Skip to main content

बाळूचे स्वप्न - (बाल कविता)

लेखक विदेश यांनी सोमवार, 08/07/2013 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
सशाने धरले सिँहाचे कान गरगर फिरवून मोडली मान । शेळीने घेतला लांडग्याचा चावा लांडगा ओरडला-धावा धावा । मुंगीची ऐकून डरकाळी कानात हत्ती घाबरून पळाला रानात । कासवाने लावली हरणाशी शर्यत हरीण दमले धापा टाकत । उंदराने बोक्याच्या पकडून मिशा काढायला लावल्या दहा उठाबशा । बाळूने मोजले दोन सात चार स्वप्नात बाळू मोजून बेजार ! '
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2828
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

एकदम चांगली विनोदी कविता. (पण प्राण्यांचा स्वभावविशेषगूण समजले आहे, एवढे वय असणार्‍यांनाच ही कविता कळू शकेल आणि आनंद घेता येईल.)