बिना अंड्याचा केक स्मिता चावरे

ओ॑कार's picture
ओ॑कार in पाककृती
9 Jul 2008 - 2:32 pm

वाढणी:
तुम्ही तुकडे कसे कराल, त्यावर अवलंबून[ मी १२ तुकडे करतो]

पाककृतीला लागणारा वेळ:
६० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस

अडीच कप मैदा, पाउण कप साखर, २ मोठे चमचे साखरेचा पाक, १ कप पाणी व एक कप दूध
१ मोठा चमचा मनुका, ३ चहाचे चमचे[सपाट कापून] बेकिंग पावडर, चिमुटभर मीठ
३ मोठे चमचे लोणी / तूप किन्वा मार्गारीन

क्रमवार मार्गदर्शन:
नेहेमीप्रमाणे तूप [ लोणी/ मार्गारिन] आणि साखर फेसून एकजीव करावी. त्यात साखरेचा पाक

आणि मीठ घालून पुन्हा फेसावे. मग त्यात दूध व पाणी घालावे.

मैदा ३ वेळा चाळून घ्यावा. त्यात बेकिंग पावडर मिसळून पुन्हा एकदा चाळून घ्यावे.

मग हे सर्व साहित्य नीट एकत्र करावे.

ज्या भांड्यात केक भाजायचा आहे, त्या भांड्याला आतून तुपाचा हात फिरवून त्यात थोडा मैदा भुरभुरवावा,

मग त्यात केकचे मिश्रण ओतावे. ३० ते ३५ मिनिटे ओव्हनमध्ये केक भाजावा.

माहितीचा स्रोत:
संग्रहित

अधिक टीपा:
करून पाहा आणि सांगा कसा वाटला.....

प्रतिक्रिया

साबो's picture

11 Jul 2008 - 9:41 am | साबो

आम्हला आस्वाद घेयला चालेल