भारताचं खरं दुर्दैव

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in काथ्याकूट
13 Jul 2013 - 4:13 pm
गाभा: 

नुकत्याच एका ऐतिहासिक ठिकाणाला दिलेल्या भेटीत पुन्हा एकदा लोकांच्या भावनाहीनतेचं, चंगळवादाचं, मगरुरीचं, अहंकाराचं प्रदर्शन बघायला मिळालं. तसं ते वाण्याकडून चार साबण आणायला गेलो तरीही बघायला मिळतं; पण अशा विशेष ठिकाणी, किंवा काही विशेष सण-समारंभात ते जरा ‘विशेष’ असतं. रस्त्यावर गाडी चालवताना तर आपण जगाचे राजे हा भाव तनामनात घेऊन लोकं वावरतात. म्हणजे सांगायचंच झालं, तर त्यांच्या वाटेमधे साधं पाखरू जरी आलं तरी त्याची आई-बहीण काढतात.

आता रांग आहे, म्हणजे आपल्या पुढे लोकं असू शकतात. पण आपण जगाचे राजे म्हटल्यावर आपल्या मधे कुणी येऊच कसा शकतो? मग अरेरावी करणे; चार शिव्या देणे किंवा ज्याचं आपल्याला बाळकडू मिळालंय तो भ्रष्टाचार करणे (संबंधित व्यक्तीस चार पैसे टेकवावेत, की... हं !) हे बघायला मिळतं. पैसे ही कमवण्याची, साठवण्याची, (देण्याची वगैरे सोडाच) गोष्ट नसून ती दाखवण्याची गोष्ट आहे; हे इथलं तत्वज्ञान आहे.

हा विषय मोठा आहे; पण थोडक्यात कसं आहे, की वर नमूद केल्याप्रमाणे जे वागतात, त्यांना ते चूक आहे हे कळण्याची बुद्धी नसते, आणि ज्यांना ते चूक आहे के कळण्याची बुद्धी असते, त्यांना तसं वागवणा-यांना थांबवणं शक्य नसतं.भारत म्हणूनच मागे आहे आणि सदैव राहील.

aa

‘लायकी नसलेल्यांकडे पैसा आहे; आणि हिंमत नसलेल्यांकडे अक्कल आहे; हेच भारताचं खरं दुर्दैव आहे.’
- अ. ज. ओक

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

13 Jul 2013 - 4:24 pm | विजुभाऊ

हे अ ज ओक कोण. पु ना ओकांचे कोणी आहेत का?
लेखातील मतांबद्दल असहमत. काही अंशी परीस्थिती वाईट असेल पन ती दुर्दैवी आहे असे वाटत नाही.
ज्याना पुढे यायचे आहे ते हरहुन्नरीने पुढे येतात.
चार शिव्या देणारे पण काहीच नाकर्ते त्यांच्या गुणानी मागे पडतात.
उद्दामपणा करणारे त्यांच्या पाठीमागे कितीही मोठे पाठबळ असले तरी ते अम्गच्या गुणांमुळे.कुठल्याकुठे फेकले जातात हे राहुल महाजन यांच्या उदाहरणावरुन दिसून येते.

वेल्लाभट's picture

13 Jul 2013 - 8:10 pm | वेल्लाभट

ज्याचं त्याचं मत.

आणि पु.ना.ओक फार मोठं नाव आहे. अ.ज.ओक एक नगण्यच.

lakhu risbud's picture

13 Jul 2013 - 6:21 pm | lakhu risbud

भटसाहेब मुतपीठीय लेख वाटला. चित्र टाकण्यामागचे कारण समजले नाही.
ते मटा किवा सकाळ मध्ये जसे लेखाशी संबंध नसणारी चित्रे असतात तसेच वाटले.

वेल्लाभट's picture

13 Jul 2013 - 8:08 pm | वेल्लाभट

बर!

पैसा's picture

13 Jul 2013 - 10:48 pm | पैसा

काही पटलं काही अंशी नाही. म्हणजे भारत मागे म्हटलं तर नेमका कोणत्या क्षेत्रात मागे आहे, असे सांगायला पाहिजे. सगळ्याच क्षेत्रात मागे आहे असे नाही. परत भ्रष्टाचार, मग्रुरी जगात सगळीकडेच आहे.

‘लायकी नसलेल्यांकडे पैसा आहे; आणि हिंमत नसलेल्यांकडे अक्कल आहे; हेच भारताचं खरं दुर्दैव आहे.

हे काही प्रमाणात खरं आहे. पण पुन्हा १००% वेळा खरं असं म्हणता येणार नाही. रतन टाटा, किरण बेदी अशी कितीतरी चांगली माणसेही भारतात आहेत. जिवावर उदार होणारे सैनिक, कमांडोज आहेत. एवढे निराश होऊ नका. परिस्थिती अजून पाकिस्तान इतकी वाईट नाही!

वेल्लाभट's picture

14 Jul 2013 - 12:38 am | वेल्लाभट

रतन टाटा आणि बाकी सग्गळे तत्सम एकत्र करा हो; टनात दहा ग्रॅम. बाकीचं काय!
परिस्थिती पाकिस्तान इतकी वाईट नाही; पण मग चांगली म्हणावी अशी तरी आहे काय? मी निराशावादी नक्कीच नाही; पण वास्तव दिसतं त्यावर माझं मत मांडलं.

सैनिकही आपसात बोलत असतील हो, की कुणाचं रक्षण करतोय आपण?... या लोकांचं? ज्यांना त्यांच्या संस्कारांचं रक्षण करता नाही आलं? ज्यांना त्यांच्या आयाबहिणिंच्या अब्रूचं रक्षण करता नाही आलं? ज्यांना मानवतेचं रक्षण करता नाही आलं? कुणाचं रक्षण करायचं.... असो !

काळा पहाड's picture

13 Jul 2013 - 11:21 pm | काळा पहाड

आपल्या मधे कुणी येऊच कसा शकतो? मग अरेरावी करणे; चार शिव्या देणे किंवा ज्याचं आपल्याला बाळकडू मिळालंय तो भ्रष्टाचार करणे

यात एका विशिष्ट जातीचे शुरवीर लोक आघाडीवर असतात हे सांगायला नकोच!

वेल्लाभट's picture

14 Jul 2013 - 12:32 am | वेल्लाभट

पहाड साहेब, अगदी बरोबर ओळखलंत.

आणि तुम्ही गडद नाईट चे पंखे आहात हे मी ओळखलं.
तर मग मीही त्यातल्याच एका संवादाची उजळणी करतो...
We stopped searching for monsters under our bed, when we realized, they are inside us.

तुषार काळभोर's picture

14 Jul 2013 - 9:32 am | तुषार काळभोर

दुखणं हे आहे तर!!!
"एका विशिष्ट जातीचे लोक" अरेरावी/मग्रुरी/माज करतात आणि आम्ही करत नाही/आम्हाला करता येत नाही/आम्ही करू शकत नाही, याचा त्रास होतोय का?
ती जात कोणती हेही सांगा. मळमळ ओकली की कमी होते म्हणतात.

वेल्लाभट's picture

14 Jul 2013 - 10:22 am | वेल्लाभट

न म्हटलेलं कसं हो वाचलंत पैलवान दादा? मानलंच पाहिजे तुम्हाला.
अजून काही निष्कर्श काढले असाल तर सांगा; आवडेल.

माझ्यासाठी म्हणाल तर मी जे ओकायचं होतं ते धाग्यात ओकलंय. वरच्या प्रतिसादात म्हटल्यानुसार काही विशिष्ट वर्गातील लोकं जास्त माज करतात जे सर्वज्ञात सत्य आहे. पण माज करणारे सगळेच असतात; आणि समस्या तीच आहे.

त्यामुळे आम्ही तसं करत नाही किंवा आम्हाला तसा माज करता येत नाही; हा मुद्दाच नाहीये इथे. परंतु तुमचा दृष्टिकोन मोठा रंजक वाटला.

तुषार काळभोर's picture

14 Jul 2013 - 1:36 pm | तुषार काळभोर

न म्हटलेलं कसं हो वाचलंत

-न म्हटलेलं कुठंय? काळा पहाड म्हणाले की,यात एका विशिष्ट जातीचे शुरवीर लोक आघाडीवर असतात हे सांगायला नकोच! (एवढं एकच वाक्य)
त्याच्यावर तुम्ही "पहाड साहेब, अगदी बरोबर ओळखलंत." अशी प्रतिक्रिया दिलीत. अर्थात,
"अरेरावी करणे; चार शिव्या देणे किंवा ज्याचं आपल्याला बाळकडू मिळालंय तो भ्रष्टाचार करणे" (संदर्भ) या गोष्टी करण्यात " एका विशिष्ट जातीचे शुरवीर लोक" आघाडीवर असतात, या काळा पहाड यांच्या म्हणण्याशी तुम्ही सहमत आहात.

इथे तुम्ही म्हणता की काही विशिष्ट वर्गातील लोकं जास्त माज करतात जे सर्वज्ञात सत्य आहे , मग सांगाना, कोणता विशिष्ट वर्ग, कोणती ठराविक जात?

तुम्हाला लोक अरेरावी/माज/भ्रष्टाचार करतात यावर वक्तव्य करायचे आहे, की तथकथित विशिष्ट/ठराविक वर्गातील लोक अरेरावी/माज/भ्रष्टाचार करतात, यावर करायचे आहे?

जर लोक अरेरावी/माज/भ्रष्टाचार करतात, एवढंच (irrespective of जात) म्हणायचं असेल, तर काळा पहाड यांची मूळ प्रतिक्रिया
आणि त्याला समर्थन देणारी तुमची प्रतिक्रिया दोन्ही गैरलागू होतात.

जर " तथकथित विशिष्ट/ठराविक वर्गातील लोक अरेरावी/माज/भ्रष्टाचार करतात", असे म्हणायचे असेल, तर तो विशिष्ट/ठराविक वर्ग कोणता, हे सांगाना!! आणि जर तसे असेल तर, प्रॉब्लेम अरेरावी/माज/भ्रष्टाचार यांचा नसून तो तथकथित ठराविक/विशिष्ट वर्गाकडून केला जातो याचा आहे, असा त्याचा अर्थ होतो.

कोणतीही गोष्ट जातीशी निगडीत करायलाच हवी का?

वेल्लाभट's picture

14 Jul 2013 - 10:24 pm | वेल्लाभट

मला एक कळत नाहीये; जणु काही तुम्हालाच काहीतरी म्हटलं जातंय अशा प्रकारे तुम्ही का प्रतिसाद देता आहात? की तुम्ही तथाकथित `त्या' वर्गात मोडता? :प

बाकी तर्क करून अर्थ लावण्यास तुम्ही समर्थ आहातच. तेंव्हा कीप इट अप.

टवाळ कार्टा's picture

14 Jul 2013 - 7:45 am | टवाळ कार्टा

सगळ्याच जातीत हे लोक असतात

पाषाणभेद's picture

14 Jul 2013 - 3:10 am | पाषाणभेद

>>>>>नुकत्याच एका ऐतिहासिक ठिकाणाला दिलेल्या भेटीत पुन्हा एकदा लोकांच्या भावनाहीनतेचं, चंगळवादाचं, मगरुरीचं, अहंकाराचं प्रदर्शन बघायला मिळालं.

आपल्याबरोबर कोणत्या ठिकाणी कसा प्रसंग घडला होता हे सांगितले असते तर लेख समजायला मदत झाली असती.
आता सांगता का?

वेल्लाभट's picture

14 Jul 2013 - 9:17 am | वेल्लाभट
इच्चक's picture

15 Jul 2013 - 11:13 am | इच्चक

करणारे लोक जास्त आहेत, हेच खरं दुर्दैव.

अनियंत्रित झालेली प्रजा आणि नियंत्रण ठेवु न शकणारी शासन व्यवस्था असली की असं दिसुन येतं.

ऋषिकेश's picture

15 Jul 2013 - 12:06 pm | ऋषिकेश

काय हो आज सकाळी सकाळीच?!

बाळ सप्रे's picture

15 Jul 2013 - 3:08 pm | बाळ सप्रे

"एका ऐतिहासिक स्थळी तुमच्याबाबत असं नक्की काय घडलं की त्यामुळे एका वर्गाचे लोक तुम्हाला भावनाहीन, चंगळवादी, मगरुर, अहंकारी, संपत्तीचं प्रदर्शन करणारे वाटु लागले" ते वाचायला आवडेल..

वेल्लाभट's picture

15 Jul 2013 - 4:26 pm | वेल्लाभट

हाहाहा! सप्रे साहेब ते काय नि कसं घडलं याची लिंक मी वरती एका प्रतिसादात दिलेली आहे. आणि 'मी' माझ्या पोस्ट मधे कुठेही 'एका विशिष्ट' जातीचे हा उल्लेख केलेला नाही; तेंव्हा नेमकं तेच वाटण्याची बाधा वाचकांना न व्हावी. आता कुणी तसं म्हटलंय ते `इन जनरल' अनुशंगाने म्हटलंय आणि त्याला माझं अनुमोदन मी दिलं. तो वेगळा विषय होतो. माझ्या या धाग्याशी त्याचा संबंध नाही. इथे मी केवळ लोकांची मानसिकता, स्वभावधर्म आणि त्यामुळे खुंटणारी देशाची प्रगती यावर भाष्य केलेलं आहे.

बाळ सप्रे's picture

15 Jul 2013 - 4:40 pm | बाळ सप्रे

OK. I missed it..
जातीचा काही संबंधच नाही यात.. मी सुद्धा वर्ग म्हटलय ते त्या प्रवृत्तीच्या रोखाने..
तो लोहगडाचा लेख वाचलाय.. खूपच वाईट.. तशा अनुभवाने खरच तळतळाट होतो..

आशु जोग's picture

17 Jul 2013 - 5:04 pm | आशु जोग

आपल्या इथल्या लोकांना किनई ट्रॅफिक सेन्सच नाही आणि चॉकलेट खाल्ले की रॅपर खाली टाकून देतात (चॉकलेट एकटेच खातात हे दु:ख आहेच) आणि कुठेही थुंकतात. फुटपाथवरून गाड्या दामटतात. रांग मोडून पुढे घुसतात. नानूचे बाबा तर धोतरात बांधून वांगी घेऊन येतात, कापडी पिशवी का घेऊन जात नाहीत काय की बाई.