उपासाचा डोसा मराठीप्रेमी

ओ॑कार's picture
ओ॑कार in पाककृती
9 Jul 2008 - 2:10 pm

वाढणी:
३-४ जण

पाककृतीला लागणारा वेळ:
१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस

भगर - ३ लहान वाट्या, साबुदाणा - १ लहान वाटी भरून
चवीपुरते मीठ
चटणीसाठी- ओले खोबरे (१ वाटी खवून), मिरची-१, मूठभर निवडलेली कोथिंबीर
१" आले, चवीपुरती साखर, लिंबू, मीठ
भाजीसाठी -३ बटाटे उकडून, चमचाभर दाण्याचे कूट, मिरच्या बारीक चिरून
तूप/तेल,

क्रमवार मार्गदर्शन:

रात्री वरई (भगर) व साबुदाणा नीट धुवून वेगवेगळे भिजत टाकावे. दुसरे दिवशी सकाळी ते बारीक वाटून घेवून एकत्र करावे. चवीनुसार मीठ घालून ३ तास झाकून ठेवावे.

डोसे करतेवेळी नॉन्स्टिक तव्यावर वाटीने फिरवून दोसे घालावेत.

अमूल बटर, हिरवी चटणी व सुक्या बटाट्याच्या उपवास भाजीबरोबर गरम गरम सर्व्ह करावेत.

अधिक टीपा:

नेहमी तीच ती खिचडी खाऊन कंटाळा येतो.

(काकडीचा कीस, मिरची-कोथिंबीर पेरून, जाडसर उत्तपेही घालता येतील!)

प्रतिक्रिया

स्नेहश्री's picture

9 Jul 2008 - 3:45 pm | स्नेहश्री

आता आषाढीला करुन बघयल हरकत नाही .

--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी

मला तर स्वप्नातही भुक लागते.... ;)

प्राजु's picture

10 Jul 2008 - 1:11 am | प्राजु

एकदम भारिच की! करून पाहीन नक्की.

आवांतर : नाहीतरी आजकाल पित्ताचा त्रास होतो त्यामुळे मनसोक्त खिचडी खाता येत नाहीच...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/