शुक्रवारचा दिवस . नेमकी त्यादिवशी ईद. म्हण्जे सुटीचा दिवस. . चौ राला म्हण्जेच धागाकर्त्याला वाटले. चला नवीन स्कूटर घेतलीय. आज जरा मोठी चक्क्कर मारून येऊयात. आता म्हातारं कितीसं लांब जाणार ? उगीच भरकटू नये म्हणून सौ, चौ ला घेतले .( म्हणून पुणे परिसरातील एक रम्य ठिकाण नक्की केले.) " रामदरा" हे स्थान पुण्यापासून साधारण पणे २४ किमी वर आहे.मी चिंचवड, खडकी, येरवडा पूल, कोरेगाव पार्क, हडपसर ओव्हर ब्रीज या मार्गाने गेलो. हा मार्ग मिनयापोलीस, कॅरोलेना, मस्कत, दुबई, मुंबई डोंबिवली ठाकुरली या गावाकडून येणार्या यात्रेकरूना ही सोयीचा आहे. ( इथे डोळा बारीक केलेली स्मायली समजणे) . हे ठिकाण तिर्थक्षेत्र असल्याचा बोर्ड लोणी गावात लावलेला आढळला. म्हणजे आम्ही यात्रेकरू होतो तर !
हडपसर हे पुणे सोलापूर रस्त्यावर असलेले ठिकाण . तेथून पुढे सोलापूरच्या दिशेला जाताना डाव्या बाजूस हिंदुस्तान पेट्रो चा डेपो आहे. तो दिसला की आपण रस्ता चुकलेलो नाही याची खात्री पटते. पुढे तीन एक किमी गेल्यावर लोणी गाव लागते. तेथून रामदरा रस्ता घेण्यासाठी उजवीकडे वळावे लागते. मग दोन्ही बाजूनी हिरवीगार शेते,मधुन मधून वस्ती, अरूंद पण पक्का डाबरी रस्ता व अधून मधून दिसणारे गाववाले .हा रस्ता पंतप्रधान निधीतून उभारला आहे. रस्ता पक्का असला तरी अरूंद् असल्याला भरधावपणे वहान पिटाळता येत नाही. वळणे वळणे घेत रस्ता रामदरा नक्की आले की नाही याचे गेसवर्क करायला लावतो. व अचानक आपली गाडी रामदर्याच्या प्रशस्त पार्किंग मधे शिरते. लोणी ते रामदरा हे अंतर ६ किमी व ७०० मीटर्स एवढे आहे.

रामदरा येथे काय आहे ? एका हिरव्या गार टेकडीच्या पायथ्याशी एक तळे आहे, त्यात मधेच घुसलेल्या भू- भागावर एक दगडी बांधकाम असलेले मंदिर आहे. बाजूने वड, पिंपळ, नारळ अशा झाडां सावली परिसरावर धरलेली.


मंदिराचा कारभार लोणी येथील एक विशवस्त मंडळ पहाते.सायंकाळी साडे सहा नंतर येथे प्रवेश वर्जित आहे. मंदिर शंकराचे आहे.मूळ दगडी मंदिराभोवती च्या जागेत जीर्णोद्धार स्वरूपात कोंक्रिटच्या छताचे काम केलेय.

प्रदक्षिणा पथात कोटा स्टोनची फरसबदी असून खाबांना काळ्या संगमरवराचे क्लॅडिंग केले आहे. मंदिराच्या भवताली एक चौथरा बांधून चार कोपर्यात देवीची मंदिरे आहेत. ही चारही मन्दिरे मूळ मंदिराचा भाग नाहीत्. ती नंतर बांधलेली आहेत हे समजते. चारही मंदिरात देवीची विविध रूपे पहावयास मिळतात.

मुख्य मंदिरात शिरण्या साठी एक उतरता पण फरसबंद अप्रोच आहे. इथे दोन अष्टकोनी आकाराचे ओटे बांधून त्याचे
दोन मिनी मंदिरात रूपांतर केलेले दिसते. देवींच्या चार मंदिराप्रमाणेच ही नंतर बांधलेली मंदिरे आहेत. एकंदरीत 'ऑल इन वन ' चा प्रयत्न जीर्णोद्धारात झालेला आहे. मुख्य मंदिरात आम्ही पोहोचलो त्यावेळी आरती चालू होती, नगारा व घंटा यांच्या काणठळी नादमयतेच्या साथीने काही भक्तगण आरती म्हणत होते. एक नाथपंथीय वाटावा असा गोसावी
आरती. फिरवीत होता.

मुख्य मंदिराचा मूळ कळस गायब झाला असावा .कारण मंदिर दगडाचे असले तरी वरचा कळस अलिकडे बांधला असावासे दिसते. मंदिरात कोरीव काम जवळ जवळ नाहीच. काही मूर्ती बाजूच्या भिंतीवर आहेत. पण ते ही जीर्णीद्धारात झाले असावे असे वाटते. अलीकडे दगदी मन्दिरे रंगवून त्या भडक रूप आणण्याचे उद्योग होत असतात.इथे रंगकाम इतर इतके भडक वाटले नाही.

प्रक्षिणा पथात अनेक विभूतींच्या मूर्ती खांबांवर स्थापित केलेल्या आहेत.
त्यात वशिष्ट, नारद, दुर्वास , व्यास ,वाल्मिकी,शंकराचार्य , तुलसीदार, मोहिनी, नानक,गोविंदसि़ह, हनुमान,सनतकुमार,हरिहर,ब्रह्मा, यद्नपुरूष, साधु वासवानी, कपिलदेव,मीरा, रामदास सूरदास , नर नारायण, विवेकानंद ई च्या कोरीव प्रतिमा आहेत. अर्थात रंग आहेतच. प्रदक्षिणा पथाच्या बाह्य भितींवर छताखाली सफेद संगमरवराच्या शिळामधे भवत्गीतेचा पंधरावा अध्याय उर्ध्व मूलं पासून कृतकृत्यश्च भारत पर्यंत वाचावयास मिळतो.

मंदिराच्या गाभार्यात अगदीच लहान वाटावे असे शिवलिंग आहे. त्यामागे बहुदा राम सीता व वर दत्त महारांजांची मूर्त आहे.

मंदिराच्या समोर तळ्याकडे तोंड करून तळे व आजूबाजूच्या हिरवाईला निरखण्याचा आनंद लुटता येतो.


मंदिराकडे जाणार्या पदपथात विसावलेली ही माउ- पिले.

तलावात आपले अंग साफ करण्याचा उद्यम करणारी ही पांढरी शूभ्र जोडी.






तलावाकाठी दहा फूट रूंदीचा बांध आहे. त्यावरून फिरत फिरत मंदीर निरनिराळा कोनातून पहाता येते.

एरवी काळ्या दगडात पहायला मिळणारा नंदी इथे संगमरवरात दिसतो.

एका टेकडी च्या पायथ्याशी हे निसर्गरम्य ठिकाण आहे. साहजिकच आरोहणाची आवड असणारे त्याचा फायदा घेउ शकतात.
इथे एक दोन दुकाने आहेत. पण खायला आपले आपण घरून आणलेलेच श्रेयस्कर . बाकी माफक प्रमाणात चणे फुटाणे व फळे खाण्याची मात्र सोय आहे.

सरते शेवटी मंदिराचे असे लांबून अवलोकन करीत आपण परतीच्या मार्गाला लागतो.
प्रतिक्रिया
20 Aug 2013 - 5:02 pm | प्रभाकर पेठकर
सुंदर छायाचित्रे आणि रोचक माहिती. धन्यवाद.
20 Aug 2013 - 5:35 pm | तुषार काळभोर
:-)
लहानपणापासून कैक वेळा जाणं झालं आहे. पण अजूनही तिथली शांतता आणि शीतलता भुरळ घालते. ४-५ वेळा तिथूनच सोनोरी(ता. प्रुरंदर) किल्ल्यावर(मल्हारगड) गेलो आहे.
आठवड्यातून कोणत्याही दिवशी गेलो, तरी फारशी गर्दी नसते. मात्र सोमवार ते शनिवार लोणीच्या कॉलेजातली 'जोडपी' येतात तिथं.
20 Aug 2013 - 5:52 pm | प्रचेतस
सुंदर ठिकाण आहे. फोटो पण छान आलेत.
20 Aug 2013 - 6:05 pm | सूड
अधिक चांगले दिसले असते.
22 Aug 2013 - 12:56 am | किसन शिंदे
सुडशी बाडिस!
22 Aug 2013 - 9:41 am | चौकटराजा
सहमत ! फ्रेम टाकणं वाईट नाही. याठिकाणी फ्रेमची रु़दी फोटोच्या एकूण मापाशी सुसंगत नाहीये.पण फोटोशॉप मधली
"अॅक्शन" दुरूस्त करण्यासाठी वेळ नसल्याने दिले टाकून.( हाच तर अभ्या वा आमच्या तील फरक आहे ) . ( म्हण्जे अभ्याला आमच्या पेक्षा वेळ कमी असतो पण त्याची कलाकृती काळजीपूर्वकच केलेली असते.)
25 Aug 2013 - 12:49 pm | अभ्या..
राजासाबानी माझे लैच कौतुक केले आहे म्हणून त्याना धन्यवाद आणि एक सोप्पी आय्ड्या:)
ज्या साइज मध्ये चित्र पब्लिश करायाचेय्य तेवढी नवीन पीएसडी बनवायची. अप्पर लेअरला फ्रेम टाकायची. सगळे फोटो एकेका लेअरला साइज करून वन बाय वन लेअर हाइड करायचा अन करायची सेव्ह एज जेपीईजी.
:-D हाकानाका
एक पार्टी ड्यू :)
20 Aug 2013 - 6:15 pm | सौंदाळा
दुसरीत असताना शाळेची सहल गेली होती, त्यानंतर जाणे झाले नाही.
जायला हवं एकदा. छान माहीती आणि फोटो.
20 Aug 2013 - 6:35 pm | कपिलमुनी
>>सनतकुमार,हरिहर,ब्रह्मा, यद्नपुरूष, साधु वासवानी, कपिलदेव,मीरा, रामदास सूरदास , नर नारायण, विवेकानंद ई >>च्या कोरीव प्रतिमा आहेत.
कपिलदेवची मुर्ती ?
बादवे , अजुन बनेश्वर अनि रामदराला गेलो नाहिये ... या विकांताला एक ठिकाण तरी नक्की..तुमच्यामुळे प्रेरणा मिळाली
21 Aug 2013 - 5:41 am | स्पंदना
फोटो काढायचा अँगल खरोखर कलात्मक आहे. विशेषतः १८ नंबरचा फोटो.
मला येथल्या मासिकासाठी मुखपृष्ठ म्हणुन जलाशयालगतच्या मंदिराचा फोटो हवा होता, वाईच्या मंदिराचा फोटो आहे, पण हे फोटोज जास्त कलात्मक वाटताहेत. मी यातील एखादा घेतला तर चालेल का?
21 Aug 2013 - 8:35 am | चौकटराजा
मी यातील एखादा घेतला तर चालेल का?
येथील लिखाण व फोटो मिपाच्या मालकांचे असेल तर त्यानाच विचारा. बाकी हे फोटो फोटोबकेट वर आहेतच व ते तिथे मुक्तपणे उपलब्ध आहेत. कसला डोस्क्याचा कॉपीराईट ?
21 Aug 2013 - 7:53 am | अत्रुप्त आत्मा
फोटु मस्त!
21 Aug 2013 - 8:40 am | नाखु
म्या पाप्याला फोटु दिसत नाहीत पण वल्लीशेठ आणी आत्मुदांना अनुमोदन्..वर्णनावर एकडाव तरि जायल्लच पाहिजे असे बिन गर्दिचे ठिकाण दिसतय्..पु.ले.शु..
22 Aug 2013 - 1:07 am | मोदक
ठरवा.
21 Aug 2013 - 3:08 pm | त्रिवेणी
खूपच मस्त फोटो.
22 Aug 2013 - 1:08 am | मोदक
मस्त फोटो - आवडले!! :-)
22 Aug 2013 - 1:12 am | मराठे
एका फोटोमधे 'ओम् धुंदी तत् सत्' असं लिहिलंय का? "ओम् धुंदी" म्हणजे काय?? (तसं नसेल तर माझे डोळे तपासून घ्यायची वेळ आली आहे)
22 Aug 2013 - 8:10 am | किसन शिंदे
चष्मा लावून आणि आणि न लावून वाचलं तरी ते 'ओम् धुंदी तत् सत्' असंच दिसतंय.
22 Aug 2013 - 9:37 am | तुषार काळभोर
या मंदीरात काही वर्षांपुर्वी 'धुंदीबाबा' या नावाचे एक बाबा/साधू/महाराज/बुवा होते. त्यावरून हा मंत्र तयार केला गेला.
30 Aug 2013 - 2:27 pm | चिगो
मला वाटलं, "ॐच्या धुंदीत सगळंकाही सत सत होऊन जातं” असा काही अर्थ असावा.. :-)
22 Aug 2013 - 7:24 am | श्रीरंग_जोशी
पुण्याशेजारीच एवढे रम्य ठिकाण असूनही रामदर्याबद्दल या लेखनाद्वारे प्रथमच कळले.
सुंदर चित्रांद्वारे अप्रतिम सादरीकरण.
22 Aug 2013 - 7:32 am | यशोधरा
सुरेख ठिकाण आहे आणि इतके जवळ! नक्की जायला हवे. धन्यवाद चौराकाका.
हिरवा परिसर, पाणी, सुरेखसे देऊळ आणि गर्दी नाही हे पाहूनच जीव हरखला आहे!
छान आहेत फोटो.
22 Aug 2013 - 9:10 am | सुधीर
शांत, निसर्गाच्या कुशीत आणि गर्दी पासून दूर असलेलं मंदिर!
22 Aug 2013 - 9:48 am | बाळ सप्रे
फोटो छानच आहेत. देवळं अशी निसर्गरम्य परिसरातच असावीत असं नेहेमी वाटतं. जायलाच हवं आता..
24 Aug 2013 - 12:57 pm | अमोल केळकर
खुप छान ठिकाण आहे :)
अमोल
25 Aug 2013 - 8:43 am | पैसा
छान ठिकाण आणि फोटो. असेच आणखी येऊ द्या!
25 Aug 2013 - 12:28 pm | सस्नेह
डोळे निववणारी प्रकाशचित्रे !
आणि वर्णनसुद्धा भारी.
25 Aug 2013 - 12:38 pm | आतिवास
या ठिकाणाची माहिती पहिल्यांदाच कळली.
ठिकाण जाण्याच्या यादीत जोडून घेतले आहे.
27 Aug 2013 - 3:03 pm | सुहास..
सुपब्र !!!!
लई दिवसांनी जरा ढंग की भ्रमंती पाहिली ...मस्त !!
27 Aug 2013 - 3:28 pm | रुमानी
खुपच छान ठिकाण
फोटो ही सुरेख....
27 Aug 2013 - 7:31 pm | बॅटमॅन
आयला जबरीच! हडपसरहून इतके जवळ आहे माहितीच नव्हते. वीकेंडला नक्की जाण्यात येईल, बहुत धन्यवाद चौराकाका!
27 Aug 2013 - 7:44 pm | प्रचेतस
.तसाच अजून थोड़ा पुढे जाऊन भुलेश्वरला पण जाऊन ये बे.
27 Aug 2013 - 7:49 pm | बॅटमॅन
येस्सार!
28 Aug 2013 - 6:14 pm | पांथस्थ
भुलेश्वर झाले कि सासवड मार्गे दिवे घाटातुन पुण्यात उतरावे. मस्त प्रवास आहे!
28 Aug 2013 - 1:24 pm | आशिष दा
तळ्याची खोली किती आहे काही कल्पना ?
तळ्यात डुंबायला परवानगी आहे का ?
28 Aug 2013 - 1:42 pm | अनिरुद्ध प
पण एक गोष्ट खटकली ती,"त्यामागे बहुदा राम सीता",यात शन्का येण्या सारखे काय आहे ते समजले नाही.
28 Aug 2013 - 2:18 pm | चौकटराजा
गाभार्यात अंधार गुडूप होता. मी फ्लॅश मारून आला तर आला या अंदाजानेच फोटो घेतला होता. त्रयींसमोर बाजून बसलेला
मारूती नसल्याने " बहुदा" हा शब्द.
बाकी या धाग्याचे निम्मे श्रेय श्री वल्ली याना आहे. त्याना मी जागेवरून फोन केला व त्यानीच धागा अवश्य करा असे सुचविलेय !
28 Aug 2013 - 3:15 pm | अनिरुद्ध प
गाभाय्रात अन्धार होता हे छायाचित्रावरुन वाटत नव्हते,छायाचित्र उत्तम आले आहे.
28 Aug 2013 - 1:52 pm | प्रज्ञाताई
फोटो व स्थळ उत्तमच. पण देवळाचे बटबटीत रंग आजूबाजूच्या निसर्गाशी विसंगत दिसतात. आणि मूर्तींमागच्या टाईल्स नाय हो बघवत. शप्पथ! सौंदर्यदृष्टिला अंधत्व आल्यागत वाटतंय!