कोलंबी पुलाव

जागु's picture
जागु in पाककृती
27 Apr 2013 - 3:13 pm

साहित्यः
२ वाटे कोलंबी सोलून.
२-३ कांदे उभे चिरुन
३ टोमॅटोंची मिस्करमधून काढलेली प्युरी
१ बटाट्याच्या किंवा गरजेनुसार बटाट्याच्या फोडी
बासमती किंवा कोणताही जुना तांदूळ ४ वाट्या.
२ चमचे आल लसुण पेस्ट
१ चमचा मिरची कोथिंबीर पेस्ट
३-४ दालचीनीचे तुकडे
४-५ लवंगा
७-८ मिरी
२-३ वेलच्या
३-४ तमालपत्र
पाव चमचा हिंग
१ चमचा हळद
२ चमचे मसाला
चवीनुसार मिठ
२ पळ्या तेल

(फोटोतील प्रमाण थोड्याफार फरकाने वेगळे आहे कृपया कोणी मिरीदाणे, लवंगा वगैरे मोजू नका :हाहा:)

कृती:
१) तांदुळ धुवुन निथळून ठेवा. (जमल्यास १ तास आधी)

२) कोलंबीला आल्,लसुण, मिरची,कोथिंबीर पेस्ट लावून घ्या.

३) भांड्यात तेल चांगले गरम करुन त्यात प्रथम दालचीनी, वेलची, तमालपत्र, मिरी, लवंग टाकून त्यावर कांदा टाका व कांदा गुलाबी रंग येई पर्यंत शिजू द्या. कांदा कुरकुरीत झाल्यास अजून चविष्ट लागतो पण त्यासाठी थोडे जास्त तेल वापरावे लागते.

४) शिजलेल्या कांद्यावर हिंग, हळद, मसाला, कोलंबी व बटाटे घाला व चांगली एक वाफ येऊ द्या. (जर कुकर मध्ये करणार असाल तर बाकीचे सगळे एकत्र टाकले तरी चालते वाफ न आणता)

५) आता टोमॅटो प्युरी, घाला व जरा परतवा.

६) ह्या मिश्रणावर तांदूळ, मिठ घाला भात शिजवण्यासाठी लागते तेवढे पाणी घाला व ढवळून मध्यम आचेवर पुलाव शिजत ठेवा.

७) ७-८ मिनीटांनी ढवळा व पुन्हा शिजू द्या पाणी आटले की गॅस मंद करुन झाकण ठेवून पुलाव वाफेवर ठेवा. ( हे सगळी भात शिजवण्याचीच प्रोसेस करायची आहे.)

हा झाला आहे कोलंबी पुलाव तय्यार.

अधिक टिपा:
कुकरमध्ये अजुन सोपा पडतो फक्त पाण्याचे प्रमाण थोडे कमी करायचे.

बटाटे नसतील आवडत तर नाही घातले तरी चालतात.

काजू घातले तरी अजुन छान लागतो. व्हेज वाल्यांनी कोलंबी ऐवजी काजू पुलाव करुन खाल्ला तरी चालेल काजू कोलंबीसारखेच दिसतात :हाहा:

मी साधा तांदूळ वापरला आहे. तुम्हाला आवडेल तो तांदूळ वापरा. फक्त नवीन नको.

प्रतिक्रिया

michmadhura's picture

27 Apr 2013 - 3:39 pm | michmadhura

खूप छान झालाय कोलंबी पुलाव जागुताई.

कोमल's picture

27 Apr 2013 - 4:00 pm | कोमल

तोंपासु पाकृ.. विकांताची सोय झाली.. :)

भावना कल्लोळ's picture

27 Apr 2013 - 4:04 pm | भावना कल्लोळ

या विकांताला स्पे. कोळंबी पुलाव

उद्या संकष्टी आहे, आजच खाऊन घेतलेला बरा. :)

सानिकास्वप्निल's picture

27 Apr 2013 - 5:32 pm | सानिकास्वप्निल

छान फोटो आणी कृती :)

विसोबा खेचर's picture

27 Apr 2013 - 5:59 pm | विसोबा खेचर

...........!!!!!!!!!!!!

मुक्त विहारि's picture

27 Apr 2013 - 6:14 pm | मुक्त विहारि

झक्कास..

तुमचा अभिषेक's picture

27 Apr 2013 - 6:32 pm | तुमचा अभिषेक

इथेही कोलंबी... स्वस्त झाली की काय...
कोलंबी अपला वीक पॉईंटच.. त्यामुळे दुसर्‍याच कोलंबीने भरलेल्या ताटाचा फोटो बघून पाणी सुटले

बाकी कोणी कोलंबी पुलावात जेमतेम शोधून शोधून काढाव्या लागतील इतपत कोलंब्या घातल्या की डोक्याला फार शॉट लागतो..

सुहास झेले's picture

27 Apr 2013 - 8:15 pm | सुहास झेले

भारी ..... !!!!

रेवती's picture

27 Apr 2013 - 8:18 pm | रेवती

पापलेट तर तुझ्यामुळे मी खाल्लाच पण आता कोलंबीचेही व्यसन लावणार का?
पुलाव छान दिसतोय.

jaypal's picture

27 Apr 2013 - 8:27 pm | jaypal

कोलंबीच्या बदली बोनलेस पापलेट/ सुरमई / रावस वेगवेगळे अथवा एकत्र घालुन हा पुलाव चविला कसा लागेल? याचाच विचार करतोय.

चिंतामणी's picture

28 Apr 2013 - 1:08 am | चिंतामणी

कोलंबी???????

अत्याचार करण्यापुर्वी याचा विचार कर.

बाकी पाकृ

तोंपासु.

खादाड's picture

28 Apr 2013 - 7:28 am | खादाड

:)

स्पंदना's picture

28 Apr 2013 - 2:17 pm | स्पंदना

चला आणखी एक पुलाव.
मस्त!

jaypal's picture

28 Apr 2013 - 3:02 pm | jaypal

pu

जागुतै नी सांगीतल्या प्रमाणेच फक्त कोळंबीच्या बदली सुरमई मसा वापरला आहे. ह्या पुलावात मीठ कमी टाकुन त्याची भरपाई आमचुर आणि चाट्मसाला वापरुन केली आहे.(प-या तु गवताळ असल्याने पनीर,सुरण किंवा सोया चंकस वापर)

अभ्या..'s picture

28 Apr 2013 - 6:00 pm | अभ्या..

वॉव, काय जबरा फोटो. ब्येस्ट एकदम.
वॉटरमार्क टाकायची गरज नाही. भांड्यावर टाकलेले नांव पण सपष्ट दिसतेय. ;)

वाह ! जयप्या, वाफही सुंदर 'धरली' आहेस. :)

पैसा's picture

6 May 2013 - 7:31 pm | पैसा

एखाद्या स्टिल लाईफ चित्रासारखे दिसतंय!

Mrunalini's picture

29 Apr 2013 - 1:58 pm | Mrunalini

अरे देवा.... तोंपासु :)

कच्ची कैरी's picture

6 May 2013 - 1:18 pm | कच्ची कैरी

माझा आवडता पुलाव :)

सर्वात फेव्हरेट पुलाव.... तोंपासु

पैसा's picture

6 May 2013 - 7:32 pm | पैसा

मुलांना आवडणारी पाकृ!