दाक्षिणात्य भाषातील शब्दांची देवनागरी-मराठी लेखन उच्चारण इत्यादी

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
17 Aug 2014 - 10:15 am
गाभा: 

दाक्षिणात्य भाषातील काही शब्दांचे देवनागरी-मराठी लेखन उच्चारण इत्यादी क्वचीत कठीण भासू शकते त्या बद्दल आवश्यकतेनुसार चर्चा करून माहिती घेता यावी या साठी हा धागा काढत आहे.

मराठी विकिपीडियावरील भारतीय अक्षरांतरण हा (आयपीए लेखांतर्गत) विभाग लेखन विषयक मदतीसाठी उपलब्ध आहे.

या धाग्या अंतर्गत पहिला शब्द കാഞ്ഞങ്ങാട് भाषा मल्याळम केरळराज्यातील कासरगोड जिल्ह्यातील एक गाव / शहर കാഞ്ഞങ്ങാട് याचे देवनागरी- मराठी लेखन ' काञ्ञङ्ङाट् ' असे होते याची जवळपास निश्चित माहिती मिळाली आहे. ञ स्वतःच जोडाक्षर होऊन दोनदा पाठोपाठ ङ च जोडाक्षर आकारांत ङ (ङा) शी 'ञ्ञङ्ङा' असे पाठोपाठ अनुनासिक उच्चारण सर्वसाधारणपणे मराठी माणसाला करण्याची वेळ येत नाही ' काञ्ञङ्ङाट् ' चे उच्चारण कसे करत असावेत/ करावे/ करता येईल

प्रतिक्रिया

माहितगार's picture

17 Aug 2014 - 12:14 pm | माहितगार

आपले या धाग्यावरील प्रतिसाद प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील

वेल्लाभट's picture

18 Aug 2014 - 11:54 am | वेल्लाभट

काय्यंगाट हा शब्द सर्दी झालेल्या माणसाने उच्चारला तर ... तसा काहीसा उच्चारावा.

आयुर्हित's picture

19 Aug 2014 - 3:14 pm | आयुर्हित

कायंनाड

कंजूस's picture

19 Aug 2014 - 8:26 pm | कंजूस

१) काच्यँगोड़ . २)काऽच्यँङगोड़
त्रिशुर हा शब्द तिकडे त्रुशुर लिहितात .कोझिकोड हे कोह्ळीकोड़ आहे .

ते मरो, इथे मित्रमंडळ गोव्याला गेलं होतं तर पर्वरीला पोर्वरीम, म्हापशाला मापुसा वैगरे काहीतरी बरळत होते. त्या शिंच्या पोर्तुगिजांनी उच्चारांची वाट लावलेनीत, आपल्या लोकांच्या अकला खरे उच्चार कळून पण पाह्यजे तिथे काम करत नाहीत. असो.

अत्रुप्त आत्मा's picture

19 Aug 2014 - 8:43 pm | अत्रुप्त आत्मा

कॉलिंग खाटुकम्यान!!!

श्रीरंग_जोशी's picture

19 Aug 2014 - 10:25 pm | श्रीरंग_जोशी

या विषयाशी संबंधीत माझा दोन वर्षांपूर्वीचा एक धागा आहे.

दक्षिण भारतीयांच्या विचित्र उच्चार पद्धती व स्पेलिंग लिहिण्याच्या त-हा

त्यावर अनेक जाणकारांनी माहितीपूर्ण प्रतिसाद दिले आहेत. कदाचित आपल्याला हवी असलेली माहिती मिळेल.