काही फोटोग्राफी प्रयत्न

राजो's picture
राजो in कलादालन
1 Mar 2014 - 8:06 pm

मिसळपाव संकेतस्थळावर प्रथमच काही फोटो शेअर करत आहे. स्वॅप्स आणि इतर जाणकार या चित्रांतील गुणदोष दाखवतील अशी अपेक्षा.

खालील चित्रांमध्ये कोणतेही पोस्ट प्रोसेसिंग केलेले नाही

gandhijis3

krishna

Reflection

jaswand

unknown flower

Light

Flag

slow shutter speed

(कलादालनामध्ये पोस्ट करताना काही एरर येत आहे)

कला

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

1 Mar 2014 - 11:03 pm | खटपट्या

छान फोटो

पाच फोटो जवळचे आहेत त्यात काही खास नाही .झेंड्याचा का काढला ?तो कशावर आहे ?झाडे आणि पाण्यातले प्रतिबिंब समजले आणि पटले .अमुक एक फोटो मला का काढावासा वाटला ते फोटोच बोलला पाहिजे .थोडे वेगळे विषय येऊ द्यात .कैमरा बदलता येत नाही पण विषय नक्कीच बदलता येतात .

नांदेडीअन's picture

5 Mar 2014 - 5:55 am | नांदेडीअन

म्हणजे जवळचे फोटो चांगलेच निघतात का ?

धन्यवाद कंजूस, नक्कीच वेगळे विषय घेण्याचा प्रयत्न करेन. सध्या कॅमेर्‍याच्या तांत्रिक बाबी समजून घेणे चालू आहे. तसा कॅमेरा घेऊन ६-७ महिने झाले आहेत, पण पुरेसा वेळ नाही मिळू शकला (कि आळस :)) कॅमेर्‍यावर हात साफ करण्यासाठी.

मुक्त विहारि's picture

2 Mar 2014 - 4:54 pm | मुक्त विहारि

निदान, नक्की कशाचा फोटो काढला आहे, हे तर अगदी स्पष्टच समजते.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Mar 2014 - 4:59 pm | अत्रुप्त आत्मा

वाह्ह! छान! सुंदर!

मेघनाद's picture

4 Mar 2014 - 10:43 pm | मेघनाद

छान आहेत फोटो, मोबाइल आणि कॅमेरा दोन्ही वापरले आहेत का ?

नाही, फक्त कॅमेराच वापरला आहे.डीएसएलआर वर प्रयत्न करतो आहे.

श्रीरंग_जोशी's picture

5 Mar 2014 - 8:47 am | श्रीरंग_जोशी

पहिल्या फोटोमध्ये कॅमेरा उंचावर न धरता बाहुल्यांच्या समोर धरला असता (जमीन दिसणार नाही असा) तर अधिक परिणामकारक वाटले असते असा अंदाज आहे.

खालील फोटो मी बर्‍याच वर्षांपूर्वी काढला आहे. त्यावेळी कॅमेरा बाहुलीच्या चेहर्‍याच्या रेषेत धरला असता तर हाच फोटो अधिक चांगला वाटला असता...

Portrait

एस's picture

7 Mar 2014 - 12:16 pm | एस

प्रतिक्रिया व्यनिद्वारे कळवली आहे. सॉरी, धाग्यात माझे नाव मी आधी वाचलेच नव्हते :-)

डिटेल्ड प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद स्वॅप्स

शैलेन्द्र's picture

7 Mar 2014 - 12:37 pm | शैलेन्द्र

कोणती लेन्स वापरताय?
१८-५५?

हो. १८-५५ किट लेन्स आणि निकॉन ३५ एम एम १.८ प्राईम लेन्स