्तक वाचायला देते
14 Oct 2014 - 9:14 pm | सुहास..
२४९०९ !! अजुन ९१ झाले की २५००० हजार होणार , आजुन किती आणी काय काय वाचायला मिळणार काय माहीत या आयडींच्या कोंडाळ्यात ...
14 Oct 2014 - 9:23 pm | बहुगुणी
अबोली: 'काथ्याकूटा'त धागा टाकलाय तर, नावं न घेता पण काही उदाहरणं वगैरे देऊन, आणखी थोडं विस्ताराने लिहायचं होतंत, म्हणजे तुम्हाला अपेक्षित असलेली चर्चा घडेल (नाहीतर नाहक चेष्टा होईल). असं विस्ताराने तुम्ही प्रतिसादातही लिहू शकता (आणि ते लवकर करा, नाहीतर 'धाग्याचं काश्मीर' होईल ;-) ).
असो, बाकी दोन सद्गुण वरती दिसले असतीलचः
स्पा-भाऊ --> नव्या लेखकांना प्रोत्साहन देणं
सुहास-भाऊ--> स्पष्टवक्तेपणा
:-)
14 Oct 2014 - 9:32 pm | मुक्त विहारि
माझ्या द्रुष्टीने माझे चांगले गूण (जे उधळायचेच असतात ते...)
चांगले गूण : बियर पिणे आणि पाजणे . भरपूर सिग्रेटी फुंकणे. सण-वार वगैरेची चिंता न करता बिंधास्त नॉन-व्हे़ज खाणे.हातात एखादे उत्तम पुस्तक आले की, बायको बरोबर संध्याकाळी फिरायला न जाणे.
वाईट गूण : हिंदी सिनेमे न बघणे...चुकुनही टी.व्ही. वरच्या मालिका न बघणे.
15 Oct 2014 - 4:49 am | अत्रुप्त आत्मा
चांगले गुण:- काही धागे उघडणे.
वाईट गुण:- काही धागे न उघडण
=====================
संयुक्त गुण:- सुखाने जगणे व् जगू देणे! ;-)
15 Oct 2014 - 4:50 am | अत्रुप्त आत्मा
चांगले गुण:- काही धागे उघडणे.
वाईट गुण:- काही धागे न उघडण
=====================
संयुक्त गुण:- सुखाने जगणे व जगू देणे! ;-)
15 Oct 2014 - 8:40 am | अर्धवटराव
जगु आणि देणे यांमधे कंसातला 'न' टंकायचा राहिला का हो गुर्जी =))
15 Oct 2014 - 12:16 pm | अत्रुप्त आत्मा
@कंसातला 'न' टंकायचा राहिला का हो गुर्जी >>> =)) अगदी अगदी.. ह्रायलाच बगा! =))
15 Oct 2014 - 6:09 am | जेपी
चांगले गुण.- नविन लेखकाच्या धाग्यावर मी पयला प्रतिसाद देऊन त्यांचे कौतुक करणे
वाईट गुण-नविन लेखकाच्या धाग्यावर मी पयला प्रतिसाद देऊन त्यांचे कौतुक करणे.
आणी
मी पयला.
15 Oct 2014 - 8:30 am | सतिश गावडे
चांगले गुणः प्रतिसादाची पिंक टाकण्याची प्रबळ उबळ दाबून टाकणे
वाईट गुणः चांगल्या धाग्यांवर लेखन आवडले असूनही प्रतिसाद द्यायला आळस करणे.
15 Oct 2014 - 11:33 am | माम्लेदारचा पन्खा
चांगला गुण- माणूस म्हणून जन्माला येणे
वाईट गुण- आपण माणूस आहोत हेच विसरून जाणे
16 Oct 2014 - 7:58 pm | मितान
क्या बात है !!!
16 Oct 2014 - 8:50 pm | बहुगुणी
लाजवाब!
17 Oct 2014 - 7:36 am | सस्नेह
अत्यंत मूलगामी गुण
15 Oct 2014 - 11:46 am | स्वामी संकेतानंद
चांगला गुण : एखादा वाईट गुण असणे
वाईट गुण : एखादाच चांगला गुण असणे
15 Oct 2014 - 11:59 am | आदूबाळ
"वाईट गुण" हे नेमका काय प्रकार असावा ते समजून घेण्यासाठी धागा उघडला तर लोक्स वेगळीकडेच निघालीयेत...
16 Oct 2014 - 8:11 pm | असंका
+१
अजूनही दुसरीकडेच चाललेत...
16 Oct 2014 - 4:23 pm | वेल्लाभट
गुणकोष बनवायचाय काय?
चांगला गुण : दुस-याचं ऐकून घेणे
वाईट गुण : स्वतःचं बोलू न शकणे
16 Oct 2014 - 4:40 pm | ज्ञानोबाचे पैजार
मुळात लेखिकेनी बनवलेली चांगल्या आणि वाईट गुणांची यादीच गंडलेली आहे.
लेखिकाबाईं कडून चांगले कशाला म्हणायचे आणि वाईट कशाला म्हणायचे याची चौकट फिक्स करुन मिळाली तर बरे होईल.
म्हणजे कोणत्या कप्यात काय टाकायचे ते जरातरी स्पष्ट होईल.
पैजारबुवा,
16 Oct 2014 - 5:50 pm | पैसा
सूड मोड ऑन>>>
या माहितीचा नक्की उपयोग कसा करणार ते आधी सांगा मग विचार करेन. >>>>
सूड मोड ऑफ्फ.
16 Oct 2014 - 7:12 pm | मुक्त विहारि
आणि
आपले वाइट गूण आपल्यापाशीच ठेवायचे...
(हाकानाका)
16 Oct 2014 - 7:38 pm | सूड
माझ्या मनातला प्रश्न आधीच आला असल्यामुळे पास!!
नुसत्या चर्चा करुन काय उपयोग? बदल त्याचं काय? मला माझे वाईट (मला स्वत:ला खटकणारे, दुसर्यांच्या सूचना मी कोण सांगतंय त्यावर त्या किती लक्ष देण्यालायक हे ठरतं.) गुण बदलणं प्रचंड अवघड जातं. पूर्वी दुसर्यांकडून चांगल्या वागण्याची अपेक्षा असायची आता बर्याच प्रमाणात ती नसते.
अपेक्षाच ठेवली नाही की पुढले सगळे प्रश्न चटाचट सुटतात.
आणखी एक म्हणजे समोरची व्यक्ती ही 'माणूस/मानव' आहे, ती ती व्यक्ती तिच्या तिच्या तत्कालीन विचार मनस्थितीनुसार कशीही रिअॅक्ट होऊ शकते. राग/आपुलकी दोन्ही तात्कालिक असू शकतं. त्यामुळे एकदा रागावलेली व्यक्ती मैत्री खात्यात येणार नाही असंही नाही आणि आपुलकी दाखवणारी व्यक्ती मैत्री खात्यात कायमचीच राहील असंही नाही.
असो...आता टंकाळा आलाय. उर्वरित तुम्ही ह्या विद्याचं (विदा या शब्दाचे षष्ठी एकवचन उगा गैरसमज नको)नक्की काय करणार आहात ते कळलं की टंकणार.
16 Oct 2014 - 8:06 pm | एस
मिपावरील तुमच्या पहिल्याच लेखावर धुळवड खेळणे हा वाईट गुण. खूप छान प्रयत्न, लिहीत रहा असे म्हणून नवलेखकांना उत्तेजन देणे हा चांगला गुण.
असोत. मनापासून शुभेच्छा.
17 Oct 2014 - 7:42 am | सस्नेह
विचारमंथनाला चालना देऊन उत्तम प्रतिसाद-नवनीत आणल्याबद्दल धागाकर्तीचे आभार !