श्रावण बिर्याणी

स्नेहश्री's picture
स्नेहश्री in पाककृती
24 Jul 2008 - 3:41 pm

माझी खास मैत्रिण गेल्यावर्षी Deuthchland(Germany)ला गेली होती श्रावणाच्य सुमारास. पण श्रावणांत कांदा लसुण खात नसल्याने काय स्पेशल करायचे हा प्रश्नच होता आणि म्हणुन एक प्रयोग म्हणुन ह्या " श्रावण बिर्याणी" चा शोध मी लावला. आता श्रावण महिना सुरुन होणार म्हणजे कांदा-लसुण बंद. म्हणुन ही माझी सोज्वळ पाकक्रिया देत आहे.
साहित्यः
तयार बासमतीचा भात.( भात शिजवतना आधी तुपावर परतुन घ्यावा त्यात थोडा लिम्बु रस, मीठ (भातापुरते) व अ़ख्खा गरम मसाला घालावा)
भाज्या :- पनिर,अर्ध्या वाफवलेल्या( फरसबी,गाजर,फ्लॉवर,मटार)
मसाल्यासाठी:
२ मोठे टोमॅटो- ब्लांच करुन्-उकळीच्या पाण्यात टाकुन सालं व बिया काढुन टाकायचे.
भिजवलेली खसखस- १+१/२ चमचा
काजु ५,६ भिजवुन
१/२ इंच आलं
२ चमचा भरुन ताजा खवा
लाल तिखट
एकत्र वाटुन घ्यावे,
मीठ, सा़खर
कढीपत्ता, तमालपत्र, वेलची- फोडणी साठी
केशर मिश्रित दुध, तळ्लेले काजु,आणि बटाट्याच्य सळई, बेदाणे,चेरी-सजावटीसाठी

क्रुती-
प्रथम तुपात कढीपत्ता, तमालपत्र, वेलची घालवी नंतर वाटलेला मसाला पक्का परतुन घ्यावा. मग त्यात भाज्या (फरसबी,गाजर,फ्लॉवर,मटार) व पनिर टाकुन छान परतुन घ्यावे. व त्यात थोडे पाणी व मीठ (चवीप्रमाणे)व चिमुटभर सा़खर घालुन एक उकळी आणवी. दाटसर रस्सा ठेवावा.
एका पातेल्याला तुप लावुन घ्यावे. त्यात एक भाताचा थर लावावा मग एक भाजीचा लावावा. त्यावर थोडे तळ्लेले काजु,आणि बटाट्याच्य सळई पसरवावेत,व केशर मिश्रित दुध शिंपडावे. असे भात आणि भाजी चे थर लावत जावे.
सर्वात शेवटी भाताच्या थरावर थोडा केशर मिश्रित दुधात थोडा प्लेन भात कालवुन तो थर सर्वात शेवटी द्यावा. व नंतर तळ्लेले काजु,आणि बटाट्याच्य सळई, बेदाणे,चेरी-सजावट करावी. व नंतर मध्यभागी भातात एक खळ्गे करुन त्यात एक वाटी ठेवावी. त्यात रसरशीत फुलवलेले दोन लालबुंद निखारे ठेवावेत्.त्यावर थोडे तुप सोडुन लगेच झाकण ठेवुन, कणिक लावुन छान दम द्यावा,आणि नंतर गरम गरम "श्रावण बिर्याण"" पेश करावी.

प्रतिक्रिया

शेखर's picture

24 Jul 2008 - 3:49 pm | शेखर

सुंदर पाककृती स्नेहश्री ...

शेखर

(अवांतर : बिर्याणी ही मटण किंवा चिकनच उत्तम)

धोंडोपंत's picture

24 Jul 2008 - 4:38 pm | धोंडोपंत

वा स्नेहश्री वा,

क्या बात है. पाककृती वाचूनच तोंडाला पाणी सुटले. तुझ्यासारखी सुगरण मिपावर आली याचा आम्हाला आनंद आहे.

आपला,
(पंतकाका) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

स्नेहश्री's picture

25 Jul 2008 - 8:46 am | स्नेहश्री

धोंडोकाका,
आज तुमच्यामुळे परत मला पाककृती लिहाली वाटली खरच मनापसुन धन्यवाद....

--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी

विसोबा खेचर's picture

24 Jul 2008 - 6:13 pm | विसोबा खेचर

पाकृ! अजूनही येऊ द्या. स्वागत आहे....

आपला,
(खादाड) तात्या.

वरदा's picture

24 Jul 2008 - 6:30 pm | वरदा

नुसता भात करुन घेतला..तुप सोडून गार करुन मोकळा केला आणि तुपात नाहीतरी मसाला घालणारच आहोत त्यात अख्खा गरम मसाला पण घातला तर चवीत खूप फरक पडेल का गं?
(स्वयंपाकात यथा तथा पण खाण्यात पटाईत)
वरदा
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

विसोबा खेचर's picture

24 Jul 2008 - 6:34 pm | विसोबा खेचर

जावयांची काळजी वाटते असे पुन्हा एकदा म्हणतो. रोज काय खात आणि कसं खात असतील बिचारे देवच जाणे! आमच्या वरदाला ज्या दिवशी स्वैपाक करता येईल तो सुदिन! :)

तात्या.

असं करते तिथे येतेय तेव्हा काकुंकडेच येते शिकायला काय म्हणता?
स्वगतः आता घाबरु नका..मी केलेले प्रयोग तुम्हालाच खावे लागतील तेव्हा... हि ही ही...
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

विसोबा खेचर's picture

25 Jul 2008 - 12:05 am | विसोबा खेचर

असं करते तिथे येतेय तेव्हा काकुंकडेच येते शिकायला काय म्हणता?

अवश्य ये, स्वागत आहे! :)

बाय द वे कधी येते आहेस भारतात? आलीस की फोन कर...

स्वगतः आता घाबरु नका..मी केलेले प्रयोग तुम्हालाच खावे लागतील तेव्हा... हि ही ही...

:)

असो, आता आपल्या दोघांकडूनही विषयांतर पुरे..! :)

तात्या.

स्नेहश्री's picture

25 Jul 2008 - 8:43 am | स्नेहश्री

वरदा,
अंग भात मोकळा शिजवण्यासाठी भात तुपावर (तांदुळ) परतुन घेणे गरजेचे आहे.
आणि त्या तुपात म्हण्जे भातात जर अख्खा गरम मसाला असेल तर अजुन लज्जत येते.
try it out.....

आणि प्रत्येकाने स्वता:ची अशी inovations करुन बघणे गरजेचे आहे.
स्वयंपाक ही कला आहे. त्याला measurement चे नियम लावण चुकीच आहे.
तु सांगितलेली पद्धत मी करुन बघेन. तशी ती वेळ वाचविणारी वाटते.........

आणि

@ तात्या....काय तु वरदाला चिडवत असतोसस....तिच्यामुळे मला एक नविन idea मिळली वेळ वाचविणारी .....

आणि सर्वांना धन्यवाद चांगल्या प्रतिक्रियांसाठी.

--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी

पिवळा डांबिस's picture

25 Jul 2008 - 9:03 am | पिवळा डांबिस

:))))))))
आणखीन काही इथे लिहिणे अप्रस्तुत ठरेल!!:)))))
:))))))
:))))))
:))))))

श्रीमंत दामोदर पंत's picture

25 Jul 2008 - 10:54 am | श्रीमंत दामोदर पंत

सुंदर पाककृती ...
धन्यवाद..........
तुझाकडे आजुन काही असतील तर प्लीज सांग .........

राधा१'s picture

24 Jul 2009 - 2:42 pm | राधा१

अरे श्रावण महिन्यासाठी ही डीश मस्तच आहे की...नक्की करुन बघणार....!!!

लिखाळ's picture

24 Jul 2009 - 7:09 pm | लिखाळ

वा .. पदार्थ रुचकर असेल असे दिसते. नक्की करुन पाहिन. :)
निखारे ठेऊन दम करणे हा प्रकार या आधी पण ऐकला आहे. पण कधी करून पाहिले नाही. एकदा प्रयत्न केला पाहिजे असे वाटत आहे.

-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)