उत्तर-पूर्व भारत: निसर्गप्रेमींसाठी पर्वणी

तिमा's picture
तिमा in भटकंती
20 Nov 2013 - 9:30 am

चारधामच्या अनुभवाने पोळल्यानंतर आता हिमालयात कुठे फिरायला जावे याचा विचार करत होतो. कारण एकदा का तुम्ही हिमालयात जाउन आलात की तो तुम्हाला बोलावतच रहातो. आणि तुम्हीही कुठल्यातरी अनामिक ओढीने त्याला प्रतिसाद देऊ लागता. नॉर्थ-ईस्ट कधीचे डोक्यांत होते. अचानक संधी चालून आली आणि एका टूर तर्फे आम्ही तिथले बुकिंग करुन टाकले.
मुम्बई-गुवाहाती-काझीरंगा-बोमदिला-तवांग्-दिरांग् (सर्व अरुणाचल)- गुवाहाती-शिलाँग्-चेरापुंजी-शिलाँग्-गुवाहाती-मुंबई असा ११ दिवसांचा कार्यक्रम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होता.
गुवाहातीला पोचल्यावर आमच्या दिमतीला इनोव्हा होत्या. प्रथम आम्ही काझीरंगा अभयारण्याला गेलो. अंतर साधारण २०० किमी आहे.
काझीरंगाहून तवांग बरेच लांब आहे. (अंदाजे ५०० किमी) म्हणून मधे बोमदिलाला स्टॉप घेतला. (८५०० फूट) तिथेही रुम हिटर लागण्याइतकी थंडी होती.
बोमदिलाहून तवांगला जाताना आसाम सीमेवरचे भालुकपाँग लागते. तिथे आपले 'इनर लाईन परमिट' चेक केले जाते. अरुणाचल प्रदेश सेंसिटिव्ह असल्यामुळे हे परमिट लागते. वाटेत 'सेला पास' १३७०० फुटांवर आहे. तिथे दुपारीही खूपच थंडी होती. तिथली लेक छान आहेत. वाटेत जसवंतगढ्ही आहे. तिथे त्या शूर शिपायाचे स्मारक आहे.पुढे दिवेलागणीच्या सुमारास (संध्याकाळी ५ वाजता) तवांगला पोचलो. तवांगहून जवळ दोन तीन प्रसिद्ध आणि कित्येक अप्रसिद्ध लेक्स आहेत. तिथे जायचा मार्गही खडतर आहे. वाटेत पीटी त्सो हे लेक बघितले. पुढे वाय पॉईंट येतो. तिथून तेरा किमी अंतरावर 'बुमला' येथे चीनची सीमा आहे. पण तिथे जायला स्पेशल परमिट लागते. ते नसल्यामुळे आम्ही वायच्या दुसर्‍या फाट्याला सेंग्येन त्सॉर लेक (माधुरी दिक्षितचे तिथे कुठले तरी शुटिंग झाले असल्यामुळे टुरिस्ट त्याला माधुरी लेक असेही म्हणतात, पण स्थानिक लोकांना ते अर्थातच आवडत नाही.) संपूर्ण भागावर आपल्या मिलिटरीचे नियंत्रण आहे. जिथे सामान्य माणसाला श्वास लागतो तिथे हे लष्कराचे लोक क्रिकेट, व्हॉलीबॉल खेळत होते. त्यांच्याशी भरपूर गप्पा झाल्या.
तवांगहून परत येताना आधी वॉर मेमोरियल बघितले. १९६२ च्या युद्धात आपले अत्यंत शूर असे २२४० ऑफिसर्स तिथे धारातीर्थी पडले. ते बघून प्रथम दु:ख आणि नंतर राजकारण्यांविषयी प्रचंड चीड निर्माण होते. वाटेत पुन्हा सेला पास लागला. येताना चेंज म्हणून बोमदिलाच्या ऐवजी 'दिरांग'ला थांबलो. हे गांवही छान आहे.
दिरांगहून लवकर निघालो कारण गुवाहातीला पोचायला ४०० किमी चा प्रवास होता. गुवाहातीला एक रात्र राहून सकाळी शिलाँगला (१०० किमी) निघालो. ती मेघालयची राजधानी आहे. फारच सुंदर हिल स्टेशन आहे ते. तिथे डॉन बॉस्को म्युझियम व कॅथेड्रल चर्च बघितले. शिलाँगहून ५३ किमी वर चेरापुंजी बघितले, जवळ एका खडकाळ गुहेतून आरपार जाण्याचा अनुभव घेतला. दुसर्‍या दिवशी जिवंत मुळांचा पूल आणि 'आशियातले सर्वात स्वच्छ' असा लौकिक असलेले एक खेडे बघितले.
अरुणाचलचा निसर्ग वेगळा तर मेघालयचा एकदम वेगळा! नॉन एसी गाडीतून प्रवास करताना तिथल्या घनदाट जंगलांमधल्या वृक्षांचा गंध, वेगवेगळ्या वनस्पती बघून डोळ्यांचे पारणे फिटले. हिमालयाचे आणखी एक रुप बघून अत्यंत तृप्त मनाने आम्ही परत आलो.
वर्णन त्रोटक आहे पण फोटोच जास्त बोलतील.
टीपः सर्व फोटो पहायचे असल्यास व्यनि करावा. लिंक पाठवता येईल.

१. बांबूचे झाड

२. काझीरंगा हॉटेल बाहेरील बाग

३. गेंडा

३अ.आईच्या मागेमागे

४. काझीरंगातील पाळीव हत्ती

५. सेला पास लेक -१

६. सेला पास लेक - २

७. पी.टी.त्सो लेक

८. माधुरी लेक, तवांग

९.घाटातील रस्त्यांचे साप

१०. एलिफंट फॉल्स, शिलाँग

११. चेरापुंजी रेंज

१२. लिव्हिंग रूट ब्रिज

१३.हा मात्र मराठी वाटतोय

१४. मोविलाँग खेडे(आशियातील सर्वात स्वच्छ खेडे)

१५. लाकडी खलबत्ते विकणारीचा मुलगा

१६. कॅथेड्रल चर्च, शिलाँग

१७. चंद्र दिवसाढवळ्या डोकावतोय

१८. शिलाँग मेन लेक

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

20 Nov 2013 - 9:32 am | यशोधरा

धाग्याचे नाव वाचूनच धागा उघडला! लेक्स आणि हिमालयतील रस्त्यांचे फोटो भारी! आधी फोटो पाहिले अधाशासारखे! आता लेख वाचते. :)

व्यनि करत आहे.

चावटमेला's picture

20 Nov 2013 - 9:52 am | चावटमेला

अप्रतिम फोटो.

सुबोध खरे's picture

20 Nov 2013 - 9:53 am | सुबोध खरे

तिमा साहेब हे म्हणजे मेजवानीला जावे आणि सूप आणि स्टार्टर मध्ये बोळवण केल्यासारखे वाटले. अजून व्यवस्थित आणि विस्तृत येऊ द्या की. आणि लिंक इथेच टाका. म्हणजे आमच्या सारख्या आळशी लोकांना व्य नि करावा लागणार नाही
उत्तर पूर्व भारत पाहणे झाले नाही कारण एक तर नौदलात होतो आणि दुसरे आमच्या बायकोला बस भयंकर लागते त्यामुळे अशा रस्त्यांना जायला तिचा पहिला नकारच असतो. असो. कमीत कमी दुधाची तहान ताकावर भागवतो आहे.

प्रभाकर पेठकर's picture

20 Nov 2013 - 10:16 am | प्रभाकर पेठकर

सुंदर वर्णन आणि छायाचित्रं. पण वर्णन एका बाजूला आणि छायाचित्रं दूसर्‍या बाजूला असे झाल्याने जरा विरस झाला.

तिमा's picture

20 Nov 2013 - 11:24 am | तिमा

पेठकर साहेब,
तुमचं म्हणणं खरं आहे. पण गेले दोन दिवस फोटो चढवण्यावरच दमछाक झाली. कलादालनात चढवायचे होते, पण तिथे सारखी एरर येत होती. शेवटी ट्युब पेटली आणि भटकंती सदरात चडले बाबा एकदाचे, हुश्य! या सगळ्या गडबडीत वर्णन एका बाजुला झाले.

झकासराव's picture

20 Nov 2013 - 11:30 am | झकासराव

वॉव!!!!
तिकडे कोणी बाइक रायडीन्ग ट्रिप काढतात का?

तिमा's picture

20 Nov 2013 - 2:02 pm | तिमा

आयडिया उत्तम आहे, पण आम्हाला कोणी दिसले नाहीत.

सुहास..'s picture

20 Nov 2013 - 11:48 am | सुहास..

आवडेश ..

त्या मुलाचा फोटो छान आला आहे , आपण स्वतः खाली बसुन काढला असता तर अजुन छान आला असता :)

तिमा's picture

20 Nov 2013 - 2:00 pm | तिमा

अहो, तो इतका लाजत होता की मी समोर बसलो असतो तर आईच्या मागे लपला असता.

अहो, तो इतका लाजत होता की मी समोर बसलो असतो तर आईच्या मागे लपला असता. >>>

हा हा हा हा हा हा

सुंदर आलेत फोटो. अजून बघायचेत. :)

प्यारे१'s picture

20 Nov 2013 - 1:47 pm | प्यारे१

खूपच छान.
वरची यशो ची आणि नंतर डॉ. खरेंची सूप स्टार्टर प्रतिक्रिया तीच आमची.
मराठी कोंबडा आवडला.

कपिलमुनी's picture

20 Nov 2013 - 2:11 pm | कपिलमुनी

लिस्ट मधे असणारी ठिकाणे आहेत ..
प्लानिंग - वेळ - प्रवास ..
डीट्टेलमंदी येउ द्या की

दिपक.कुवेत's picture

20 Nov 2013 - 2:41 pm | दिपक.कुवेत

डिट्टेलमंदि सर्व माहिती येउ द्या. लेकचे फोटो फारच आवडले.

तिमा's picture

20 Nov 2013 - 4:20 pm | तिमा

समस्त मिपाकरांच्या विनंतीला मान देऊन एकदम डिट्टेलवार वर्णन लिहायला घेतलंय. (अगदी जीवनभाऊंसारखं) तरी थोडा अवधी ध्यावा ही विनंती.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Nov 2013 - 5:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

ये हो गयी ना बात !

वर्णनाबरोबर अजून फोटो ही टाका जरा. आम्हालाही ट्रीप मारायला मदत होईल अशी माहिती पण येऊ द्या.

मी-सौरभ's picture

20 Nov 2013 - 6:50 pm | मी-सौरभ

आम्ही असं समजू की हा लेख वाचलाच नाही आणि तुम्हा एक नविन लेखमाला टाकताय..
कोणती ट्रॅव्हल कंपनी? परमिट? नक्षलवादी? यावर पण थोडी माहिती आली तर छान होईल..

राजेंद्र मेहेंदळे's picture

20 Nov 2013 - 5:20 pm | राजेंद्र मेहेंदळे

डिट्टेलवार वर्णन जीवनभौंसारखे

टवाळ कार्टा's picture

20 Nov 2013 - 6:49 pm | टवाळ कार्टा

फोटो भारी"च"

स्पंदना's picture

21 Nov 2013 - 5:49 am | स्पंदना

तिमा! तिमा!! तिमा!!!
लवकर येउ दे डिट्टेल वर्णन.
अगदी एस्पिक एक्क्यांसारख ट्राव्हेल एजन्सी, पैसे, खाणम्,पिणं सगळ पाहेजे.
कपडे कसले घ्यावेत. तेथे काय घ्यावे? सगळ सगळ सांगा.

बाकी कोंबडा पाहून मन उसासले हो!

देशपांडे विनायक's picture

21 Nov 2013 - 11:16 am | देशपांडे विनायक

PARSHURAM KUND

देशपांडे विनायक's picture

21 Nov 2013 - 11:21 am | देशपांडे विनायक

PARSHURAM KUND

पैसा's picture

21 Nov 2013 - 1:53 pm | पैसा

वर्णन आणि फोटो अगदी सुंदर!