चित्र-रंगावली प्रदर्शन

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in कलादालन
6 May 2013 - 5:01 pm

श्री.जगदीश चव्हाण सर,
चित्र रंगावली आणी इतर सर्व प्रकारच्या रांगोळ्यां मधिल एक मोठ्ठं नाव...माझी यांची ओळख आमचा १ व्यवसाय-मित्र,जो त्यांचा विद्यार्थी आहे,त्याच्यामुळे झाली.गेल्या वर्षी पहिल्यांदा मी सरांच्या आणी त्यांच्या शिष्यवर्गाने काढलेल्या उत्तमोत्तम रांगोळ्या पाहिल्या आणी मन भारावुन गेलं आमचा मित्र त्याच प्रदर्शनात माझीपण १ फुलांची रांगोळी व्हावी म्हणुन म्हणाला होता आणी गेल्या वर्षी मी कामांच्या फुल्ली लोडेड सिझनमधे जेव्हढा वेळ मिळेल त्यात जमेल तशी रांगोळी काढली पण होती.या वर्षी मात्र चव्हाण सरांनी सुमारे महिनाभर आधी मला अवर्जून प्रदर्शनाची तारिख/वेळ इ.सर्व काही सांगितलं आणी,''तुंम्ही फुलांची रांगोळी काढायचीच आहे'' असं आग्रहानी बजावलं देखिल. हा आग्रह निश्चितपणानी माझा हुरूप वाढवणाराच होता...मलाही अश्या प्रकारे एखाद्या प्रदर्शनात सहभागी व्हायचा/व्यक्त व्हायचा अनुभव हवाच होता...त्यामुळे सारा योग जुळून आला आणी मी देखिल काल तिथे माझी थोडिशी कला सादर केली.

काल दिनांक ५ रोजी या चित्र रंगावली प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता झालं. अभिनेती स्पृहा जोशी ह्या प्रमुख पाहुण्या होत्या. या चित्र रांगोळ्यांचं वैशिष्ठ्य म्हणजे,प्रथम दर्शनीच मनाची पकड घेण्याची विलक्षण ताकद त्यांमधे आहे.तसच जो प्रकार एरवी ब्रश/खडू/पेन्सिल इ.माध्यमातूनच व्यक्त होतो...तो रांगोळ्या आणी रंगछटां मधुन साकार करण हे अतिशय जिद्द आणी कलात्मकतेचं काम आहे.गेली २० वर्ष चव्हाण सर ही कला जोपासत वाढवत आहेत. आज त्या निमित्तानी इथे काही चित्र रंगावल्या शेअर करतो... बाकि आपणा सर्वांनी या व इतर रांगोळ्या प्रत्यक्ष पहाण्यासाठी प्रदर्शनाला जरूर भेट द्यावी...
http://sphotos-e.ak.fbcdn.net/hphotos-ak-ash3/942795_453558741397084_1651570320_n.jpg
http://sphotos-c.ak.fbcdn.net/hphotos-ak-ash3/575454_453558451397113_183919731_n.jpg
http://sphotos-h.ak.fbcdn.net/hphotos-ak-ash3/946896_453558784730413_1838280153_n.jpg
http://sphotos-d.ak.fbcdn.net/hphotos-ak-prn1/935647_453572871395671_524110558_n.jpg
http://sphotos-d.ak.fbcdn.net/hphotos-ak-ash3/942996_453570294729262_482783606_n.jpg
http://sphotos-f.ak.fbcdn.net/hphotos-ak-prn1/946784_453574164728875_859647726_n.jpg
http://sphotos-f.ak.fbcdn.net/hphotos-ak-prn1/943388_453569371396021_1502374604_n.jpg
http://sphotos-c.ak.fbcdn.net/hphotos-ak-ash3/575584_453564348063190_1732323068_n.jpg
http://sphotos-e.ak.fbcdn.net/hphotos-ak-prn1/936920_453574534728838_127422082_n.jpg
http://sphotos-d.ak.fbcdn.net/hphotos-ak-ash3/946653_453562314730060_86239130_n.jpg
http://sphotos-e.ak.fbcdn.net/hphotos-ak-ash3/942386_453562058063419_686700748_n.jpg
http://sphotos-c.ak.fbcdn.net/hphotos-ak-frc1/944201_453562144730077_1567667342_n.jpg
http://sphotos-a.ak.fbcdn.net/hphotos-ak-ash4/393137_453563654729926_605586782_n.jpg
आणी शेवट ही आमची उद्घाटनीय-फुलांची रोंगोळी
http://sphotos-h.ak.fbcdn.net/hphotos-ak-ash3/940840_453570508062574_1512668198_n.jpg
http://sphotos-e.ak.fbcdn.net/hphotos-ak-ash3/942425_453572754729016_390250917_n.jpg
=====================================================================
रांगोळी-चित्रांचे भव्य प्रदर्शन
दिनांक ५ मे ते ७ मे रोजी,वेळ- सकाळी ९ ते रात्री ९.
ठिकाण-घोले रोड आर्ट गॅलरी, म.न.पा.क्षेत्रीय कार्यालयाचे जवळ...
महात्मा फुले संग्रहालया समोर...घोले रोड,(बालगंधर्व चौक ते एफ.सी.रोड रस्ता)

प्रवेश-विनामूल्य...
======================================================================

कला

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

6 May 2013 - 5:28 pm | विसोबा खेचर

खल्लास..

एकापेक्षा एक सुरेख...!

खूप आनंद वाटला, समाधान वाटलं...

तात्या.

जयवी's picture

6 May 2013 - 5:32 pm | जयवी

अ प्र ति म !!
एकसे बढकर एक रांगोळ्या......अहाहा !!
आणि तुमची रांगोळी पण झकास ... :)

स्पा's picture

7 May 2013 - 9:39 am | स्पा

बुवा लयच भारी.
सर्व रांगोळ्या अप्रतिम

किसन शिंदे's picture

7 May 2013 - 8:43 pm | किसन शिंदे

+२
सर्वच रांगोळ्या एकापेक्षा एक आहेत. अशी रंगावली प्रदर्शने दिवाळीच्या वेळेस ठाण्यात भरतात, मी आवर्जून पाहायला जातो.

प्रसाद प्रसाद's picture

6 May 2013 - 5:32 pm | प्रसाद प्रसाद

मस्त.... खरंच रांगोळी आहे की चित्र काढलंय ते कळत नाहीये!
If I am not wrong, गेले कित्येक वर्ष दर गणेशोत्सवात जगदीश चव्हाण सरांचे पुण्यात रंगावल्यांचे प्रदर्शन असते.

अत्रुप्त आत्मा's picture

6 May 2013 - 5:48 pm | अत्रुप्त आत्मा

@If I am not wrong,>>> यु आर करेक्ट!!! :)

a

प्यारे१'s picture

6 May 2013 - 5:43 pm | प्यारे१

सुरेख.

नि३सोलपुरकर's picture

6 May 2013 - 5:45 pm | नि३सोलपुरकर

क्लास आहेत सारे चित्रे (रांगोळ्या) आणि तुमची रांगोळी पण झकास ... smiley. अ.आ राव.
देव पण काय कला देतो एकेकाच्या हातात.

मस्त चित्रे आहेत हो आत्मूस!!! आवडल्या गेले आहे. :)

ढालगज भवानी's picture

6 May 2013 - 6:00 pm | ढालगज भवानी

इथे हे फोटो टाकल्याबद्दल अनेक धन्यवाद.

कोमल's picture

6 May 2013 - 6:02 pm | कोमल

खूपच छान..

ढालगज भवानी's picture

6 May 2013 - 6:02 pm | ढालगज भवानी

हाहा कसली गोड स्मायली आहे गं :)

प्रचेतस's picture

6 May 2013 - 6:07 pm | प्रचेतस

एकदम सुरेख हो आत्मुदा.

मुक्त विहारि's picture

6 May 2013 - 6:15 pm | मुक्त विहारि

रांगोळ्या मस्त काढल्या आहेत...

जमल्यास, सर्व रांगोळ्यांचे फोटो टाकाल का?

दिपक.कुवेत's picture

6 May 2013 - 6:37 pm | दिपक.कुवेत

अप्रतिम देखण्या रांगोळ्या. रांगोळ्यातुन चेहर्‍यावरचे भाव दाखवण म्हणजे ___/\___.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 May 2013 - 9:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

पुष्परंगावलीसकट सगळ्या रांगोळ्या नंबर १ !

अभ्या..'s picture

6 May 2013 - 9:45 pm | अभ्या..

नं. ३०, ४०, ५२ आणि ६२ अगदी मूळ चित्राबरहुकूम. आवडल्या.
गुर्जींची पुष्परंगावली नेहमीप्रमाणेच अप्रतिम. :)
धन्यवाद

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 May 2013 - 9:30 am | ज्ञानोबाचे पैजार

मस्त मस्त मस्त.
रांगोळ्या अगदी मुळ चित्राबरहुकुम आलेल्या आहेत.
गुरुजींच्या फुलांच्या रांगोळी बद्दल काही वेगळे बोलणे नलगे.

स्पा's picture

7 May 2013 - 9:37 am | स्पा

स्पृहा जोशी चा फटू कुठेय ....
;)

आम्ही नै जा :P

अत्रुप्त आत्मा's picture

7 May 2013 - 10:14 am | अत्रुप्त आत्मा

तू बघशील...! म्हणुनच टाकला नाहिये. :-b

चित्रगुप्त's picture

7 May 2013 - 10:31 am | चित्रगुप्त

रांगोळी हे एक अत्यंत कसबाचे आणि अवघड काम आहे, आणि त्यात पारंगतता मिळवणे मोठ्या जिकिरीचे आणि चिकाटीचे काम आहे, हे खरेच. इथे दिलेल्या सर्व रांगोळ्यांचे कर्ते त्याबद्दल कौतुक आणि अभिनंदनास पात्र आहेत हेही खरे.
पण मला नेहमी असा प्रश्न पडतो की हे कसब, चिकाटी आणि कौशल्य यापलिकडे जाण्याचा ही मंडळी का प्रयत्न करत नाहीत? त्यांनी तसा प्रयत्न करावा म्हणून प्रदर्शनाचे आयोजक काही नियम का घालून देत नाहीत? दलाल, रविवर्मा आदिंच्या चित्रांची हुबेहूब नक्कल, याहून वेगळे, स्वतःचे असे, मग ते साधेसुधे का असेना, काही का केले जात नाही?
असो. आम्हाला त्या दृष्टीने धागाकर्त्याच्या फुलांच्या रांगोळ्याच जास्त भावल्या. अभिनंदन.

अभ्या..'s picture

7 May 2013 - 2:54 pm | अभ्या..

राईट्ट्ट बॉस,
परवा एका मुली वाचवा ह्या विषयावर रांगोळी स्पर्धेत अगदी नेटवरचे सरकारी पोस्टर्सचे कलर प्रिंटआऊट घेऊन ते रांगोळीद्वारे उतरविण्यात स्पर्धक मग्न होते. माध्यम कोणतेही असो, जलरंग, तैलरंग किंवा रांगोळी. ओरिजिनॅलिटी महत्वाचीच. म्हणून मला ठिपक्याभोवती काढलेल्या कानडी रांगोळ्या जास्त आवडतात. त्यात कला असते, कुसर नाही (सौजन्यः अर्थात पु. ल.) म्हणून गुर्जींच्या पुष्परंगावली जास्त मोलाच्या. :)
@गुर्जी: ह्या रांगोळ्या काढण्यातल्या कष्टांची मला कल्पना आहे कमी लेखायचा उद्देश नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

7 May 2013 - 4:29 pm | अत्रुप्त आत्मा

चित्रपुप्त..आपल्या विचारांशी बहुशः सहमत आहे... सरांना हा विचार सांगितला जाइल. सरांनी आपण म्हणता तश्याही कलाकृती सादर केल्या आहेत. पण याविषयी त्यांच्याशी अधिक बोलल्यानंतरच मला या मागचं कारण कळेल. :)

आदूबाळ's picture

7 May 2013 - 11:10 am | आदूबाळ

@अआ - सुंदर रांगोळ्या!

धनुअमिता's picture

7 May 2013 - 2:26 pm | धनुअमिता

अप्रतिम..... सुरेख........सुंदर रांगोळ्या

मराठे's picture

7 May 2013 - 9:14 pm | मराठे

छान.