अंगलट आलेले प्रकरण

खटपट्या's picture
खटपट्या in जनातलं, मनातलं
6 Apr 2014 - 11:51 am

श्री शशिकांत ओक यांच्या http://www.misalpav.com/node/27497#new या धाग्यावरून स्फूर्ती घेवून लिहिण्याचा केलेला प्रयत्न

१९९५/९६ ची गोष्ट असेल. मी एका सहकारी बँकेत आय टी विभागात होतो. त्यावेळेचे बँकिंग चे माहिती तंत्रज्ञान आगदीच बाळबोध होते म्हणायला हरकत नाही (नेट्वर्किंग च्या दृष्टीकोनातून) सर्व शाखा एकमेकांशी जोडलेल्या नव्हत्या. प्रत्येक बँकेचा आय टी सेट अप स्वतंत्र असे. त्यामुळे प्रत्येक शाखेत एक किंवा दोन शाखांमध्ये मिळून एक असा आय टी चा माणूस नेमलेला असे.

मी ज्या शाखेत होतो त्या शाखेत तर आठवड्याला एखाद दुसरा प्रोब्लेम येत असे. बाकी वेळ मी नुसता बसून राहत असे. वाचणार तरी किती. त्यावेळेला इंटरनेट खूप महाग होते. मग या रिकाम्या वेळेत मी बँकेच्या इतर स्टाफ बरोबर गप्पा मारत असे किंवा कधी कधी त्यांना त्यांच्या कामात मदत करत असे. सेविंग आणि करन्ट वाल्यांच्या काउण्टर वर बसून गफ्फा मारणे आणि त्यांना लागेल ती मदत करणे हे माझे रोजचे काम झाले. शाखा व्यवस्थापकांचे मी काय करतोय याकडे बारीक लक्ष असे. कधी कोण चहा पिण्यासाठी किंवा बायो कॉल साठी गेल्यास मी त्यांचे कौण्टर तेवढ्या वेळेपुरता सांभाळत असे. आणि हे मी करतोय हे शाखा व्यवस्थापकांना माहित होते. काही दिवसांनी हे नेहमीचेच झाले आणि काही लोक माझ्यावर कौण्टर सोडून तास तास भर बाहेर जाऊन येऊ लागले. मी कोणत्या कामासाठ आलोय आणि करतोय काय असा प्रश्न मी स्वतःलाच विचारात असे (मला प्रश्न बरेच पडतात Skype Emoticons)

एकदा करन्ट अकौंट चे दोघेजण अचानक रजेवर गेले. व्यवस्थापकांनी मला दोन्ही करण्ट अकौंट कौण्टर सांभाळण्याचे फर्मान सोडले. मी आपला सांग काम्यासारखा कोउण्टर वर बसलो. दोन्ही कौण्टर ची गर्दी एकाच कडे आल्यामुळे मी थोडा गडबडलो होतो आणि तसे हे माझे नेहमीचे काम नव्हते त्यामुळे थोडेसे दडपणही होतेच. हळू हळू गर्दी वाढू लागली. मी खाली मान घालून काम करत होतो. वर बघायला उसंत नव्हती. त्यावेळेला टोकन पद्धत चालत असे. एक खातेदार आठ हजाराचा सेल्फ चा चेक घेऊन आला मी त्याचे खाते तपासून त्याला वर न बघता टोकन दिले. ते नेमके दुसऱ्याच माणसाने घेतले. आणि ज्याला मी आठ हजाराचे टोकन द्यायला पाहिजे होते त्याला मी एक हजाराचे टोकन दिले (थोडक्यात टोकन ची अदलाबदली झाली) दोघांचे सेल्फ चे चेक होते.

ज्याला एक हजार मिळायचे होते तो आठ हजार कशियर कडून घेवून निघून गेला. आणि ज्याला आठ हजार मिळायचे होते त्याला एक हजार मिळताच तो कशियर बरोबर भांडू लागला. कशियर माझ्याकडे आले. सर्व तपासून पाहता टोकन ची अदलाबदली लक्षात आली. त्या वेळेला दिलेल्या टोकन चा नम्बर आम्ही चेक च्या मागे लिहत असू. त्यात माझ्याकडून गडबड झाली होती.

झाले प्रकरण व्यवस्थापकांकडे गेले. त्यांची पाचावर धारण बसली. कारण मी काही बँकेचा स्टाफ मेम्बर नव्हतो. त्यामुळे प्रकरण त्यांच्यावर शेकणार होते. बँक बंद झाल्यावर आम्ही (मी आणि व्यवस्थापक) जो आठ हजार घेऊन निघून गेला होता त्याच्या घरी गेलो. सुरवातीला तो आठ हजार घेतले हे मान्य करायला तयार होईना. नेमके व्यवस्थापकांचे वडील फौजदार निघाले. त्यांना फोन करताच ते ताबडतोब आले. खाकी वर्दी बघताच, आठ हजार घेतलेला इसम घाबरला आणि पैसे परत द्यायचे त्याने मान्य केल. माझा जीव भांड्यात पडला.

त्या दिवसापासून कानाला खडा लावला. कधी कुठल्या कौण्टर वर घुटमाळलो नाही. व्यवस्थापकांनी सुद्धा मला कधी वेगळे काम सांगितले नाही.
आजही मला ते व्यवस्थापक रस्त्यात कधी भेटले कि त्या दिवसाची आठवण काढतात. Facebook smileys

नोकरीअनुभव

प्रतिक्रिया

गणपा's picture

6 Apr 2014 - 12:58 pm | गणपा

किस्सा भारीच.

पैसा's picture

6 Apr 2014 - 1:16 pm | पैसा

भारी किस्सा. असले प्रकार गर्दीच्या वेळी नेहमीच होतात. अगदी जुन्या स्टाफकडूनही होतात! आणि आता नव्या आयटी ऑफिसरांना असे हरकाम्या म्हणून वापरणे हेही नेहमीचेच झाले आहे!

मुक्त विहारि's picture

6 Apr 2014 - 2:53 pm | मुक्त विहारि

आवडला

बॅटमॅन's picture

6 Apr 2014 - 3:06 pm | बॅटमॅन

अगायायो!!!

स्पंदना's picture

6 Apr 2014 - 4:19 pm | स्पंदना

आई ग!!
खरच आठ हजार मिळताच डोळेच काय पण डोकेही फिरले असावे त्या माणसाचे.
(माझे सुद्धा प्रतिसाद हे एका साध्या सदस्याचे प्रतिसाद असतात. हव तर स्त्री सद्स्याचे म्हणा)

सस्नेह's picture

6 Apr 2014 - 4:28 pm | सस्नेह

बिचारे व्यवस्थापक आणि नशीबवान तुम्ही !

यशोधरा's picture

6 Apr 2014 - 4:32 pm | यशोधरा

बापरे! बरं झालं, पैसे परत मिळाले.

किसन शिंदे's picture

6 Apr 2014 - 4:38 pm | किसन शिंदे

नशिब तुमचे त्या माणसाने पैसे परत दिले.

शुचि's picture

6 Apr 2014 - 8:44 pm | शुचि

बाप रे!!! खतरा अनुभव!!

शशिकांत ओक's picture

6 Apr 2014 - 9:47 pm | शशिकांत ओक

छान लेख... पैसे परत मिळाले ...
पोलिसखात्यातील व्यक्तीच्या धाकाचा परिणाम!
असाच एक किस्सा येतोय पुढील कथनातून...

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार