कैरीचे पन्हे

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in पाककृती
25 Apr 2013 - 7:28 am

मे महिन्याची सुट्टी लागली की माझा आणि माझ्या धाकट्या भावाचा एक अत्यंत आवडता कार्यक्रम असायचा तो म्हणजे I Love you Rasna म्हणत रसना चे सरबत बनवणे :) आम्ही दोघेजण यासाठी प्रचंड उत्सुक असायचो. सरबत पिण्यापेक्षा ते बनवण्याचा उद्योग जास्त enjoyable असायचा. आई रसना चा pack घेऊन यायची. Orange हा all time favorite. कधीतरी कालाखट्टा हि करायचो. सक्काळी सक्काळी आंघोळ करून तयारीला लागायचो.

मोठ्ठ पातेलं, त्यात मापून पाणी, मोजून साखर घालायची आणि ढवळत बसायचं. पाण्यातून साखर अदृश्य कधी होते याकडे आम्ही डोळे लावून असायचो. नंतर त्या pack मधील powder आणि concentrated liquid पाण्यात घातलं की सूर्यगोळा जणू सकाळीच आमच्या सरबतात येउन बुडायचा आणि आमचं सरबत त्याच्या रंगात रंगवायचा. एका आगळ्याच आनंदात आम्ही सरबत बाटलीत भरायचो. त्यातील सांडवासांडवी, चिक्कट हात, रंगलेली फरशी सगळीच मज्जा! fridge मध्ये ती बाटली अशा थाटात विराजमान होई जणू एखादी राजकन्याच!
हि सगळी सरबत कहाणी आठवण्याच कारण म्हणजे आजची आपली recipe "कैरीचे पन्हे". चला.... उन्हाळ्यातील हे घरगुती स्वादिष्ट cold drink बनवूया.

साहित्य: एक मोठ्ठी कैरी (साधारण ४५० ग्रॅम), दुप्पट साखर, चवी पुरते मीठ, वेलची पूड, केशर
साखरेऐवजी तुम्ही गूळ देखील घालू शकता.

कृती: १) कैरीचे साल काढून घ्यावे. सगळा हिरवा भाग काढावा. नंतर ती कैरी cooker मध्ये ३ शिट्या होईपर्यंत वाफवावी.
२) कैरी गार झाली की त्याचा गर काढावा व mixer च्या भांड्यात घालावा. साखर आणि थोडेसे पाणी घालावे व mixer वर वाटून घ्यावे.
३) कैरीच्या paste मध्ये चवीनुसार मीठ घालावे. स्वादाला वेलची पूड घालावी आणि परत एकदा mixer वर वाटून घ्यावे.
४) हा झाला concentrated pulp तयार! fridge मध्ये हा pulp छान टिकतो. पन्हे बनवायचे असेल त्या वेळी २ मोठे चमचे pulp glass मध्ये घ्यावा आणि त्यात तिप्पट गार पाणी घालून चमच्याने ढवळावे. त्यात केशराच्या काड्या घालाव्यात आणि serve करावे.

काही महत्वाचे: १) कैरीची साल पूर्णपणे काढून घ्यावी. कैरीला जर साल राहिली तर ती mixer वर नीट वाटली जात नाही.
२) कैरीच्या आंबटपणानुसार साखरेचे किंवा गूळाचे प्रमाण कमीजास्त करावे.

मूळ प्रेषकः रेश्मा ओक
http://takkuuu.blogspot.in/2013/04/kairipanhe.html

1
2
3
4
5
6

प्रतिक्रिया

इन्दुसुता's picture

25 Apr 2013 - 9:30 am | इन्दुसुता

रसना अजूनही आवडते... ( काही फ्लेवर्स ). लहान पणची आठवण करून दिलीत :)
पन्हे मी असेच करते फक्त कैरी सालासकट उकडून घेते. उकडल्यानंतर कैरीचा गर काढणे सोपे असते. शिवाय मी केशर आणि वेलची पूड एकाच वेळी घालते. :)

पहिला परिच्छेद वाचला आणि ५ मिनिटात लहानपणीचा तो उद्योग डोळ्यासमोरुन गेला.
रसना आणि ती उन्हाळी सुट्टी.. सगळं मागे पडलं :(

निवेदिता-ताई's picture

25 Apr 2013 - 10:22 am | निवेदिता-ताई

:)

अत्रुप्त आत्मा's picture

25 Apr 2013 - 1:53 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink009.gif

आहाहाहा... काय मस्त दिसतय ते पन्हे.. तोंपासु. :)

गौरीबाई गोवेकर's picture

25 Apr 2013 - 2:13 pm | गौरीबाई गोवेकर

मस्तच. उन्हाळ्यात बरो.

वेल्लाभट's picture

25 Apr 2013 - 3:54 pm | वेल्लाभट

खूप खूप धन्यवाद!

- टक्कू
http://takkuuu.blogspot.in/2013/04/kairipanhe.html

स्पंदना's picture

25 Apr 2013 - 4:17 pm | स्पंदना

चव आली तोंडाला पन्ह्याची. मस्त.

कच्ची कैरी's picture

25 Apr 2013 - 6:36 pm | कच्ची कैरी

मस्त ,माझी आई मस्त बनवते हे पन्हे :)

सुहास झेले's picture

25 Apr 2013 - 6:41 pm | सुहास झेले

लै भारी... :) :)

पैसा's picture

25 Apr 2013 - 10:16 pm | पैसा

लेख आणि फोटो छान आहेत. फक्त ते वॉटरमार्क्स जरा मोठे वाटतायत.

सानिकास्वप्निल's picture

26 Apr 2013 - 10:08 pm | सानिकास्वप्निल

जीव तृप्त झाला पन्हे बघून :)
फोटो पण छान आहेत.
गूळ घातलेले पन्हे जास्तं आवडते.

दिपक.कुवेत's picture

27 Apr 2013 - 2:08 pm | दिपक.कुवेत

मला फोटो दिसत नाहियेत....पण खरे पन्हे हे गुळ घातलेलेच.

निशिगंध's picture

27 Apr 2013 - 7:02 pm | निशिगंध

मस्तच आहे...

मदनबाण's picture

29 Apr 2013 - 10:56 am | मदनबाण

पन्ह लयं आवडते मला... :)

किसन शिंदे's picture

1 May 2013 - 9:11 pm | किसन शिंदे

मबा, ठाण्यात गावदेवी मैदानाच्या बाहेर पोळीभाजी केंद्राजवळ कैरीचं पन्ह मिळते, चवीला अतिशय मस्त!

अमोल केळकर's picture

29 Apr 2013 - 11:16 am | अमोल केळकर

हम्म वाचूनच थंड झालो

अमोल केळकर

आंबा (कैरी) आणि चण्याची डाळ त्याचा जे बनवतात (मला नाव माहित नाही) आणि हळदी कुंकूत देतात त्याची पाककृती कोणी मिपा वर टाकेल का?