एक कोपरा

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in दिवाळी अंक
26 Oct 2013 - 8:39 am

एक कोपरा असा जिथे की मांडियला संसार
एक कोपरा जिथे मिळाला ह्र्दयाला आधार

धुंडाळुनिया देवळे मला मनात मग सापडला
एक कोपरा असा जिथे की झाला साक्षात्कार

त्या दिवशी तो राव भयाने व्याकुळलेला दिसला
शोधित होता एक कोपरा होऊनिया लाचार

घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती
असावा परि एक कोपरा जुळती जेथ विचार

विश्वामध्ये येती सारे घेऊनिया आकार
उरती होऊन एक कोपरा आणि पाकळ्या चार

त्या गर्दीतच मला उमगले या जगताचे सार
एक कोपरा माझा आणिक माझ्यातुन साकार

उजळून गेल्या जगी अपूर्व शोध कशाचा घेशी
एक कोपरा जिथे मिळावा हक्काचा अंधार

२५-२-१३ अपूर्व ओक.

दिवाळी अंक २०१३

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

1 Nov 2013 - 2:13 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

धुंडाळुनिया देवळे मला मनात मग सापडला
एक कोपरा असा जिथे की झाला साक्षात्कार

हे खासचं.

पैसा's picture

2 Nov 2013 - 8:46 am | पैसा

रचना आवडली!

मुक्त विहारि's picture

2 Nov 2013 - 8:57 pm | मुक्त विहारि

एक कोपरा जिथे मिळावा हक्काचा अंधार

प्यारे१'s picture

2 Nov 2013 - 11:33 pm | प्यारे१

आवडली कविता.

अनन्न्या's picture

3 Nov 2013 - 4:12 pm | अनन्न्या

धुंडाळुनिया देवळे मला मनात मग सापडला
एक कोपरा असा जिथे की झाला साक्षात्कार
मस्त!

सुधीर मुतालीक's picture

3 Nov 2013 - 10:02 pm | सुधीर मुतालीक

हे तुम्हा मंडळींना सुचतं कसं यार ? मस्त !

सुहास झेले's picture

5 Nov 2013 - 4:10 pm | सुहास झेले

धुंडाळुनिया देवळे मला मनात मग सापडला
एक कोपरा असा जिथे की झाला साक्षात्कार

मस्त :)

psajid's picture

7 Nov 2013 - 3:32 pm | psajid

"विश्वामध्ये येती सारे घेऊनिया आकार
उरती होऊन एक कोपरा आणि पाकळ्या चार"
हा जीवनाचं सार सांगणारा शेर खूप आवडला !
वाह ! क्या बात है !