मँगो मुस

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in पाककृती
2 Jun 2014 - 7:27 pm

जल्ला ह्या उन्हाच्या काहिलीवर अजुन एक A1 उतारा....

dish 1

साहित्यः
१. हापुस आंबे - ४ (ईसीली नाहिच मिळाले तर टिन मधला रस वापरा)
२. व्हिपिंग क्रिम - २५० मिली
३. मँगो जेली १ पाकिट
४. साखर आंब्याच्या गोडिनुसार कमी/जास्त
५. सजावटि साठि (टिप नं २ बघा)

कॄती:
१. आंब्यांचा रस मिक्सर मधुन काढा. गाळण्याने गाळुन घ्या जेणेकरुन टेक्श्चर स्मुथ येईल शीवाय खाताना रेषा/धागे तोंडात येणार नाहि

Dish 2

Dish 3

२. अर्धा कप पाणी मायक्रोवेव मधे एक १५ सें. गरम करुन मँगो जेलीची पुड त्यात भीजत ठेवा

Dish 4

३. लिक्विड क्रिम आणि साखर ईलेक्ट्रिक बीटर ने क्रिम व्हिप्ड होईस्त फेटुन घ्या. बीटर नसल्यास ब्लेंडर मधे फेटुन घ्या. आवश्यकती घनता येईस्त हळू हळु करुन मिक्सर फिरवा अन्यथा क्रिम वेगळं होईल

Dish 5

४. आता हलक्या हाताने आंब्याचा रस, जिलेटिनमिश्रित पाणी आणि व्हिप्ड क्रिम मिक्स करा

Dish 6

५. आवडत्या मोल्ड मधे घालुन मुस फ्रिज मधे सेट होण्यास ठेवा. एक ४-५ तासात थंडगार मुस चा आस्वाद घ्या

Dish 8

टिपा:

१. मँगो एवजी त्या त्या सीजनची फळं घालुन वेगवेगळ्या चवीचं मुस बनवु शकता
२. मी आंब्याच्या फोडिंचे क्युब्स करुन बदाम/पिस्त्याच्या कापांनी डेकोरेट केले. पर्याय बरेच आहेत उदा.
अ. सेट झालेल्या मुसवर सर्व करण्याआधी मिक्सर मधुन फिरवलेला आंब्याचा रस घाला व ड्राय फ्रुट्सनी सजवा
ब. सेट झालेल्या मुसवर हलकासा चॉकलेट सॉस ड्रिझल करा व अर्धी स्ट्रॉबेरी (पानासहित) ठेवा. हेच कॉम्बों उलटंहि करता येईल
क. आंब्याच्या क्युब्स वर कॅरमलाईज्ड झालेल्या साखरेची वेगवेगळि डिझाईन्स पेरा
३. उरलेलं मुसचं मिश्रण डिप फ्रिजर मधे ठेवा. एक उत्तम, स्मुथ टेक्च्शरचं, प्युअर मँगो फ्लेवरचं आईसक्रिम एंजॉय करु कराल ह्याची खात्री बाळगा

चला तर मग....अजीबात वेळ दवडु नका. उन्हाळा आणि आंबे आहेत तोवर ह्या मुस चा आस्वाद घ्या.

Dish 7

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

2 Jun 2014 - 7:31 pm | मुक्त विहारि

हलकट..

ह्या ऐन हापूसच्या हंगामात आम्ही इकडे, अन तुम्ही लेको रोज मँगो केक खा अन मँगो मूस ओरपा.

करा चैन...

आता येच तू डोंबोलीला...

प्रभाकर पेठकर's picture

2 Jun 2014 - 7:36 pm | प्रभाकर पेठकर

मस्तं. डायबेटीस विसरायला लावणारी पाककृती. मोहात पाडते आहे.

मुक्त विहारि's picture

2 Jun 2014 - 7:41 pm | मुक्त विहारि

जरा जीभ तिखट-पणा आणि चमचमीतपणा विसरायला लागली आहे.

आता जरासे, किंचीतसे, थोडेसे, मटण-कलिया मिळाले तर मस्तच...

प्रभाकर पेठकर's picture

2 Jun 2014 - 8:06 pm | प्रभाकर पेठकर

नोंद घेण्यात आली आहे.

आयुर्हित's picture

2 Jun 2014 - 8:19 pm | आयुर्हित

पेठकरकाका,जर आपण आजच ठरवले तर पूढिल उन्हाळ्यापर्यन्त डायबेटीस विसराल आणि मनसोक्त आम्बे खाणार!
बोला, आहे का तयारी?
मला व्यनी करा!

आंबे खाणं जाऊ दे खड्ड्यात. वर्षभरात डायबेटीस विसरायला लावणारा सोप्पा मार्ग व्यनित नाही इथेच सर्वांसमोर द्या. मिपावर मी एकटाच मधुमेही नाही. सर्वांनाच त्याचा फायदा होऊ दे नं!

आयुर्हित's picture

4 Jun 2014 - 12:34 pm | आयुर्हित

सर्वांना फायदा देण्यासाठी मधुमेह (एकटा नव्हे तर दहा गंभीर आजारांचा स्त्रोत हा लेख आहेच की!

प्रभाकर पेठकर's picture

5 Jun 2014 - 2:37 am | प्रभाकर पेठकर

मग, 'डायबेटीस विसरायला लावणारा सोप्पा मार्ग' तिथे द्या. वाचू आम्ही.

जंक्षन फोटू आलेत. कृतीही आवडली.
आमच्या इकडेही इकडल्या पद्धतीची चांगली आम्रफळे मिळायला लागली आहेत.
अजून जरा सिझन चांगला तापल्यास ही कृती करता येईल.

अनन्न्या's picture

2 Jun 2014 - 7:56 pm | अनन्न्या

आंबे आहेतच, आता बघतेच करून!

मैंगोनी दिलाय दणका .आवडला पदार्थ जमेल तसा करून पाहतो .

>>पुअर मँगो फ्लेवरचं आईसक्रिम एंजॉय करु कराल ह्याची खात्री बाळगा

संपादकांना सांगून जरा दुरुस्ती करुन घ्या.
मूस बनवणं इतकं सोपं करुन सांगितल्याबद्दल धन्यवाद. ऐनवेळी शिंची इनोची बाटली सापडेना. ;)

कवितानागेश's picture

2 Jun 2014 - 8:41 pm | कवितानागेश

हाय हाय!! मर जावां..... :)

फोटो पाहून ड्वाले 'आंबा'वले...

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Jun 2014 - 8:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

मन आंबा आंबा झाले !

आम्हालाही द्या की मॅगो केक, मूस आणि काय-काय! :)
मस्त कातिल दिसतोय रे!

दिपकशेठ, तुमच्या कडे काय हापुस आंबा महोत्सव चालु आहे का? फोटो पाहून अशक्य जळजळ झाली आहे.
युरोपातील हापुस बंदी मुळे आम्ही ह्यावर्षी हे असलं काही करुन खाण्यास मुकणार. :(

बाकी पाकृ आणि फोटो तर एकदम कल्ला. *good*

सानिकास्वप्निल's picture

2 Jun 2014 - 11:12 pm | सानिकास्वप्निल

मँगो मुस मस्तं दिसतय :)

मी जेलीऐवजी व्हाईट चॉक्लेट थोडे वितळवून घालते, मस्तं सेट होतं.
हे बघून बनवावेच लागणार. चला आता कॅन्ड मँगो प्युरेचा वापर करावा लागणार. (आम्हाला कुठे मिळणार हापूस आता :( )

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jun 2014 - 12:00 am | अत्रुप्त आत्मा

मुसुमुसू हाय हाय अंबा मिलायलाय,(बालिकेचे ;) )>>दिपुकाका अंबा देव॥ =))

डेझर्टसम्राट दिपकाचार्य http://www.sherv.net/cm/emoticons/cook/chef.gifकी जय! .. की जय! .. की जय!

मदनबाण's picture

3 Jun 2014 - 7:00 am | मदनबाण

आहाहा... :)
फोटु अगदी मुस-मुसले आले आहेत . . . ;)

मदनबाण's picture

3 Jun 2014 - 7:03 am | मदनबाण

आहाहा... :)
फोटु अगदी मुस-मुसले आले आहेत . . . ;)

इन्दुसुता's picture

3 Jun 2014 - 8:45 am | इन्दुसुता

उत्कृष्ट पाकृ आणि प्रेझेन्टेशन.

इरसाल's picture

3 Jun 2014 - 9:55 am | इरसाल

ह्या दिपकला नाय काय काम्,,,,,हु !!!!!

फार सुंदर फोटो आहे. पाककृती पण सोपी वाटते आहे.

काही शंका:
१. मँगो जेलीचं अख्खं पाकीट अर्धा कप कोमट पाण्यात भिजवून वापरायचं का?
२. क्रिमला काही दुसरा पर्याय आहे का? पनीर/ तोफू??

दिपक.कुवेत's picture

3 Jun 2014 - 11:36 am | दिपक.कुवेत

१. जेलीचं अर्ध पाकिट वापरलसं तरी चालेल. म्हणजे साहित्याच्या प्रमाणानुसार जेलीचं प्रमाण ठरवं.
२. क्रिम एवजी पनीर्/तोफु घालुन कसं लागेल कल्पना नाहि. क्रिम मुळे एक जे स्मुथ/मखमली टेक्श्चर येतं ते पनीर्/तोफु घालुन येईल असं वाटत नाहि.

अवांतरः काहि ठिकाणी ह्या मुस मधे अंड्याचा पांढरा भाग पण क्रिम सारखा व्हिप्ड करुन घालतात. मी अंडे वगळले. पण जर अंड वापरलस तर व्हॅनीला ईसेन्स जरुर घाल नाहितर मुस ला अंड्याचा वास येतो. अगदिच शाकाहारी असशील तर जेली एवजी अगार-अगार (व्हेज जेली) घाल.

हसरी's picture

3 Jun 2014 - 11:44 am | हसरी

धन्यवाद दीपक :-)

क्रीम खूप हेवी होईल असे वाटल्याने पनीरचे विचारले. शिवाय इथे सध्या प्रचंड उन्हाळा असल्याने क्रिम बीट करणे अवघड जाईल.
दोन मेजरींग कप आमरसासाठी जेलीचं अर्ध पाकीट पुरेसं होईल ना?

दिपक.कुवेत's picture

3 Jun 2014 - 12:00 pm | दिपक.कुवेत

हो दोन कप आमरसा साठि जेलीचं अर्ध पाकिट पुरेल. पनीर घालायचचं असेल तर एकदा थोडसं पाणी घालुन मिक्सर मधुन फिरवं. कदाचीत स्मुथ टेक्च्शर येईल. कर आणि कळवं कस होतेयं ते. जमल्यास फोटो पण पोस्ट कर. ऑल दि बेस्ट!

हसरी's picture

6 Jun 2014 - 2:23 pm | हसरी

सेट नाही झालं मूस :-( :-(
खाणार्‍या मेंबरांनी मँगो मिल्कशेक म्हणत चाटून पुसून भांडंही साफ केलं तो भाग वेगळा...

आता उन्हाळा कमी झाला की फ्रेश क्रिम वापरून बघेन. पण त्यावेळी जेली क्रिस्टल नाही घेणार, आगर-आगर वापरेन. वरच्या प्रमाणासाठी आगर-आगर किती लागेल?

दिपक.कुवेत's picture

6 Jun 2014 - 8:57 pm | दिपक.कुवेत

खरं तर जेली घातल्यावर मुस एक ४-५ तासांत छान सेट होतं. पुढल्या वेळेस आधी एक अर्धा तास डिप फ्रिजर मधे ठेव आणि मग खाली फ्रिजर मधे ठेव. तसचं उन्हाळा आणि फ्रेश क्रिमचा संबंध समजला नाहि. उन्हाळा खुप असेल तर क्रिम नीट व्हिप्ड होत नाहि का?? विचारायचं कारण कि ईथे सुद्धा (कुवेत मधे) खुप उन्हाळा असतो/चालु झालाय आणि मला तरी निदान क्रिम व्हिप्ड करण्यात काहिच अडचण आली नाहि. मी अगार अगार कधी वापरलं नाहिये त्यामुळे तुझ्या अंदाजाने घाल.

मुक्त विहारि's picture

7 Jun 2014 - 3:19 pm | मुक्त विहारि

ये "अगार अगार" क्या हय?

दिपक.कुवेत's picture

7 Jun 2014 - 5:02 pm | दिपक.कुवेत

अगार अगार म्हणजे व्हेज जेली. काहि शाकाहारी लोकांना बाजारात जेली मिळते ती चालत नाहि कारण त्यात गायीच्या चरबीचा अंश असतो म्हणुन त्या एवजी हे अगार-अगार घालतात.

मुक्त विहारि's picture

8 Jun 2014 - 9:41 am | मुक्त विहारि

धन्यवाद....

कवितानागेश's picture

10 Jun 2014 - 11:24 am | कवितानागेश

'चायना ग्रास' म्हणून एक पदार्थ मिळतो. ते अगार अगार असतं.

यशोधरा's picture

3 Jun 2014 - 2:12 pm | यशोधरा

अरे दुष्टा!

प्यारे१'s picture

3 Jun 2014 - 2:21 pm | प्यारे१

ह्या दीप्याच्या तर .... *$@%#&*$^&*#@@%^*

इशा१२३'s picture

3 Jun 2014 - 5:48 pm | इशा१२३
इशा१२३'s picture

3 Jun 2014 - 5:48 pm | इशा१२३

काय सुरेख फोटो आहे..आवडली पाककृती...

सुबोध खरे's picture

3 Jun 2014 - 7:02 pm | सुबोध खरे

बिन कष्टाचे इतके सुंदर मूस कुठे मिळेल याचा विचार करत होतो?
(आमची पाककला म्हणजे अजून भात टाकण्यापर्यंत पोहोचली नाही.)
फोटो पाहून तर तोंडाला फारच पाणी सुटले आहे.
हा हन्त.

झकासराव's picture

3 Jun 2014 - 7:20 pm | झकासराव

लै भारी :)

जागु's picture

6 Jun 2014 - 1:04 pm | जागु

भन्नाट.

पैसा's picture

13 Jun 2014 - 9:39 pm | पैसा

मस्त!

RadhikaHrishikesh's picture

18 Jun 2014 - 8:37 am | RadhikaHrishikesh

लय म्हनजे लय म्हनजे लय च भरि

भानस's picture

15 Jul 2014 - 11:15 pm | भानस

हा फोटो कमीतकमी दहावेळा पाहिलाय... :) खूपच छान दिसतेय आणि पाहूनच ' सुदिंग ' वाटते. :) करायलाच लागणार.

पाकृ वर आणतोय हो....