कामाख्या मंदिर गुहाती
कामाख्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता
कामाख्या मंदिर
या देवळात कुमारी पूजा केल्या जातात . आम्ही दर्शनास गेलो तेव्हा तेथे एका कुमारीची चाललेली पूजा दिसत आहे
या देवळात नवस फेडण्यासाठी निरनिराळ्या किमतीचे अजापुत्र मिळतात असे समजले
अशा एका अजापुत्राचे दर्शन एका फोटोत घडते
मंदिरात फिरताना मला एक प्रकारचे दडपण वाटत होते हे दोन वर्षानंतरही आठवत आहे
प्रतिक्रिया
2 Dec 2013 - 10:41 am | पैसा
फार जुने मंदिर दिसते आहे. अजून डिटेल फोटो बघायला आवडले असते. कुमारी पूजा आणि अजापुत्र बळी वगैरे म्हणजे हे शाक्तपंथियांचे केंद्र होते का?
4 Dec 2013 - 7:38 pm | परिंदा
हो, अजुनही शाक्तपंथियांचे केंद्र आहे. माझ्या एका मित्राने तिथे रेड्याच्या बळी देताना पाहिले होते, त्याने केलेले वर्णन ऐकुनच अंगावर काटा आला होता.
4 Dec 2013 - 9:46 pm | प्रचेतस
असे काही नाही.
रेडे, अजापुत्रांचा बळी देणे पूर्वी सर्रास व्हायचे.
पोर्तुगीज प्रवासी दुमिंगुश पाइश ने विजयनगरातल्या नवरात्रोत्सवातील बळींच्या पद्धतीचे सविस्तर वर्णन केले आहे. शिवकाळात बहुतेक सर्व किल्ल्यांवर, देवी मंदिरांत रेडे बळी दिले जायचे. तुळजापुरात तर आजही नवरात्रात अजाबली दिला जातो.