माझी कृष्ण-धवल छायाचित्रकारी.....(कलादालनात टाकता येत नाही म्हणून येथे टाकत आहे )

Primary tabs

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in कलादालन
30 Jun 2013 - 10:57 pm

काही महिन्यापूर्वी एकदम कृष्णधवल छायाचितत्रांनी मनाचा ताबा घेतला आणि त्यातून तयार झाली ही छायाचित्रे......
एका मित्राच्या अत्यंत जुन्या म्हणजे बघा पेशवेकालीन वाड्यात गेलो असताना ही जुनी जाळी आणि त्यावर चढलेला हा वेल नजरेस पडला. जाळीचे टेक्स्चर व मनीप्लँटचा वेल....
मनी प्लँट...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

देवळातील शिल्पे मला नेहमीच कृष्णधवलमधे भावतात. कारण त्यावर पडलेल्या प्रकाशाचा आणि सावल्यांचा खेळ ! असेच एक शिल्प सिन्नरच्या गोंदेश्र्वरच्या देवळात टिपले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

कोवळ्या मानातून झिरपणारा प्रकाश हा माझ्या आवडीचा विषय.....कोवळ्या लालसर रंगातून, जवळ जवळ पारदर्शक असणार्‍या पानातून झिरपणारा प्रकाश जेव्हा कोवळा होऊन बाहेर पडतो ते दृष्य मोठे विस्मयकारक वाटते.
लाईट फिल्टर....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

लॉर्ड ऑफ द रिंग मधील नासगूल....
काळ्या कुट्ट कावळ्याचा कृष्णधवल फोटो काढायला विशेष प्रयास पडले नाहीत.....पण हा फार जवळून काढला आहे......
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

हंपीतील एक देऊळ......
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

पायर्‍या..
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

ही वाट दूर जाते......
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

बिनशेंदूराचा देव..........
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

हे म्हणजे वाळलेले गवत..
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

हंपीचे दगड....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

आशिर्वाद.......
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Watching each other......
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

हंपीतील एक शिल्प.......
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

बदामी..........
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

कृष्णधवल चायाचित्रांची गंमत काही वेगळीच............

जयंत कुलकर्णी.

स्थिरचित्र

प्रतिक्रिया

कृष्णधवलचा अभिप्रेत प्रभाव दिसण्यासाठी शिल्पकलेसाठी दिवसा नऊ ते चार वेळ टाळून चित्रे घेऊन पाहावी असं मला वाटतं .जवळच्या पांडवलेणी (नाशिक) येथे प्रयोग करता येईल .कैमेरा अॅंगल वेगळा ठेऊन (आणि २४/२८ मिमि लेन्स वापरून)किँवा प्रकाशाच्या विरूध्द काही चित्रे फारच आकर्षक येतात .हम्पिचे खडकांचे फोटो अगदी सकाळी/संध्याकाळी आणखी चांगले येतील .

प्रभाकर पेठकर's picture

8 Jul 2013 - 11:58 am | प्रभाकर पेठकर

सूर्याचा कोन आणि उन्हाचा कोवळेपणा, लांब कोवळ्या सावल्या शिल्पाला भरीवपणा देईल.

स्पंदना's picture

1 Jul 2013 - 7:31 am | स्पंदना

watching each other मध्ये हत्तीच्या डोळ्यात भाव किती मायाळु आहेत.
शेवटचा ओवरीचा फोटो फार छान वाटला.
सारेच छान आहेत पण कमेंटस करायच्या म्हंटल्यातर एक अख्खा लेख होइल.
ते रौद्र निसर्गाच्या खाली दबलेले मंदिरही मस्तच.
कावळ्याचा डोळा विस्मयचकित!
स्पा हा फोटो घे रे त्यांच्याकडुन मागून. बरा पडेल तुझ्या कथांना.

सुधीर's picture

1 Jul 2013 - 8:44 am | सुधीर

सगळीच छायाचित्र आवडली.

कृष्णधवल चायाचित्रांची गंमत काही वेगळीच............

अगदी सहमत. मलाही कृष्णधवल छायाचित्रे अतिशय आवडतात.
कुलकर्णी साहेब, आपण येथे मिपावर टाकलेली सर्व छायाचित्रे आवडीने पाहिली आहेत. ती छायाचित्रे म्हणून त्यांच्या जागी चांगली आहेत, तशीच ही सुद्धा. त्यातली कॉम्पोझिशन म्ह्णून १, ३, ५, ७ आणि १४ आवडली, नंबर ४ देखील चांगले कॉम्पोझिशन होऊ शकले असते.
स्पष्टोक्ती बद्दल राग येणार नाही अशी आशा करते. :)

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jul 2013 - 10:43 pm | अत्रुप्त आत्मा

अप्रतिम हो काका... :) शेवटचा फोटू,म्हणजे तर ... मारडाला!!!

किसन शिंदे's picture

8 Jul 2013 - 8:52 am | किसन शिंदे

सगळेच फोटू फार मस्त दिसताहेत हो सर.

पैसा's picture

8 Jul 2013 - 10:08 am | पैसा

सगळीच छायाचित्रे आवडली. कॄष्णधवल चायाचित्रे एका वेगळ्याच जगात नेतात. जुन्या देवळांचे फोटो कृष्णधवल चांगले दिसतात तशीच माणसांची छायाचित्रे सुद्धा. जुन्या कृष्णधवल सिनेमांची मजा काही औरच! मधुबाला, वहीदा सगळ्याजणी कृष्णधवलमधेच काय जादुई दिसायच्या!

चित्रगुप्त's picture

8 Jul 2013 - 10:59 am | चित्रगुप्त

कॄष्ण-धवलची मौज काही न्यारीच. त्यात आणखी जर ते फोटो सेपिया मधे केले तर सोने मे सुहागा.

प्रभाकर पेठकर's picture

8 Jul 2013 - 12:02 pm | प्रभाकर पेठकर

कावळा आणि बदामी ही छायाचित्रे विशेष आवडली.
कावळ्याच्या चेहर्‍यावरील सूक्ष्म तपशिल आणि बदामीतील छाया-प्रकाश उल्लेखनिय आहे.

Dhananjay Borgaonkar's picture

8 Jul 2013 - 1:34 pm | Dhananjay Borgaonkar

कमाल आले आहेत फोटो. हंपी, बदामीचे तर खुपच भारी.

एकुजाधव's picture

31 Jan 2014 - 12:57 pm | एकुजाधव

छान फोटोज.

अनिरुद्ध प's picture

31 Jan 2014 - 1:09 pm | अनिरुद्ध प

छायाचित्रं सुन्दर आहेत ,एक प्रष्ण आहे,कि सद्ध्या क्रुष्ण-धवल फिल्म मिळतात का?

मृगजळाचे बांधकाम's picture

2 Mar 2014 - 11:46 pm | मृगजळाचे बांधकाम

हत्तीचा फोटो छानच आहे