राजस्थानी मिरची वडा

Primary tabs

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in अन्न हे पूर्णब्रह्म
17 Jul 2013 - 3:16 am

साहित्यः

५-६ भावनगरी मिरच्या (तुम्ही कुठल्याही कमी तिखट असलेल्या मोठ्या मिरच्या घेऊ शकता,)
२-३ बटाटे उकडून, किसून घेणे
दीड-दोन वाट्या बेसन
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
१/४ टीस्पून हिंग
१ टेस्पून लाल तिखट
१ टेस्पून बडीशेप पावडर
१ टेस्पून जीरेपूड
१ टेस्पून अनारदाना पावडर (आमचूर पावडर ही वापरू शकता)
बारीक चिरलेली कोथींबीर
मीठ चवीनुसार

.

पाकृ:

किसलेल्या बटाट्याच्या मिश्रणात लाल तिखट, हिरव्या मिरच्या, जीरेपूड, बडीशेप पावडर, चिरलेली कोथींबीर, अनारदाना पावडर व चवीप्रमाणे मीठ घालून एकत्र करावे.
मिरच्यांना मध्यभागी चिर द्या. वरील बटाट्याचे सारण मिरच्यांमध्ये नीट भरुन घ्या.
बेसनमध्ये लाल तिखट, हिंग व मीठ घालून एकत्र करा.
त्यात थोडे पाणी घालून मिश्रण भज्यांच्या पीठासारखे तयार करुन घ्या.
कढईत तेल मध्यम आचेवर तापत ठेवा.
तयार केलेल्या मिरच्या बेसनात घोळवून गरम तेलात अलगद सोडा व सोनेरी रंगावर तळून घ्या.

.

गरमा - गरम राजस्थानी मिरची वडा चिंच-खजुरेच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.

.

.

प्रतिक्रिया

टपरी's picture

17 Jul 2013 - 4:02 am | टपरी

मस्तच..... खुप छान..!!

अक्षया's picture

17 Jul 2013 - 5:35 pm | अक्षया

+ १

जय बजरंगबली! अशी खमंग पाकृ आणि खतरनाक फोटू देताना तुला आमची दया कशी आली नाही! ;)
हा प्रकार कधी खाऊन बघितला नाहीये पण भारी असणारच!
साहित्यामधील पाच ते सहा भावनगरी मिरच्या कितीजणांना पुरतात?

आज्जे जरा दमान! एकदम बजरंगबली? ऑ?
:)) :))

मदनबाण's picture

17 Jul 2013 - 12:04 pm | मदनबाण

आहाहा... पावसाळ्यात असे पदार्थ पाहुन अंमळ जळजळ झाली. ;)
आज्जे जरा दमान! एकदम बजरंगबली? ऑ?
हॅ हॅ हॅ! आज्जे ये गट्टा पुलाव का परिणाम हयं क्या ? ;)

(मश्रुम स्टार्टर्स प्रेमी);)

सानिकास्वप्निल's picture

17 Jul 2013 - 4:05 pm | सानिकास्वप्निल

अगं इथे मिळाल्या ह्या मिरच्या आकाराने खुपचं मोठ्या होत्या (cubanelle pepper) असाव्यात असा अंदाज आहे, त्यामुळे पाच ते सहा मिरच्या दोन माणसांना आरामात पुरतात :)

सुबोध खरे's picture

18 Jul 2013 - 12:56 pm | सुबोध खरे

हा राजस्थानी मिरची वडा मी जोधपूरला असताना खाल्ला होता. हा मिरची वडा आणि माव्याची कचोरी ( गुलाबजामचा खवा मोठ्या कचोरीत भरून ती शुद्ध तुपात तळून देतात. मी आणि आमचा आर्मीचा सर्जन असे दोघे एक मिरची वडा आणि एका कचोरीत ( दोघात मिळून) गार झालो. अतिशय स्वादिष्ट अश या दोन्ही पाककृती आहेत. त्यातून हे असे फोटो फारच जळजळ निर्माण करतात. आता असा मिरची वडा मुंबईत कुठे मिळतो हे शोधायला पाहिजे

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

21 Jul 2013 - 11:33 pm | निनाद मुक्काम प...

माव्याची कचोरी मात्र कोणत्याही मारवाडी किंवा राजस्थानी हलवायाकडे मुंबईच्या मिळते.
एवढी उत्कृष्ट असून तिला मुंबईत लोकप्रियता का लाभली नाही हे एक कोडेच आहे

जोधपूरला नई सडक वर नॅशनल हँड्लूम हाउस आहे.त्याच्या बाजूलाच एक खूप मोठे मिठाईचे दुकान आहे.तेथे हा चवदार मिराचीवडा गरमागरम तयार करून मिळतो.खूप मोठ्ठ असतो आणि काजू घालून फारच अप्रतिम बनवतात.

अय्याया! काय भारी दिसतं आहे!

जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले
तेव्हा या मिरचीने दर्शन दिले॥

कवितानागेश's picture

17 Jul 2013 - 7:28 am | कवितानागेश

मी मिरची खात नाही, पण तरीही फोटो इतका टेम्प्टिन्ग आहे की धागा उघडलाच!
ही भजी आता करावीच लागणार असं दिसतय..... :)

जुइ's picture

17 Jul 2013 - 8:16 am | जुइ

छान दिसत आहे एकदम! यावरुन चेन्नईला मरिना बीच वर खाल्लेली मिरची भजी आठवली :)

बाळ सप्रे's picture

17 Jul 2013 - 9:28 am | बाळ सप्रे

मस्त दिसतायत ..
मिरच्या चिरल्यावर सारण भरण्यापूर्वी आतल्या बिया काढून टाकल्यात का??

सानिकास्वप्निल's picture

17 Jul 2013 - 3:59 pm | सानिकास्वप्निल

मिरच्या चिरल्यावर बिया काढल्या नाहीत कारण त्या फार तिखट नाही, हवे असल्यास तुम्ही बिया काढू शकता :)

चिंतामणी's picture

17 Jul 2013 - 9:33 am | चिंतामणी

मिरची खायची भिती वाटते. पण शेवटचा फटु पाहून खल्लास.

आणि सुरवातीलाच दिलासा दिला आहेस

५-६ भावनगरी मिरच्या (तुम्ही कुठल्याही कमी तिखट असलेल्या मोठ्या मिरच्या घेऊ शकता,)

त्यामुळे खाउन बघायला हरकत नाही. ;)

प्रभाकर पेठकर's picture

17 Jul 2013 - 9:51 am | प्रभाकर पेठकर

झकास..! सध्या रमझानचा महिना सुरु आहे. त्या मुळे रोझा सोडणार्‍यांसाठी, सूर्यास्तासमयी, आमच्या उपहारगृही कांदा, बटाटा आणि मिरची भजी दरवर्षी केली जातात. मिरची भज्यांना भरपूर मागणी असते. विशेष म्हणजे रमझान महिन्याव्यतिरिक्त इतर महिन्यांमध्ये ही भजी करण्याची पद्धत नाही. गरमागरम, मस्त भजी अजिबात तिखट लागत नाहीत. अर्थात आम्ही एवढे सारण वगैरे भरण्याचे कष्ट घेत नाही. मिरच्या उभ्या चिरून मसाले, तिखट, हळद, मीठ घातलेल्या चण्याच्या पीठाच्या आवरणात बुडवून तळल्या जातात.

त्रिवेणी's picture

17 Jul 2013 - 9:57 am | त्रिवेणी

"मिरच्या उभ्या चिरून मसाले, तिखट, हळद, मीठ घातलेल्या चण्याच्या पीठाच्या आवरणात बुडवून तळल्या जातात."
पडत्या पावसात अशा मिरच्या खाण्याची मजा दुपटीने वाढते.

. मिरची भज्यांना भरपूर मागणी असते. विशेष म्हणजे रमझान महिन्याव्यतिरिक्त इतर महिन्यांमध्ये ही भजी करण्याची पद्धत नाही.

अगदी अगदी. महिनाभर 'हाफ डे'ची मज्जा आणि संध्याकाळी चहा भरोबर गरमा गरम भज्या.
कसली आठवण करुन दिलीत पेठकरकाका.

त्रिवेणी's picture

17 Jul 2013 - 9:52 am | त्रिवेणी

५-६ मिरच्या मी एकटीच खाईन.

कपिलमुनी's picture

17 Jul 2013 - 9:55 am | कपिलमुनी

फोटू एकदम कातिल !!

पूर्वी असाच एक प्रयोग सिमला मिरची सोबत केला होता ..तेव्हा तिचे आवरण जाड असल्याने फसला होता ..आता हे करून बघेन

मराठीप्रेमी's picture

17 Jul 2013 - 10:04 am | मराठीप्रेमी

एकदम जबरदस्त पाककृती. नक्कीच करून बघितली जाइल.

रुमानी's picture

17 Jul 2013 - 10:20 am | रुमानी

बाहेर पाउस पड्तोय आणी ईथे ही पाक्रु नेहमिप्रमाने मस्तच........
आत नुस्ते भजी तरी मागवुन खाने आले. :)

छ्या... अत्याचार आहे राव!!!!!

नेहमीप्रमाणी भारी!!

सुहास झेले's picture

17 Jul 2013 - 11:05 am | सुहास झेले

भारीच.... :) :)

फक्त ५ मिरच्या ....आमच्याकडे नवरोबा १०-१५ भजी एकटा संपवतो ... ह्या िमरच्या ितखट नसतात आणि िमरची भाजी आणि भजी दोन्हीही अप्रतिम होतात.

सानिका ला खरंच मानालायला हवे…खुप कलात्मक फोटो आणि पाकृ ि दल्याबद्दल
एकदम जबरदस्त.

सखी's picture

17 Jul 2013 - 7:51 pm | सखी

हेच म्हणते. सानिका ला खरंच मानालायला हवे…खुप कलात्मक फोटो आणि पाकृ दिल्याबद्दल.
नेहमीनेहमी कसं जमतं इतकं छान सादर करायला हाच प्रश्न मला नेहमी पडतो.

दिपक.कुवेत's picture

17 Jul 2013 - 11:39 am | दिपक.कुवेत

फोटो फारच टेम्प्टिंग आलेत. स्ट्फ प्रकार आवडला. काका म्हणतात त्या प्रमाणे ईकडे सुद्धा मिरच्या विधाउट स्टफिंग नुसत्या बेसनाच्या पिठात तळलेल्या देतात.

स्वाती दिनेश's picture

17 Jul 2013 - 11:43 am | स्वाती दिनेश

डिशमधून उचलून आत्ताच खावासा वाटतो आहे,
स्वाती

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jul 2013 - 12:33 pm | अत्रुप्त आत्मा

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हा.......!!!

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jul 2013 - 12:33 pm | अत्रुप्त आत्मा

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हा.......!!!

सान्वी's picture

17 Jul 2013 - 1:45 pm | सान्वी

मस्त.....

आता या मिरच्या शोधणे आले.

भावना कल्लोळ's picture

17 Jul 2013 - 3:05 pm | भावना कल्लोळ

कालच केल्या होत्या भावनगरी मिरच्या. पण मी थोड्या वेगळ्या पद्धतीने करते अश्या मिरच्या घरी, त्या बेसनाच्या पिठात घोळवून नाही करत. किसलेले खोबरे, थोडी हळद आणि मीठ, भावनगरी मिरच्या ना मध्ये चीर देऊन त्या मध्ये भरते आणि डायरेक्ट तेलात खरपूस तळते. वरण भात, वाटाणा बटाटाची भाजी, आणि या मिरच्या. मस्त जेवण होते, आमच्या नवरदेवाक लय आवडतो हा बेत.

सानिकास्वप्निल's picture

17 Jul 2013 - 4:08 pm | सानिकास्वप्निल

हो माझ्या आजीची हीच पद्धत आहे , ती जीरे + सुके खोबरे+ मीठ+ हळद भरुन ह्या मिरच्या बनवायची, त्याची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद :)
वरील पद्धत ही राजस्थानी आहे :)

किलमाऊस्की's picture

18 Jul 2013 - 10:39 pm | किलमाऊस्की

आमच्याकडेही अशाच करतात, हे पण भारी दिसतय.

मई मिरच्या खात नाही. पण कधीतरी करेन बाकीच्यांसाठी.

सौंदाळा's picture

17 Jul 2013 - 5:38 pm | सौंदाळा

ऑफीस बाहेरचा चहावाला अधुन मधुन मिरची भजी बनवत असतो. (अर्थात सारण न घालता)
आम्हीसुद्धा घरी दोन्-चारदा केली आहेत.
शिवाय मिरची भजी गोव्यातील बर्‍याच पारंपारीक उपहारग्रुहांमध्ये नाष्त्यासाठी असते. चहा, उसळ-पाव (ब्रुन), मिरची भजी वाह मज्जा येते.

अनन्न्या's picture

17 Jul 2013 - 6:16 pm | अनन्न्या

मग मिरच्या शोधते.

भावना कल्लोळ's picture

17 Jul 2013 - 7:03 pm | भावना कल्लोळ

वन प्लेट पार्सल प्लीज … टू मी अनन्या तै ….

नेहरिन's picture

17 Jul 2013 - 7:23 pm | नेहरिन

सानिका ..........एकदम "मारडाला " फोटो...........

पुर्वी कधितरि केली होति ही भजी ........... मस्तच

प्यारे१'s picture

17 Jul 2013 - 8:17 pm | प्यारे१

आआआआआह्ह्ह्ह्ह्ह्ह!

तुमचा अभिषेक's picture

18 Jul 2013 - 1:13 pm | तुमचा अभिषेक

हा एकंदरीत प्रकारच माझ्या आवडीचा मग आतले सारण असो वा नसो..
पण याचे इतके सुंदर रुप पहिल्यांदा बघतोय.. चवीलाही फोटोच्या तोडीस तोड असणारच यात शंका नाही..

जागु's picture

18 Jul 2013 - 1:15 pm | जागु

तोपासु.

चिगो's picture

18 Jul 2013 - 6:51 pm | चिगो

सगळ्या लग्न झालेल्या मिपाकरांच्या बायका, 'सानिकातैला मिपावर पाकृ टाकणे बॅन करा' ह्या मागणीसाठी मिपा सर्व्हरवर मोर्चा काढणार आहेत, असे विश्वसनीय सुत्रांकडून कळते. अधेमधे मिपा सर्व्हरचे गोठणे, हे ह्या महीलामंडळाच्या हालचालींमुळेच घडले, असेही ह्या सुत्रांकडून कळते. "काय शिंचा त्रास आहे? तिथे मिपावर त्या सानिकाच्या पाकृ बघतात, आणि आम्हाला छळतात ! एवढंच होतं तर 'मास्टर शेफ'शी लग्न करायचं..” ही खाजगीतली खळखळही कळली..

ताई, डोळे निवण्याची आणि जीभ खवळण्याची तुझी किमया गजब आहे.. अशीच कृपा ठेव..

चंबु गबाळे's picture

19 Jul 2013 - 12:19 pm | चंबु गबाळे

मस्त दिसतोय मिरची वडा. अगदी असाच वडा क्रुती youtube वर पाहिली संजीव कपुरची, अशीच कापुन.
http://www.youtube.com/watch?v=Xi8u1pQjOkE

पैसा's picture

20 Jul 2013 - 10:02 am | पैसा

सगळ्यात महत्त्वाचे: सानिका दुष्ट आहे! :P :-/

प्रभाकर पेठकर's picture

20 Jul 2013 - 10:06 am | प्रभाकर पेठकर

आणि त्यांनी शिकविलेले पदार्थ खाऊन मिपा सदस्य 'धष्टपुष्ट' होत चालले आहेत.

उत्तम पदार्थ आणि फोटोसुद्धा!
पाहूनच तोंपासू!
आता पावसाळा आलाच आहे जवळ!
तेव्हा अशाच नवनवीन कलाकृती येवू द्या अजून.
धन्यवाद.

इशा१२३'s picture

10 May 2014 - 2:57 pm | इशा१२३

अप्रतिम....सानिका नेहेमीप्रमाणे सुंदर फोटो...लेकाला आवडते म्हणून पनीरही खिसून घालते मी सारणात.आवडता पदार्थ आहे.

निवेदिता-ताई's picture

15 Nov 2014 - 3:01 pm | निवेदिता-ताई

मस्तच

चंद्रनील मुल्हेरकर's picture

17 Nov 2014 - 10:55 pm | चंद्रनील मुल्हेरकर

छान आहे..

वडा चिंच-खजुरेच्या चटणीबरोबर सर्व्ह करा

घ्या, इथल्या चिंच-खजुराच्या चटणीबद्दल कोणी काही बोललं नाही. आम्ही चुकूनमाकून लिहिलं तर धागाच हायजॅक केला! असो, असो. तूर्तास आपली पाककृती (नेहमीप्रमाणेच नेहमीइतकीच) आवडण्यात आली आहे असे नमूद करतो. वीकांताला करून (इतरांना खायला देऊन) पाहण्यात येईल.

>> आम्ही चुकूनमाकून लिहिलं तर धागाच हायजॅक केला!

काही वेळा, काय लिहीलंय पेक्षा कुणी लिहीलंय हे महत्त्वाचं असतं. ;)

एस's picture

17 Nov 2014 - 11:29 pm | एस

कंपूबाजी असे त्याचे दुसरे नाव आहे.

अर्थात तो मनुष्यस्वभाव आहे आणि विषयवस्तूचे मूल्यांकन आपण इतर घटकांचा आधार घेऊन ठरवत असतो. उदा. स्वस्त बाटलीतून आणि महागड्या बाटलीतूनही तीच वाईन चषकात ओतून प्यायला दिली तर चव वेगवेगळी लागते, तसं काहीसं. ग्रुप-सायकॉल्जीच्या दृष्टीने रोचक विषय. :-)

सानिकास्वप्निल's picture

18 Nov 2014 - 1:25 am | सानिकास्वप्निल

ते सगळं बरोबर आहे पण तुमच्या धाग्यावर धुमाकुळ घालणार्‍यांपैकी मी नाही हे सांगू इच्छिते ;)

प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद :)

प्यारे१'s picture

18 Nov 2014 - 4:47 pm | प्यारे१

मिरची वडा असल्यानं थोडंफार तिखट लागलं तर गोडाची चटणी काम करेल असा विचार असेल हो!
तुमचा वडा साधा वडा होता ना? मिर्ची वडा नव्हता. समझा करो जी!