मित्रानो सर्वाना माहित आहेच. तरी आपल्यावरील प्रेमापोटी एकदा रिपीट करतो.
पावसाळ्यात viral जोरात आहे. तरी सर्वांनी पाणी उकळून प्यावे.(लहान मुलांना must. ते शक्य नसल्यास water purifier वापरावे. घरात Paracetomol चा stock नक्की ठेवा. लहान मुलांच्या वय/वजनाप्रमाणे syrup. Crocin या ब्र्यांडवर मुलांच्या वय/वजनाप्रमाणे घ्यायचे कोष्टक दिलेले असते. Power उपलब्ध भारतात १२० आणि २४० (टीप:ही जाहिरात नव्हे. ताप अंगावर काढू नका. इंजेक्षनला घाबरू नका. :)
पालेभाज्या खूप धुवून, चांगल्या शिजवूनच खा. (कच्च्या सलाद्चे फ्याड पावसाळ्यात नको). या दिवसात अग्नी मंद असतो,म्हणून जेवणात आले,लसुन,सैंधव यांचा उपयोग नक्की करा. पावसाळ्यात गाडीवरची वडे,भजी मस्त लागतात पण त्याचा अतिरेक नको आणि नेहमीच्या विक्रेत्याकडूनच घ्या. चहा बनविताना चहा मसाला, गवती चहा, पुदिना, मिरे, लवंगा, इत्यादींचा वापर नक्की करा. मांसाहार फक्त फ्रेश - नेहमीच्या खाटकाकडून घ्या. अथवा माहितीतल्या हॉटेलमध्येच खा. पावसाळ्यातल्या रानभाज्यांचा अवश्य स्वाद घ्या. मश्रूम नवीन विक्रेत्याकडून अजिबात घेऊ नका. धूम्रपान शक्यतो नकोच कारण त्यामुळे घशाचे इन्फेक्शन वाढते. मदिरापान देखील प्रमाणात करा.
Monsoon Picnic / Trek कराल तेव्हा वातावरण morally पवित्र आणि स्वच्छ ठेवा. (मिपाकर सुज्ञ आहेतच).
पावसाळ्यातला काळजीच्या अजून सूचना कृपया प्रतिक्रियेत लिहाव्यात. जनहितार्थ. :)
धन्यवाद .
प्रतिक्रिया
21 Jun 2013 - 10:42 pm | पाषाणभेद
तुम्ही वैद्य आहात काय हो? :-) (हळू घ्याल ही अपेक्षा. मिपा बंद असल्यानंतरची बोटांची हौस भागवून घेतो आहे. :-) )
फार छान काळजी करणारा लेख.
आला पावसाळा - तब्येत सांभाळा
आला उन्हाळा - तब्येत सांभाळा
आला हिवाळा - तब्येत सांभाळा
असले मागचेच लेख वर्तमानपत्रवाले नविन म्हणून छापत असतात काय?
22 Jun 2013 - 10:21 am | सचिन कुलकर्णी
फार छान काळजी करणारा लेख.धन्यवाद.
तसा व्यवसायाने मी IT मध्ये आहे.(गरीब बिचारा!!). पण माझे मित्र मला डॉक्टर या टोपण नावानेच हाक मारतात. :)
डॉक्टर व्हायची हाउस भागवता आली नाही म्हणून शरीरशास्त्राचा अभ्यास करून Naturopathy,आयुर्वेदाचा थोडाबहुत अभ्यास केला आहे.
देवाच्या कृपेने Allopathy ची देखील बर्यापैकी माहिती झाली आहे.
आणि वर्तमानपत्रे बहुधा आपण म्हन्त्ल्याप्रमाणे संग्रहित लेखच छापत असावेत. :)
22 Jun 2013 - 10:26 am | सचिन कुलकर्णी
तसे आपणही Diabetologist आहातच की.. :)
(मनापासून म्हणतो आहे हं हे. थट्टेने नव्हे.)