२१ डिसेंबर, मॉस्को

लाल टोपी's picture
लाल टोपी in भटकंती
21 Dec 2013 - 9:37 pm

२१ जूनला आपण उत्तर गोलार्धातील सर्वात मोठ्या दिवसाची मॉस्को सफर केली. आज २१ डिसेंबर सर्वात लहान दिवस आणि मोठी रात्र. आजचा दिवस उगवणार होता सकाळी ९.५० ला (सूर्योदय) आणि सूर्यास्त संध्याकाळी ५.२० वाजता. पहिल्या भागात आज सकाळी फेरफटका मारतांनाची काही छायाचित्रे. सकाळी ९.१० ते १०.०० या वेळेत ही छायाचित्रे काढली आहेत.

सकाळी फोटो काढण्यासाठी मुद्दाम थोडा उशीराच निघालो. खरंतर मॉस्कोला या वेळेपर्यंत चांगलाच हिमवर्षाव सुरू झालेला असतो. सर्वत्र पांढ-या रंगाचे अधिराज्य असते या वर्षी मात्र अगदीच तुरळक हिमवर्षाव आतापर्यंत झाला आहे. आज मात्र बाहेर हलका हिमवर्षाव सुरु होता. जवळ जवळ सर्वच चित्रांत हलका हिमवर्षाव सुरु असलेला दिसून येईल.
१.
1
काही दिवसावर आलेल्या नाताळच्या स्वागताची तयारी रस्त्यावर दिसून येत आहे.
२.
2
रात्रभराच्या हिमवर्षावामुळे जमिनीवर बर्फाचा सफेद थर जमा झाला होता. अजूनही तेवत असलेल्या रस्त्यावरील दिव्यांच्या सोनेरी प्रकाशात जादुई वातावरण तयार झाले होते. (सकाळी ९.१५)
३.
3

४.
3

५.

4

मॉस्कोतील रशियन महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा. आजूबाजूच्या निवासी इमारती.
६.
6

आता पर्यंत ९.३० होऊन गेले आहेत तरी देखील अंधाराचे साम्राज्य दाखवणारी ही काही क्षणचित्रे.

७.
7

८.
8
९.
10

रस्त्यावर जमा होणारे बर्फ सात दूर केले जाते तेच काम करणारे कर्मचारी.
१०.
9

११.
11
रस्त्यावरील घड्याळात ९.३५ झाले आहेत..... सकाळचे!!
12

आता हळू हळू अंधार दूर होऊ लागला आणि मॉस्कोच्या रस्त्यांवर पहाट अवतरू लागली ती ९.४५ नंतर.
१२.
11

१३.
13

१४.
72

१५.
13

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

21 Dec 2013 - 11:29 pm | मुक्त विहारि

फोटो आणि वर्णन आवडले.

पैसा's picture

21 Dec 2013 - 11:37 pm | पैसा

सगळे फोटो मस्तच आहेत! सकाळी ९ नंतर इतका काळोख बघून अजब वाटत होतं!

प्यारे१'s picture

22 Dec 2013 - 2:44 am | प्यारे१

मस्तच!
मध्ये नॉर्वेमध्ये असलेल्या मित्रानं दुपारी तीनला लक्ख काळोख असलेले फोटो चेपुवर टाकलेले.
आमच्याकडे पण सध्या सकाळी ७.१५ ला पहाटेचे ५.३० नि संध्याकाळी ५.३० म्हणजे रात्र असा प्रकार झालाय.
बोअर वाटतंय पण! :(

प्रचेतस's picture

22 Dec 2013 - 10:43 am | प्रचेतस

मस्त

बॅटमॅन's picture

22 Dec 2013 - 11:26 am | बॅटमॅन

मस्तच!!!! रशिया हा मिपावर अनएक्प्लोर्ड आहे, मागे तुम्ही अशाच पद्धतीचा एखादा लेख लिहिल्यागत वाटतेय, जमल्यास रशिया सफरीबद्दलही असाच लेख लिहावा अशी विनंती. :)

विजुभाऊ's picture

22 Dec 2013 - 12:44 pm | विजुभाऊ

अरे भौ. इकडे साउथ अफ्रिकेत एकदम कडक उन्हाळा आहे. दिवस तर इतका मोठा आहे. सकाळी साडे चार वाजता उजाडते. सात आठ पर्यन्त सूर्य एकदम कड्डक तलपत असतो. संध्याकाळी साडे सात वाजेर्यन्त तो तसाच असतो

विजुभाऊ's picture

22 Dec 2013 - 12:50 pm | विजुभाऊ

आपण दोघे दोन ध्रुवांवर....... तुम्ही उत्तरेत मी दक्षिणेत.

जेपी's picture

22 Dec 2013 - 7:09 pm | जेपी

मस्त फोटो .

अनुप ढेरे's picture

22 Dec 2013 - 8:12 pm | अनुप ढेरे

कॅमेर्‍याच्या लेन्सवर पण हिमवर्षाव झालेला दिस्तोय...

प्रकाशचित्रं आवडली. अजून थोडं वर्णन वाचायला आवडेल - पुढच्या लेखात जरुर लिहा.

लाल टोपी's picture

23 Dec 2013 - 12:14 pm | लाल टोपी

मनःपूर्वक आभार..
@ बॅटमन, अतिवासताई : हो या आधी २१ जून वर असाच लेख लिहीला होता. रशियावर एक लेख मालिका लिहायला सुरुवात केली आहे पूर्ण लिहूनच पोस्ट करायचा विचार आहे.
@ विजूभाउ: खरच दोन ध्रुवावरील आपण एकमेकांशी गप्पा मारतो 'मिपा'ची कृपा. सध्या तिकडे मोठे दिवस असतील ना?
@ अनुपजी : कॅमेरा साधाच असल्या ने आणि पूर्ण अंधारामुळे फोटो तितकेसे स्पष्ट नाहीत.

सौंदाळा's picture

23 Dec 2013 - 2:14 pm | सौंदाळा

मस्तच.
जमले तर आजचे सुर्यास्ताचे फोटोसुध्दा टाका.
बॅटमॅनशी सहमत. रशियाबद्दल वाचायची इच्छा आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

23 Dec 2013 - 3:22 pm | अत्रुप्त आत्मा

फोटू बगताना लै लै भारी वाटलं! :)