चिन्यांचा उपद्व्याप

कोमल's picture
कोमल in काथ्याकूट
26 Apr 2013 - 3:45 pm
गाभा: 

दोन तीन दिवसांपूर्वीच्या पेपर मध्ये आलेल्या बातमीने मनात खळबळ माजवली.

  • चीनी हेलिकॉपर्ट्सची भारतीय हवाई हद्दीत ३०० किमी पर्यंत घुसखोरी
  • चीनी सैन्याची देप्सांग खोऱ्यात सुमारे १० किमी पर्यंत घुसखोरी, ६ दिवसांनंतर भारताला खबर

आणि यावर संरक्षण मंत्रांचे वक्तव्य काहीसे असे होते- "चीनकडून होत असलेल्या घुसखोरीच्या मुद्द्यावर 'शांततापूर्ण' मार्ग काढण्यासाठी विविध पातळ्यांवर 'चर्चा' सुरू आहेत. देशाची एकात्मता आणि सुरक्षा यांचे रक्षण करण्यासाठी सरकार आवश्‍यक ती सर्व पावले उचलत आहे."
ghusakhori

आहोत कुठे आपण?? नक्की काय सुरु होणार आहे?? कि झालं आहे पण आपल्याला अजून सुगावा लागलेला नाहीये?
१९६२ च्या युद्धाची ऐंशीत आणि नव्वदीत जन्मलेल्या आमच्या सारख्यांना फारच पुसट (किंवा अगदी नाहीच) झळ लागलेली. इंडो चायना वॉर बद्दल आम्ही ऐकल आमच्या आजी आजोबांकडून, तत्सम व्यक्तींकडून, वाचलं आंतरजालावरील माहितीपर लेखांतून किंवा भा. रा. भागवतांच्या मानस पुत्र फा. फे. कडून.
फा. फे. चा गमतीचा मुद्दा सोडला तर आम्हाला फक्त एवढंच माहित आहे कि चीन सारखा बलाढ्य शत्रू खिशात सुरा घेऊन आपल्या शेजारी येउन बसला होता आणि संधी साधून त्याने आपल्यावर हल्ला केला. तात्कालिक राजकीय परिस्थितीमुळे म्हणा किंवा हिमालयात लष्करास आलेल्या अडचणींमुळे म्हणा आपला त्या युद्धामध्ये पराभव झाला.

आता पुन्हा जर फिरून तशी परिस्थिती निर्माण झाली तर परिणाम काय होऊ शकतील?

आजवर चीन ने या न त्या मार्गाने भारतासाठी प्रश्न निर्माण केले आहेतच. पाकिस्तानला केलेले अप्रत्यक्ष सहकार्य, गेल्या ३ वर्षांत ६०० वेळा केलेली घुसखोरी, याव्यतिरिक्त चिनी साहित्यांनी भारताची बाजारपेठ आणि खाद्यपेठ मोठ्याप्रमाणात बळकावली आहेच. "हिंदी चीनी भाई भाई(??)" म्हणत म्हणत या भाईने तर दादागिरी दाखवायला सुरुवात केली आहे असे वाटते. भारताचा आणि किती भूभाग हा भाई घशात घालणार आहे कुणास ठाऊक??

आजच्या घडीला भारतात असलेली राजकीय परिस्थिती किंवा राजकीय इच्छाशक्ती(!!)(एका दैनिकाच्या संपादकांच्या मते) चीन ला थोपवू शकेल का?
(चीनी बातम्यांनी सुन्न झालेली) कोमल
फोटो गूगल कडून साभार

प्रतिक्रिया

अडीच किमी म्हणजे फ़ारच थोडा भाग परत मिळालाय ना ?

असे कूठे म्हंटले आहे? अडीच किमी मागे ढकलले असे तुम्हीच लिहीले आहे. परत ऐकदा अडीच किमी मागे गेले म्हणजे किती भूभाग मिळाला हे सांगता येणे अशक्य आहे. वस्तुस्थिती माहीत नसतांना उगाच सरकारला दोष देण्यात काय अर्थ आहे. निदान सध्याचे सरकार सैन्याचे आधुनिकीकरण तरी करत आहे, थोडा संयम ठेवा. उगाच उठ्सुठ युध्य करायचे नसते आणि सध्याची देशाची करोनामूळे काय परीस्थीती आहे. ते बघा. आता देशाला युध्य परवडणार आहे का?

तेव्हा सरकारला सल्ला देण्यापेक्षा किलोमीटर आणि चौरस किलोमीटरची उजळणी करावी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jun 2020 - 9:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद वाचलेच नै म्हणजे तुम्ही या धाग्यावरचे कोणतेच. मदनबाणाने दिलेला प्रतिसाद इथे वाचा. बातमीत कितीभाग बळकावला ते सांगितलेले आहे. लडाखमधे चीनची घुसखोरी ही बातमीही वाचून या. राहीला अडीच किलोमिटरच्या बातमीचं तर त्याचीही बातमी ्पाहून आणि वाचून या. आता सरकारच्या वतीने आपल्याकडे काही प्रतिसाद असेल काही माहिती असेल तर ती टाका. उगाच सरकार सरकार करु नये असे वाटते.

माहिती तर काहीच नाही आणि प्रतिसाद लिहित आहात कठीण आहे.

-दिलीप बिरुटे

निदान मला चौरस किलोमीटर आणि किलोमीटर यातला फरक कळतो. तुम्हाला जेव्हा कळू लागेल तेव्हा सांगा मग पुढीलच र्चा करु या.......

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jun 2020 - 8:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खरंच मला माहिती नाही, मला हे मान्य आहे. जर तुम्हाला ते माहिती आहे, त्यातलं गणित कळतं, तर करेक्ट माहिती सांगा. मला समजुन घ्यायला आवडेल. चीनी सैन्य भारताच्या किती हद्दीत आत घुसले ? बातमीत चीनने कोणता कोणत्या भाग बळकावला ते सांगितले आहेच . कोणत्या भागावर हक्क सांगितला आणि आपण कुठे कुठे शेपुट घातलं ते सविस्तर लिहा.

नसेल माहिती तर सोडून द्या.

-दिलीप बिरुटे

अनरँडम's picture

14 Jun 2020 - 10:04 pm | अनरँडम

धागा पेटलेला दिसतो. मोदी योगसाधनेने शिच्या डोक्याचा भुगा करायच्या आत शिला शहाणपण आले ते बरे झाले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Jun 2020 - 1:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारत आणि चीन सैन्यात चकमक आणि भारतीय सैन्य तीन सैनिक शहिद झाल्याची बातमी येत आहे.

-दिलीप बिरुटे

मदनबाण's picture

16 Jun 2020 - 1:35 pm | मदनबाण

१ ऑफिसर आणि २ सैनिक वीरगतीला प्राप्त झाले आहेत ! :(
Indian Army Officer, 2 Soldiers Killed in 'Violent Face-Off' With Chinese Troops in Ladakh's Galwan Valley

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- What stops India from designating Pakistan a terrorist state and cutting off diplomatic relations with it? :- Brahma Chellaney

गोंधळी's picture

16 Jun 2020 - 10:09 pm | गोंधळी

India-China border tension | At least 10 Army personnel killed in Galwan Valley face-off: Report

https://www.moneycontrol.com/news/india/india-china-border-tension-at-le...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jun 2020 - 4:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कालपासून चीनच्या आगळीकीने आपले वीस सैन्यांना वीरगती प्राप्त झाली. सरकारच्या पातळीवर चर्चेच्या फे-या होतील, शांतता बाळगळ्या जाईल. संयम बाळगा असे म्हटल्या जाईल. पण चिन्यांचा हिशेब व्हायलाच पाहिजे.

-दिलीप बिरुटे
(संतापलेला मिपाकर)

अभ्या..'s picture

17 Jun 2020 - 4:32 pm | अभ्या..

तुम्ही मोदिकाकाना दिलेला इशारा पाहता पुरेसे संतापलेले नाहीत असे वाटते.
बेटर लक नेक्स्ट टाईम..
.
गल्लीत फिरुदे
(कंटाळलेला मिपाकर)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jun 2020 - 5:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आम्ही नऊ जून पासून सरकारला सांगत होतो लक्ष घाला. (पाहा आमचे प्रतिसाद) ऐकलं नाही.
आता उद्या सर्वपक्षीय बैठक होत आहे आणि सैनिकांचं बलीदान व्यर्थ जाऊ देणार नाही हे स्टेटमेंट आलं आहे.

आता उशिरा सुचलेलं शहाणपण काय उपयोगाचं.

-दिलीप बिरुटे
(कट्टर भारतीय)

मदनबाण's picture

17 Jun 2020 - 9:44 pm | मदनबाण
मदनबाण's picture

18 Jun 2020 - 12:49 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Photo of the Day: India's Rama takes on China's dragon :- Taiwan News

आपले जे जवान वीरगतीस प्राप्त झाले त्यांच्यावर चीनी सैन्याने मोठे खिळे बसवलेल्या लोखंडी रॉड्स चा वापर करुन हल्ला केल्याचे स्मोर आले आहे.
P1

संदर्भ :- The nail-studded rods used by Chinese on Indian troops

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Photo of the Day: India's Rama takes on China's dragon :- Taiwan News